Dnamarathi.com

Ahmednagar News: शेवगाव पोलीसांनी धडाकेबाज कारवाई शेवगाव शहरातुन दोन आरोपींकडुन चार धारदार तलवारी जप्त करुन त्यांना अटक केली आहे. 

 09 मार्च 2024 रोजी आपले पोस्टे हद्दीत कोम्बींग ऑपरेशन राबवुन अवैध धंद्यावर कारवाई, अग्निशस्त्रे व हत्यारे याबाबत मोहीम राबवावी याबाबत  पोलीस अधिक्षक राकेश ओला यांचे आदेश प्राप्त झाले होते. 

 त्याअनुषंगाने शेवगाव पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक दिगंबर भदाणे यांचे आदेशाने दोन पोलीस पथके रवाना करण्यात आली होती. पोलीस निरीक्षक  शेवगाव पोलीस स्टेशन यांना गुप्त बातमीदारामार्फत 06.30 वा. चे सुमारास शेवगाव शहरात कोरडे वस्ती येथील दोन इसम यांनी स्वतः जवळ तलवार बाळगली असल्याची माहिती मिळाली.

या माहितीवरून  विशाल संपत भाकरे (वय-२३ वर्षे रा. कोरडेवस्ती ता. शेवगाव जि. अहमदनगर) व संतोष अशोक घोंगडे (वय-२५ वर्ष रा. कोरडेवस्ती ता. शेवगाव जि. अहमदनगर) यांना पोलीस पथकाने ताब्यात घेवुन

सदर तलवारी बाबत विचारपुस केली असता त्यांनी प्रथम उडवडीचे उत्तरे दिली परंतु पोलीस पथकाने अधिक विश्वासामध्ये घेऊन विचारले असता त्यांनी सांगितले की, सदरच्या तलवारी ह्या घरामध्ये लपवून ठेवल्या आहेत. तुम्ही आमच्या सोबत चला त्या आम्ही काढून देतो.

 तेव्हा आमचे कडिल पोलीस स्टाफ व पंचासमक्ष वरिल दोन्ही आरोपींनी त्यांचे ताब्यातील चार तलवारी काढुन दिल्यानंतर शेवगाव पोलीस स्टेशन भारतीय हत्यार कायदा कलम 4/25 प्रमाने वरिल दोन्ही आरोपीवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

सदरची कारवाई ही  पोलीस अधिक्षक  राकेश ओला सो.अ.नगर,अप्पर पोलीस अधिक्षक प्रशांत खैरे अ.नगर, मा.उपविभागिय पोलीस अधिकारी  सुनिल पाटील उपविभाग शेवगांव यांचे मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक दिगंबर भदाणे, पोसई अमोल पवार, पोहेकॉ नाकाडे, पोहेकॉ दराडे, पोना उमेश गायकवाड, पोकों शाम गुंजाळ, पोकों बप्पासाहेब धाकतोडे, पोकों एकनाथ गर्कळ, पोकों कृष्णा मोरे, पोकों संतोष वाघ, पोकों संपत खेडकर यांनी केली असून पुढील तपास पो.नि. दिंगबर भदाणे यांचे मार्गदर्शनाखाली पोहेकाँ दराडे हे करत आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *