DNA मराठी

DNA Marathi News

IMG 20240323 WA0002

Ahmednagar News:  सुजय विखे पाटील यांचा विजय निश्चित: लोकनेत्या पंकजा मुंडे

Ahmednagar News:  लोकनेत्या पंकजा मुंडे अहमदनगर जिल्ह्याच्या दौऱ्यावर असताना खासदार डॉ. सुजय विखे पाटील, आमदार मोनिका राजळे आणि शिवाजीराव कर्डिले यांनी त्यांचे यथोचित स्वागत केले.  लोकसभा निवडणुकांची रणधुमाळी सध्या सर्वत्र सुरू झाली आहे. या अनुषंगाने आज पंकजा मुंडे अहिल्यादेवीनगर जिल्ह्याच्या दौऱ्यावर असून त्यांनी भाजपा तथा महायुतीचे अधिकृत उमेदवार डॉ. सुजय विखे पाटील हेच नगर दक्षिण मधून पुन्हा एकदा बाजी मारतील असे भाष्य केले.  पंकजा मुंडे यांचे काल रात्रीच आगमन झाले असून त्यांनी बुऱ्हानगर येथील शिवाजीराव कर्डिले यांच्या निवासस्थानी मुक्काम केला आणि सकाळी दौऱ्यास सुरुवात केली. यादरम्यान त्यांनी पाथर्डी येथील रॅलीत सहभाग दर्शवून नागरिकांनी केलेल्या जंगी स्वागताचा स्वीकार केला.  यावेळी जेसीबीच्या साहाय्याने पुष्पवृष्टी करून नागरिकांनी आपले समर्थन भाजपाच्या या दोन्ही उमेदवारांना दर्शविले. यावेळी त्यांच्यासहित डॉ. सुजय विखे पाटील, मोनिका राजळे आणि शिवाजीराव कर्डिले यांचा क्रेनच्या सहाय्याने मोठा फुलांचा हार घालून स्वागत करण्यात आले. यांनतर त्यांनी पाथर्डी तालुक्यातील विविध गावांमध्ये देखील भेटी दिल्या. तेथेही त्यांचे मोठ्या जल्लोषात स्वागत करण्यात आले.  यावेळी पंकजा मुंडे यांनी स्पष्ट केले की, डॉ. सुजय विखे पाटील यांनी मागील पाच वर्षाचा कालावधी हा विविध विकास कामांमध्ये व्यस्त राहूनच घालवला आहे. निश्चितच त्यांची ही विकासक वाट त्यांना पुन्हा एकदा संसदेत पाठवेल हा मला विश्वास आहे. मागील निवडणूकीच्या काळातही डॉ. सुजय विखेंच्या प्रचारार्थ मी नगर जिल्ह्यात आले होते. यंदाही आले आणि सुजय विखे यांना शुभेच्छा दिल्या. डॉ. सुजय दादांचा विजय निश्चित असून लोकांचे त्यांच्यावरील प्रेम हे अतिशय कौतुकास्पद आहे असे स्पष्ट करून यावेळी मी स्वतः महायुतीच्या माध्यमातून उमेदवार म्हणून लोकसभा निवडणूक लढवत आहे. निश्चितच भारतीय जनता पार्टीच्या वतीने आम्ही सर्वांगीण विकास साधण्यासाठी कटिबद्ध राहू असे मत पंकजा मुंडे यांनी बोलताना व्यक्त केले. तसेच त्यांनी खासदार डॉ. सुजय विखे पाटील आणि विविध मान्यवरांच्या समवेत श्री क्षेत्र मोहोटादेवी येथे देखील श्री जगदंबा मातेचे मनोभावे दर्शन घेतले. तसेच उपस्थित सर्वांशी संवाद साधला. याप्रसंगी भाजपाचे समस्त पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Ahmednagar News:  सुजय विखे पाटील यांचा विजय निश्चित: लोकनेत्या पंकजा मुंडे Read More »

Ramesh Atwale

Ramdas Athawale : मोठी बातमी! केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांच्या गाडीचा अपघात,  कंटेनरने दिली धडक

Ramdas Athawale : केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांच्या गाडीला कंटेनरने धडक दिल्याने अपघात झाला.   केंद्रीय सामाजिक न्याय आणि अधिकारिता राज्यमंत्री रामदास आठवले साताऱ्याहून मुंबईच्या दिशेने येत असताना हा अपघात झाला.  सातारा जिल्ह्यातील वाई येथे हा अपघात झाल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले.  रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे (आरपीआय) प्रमुख रामदास आठवले यांच्या गाडीला अचानक ब्रेक लागल्याने कंटेनरला धडकली. या धडकेने कारच्या पुढील भागाचे नुकसान झाले. प्रत्यक्षदर्शींनी दिलेल्या माहितीनुसार, आठवले यांची गाडी पुढे जाणाऱ्या कंटेनरने अचानक ब्रेक लावल्याने कंटेनरला धडकली. या अपघातात सुदैवाने कोणीही जखमी झाले नाही. सातारा एसपी समीर शेख यांनी केंद्रीय मंत्री आठवले सुरक्षित असून या दुर्घटनेत कोणीही जखमी झाले नसल्याची पुष्टी केली. त्यानंतर आठवले दुसऱ्या वाहनाने मुंबईला रवाना झाले. पोलीस या प्रकरणाचा तपास करत आहेत.

Ramdas Athawale : मोठी बातमी! केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांच्या गाडीचा अपघात,  कंटेनरने दिली धडक Read More »

IMG 20240322 WA0003

Ahmednagar News:  गावठी हातभट्टी चालकाविरुद्ध मोठी कारवाई, एक लाख 62 हजार किमतीचा मुद्देमाल नष्ट

Ahmednagar News :- लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर नगर तालुका पोलीस ठाण्याकडून अवैध हातभट्टी चालकावरती कारवाईची मोहीम सुरू करण्यात आली आहे.  नगर तालुका पोलीस स्टेशन ठाण्याच्या हद्दीतील साकत गाव व या परिसरात हातभट्टी दारू उत्पादन करून विक्री होत असल्याची गुप्त माहिती पोलीस निरीक्षक प्रल्हाद गीते यांना   मिळाली होती.  मिळालेल्या माहितीवरून तत्काळ पथकासह स्वतः पोलीस निरीक्षक प्रल्हाद गीते साकत गावच्या शिवारातील 13/15 सुमारास छापा टाकून हातभट्टी चालक सोमनाथ नारायण पवार (राहणार साकत ताजी अहमदनगर) याच्या कब्जात 36000 किमती चा गावठी हातभट्टी तयार करण्याची कच्चे रसायनसह मुद्देमाल नष्ट करण्यात आला व सदर आरोपीविरुद्ध महाराष्ट्र दारूबंदी कायदा कलम 65 (ई)(फ) प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला. दुसरी कारवाई साकत गावच्या शिवारात 14/30 छापा टाकला असता आरोपी हरिभाऊ मौला पवार (गाव-साकत खुर्द ता .जि.अहमदनगर) याच्या कब्जात 38 हजार रुपये किमतीचे हातभट्टी दारू तयार करण्याचे साहित्य नष्ट करण्यात आले. सदर आरोपी विरोधात महाराष्ट्र दारूबंदी कायदा कलम 65 (फ) (क) (ड) (ई) प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला  तिसरी कारवाई  साकत गावाच्या शिवारात सीना नदी पात्रात   छापा टाकला असता आरोपी सोपान हरिभाऊ पवार (गाव- साकत खुर्द ता.जि. अहमदनगर) याच्या कब्जात 42 हजार रुपये किमतीचे हातभट्टी दारू तयार करण्याचे साहित्य नष्ट करण्यात आले व सदर आरोपी विरोधात महाराष्ट्र दारूबंदी कायदा कलम 65 (फ )(क) (ड) (ई)प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला चौथी कारवाई साकत गावच्या शिवारात 16.30 पास्ता छापा टाकला असता आरोपी आकाश महिपती पवार (गाव,रा साकत ता, जि अहमदनगर) याच्या घराची झडती घेतली असता त्याच्या कब्जात 46000 रू हजार रुपये किमतीचा मुद्देमाल कच्चे रसायन व गावठी हातभट्टी तयार दारू साहित्य मिळून आल्याने ते नष्ट करण्यात आले सदर आरोपी विरोधात महाराष्ट्र दारूबंदी कायदा कलम 65 (ई)(फ) प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला. सदर चार कारवाई मध्ये एकूण एक लाख 62 हजार किमतीचा मुद्देमाल नष्ट करून चार आरोपी विरोधात गुन्हा दाखल करून ताब्यात घेण्यात आले. पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक गांगुर्डे करत आहेत.

Ahmednagar News:  गावठी हातभट्टी चालकाविरुद्ध मोठी कारवाई, एक लाख 62 हजार किमतीचा मुद्देमाल नष्ट Read More »

Raj Thackeray

Maharashtra Politics : भाजपला ‘राज ठाकरे’ ची गरज का?, एका क्लीकवर समजून घ्या संपूर्ण राजकीय खेळ 

Maharashtra Politics : गेल्या तीन-चार दिवसांपासून पुन्हा एकदा महाराष्ट्र नवनिर्माण सेना आगमी लोकसभा निवडणुकीपूर्वी महायुतीत शामिल होणार असल्याची चर्चा सुरू झाली आहे.   सध्या महायुतीमध्ये भाजपसह एकनाथ शिंदे यांची शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) यांचा समावेश आहे. मात्र तरीही देखील भाजपला राज ठाकरेंच्या मनसेची गरज का? असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.   अलीकडच्या काळात राज ठाकरे यांनी हिंदू नेता म्हणून आपली प्रतिमा निर्माण करण्याचा प्रयत्न केला. राज ठाकरेंची ही प्रतिमा भाजपच्या हिंदुत्ववादी भूमिकेशी जुळते. चुलतभाऊ उद्धव ठाकरे सत्तेत असताना राज यांनी मशिदींमध्ये लावलेल्या लाऊडस्पीकरचा मुद्दा उपस्थित केला होता, त्यानंतर टोलवरून एकनाथ शिंदे सरकारला कोंडीत पकडण्याचा प्रयत्न केला होता. शिवसेना-राष्ट्रवादी असूनही भाजपला मनसेची गरज का? भाजपला एकच आमदार असलेल्या पक्षासोबत युती का करायची आहे? विशेष म्हणजे सत्ताधारी महायुतीमध्ये तीन मोठे पक्ष असले तरी तिन्ही पक्षांमधील जागावाटपाचा प्रश्न सुटत नसताना भाजप मनसेला बरोबर घेण्यास उत्सुक आहे. त्यामागचे महत्त्वाचे कारण म्हणजे ‘ठाकरे ब्रँड’. मुंबईत ‘ठाकरे ब्रँड’ गेल्या लोकसभा निवडणुकीत मुंबईतील सहाही जागा भाजप-शिवसेना युतीने जिंकल्या होत्या. दोन्ही पक्षांना 3-3 जागा मिळाल्या. मात्र यानंतर भाजप आणि शिवसेना वेगळे झाले. त्यानंतर शिवसेनेत फूट पडली. तीनपैकी दोन खासदारांनी शिवसेनेची (एकनाथ शिंदे) बाजू घेतली. पण पक्षाचे नाव आणि त्याचे चिन्ह गमावलेले उद्धव ठाकरे आजही मुंबईच्या राजकारणावर वर्चस्व गाजवत आहेत.  उद्धव यांचा पराभव करण्यासाठी भाजपला ‘ठाकरे ब्रँड’ हवा आहे. राज ठाकरेंच्या मनसेला मुंबईशिवाय ठाणे आणि नाशिकमध्येही चांगला पाठिंबा आहे. ‘ठाकरे’ विरुद्ध ‘ठाकरे’ एकनाथ शिंदे यांच्या बंडखोरीमुळे शिवसेनेत फूट पडली, त्यामुळे शिवसेनेच्या मूळ मतदारांचा उद्धव ठाकरेंबद्दल सहानुभूती असल्याचे राजकीय जाणकारांचे म्हणणे आहे.  मुंबई, ठाण्यासह राज्यातील कोकणपट्ट्यात उद्धव ठाकरे यांना मोठा समर्थन दिसून येत आहे. सहानुभूतीच्या जोरावर ठाकरे पुन्हा एकदा मुंबईत विजयी होऊ शकतात आणि याचा फायदा त्यांना आगामी बीएमसी निवडणुका आणि राज्याच्या विधानसभा निवडणुकीतही मिळेल. त्यामुळे उद्धव ठाकरेंना रोखण्यासाठी भाजपला राज ठाकरेंचा ढाल म्हणून वापर करायचा आहे. मराठी अस्मिता आणि मराठी माणूस हिंदुत्वाचा मुद्दा बनवून शिंदे सेना आणि भाजप उद्धव ठाकरेंवर निशाणा साधत आहेत, तर उद्धव प्रत्युत्तरात भ्रष्टाचार, कुशासन, मराठी अस्मिता, उद्योग गुजरातमध्ये नेण्याचे मुद्दे उपस्थित करत आहेत. या प्रश्नांची उत्तरे राज ठाकरेंनी दिली तर भाजपसाठी ते अधिक फायदेशीर ठरेल.  कारण बाळासाहेबांच्या मार्गदर्शनाखाली ‘नेता’ बनलेल्या राज ठाकरेंना महाराष्ट्राचा धर्म, मराठी अस्मिता यांसारख्या मुद्द्यांवर प्रभावीपणे मुकाबला कसा करायचा हे चांगलंच माहीत आहे. राज्यात आपला पाया भक्कम करणाऱ्या मराठी माणसाचा मुद्दा मनसेने सुरुवातीलाच उचलून धरला होता. विचारधारांची लढाई काँग्रेससोबतच्या महाविकास आघाडीत सहभागी होऊन बाळासाहेब ठाकरे यांची विचारधारा सोडून दिल्याचे सांगत शिंदे यांची शिवसेना आणि भाजप सातत्याने उद्धव ठाकरेंवर टीका करत आहेत.  दुसरीकडे, गेल्या काही वर्षांपासून मनसे आक्रमक हिंदुत्ववादी पक्ष म्हणून स्वत:ला सादर करत आहे. त्यामुळे भाजपसोबत गेल्यास त्यांना विचारसरणीची अडचण येणार नाही. उलट राजबाबत बाळासाहेबांच्या हिंदुत्वाचा मार्ग अवलंबत असल्याचा मेसेज मतदारांमध्ये देण्याचा प्रयत्न भाजप करणार आहे.

Maharashtra Politics : भाजपला ‘राज ठाकरे’ ची गरज का?, एका क्लीकवर समजून घ्या संपूर्ण राजकीय खेळ  Read More »

Prostitution Racket

Pune News : धक्कादायक! मॉलमध्ये हायप्रोफाईल सेक्स रॅकेट उघड, मॅनेजरला अटक

Pune News : गेल्या काही दिवसांपासून पुणे जिल्ह्यात सुरू  असणाऱ्या हायप्रोफाईल वेश्याव्यवसाय रॅकेटचा सातत्याने पर्दाफाश होत आहे.    पुन्हा एकदा हायप्रोफाईल वेश्याव्यवसाय रॅकेट पर्दाफाश झाला आहे. पिंपरी-चिंचवडमध्ये ‘स्पा’ सेंटरच्या नावाखाली वेश्याव्यवसाय चालवणाऱ्या टोळीचा पर्दाफाश झाला आहे.  पोलिसांनी या वेश्याव्यवसाय रॅकेटचा पर्दाफाश करत चार मुलींना वाचवले आहे.मिळालेल्या माहितीनुसार, निगडी परिसरातील फिनिक्स स्पामध्ये वेश्याव्यवसायाचा काळा धंदा सुरू असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. माहितीवरून पोलिसांनी  कारवाई करत चार मुलींची सुटका केली असून स्पाच्या महिला व्यवस्थापकाला ताब्यात घेतले आहे. पोलिसांनी सांगितले की, अनैतिक वाहतूक प्रतिबंध विभागाला निगडीतील इन्स्पिरिया मॉलमधील फिनिक्स नावाच्या स्पामध्ये वेश्या व्यवसाय चालविला जात असल्याची माहिती मिळाली.  त्यानंतर पोलिसांनी त्या स्पामध्ये बनावट ग्राहक पाठवले. वेश्याव्यवसायाची खात्री झाल्यानंतर पोलिसांच्या पथकाने ‘स्पा’वर छापा टाकला. या प्रकरणात चार मुलींना वाचवण्यात पोलिसांना यश आले. महिला व्यवस्थापकाला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. या प्रकरणातील फरार आरोपी दिनेश गुप्ताचा ते शोध घेत आहेत. पैशाचे आमिष दाखवून मुलींना वेश्याव्यवसायात ढकलण्यात आल्याचा आरोप आहे. त्यामुळे पोलीस चारही मुलींना पुनर्वसन केंद्रात पाठवू शकतात. या प्रकरणाचा पुढील तपास सुरू आहे.

Pune News : धक्कादायक! मॉलमध्ये हायप्रोफाईल सेक्स रॅकेट उघड, मॅनेजरला अटक Read More »

Ram Shinde

Ram Shinde : राम शिंदे कडून विखेंना शुभेच्छा, राम शिंदेंनी केला होता खासदारकीसाठी दावा

Ram Shinde : भाजपकडून लोकसभेचे उमेदवारांची यादी जाहीर झाली यामध्ये नगर दक्षिण मधून सुजय विखे यांना उमेदवारी जाहीर झाली. लोकसभेच्या अनुषंगाने  नगर शहरांमध्ये भाजपाच्या पदाधिकाऱ्यांची बैठक पार पडली. यावेळी भाजप आमदार राम शिंदे यांनी मंचावरच सुजय विखे यांना  शुभेच्छा देत त्यांचा सत्कार देखील केला. खासदार सुजय विखे यांनी देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पुन्हा एकदा पंतप्रधान करायचा आहे त्यासाठी सर्व एकत्र येऊन  काम करणार असल्याचं दोघांनी सांगितलं, लोकसभेची यादी जाहीर होतात येणाऱ्या निवडणुकीच्या अनुषंगाने भाजपची नगर शहरात आढावा बैठक पार पडली आहे. लोकसभेची रणनीती काय असणार यावरती करण्यात आली. यावेळी भाजपाचे उमेदवार सुजय विखे तसेच आमदार बबनराव पाचपुते, आमदार मोनिका राजळे, आमदार राम शिंदे तसेच माजी आमदार शिवाजी कर्डिले यांच्यासह अनेक कार्यकर्ते तसेच पदाधिकारी उपस्थित होते. याप्रसंगी आमदार राम शिंदे बोलताना म्हणाले की, भाजपकडून नगर दक्षिण लोकसभेसाठी सुजय विखे यांना उमेदवारी जाहीर करण्यात आली. मी देखील लोकसभेच्या उमेदवारीसाठी इच्छुक होतो मात्र पक्षाने घेतलेल्या निर्णयाचं मी स्वागत केलं तसेच मी सुजय विखे यांना निवडणुकीसाठी शुभेच्छा देखील दिले आहे. तर एकत्र येऊन काम करत असल्याचा सुजय विखे यांनी सांगितलं.

Ram Shinde : राम शिंदे कडून विखेंना शुभेच्छा, राम शिंदेंनी केला होता खासदारकीसाठी दावा Read More »

Asaduddin Owaisi

AIMIM ने केली ‘इतक्या’ लोकसभा उमेदवारांची घोषणा; कोणाचा खेळ बिघडवणार ?

AIMIM Lok Sabha Candidate: ऑल इंडिया मजलिस इत्तेहादुल मुस्लिमीन (AIMIM) ने लोकसभा निवडणूक 2024 तीन लोकसभा उमेदवारांची घोषणा केली. तर येत्या काही दिवसात आणखी काही उमेदवारांची घोषणा करणार असल्याची माहिती पक्षाचे अध्यक्ष असदुद्दीन ओवेसी यांनी दिली आहे.  पक्षाध्यक्ष असदुद्दीन ओवेसी यांनी माहिती देत सागितले की, 2024 च्या लोकसभा निवडणुकीसाठी  औरंगाबादमधून इम्तियाज जलील आणि किशनगंजमधून अख्तरुल इमान हे एआयएमआयएमचे उमेदवार असतील. पक्षाचे अध्यक्ष असदुद्दीन ओवेसी स्वतः तेलंगणातील हैदराबाद लोकसभा मतदारसंघातून निवडणूक लढवणार आहेत.  त्यांनी सांगितले की, लवकरच बिहार, उत्तर प्रदेश, महाराष्ट्रासह इतर राज्यांमध्ये उमेदवार जाहीर केले जातील. AIMIM महाराष्ट्रात 6 जागांवर निवडणूक लढवणार एआयएमआयएम पक्ष बिहार, उत्तर प्रदेश आणि महाराष्ट्रात किती जागा लढवणार याचा निर्णय अद्याप झालेला नाही. ही वेगळी बाब आहे की पक्षाचे नेते सय्यद इम्तियाज जलील यांनी महाराष्ट्रात 6 जागांवर निवडणूक लढवणार असल्याचे सांगितले होते. यामध्ये मुंबई, छत्रपती संभाजीनगर, नांदेड, धुळे आणि विदर्भातील एका मतदारसंघाचा समावेश आहे. AIMIM बिहारमध्ये 11 जागांवर निवडणूक लढवू शकते एआयएमआयएम बिहार, उत्तर प्रदेश आणि महाराष्ट्रातील पक्षाध्यक्षांशी चर्चा करत आहे. लवकरच येथेही उमेदवार जाहीर केले जातील. बिहारमध्ये पक्ष 11 जागा लढवण्याची शक्यता आहे. याशिवाय पक्ष यावेळी उत्तर प्रदेशमध्ये निवडणूक लढवणार आहे.  काँग्रेस, समाजवादी  आणि राजद यांचं टेन्शन वाढणार ? एआयएमआयएमने उत्तर प्रदेश आणि बिहारमध्ये निवडणूक लढवण्याची घोषणा केल्याने समाजवादी पक्ष आणि काँग्रेसच्या हृदयाचे ठोके वाढले आहेत. दोन्ही ठिकाणी उमेदवार उभे केल्यास निश्चितच नुकसान होईल. कारण AIMIM चा मतांचा आधार मुस्लिम आहे.  समाजवादी पक्ष, काँग्रेस आणि राजद यांचाही हा आधार आहे. गेल्या लोकसभा निवडणुकीत इम्तियाज जलील औरंगाबादमधून विजयी झाले होते, तर ओवेसी हैदराबादमधून खासदार आहेत. अख्तरुल इमान हे बिहार विधानसभेचे आमदार आहेत.

AIMIM ने केली ‘इतक्या’ लोकसभा उमेदवारांची घोषणा; कोणाचा खेळ बिघडवणार ? Read More »

Voter ID

Lok Sabha Election 2024 ची घोषणा झाली! ‘या’ सोप्या पद्धतीने डाऊनलोड करा Voter Id कार्ड

Lok Sabha Election 2024 : शनिवारी केंद्रीय निवडणूक आयोगाने लोकसभा निवडणुकीच्या तारखा जाहीर केले आहे. सतराव्या लोकसभा निवडणुकीसाठी पुढील महिन्यापासून मतदानाची सुरुवात होणार आहे.  या निवडणुकीमध्ये मतदान करण्यासाठी आपल्या सर्वांना मतदार ओळखपत्राची आवश्यकता आहे. मात्र अद्याप तुम्ही तुमचे मतदान कार्ड डाऊनलोड केलं नसेल तर या लेखात जाणून घ्या तुम्ही घरी बसल्या बसल्या तुमचं मतदान कार्ड कसे डाउनलोड करू शकतात.   हे जाणून घ्या निवडणूक आयोगाच्या अधिकृत वेबसाइटवरून मतदार ओळखपत्र डाउनलोड करणे खूप सोपे आहे. या संपूर्ण प्रक्रियेला फक्त काही मिनिटे लागतील. येथे जाणून घ्या मतदार ओळखपत्र स्टेप बाय स्टेप डाउनलोड करण्याची प्रक्रिया. ही प्रक्रिया पूर्ण करा मतदार ओळखपत्र डाउनलोड करण्यासाठी, सर्वप्रथम तुम्हाला मतदार सेवा पोर्टलवर जावे लागेल. तुम्हाला पोर्टलवर साइन इन करण्याचा पर्याय दिसेल. येथे तुम्हाला तुमचा तपशील भरावा लागेल, त्यानंतर तुम्हाला ‘साइन अप’ करावे लागेल. तुम्हाला पासवर्ड आणि मोबाईल नंबर OTP देखील विचारला जाईल, जो एंटर करावा लागेल. ‘फॉर्म 6’ देखील येथे दिसेल, जेथे सामान्य मतदार म्हणून नवीन नोंदणी केली जाऊ शकते. ‘E-EPIC Download’ चा पर्याय देखील दिसेल, EPIC नंबर भरताना खूप काळजी घ्या आणि विचारपूर्वक टाका. सर्व तपशील योग्यरित्या भरल्यानंतर, ओटीपी प्रविष्ट करण्याचा पर्याय दिसेल.  तुम्ही OTP टाकताच, ‘E-EPIC डाउनलोड करा’ देखील तुमच्या समोर दिसेल, जिथून तुम्ही तुमचे मतदार ओळखपत्र डाउनलोड करू शकता.

Lok Sabha Election 2024 ची घोषणा झाली! ‘या’ सोप्या पद्धतीने डाऊनलोड करा Voter Id कार्ड Read More »

Farmer

PM Kisan Yojana : शेतकऱ्यांनो, ‘ही’ 3 महत्त्वाची कामे पूर्ण करा, नाहीतर मिळणार नाही 2 हजार रुपये

PM Kisan Yojana: देशातील शेतकऱ्यांना आर्थिक मदत देण्यासाठी गेल्या काही वर्षांपासून सरकार प्रधानमंत्री किसान सन्मान निधी राबवत आहे.  या योजनेअंतर्गत कोट्यवधी शेतकऱ्यांना दर चार महिन्यांनी 2000-2000 रुपयांच्या 3 समान हप्त्यांमध्ये वार्षिक 6000 रुपये दिले जातात.  ज्या शेतकऱ्यांकडे 2 हेक्टरपर्यंत जमीन आहे आणि जे भारताचे नागरिक आहेत त्यांना हा लाभ उपलब्ध आहे. हे पैसे थेट शेतकऱ्यांच्या खात्यात डीबीटी हस्तांतरणाद्वारे पाठवले जातात.आतापर्यंत 16वा हप्ता जाहीर झाला होता आणि आता 17वा हप्ता जारी होणार आहे.   17 वा हप्ता कधी येणार? पीएम योजनेच्या नियमांनुसार, पहिला हप्ता एप्रिल ते जुलै दरम्यान, दुसरा हप्ता ऑगस्ट ते नोव्हेंबर दरम्यान आणि तिसरा हप्ता डिसेंबर ते मार्च दरम्यान जारी केला जातो.  दुसऱ्या शब्दांत, आता 17 वा हप्ता एप्रिल ते जुलै दरम्यान जारी केला जाईल. एप्रिल ते जून दरम्यान लोकसभा निवडणुका होणार असल्याने आणि आचारसंहिता लागू असल्याने पुढील हप्ता जून महिन्यात पाठवला जाण्याची शक्यता आहे, कारण निकाल 4 जूनला जाहीर होणार असला तरी अद्याप अधिकृतपणे पुष्टी करणे बाकी आहे. या शेतकऱ्यांना  लाभ मिळणार    या हप्त्याचा लाभ फक्त त्या शेतकऱ्यांनाच मिळेल ज्यांनी त्यांचे बँक खाते आधारशी लिंक केले आहे आणि जमीन पडताळणी eKYC सह केली आहे. eKYC करण्यासाठी तुम्ही तुमच्या जवळच्या CSC केंद्रात किंवा बँकेत देखील जाऊ शकता. यासाठी, तुम्हाला eKYC फॉर्म भरावा लागेल आणि तो कागदपत्रांसह सबमिट करावा लागेल, त्यानंतर तुमचे बायोमेट्रिक केले जाईल आणि नंतर तुमचे eKYC केले जाईल. पीएम किसान योजनेशी संबंधित कोणतीही समस्या असल्यास, शेतकरी pmkisan-ict@gov.in या ईमेल आयडीवर संपर्क साधू शकतात. तुम्ही पीएम किसान योजनेच्या हेल्पलाइन नंबर – 155261 किंवा 1800115526 (टोल फ्री) किंवा 011-23381092 वर संपर्क साधू शकता. eKYC कसे करावे? पीएम किसान योजनेच्या अधिकृत वेबसाइटला भेट द्या आणि फार्मर कॉर्नर अंतर्गत ‘ई-केवायसी’ पर्यायावर क्लिक करा. आता आधार क्रमांक द्या, हा OTP तुमच्या मोबाईल नंबरवर येईल, तो सबमिट करा. ई-केवायसी करण्यासाठी तुम्ही तुमच्या जवळच्या CSC केंद्राला देखील भेट देऊ शकता. येथे जाऊन तुम्ही OTP आधारित eKYC करून घेऊ शकता. जर तुम्हाला पोर्टल किंवा CSC केंद्राद्वारे ई-केवायसी करता येत नसेल, तर तुम्ही बँकेत जाऊनही हे काम करून घेऊ शकता. यासाठी, तुम्हाला eKYC फॉर्म भरावा लागेल आणि तो कागदपत्रांसह सबमिट करावा लागेल, त्यानंतर तुमचे बायोमेट्रिक केले जाईल आणि नंतर तुमचे eKYC केले जाईल. यादीत तुमचे नाव तपासा सर्वप्रथम, तुम्हाला पीएम किसान सन्मान निधीच्या अधिकृत वेबसाइटवर जावे लागेल (https://pmkisan.gov.in/) आणि पोर्टलवर दर्शविणारी आपली स्थिती जाणून घ्या हा पर्याय निवडा. येथे तुमचा नोंदणी क्रमांक टाका, तुमच्याकडे नोंदणी क्रमांक नसेल तर Know your registration no या पर्यायावर क्लिक करा. यानंतर तुम्हाला तुमचा मोबाईल नंबर आणि कॅप्चा टाकावा लागेल. आता तुम्हाला एक OTP मिळेल. OTP टाकल्यानंतर तुम्हाला नोंदणी क्रमांक कळेल. नोंदणी क्रमांक टाकल्यानंतर, तुम्हाला तुमची स्थिती कळेल. तुम्हाला तुमच्यासोबत तुमच्या गावातील लोकांची नावे पाहायची असतील, तर तुम्हाला पीएम किसान पोर्टलवर जाऊन लाभार्थी यादीचा पर्याय निवडावा लागेल. यानंतर तुम्हाला तुमचे राज्य, जिल्हा, ब्लॉक आणि गावाचे नाव टाकावे लागेल. लाभार्थी यादी डाऊनलोड करून, तुमच्या नावासह गावातील आणखी कोणाला या योजनेचा लाभ मिळत आहे हे तुम्ही पाहू शकता.

PM Kisan Yojana : शेतकऱ्यांनो, ‘ही’ 3 महत्त्वाची कामे पूर्ण करा, नाहीतर मिळणार नाही 2 हजार रुपये Read More »

Police

Pune News:  डोक्यावर हातोड्याने वार.. 01 कोटीच्या टर्म इन्शुरन्ससाठी पत्नीने केली पतीची हत्या

Pune News: पुणेमध्ये एक धक्कादायक घटना घडली आहे. या घेटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली असून अनेक चर्चांना उधाण आले आहे.  समोर आलेल्या माहितीनुसार 1 कोटी रुपयांच्या टर्म इन्शुरन्सच्या लोभापोटी पत्नीने पतीची हत्या केली. महिलेने प्रियकरासह हा गुन्हा केला. आरोपीने पीडितेच्या डोक्यावर हातोड्याने वार करून निर्घृण हत्या केली. पिंपरी-चिंचवड शहरात एका महिलेने लष्करात काम करणाऱ्या प्रियकरासह पतीची हत्या केली. ही घटना आळंदी पोलीस ठाण्याच्या हद्दीतील चिंबळी येथे घडली. या घटनेने परिसरात खळबळ उडाली आहे. मृताच्या 1 कोटी रुपयांच्या टर्म इन्शुरन्सवर पत्नीचा डोळा होता. दोघेही ते पैसे आपापसात वाटून घेणार होते. राहुल सुदाम गाडेकर (36) असे आरोपी महिलेच्या पतीचे नाव आहे. या प्रकरणी राहुलची पत्नी सुप्रिया गाडेकर आणि तिचा प्रियकर सुरेश पाटोळे आणि त्याचा साथीदार रोहिदास सोनवणे यांना पोलिसांनी अटक केली आहे.  आरोपी सुरेश हा भारतीय लष्करात कार्यरत असल्याचे सांगण्यात येत आहे. पोलिसांनी सांगितले की, मृत राहुल गाडेकर यांची पत्नी सुप्रिया ही संगमनेर तालुक्यातील निमगाव पंगा येथे गेल्या दोन वर्षांपासून लॅब चालवत होती.  तिथे ती लष्करात कार्यरत असलेल्या सुरेशच्या प्रेमात पडली. हा प्रकार पती राहुलला समजल्यानंतर पती-पत्नीमध्ये नेहमी भांडणे होत होती. यानंतर सुप्रियाने प्रियकराच्या मदतीने पतीला मार्गावरून दूर करण्याचा निर्णय घेतला. अलीकडेच सुरेश पाटोळे सुट्टीवर घरी आले होते, तेव्हा त्यांनी राहुलला मारण्यासाठी दोन लोखंडी हातोडे खरेदी केले होते. त्याचवेळी राहुल गाडेकर यांनी एक कोटी रुपयांचा टर्म इन्शुरन्स घेतल्याचे पोलिसांनी सांगितले. याची माहिती पत्नी सुप्रियाला होती. राहुलच्या मृत्यूनंतर ती सुरेश आणि त्याच्या साथीदाराला काही पैसे देणार होती. राहुल गाडेकर चाकण येथील एका कंपनीत कामावर जात असताना आरोपी सुरेश व रोहिदास यांनी पाठीमागून त्याच्या डोक्यात लोखंडी हातोड्याने वार करून त्याचा खून केला. राहुलचा खून केल्यानंतर आरोपी सुरेश नोकरीवर रुजू झाला. रोहिदास चिंचपूर गावात आपल्या घरी गेला. मात्र तपासादरम्यान पोलिसांना पत्नीवर संशय आला आणि चौकशीत सत्य बाहेर आले. आरोपींनी आपल्या गुन्ह्याची कबुली दिली. या खून प्रकरणातील तिन्ही आरोपींना आळंदी पोलिसांनी अटक केली असून त्यांची चौकशी सुरू आहे.

Pune News:  डोक्यावर हातोड्याने वार.. 01 कोटीच्या टर्म इन्शुरन्ससाठी पत्नीने केली पतीची हत्या Read More »