Dnamarathi.com

Ahmednagar News: ८ मार्च म्हणजे सगळीकडे जागतिक महिला दिन म्हणून साजरा केला जातो मात्र श्रीगोंद्यात एका अल्पवयीन मुलीवरती सामूहिक बलात्कार केल्याप्रकरणी दोघांवर गुन्हा दाखल करण्यात आला.

पोलिसांनी दोघांना जेरबंद करत न्यायालयात हजर केल्यावर त्यांना पोलीस कोठडी सुनावण्यात आलेली आहे.

श्रीगोंदा तालुक्यातील दक्षिणेकडील एका गावातील एका अल्पवयीन म्हणजे नऊ वर्षाच्या मुली वरती दोघांनी सामूहिक बलात्कार केल्याप्रकरणी श्रीगोंदा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून यातील मुख्य आरोपी संतोष रामभाऊ पवार व युवराज नंदू शेंडगे यांनी अल्पवयीन मुली सोबत एक महिन्यांपासून वारंवार बलात्कार केला असून त्याचे मोबाईल चित्रीकरण केल्यानंतर मोबाईल मधील चित्रीकरण नातेवाईकांनी पाहिल्यानंतर ही बाब त्यांच्या लक्षात आल्यानंतर त्यांनी याबाबत या दोघांना विचारणा केली असता त्यांनी सुरुवातीला उडवा उडवीची उत्तर दिली.

 मात्र प्रकरण चांगलेच अंगाशी येत आहे हे लक्षात आल्यानंतर त्यांनी घडलेल्या सगळा प्रकार सांगितला यावरून मुलीच्या नातेवाईकांच्या फिर्यादीवरून संतोष रामभाऊ पवार, युवराज नंदू शेंडगे यांच्यावर पोक्सो ॲट्रॉसिटीसह सामूहिक बलात्काराचा गुन्हा दाखल करण्यात आला असून याबाबत पोलिसांनी दोघांना जेरबंद केले असून त्यांना आज न्यायालयात हजर केले असता त्यांना 14 मार्चपर्यंत पोलीस कोठवडी सुनावण्यात आली.

 या घटनेस चा सर्व प्रकार उपविभागीय पोलीस अधिकारी कर्जत विभाग विवेकानंद वाखारे हे करत आहेत मात्र जागतिक महिलादिनी असा प्रकार घडल्यामुळे तालुक्यात एकच खळबळ उडाली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *