DNA मराठी

BJP

Chandrashekhar Bawankule

Chandrashekhar Bawankule : ‘सुद्धा तोंड सांभाळून बोललं पाहिजे’, चंद्रशेखर बावनकुळेंचा राहुल गांधींना सल्ला

Chandrashekhar Bawankule :  शिंदे गटाचे आमदार संजय गायकवाड यांनी राहुल गांधी यांच्यावर वादग्रस्त वक्तव्य केल्याने राज्यातील राजकारण चांगलंच तापला आहे. यातच भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी राहुल गांधी यांनी सुद्धा तोंड सांभाळून बोललं पाहिजे असा सल्ला दिला आहे. त्यामुळे पुन्हा एकदा राज्यात काँग्रेस आणि भाजपमध्ये आरोप प्रत्यारोप सुरू होण्याची शक्यता आहे.  माध्यमांशी बोलताना चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले, संजय गायकवाड आणि अनिल बोंडे यांच्या अश्या बोलण्याचं समर्थन होऊ शकत नाहीय, असं बोलनही योग्य नाहीय, कुठल्याही व्यक्तीने असं बोलू नये. पण राहुल गांधीने सुद्धा तोंड सांभाळून बोललं पाहिजे. राहुल गांधींनी ज्या पद्धतीने ओबीसी, एस सी, एस टी यांचं आरक्षण काढून टाकू क्लियर आहे त्यांच्या बोलण्या मधे. आता बघा हे लोक आता मोदींच्या विरोधात प्रचार करत सुटले होते की मोदीजी संविधान बदलणार, मोदींनी कधीही संविधान बदलण्याची भाषा केली नव्हती. दहा वर्ष मोदी होते कधी संविधान बदललं नाहीय आणि आताही संविधान बदलणार नाहीय आणि तो बदलूच शकत नाहीय.  आता राहुल गांधीनी पोटातलं ओठांवर आणलं की आम्ही आरक्षण बदलणार आहे आम्हला आरक्षण नको आहे. हेच नेहरूजी म्हटलं होत.. की आरक्षण विकासाला बाधा आहे, हेच राजीव गांधींनी म्हटलं होत की आरक्षण हे बुद्धिहीन लोकांना द्यावं लागत आणि हेच आता राहुल गांधींनी म्हटलं की आम्ही आरक्षण थांबवणार आहे. तीन पिढ्याची भाषा गांधी परिवाराची आरक्षण थांबाविण्याची आहे  राहुल गांधींनी सुद्धा विचार करून बोललं पाहिजे असं भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले.  तसेच यावेळी त्यांनी माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर देखील जोरदार हल्लाबोल केला.  महाविकास आघाडीत मुख्यमंत्री पदाला घेऊन धुसपूस आहे. शरद पवार यांनी सुप्रिया सुळे यांना मुख्यमंत्री करण्याचा चंग बांधला आहे उद्धव ठाकरे कटोरा घेऊन फिरत आहे, मला मुख्यमंत्री करा, मला मुख्यमंत्री करा, काँग्रेसकडे जातं आहे, शरद पवार कडे जातं आहे. काँग्रेसकडे नाना पटोले सारखे दहा नेते तयार झाले आहे.  महाविकास आघाडीकडे मुख्यमंत्री साठी चढाओढ आहे पण आमच्याकडे डबल इंजिन सरकार आलं पाहिजे  2029 पर्यंत केंद्रात मोदीच सरकार आहे आणि राज्यातलं सरकार एका विचारच आलं आणि दोन्ही सरकार एका विचाराचे आले तर महाराष्ट्राच्या 14 कोटी जनतेला फायदा होऊ शकतो. म्हणून महाराष्ट्रात डबल इंजिनच महायुतीच सरकार पाहिजे असेही यावेळी ते म्हणाले.

Chandrashekhar Bawankule : ‘सुद्धा तोंड सांभाळून बोललं पाहिजे’, चंद्रशेखर बावनकुळेंचा राहुल गांधींना सल्ला Read More »

BJP

Maharashtra Election: भाजपाचे विद्यमान आमदार मोनिका राजळे यांना डावलुन शेवगांवांत भाजपाचा भव्य मेळावा….!

Maharashtra Election: शेवगांव व पाथर्डी तालुक्यातील भारतीय जनता पक्षाच्या कार्यकर्त्याचा निर्धार मेळावा शेवगांव येथील लक्ष्मीनारायण मंगल कार्यालय या ठिकाणी भारतीय जनता पार्टीचे महाराष्ट्र प्रदेश सरचिटणीस अरुण मुंढे तसेच ओबीसी सेलचे जिल्हा अध्यक्ष गोकुळ दौंड यांच्या नेतत्वाखाली मेळावा पार पडला. शेवगांव-पाथर्डी विधानसभेच्या भाजपाच्या आमदार मोनिका राजळे यांना डावलुन हा निर्धार मेळावा भाजपाचे राज्य सरचिटणीस अरुण मुंढे आणी ओबीसी सेलचे जिल्हाध्यक्ष गोकुळ दौंड यांनी निर्धार मेळाव्याचे भव्य आयोजन करून अरुण मुंडे व गोकुळ दौंड यांनी आमदार मोनिका राजळे यांच्या विरोधात शेवगांव-पाथर्डी विधानसभेसाठी दंड थोपटले आहे.  मेळाव्यात अरुण मुंढे किंवा गोकुळ दौंड या दोघांपैकी कोणी एकाला पक्षाने विधानसभेची उमेदवारी द्यावी अशा मागणीने जोर धरला असुन विद्यमान आमदार मोनिका राजळे यांना पक्षश्रेष्ठींनी पुन्हा उमेदवारी देऊ नये अन्यथा शेवगाव-पाथर्डी विधानसभा मतदारसंघातील पक्षाचे पदाधिकारी सामुहिक राजीनामे देणार असल्याचे वक्तव्य यांनी केले.  यावेळी भाजपचे शेवगांव तालुकाध्यक्ष तुषार वैद्य, ओबीसी सेलचे जिल्हाध्यक्ष गोकुळ दौंड, जय शिवसंग्राम पक्षाचे जिल्हाध्यक्ष नवनाथराव ईसारवाडे, बाळासाहेब सोनवने, आत्माराम कुंडकर, बाळासाहेब कोळगे, संजय मरकड सह भाजपा पदाधिकारी, कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Maharashtra Election: भाजपाचे विद्यमान आमदार मोनिका राजळे यांना डावलुन शेवगांवांत भाजपाचा भव्य मेळावा….! Read More »

Uddhav Thackeray 1

Uddhav Thackeray : ‘मला भाजपमुक्त राम हवाय, उद्धव ठाकरेंचा पुन्हा मोदींवर हल्लाबोल

Uddhav Thackeray : राज्यात लवकरच विधानसभा निवडणुका जाहीर होणार आहे मात्र त्याआधी सर्व राजकीय पक्षांकडून जोरात तयारी सुरू झाली आहे. यातच शिवसेना बाळासाहेब ठाकरे पक्षाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनी पुन्हा एकदा मुख्यमंत्री एकनाथ शिंदेसह भाजपवर जोरदार टीका केली आहे.  उध्दव ठाकरे म्हणाले की, ‘मी कोणाच्याही विरोधात नाही. भाजपच्या लोकांनी माझे निवडणूक चिन्ह चोरले आहे. 15 लाख देण्याचे बोलले, 15 लाख कुठे गेले? ‘भाऊ-बहिण म्हणणारे कुठे आहेत? आता दिसत नाही. मोठे प्रकल्प गुजरातमध्ये जातात. सर्व गोष्टी गुजरातला जात आहेत. इतर भिकारी आहेत, पण आम्ही भिकारी नाही. ते आम्हाला ‘लाडली बहीण योजने’ अंतर्गत फक्त 1500 रुपये देत आहेत, पण एवढ्यानेही काय होणार? असा प्रश्न त्यांनी यावेळी उपस्थित केला. भाजपमुक्त रामाची इच्छा उद्धव ठाकरे म्हणाले, ‘आदर्श घोटाळा झाला आहे, पण त्यात कोणाचा हात आहे ते कोणी सांगेल का? राम मंदिर बांधण्यासाठी लोकांनी आपले रक्त दिले आहे. सामान्य लोक जय श्री राम म्हणतील आणि तुम्ही फक्त केम छो म्हणतील, पण मला भाजपमुक्त राम हवा आहे, तुम्ही काही महिने थांबा. मी याआधीही सांगितले आहे की तुम्ही किंवा मी पारशी, ख्रिश्चन, मुस्लिम सर्व आमच्यासोबत आहे. ठाकरे म्हणाले की, ‘नोव्हेंबरमध्ये निवडणुका होणार असल्याचं ऐकलं आहे, त्यामुळे ते 4 महिन्यांसाठी फक्त 1500 रुपये देत आहेत. भाजपला संपूर्ण महाराष्ट्र 1500 रुपयांना विकत घ्यायचा आहे का? ही एक योजना आहे, जे तुमचे पैसे आहेत आणि तुम्ही ते घेतलेच पाहिजे.

Uddhav Thackeray : ‘मला भाजपमुक्त राम हवाय, उद्धव ठाकरेंचा पुन्हा मोदींवर हल्लाबोल Read More »

Ajit And Sharad Pawar

Ajit Pawar: अजित पवार नॉट रिचेबल, अनेक चर्चांना उधाण; शरद पवार म्हणाले, अजित पवारांची…

Ajit Pawar:  एकीकडे राज्यात महायुतीच्या नेत्यांकडून लोकसभेच्या जास्तीत जास्त जागा जिंकण्यासाठी जोरदार प्रचार होत आहे. देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी देखील महाराष्ट्रावर विशेष लक्ष देत रोडशो आणि अनेक जाहीर सभा घेत आहे. तर दुसरीकडे राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार लोकसभा निवडणुकीच्या प्रचारातून अचानक गायब झाल्याने अनेक चर्चांना उधाण आले आहे. वाराणसी लोकसभा मतदारसंघातून पंतप्रधान नरेंद्र मोदींनी तिसऱ्यांदा उमेदवारी अर्ज दाखल केला तेव्हा देखील अजित पवार उपस्थित नव्हते.  राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यावेळी उपस्थित होते मात्र अजित पवार उपस्थित नसल्याने राजकीय वर्तुळात अनेक तर्क वितर्क लावण्यात येत आहे. यामुळे अजित पवार नेमकं कुठे आहे याबाबत राष्ट्रवादी नेत्यांना प्रश्न विचारला असता त्यांनी अजित पवारांची तब्येत बरी नसल्याचे सांगितले. माञ राजकीय वर्तुळात अजित पवार महायुतीवर नाराज असल्याचे सांगण्यात येत आहे.  यामुळे अचानक लोकसभा प्रचारातून अजित पवार गायब झाले असल्याची चर्चा होत आहे.  अजित पवार नेमकं कुठे गायब झाले? याबाबत सर्व शरद पवार यांना प्रश्न विचारला होता. यावर उत्तर देत शरद पवार म्हणाले अजित पवारांची तब्येत खराब आहे आणि यामुळे ते आराम करत आहे असं शरद पवार म्हणाले. मात्र अजित पवार महायुतीच्या काही नेत्यांवर नाराज असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू झाली असून मुंबईत आज होणाऱ्या महायुतीच्या सभेत अजित पवार हजर राहणार का? याकडे आता संपूर्ण राज्याचे लक्ष लागून आहे.

Ajit Pawar: अजित पवार नॉट रिचेबल, अनेक चर्चांना उधाण; शरद पवार म्हणाले, अजित पवारांची… Read More »

IMG 20240421 WA0001

BJP News: जनता दल से. यांचा डॉ. सुजय विखे पाटील यांना जाहिर पाठिंबा

BJP News: महायुतीचे उमेदवार खा. डॉ. सुजय विखे पाटील यांचा वाढता जनसंपर्क पाहता विविध सामाजिक संघटना, धार्मिक संघटना आणि छोटेमोठे राजकीय पक्ष त्यांच्या समर्थासाठी पुढे येत आहेत. त्यात आता जनता जल सेक्युलर पक्षाची पडली आहे. अहमदनगर जनता दल से. चे जिल्हाध्यक्ष भगवान बांगर यांनी सुजय विखे पाटील यांना जाहिर पाठिंबा दर्शविला आहे. यामुळे सुजय विखे पाटील यांना अधिक बळ मिळाले आहे.  सुजय विखे पाटील हे अहिल्यानगरचे विद्यमान खासदार असून महायुतीच्या माध्यमातून भाजपचे उमेदवार म्हणुन रिंगणात आहेत. मागील पाच वर्षात केलेल्या विकास कामाच्या जोरावर ते मतदारांपुढे जात आहेत. महायुतीतील घटक पक्षांची त्यांना साथ मिळाल्याने त्यांची बाजू उजवी असल्याचे दिसून येत आहे. त्यात अनेक स्थानिक सामाजिक, धार्मिक संघटना त्यांना सहकार्य करत आहेत. यामुळे त्यांच्या विजयाचे मार्ग अधिक प्रबळ होत आहेत. त्यात आता जनता दल सेक्युलर जोडीला आल्याने जिल्ह्यातील त्यांचे मताधिक्य वाढणार असल्याचे सांगितले जात आहे.  जनता दल से. चे जिल्हाध्यक्ष भगवान बांगर यांनी सांगितले की, सुजय विखे पाटील यांनी मागील पाच वर्षात केलेल्या विकास कामाच्या जोरावर त्यांना आम्ही आमच्या पक्षाचा पाठिंबा जाहिर केला आहे. त्यासाठी जनता दलाचे महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष नाथाभाऊ शेवाळे, यांनी राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि महायुतीचे समन्वयक प्रसाद लाड यांच्याशी पाठिंब्या बाबत चर्चा केली असून त्यांच्या आदेशानुसार आम्ही त्यांना हा पाठिंबा पत्राद्वारे घोषित केला आहे. येणाऱ्या काळात सुजय विखे पाटील हे जिल्ह्याच्या विकासासाठी कामे करतील यावर आमचा विश्वास आहे. असे त्यांनी यावेळी पत्रकारांशी बोलताना सांगितले.

BJP News: जनता दल से. यांचा डॉ. सुजय विखे पाटील यांना जाहिर पाठिंबा Read More »

NDA

Lok Sabha Election 2024  : महायुतीत जागावाटपाचा तिढा सुटेना, ‘या’ 2 जागा भाजपसाठी ठरल्या डोकेदुखी ?

Lok Sabha Election 2024 : आगामी लोकसभा निवडणुकीपूर्वी राज्यातील राजकारणात पुन्हा एकदा मोठा ट्विस्ट समोर आला आहे. मिळालेल्या माहितीनुसार सत्ताधारी महायुतीमध्ये अद्याप देखील जागा वाटपाचा प्रश्न सुटलेला नाही.  यामुळे राज्यात 48 लोकसभा जागांपैकी कोण किती जागावर निवडणूक लढवणार याची अपचारीक घोषणा झालेली नाही.  तर दुसरीकडे मिळालेल्या माहितीनुसार, महायुतीतील जागावाटपाची चर्चा अंतिम टप्प्यात असल्याचे वृत्त आहे. महायुतीच्या 48 पैकी 46 जागांचा फॉर्म्युला निश्चित झाला असून, 2 जागांसाठी अजूनही लढत सुरू असल्याचे सूत्रांनी सांगितले.  भाजपने राज्यात आतापर्यंत 23 उमेदवार जाहीर केले आहेत. तर राष्ट्रवादी आणि शिवसेनेने अद्याप उमेदवार जाहीर केलेला नाही.मिळालेल्या माहितीनुसार, नाशिक आणि ठाण्याच्या जागांबाबत सत्ताधारी महायुतीमध्ये अद्यापही चुरस सुरू आहे. ठाणे लोकसभा जागा मिळविण्यासाठी भाजपचे प्रयत्न सुरू आहेत. ठाण्यात आपली ताकद शिवसेनेपेक्षा जास्त असल्याचा भाजपचा तर्क आहे. त्याचवेळी ठाणे हा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा बालेकिल्ला असल्यानं शिंदे सेना ठाण्याची जागा सोडायला तयार नाहीत. त्यामुळे ही जागा त्यांच्या प्रतिष्ठेची आहे. ठाण्याव्यतिरिक्त नाशिकच्या जागेवरही तिन्ही पक्षांनी दावा केला आहे. या जागांवर शिंदे यांची शिवसेना निवडणूक लढवू शकते कल्याण, दक्षिण मुंबई, दक्षिण मध्य मुंबई, उत्तर पश्चिम मुंबई, पालघर, मावळ, रामटेक, कोल्हापूर, हातकणंगले, बुलढाणा, शिर्डी, हिंगोली, यवतमाळ-वाशीम. अजित पवार यांच्या राष्ट्रवादीला या जागा मिळतील बारामती, शिरूर, रायगड, परभणी (महादेव जाणणे). याशिवाय राज्यातील उर्वरित जागा भाजपच्या खात्यात जाऊ शकतात. ठाण्याला महत्त्व का?  सध्या ठाण्याचे विद्यमान खासदार राजन विचारे आहेत. ते उद्धव ठाकरेंच्या गटात आहेत. या लोकसभा मतदारसंघात भाजपचे 4 आणि शिवसेनेचे 2 आमदार आहेत. याशिवाय हा मतदारसंघ मुख्यमंत्री शिंदे यांचाही मतदारसंघ आहे. नाशिकमध्येही अडचणी? नाशिकच्या जागेवर तिन्ही पक्षांना निवडणूक लढवायची आहे. सध्या नाशिकमधून शिंदे गटाचे हेमंत गोडसे खासदार आहेत. मात्र, राष्ट्रवादीचे दिग्गज अजित पवार गटाचे नेते छगन भुजबळ यांना नाशिकची जागा हवी आहे. याशिवाय ठाण्यात ताकद दाखवून हेमंत गोडसे यांनी आपले इरादे व्यक्त केले आहेत. रविवारी रात्री शिवसेनेचे नाशिकचे सर्व आमदार, अधिकारी आणि खुद्द खासदार गोडसे हे मुख्यमंत्र्यांच्या ठाण्यातील निवासस्थानाबाहेर जमले होते. नाशिक लोकसभा मतदारसंघात भाजपचे तीन आमदार आहेत. त्यामुळे ही जागा काबीज करण्यासाठी भाजप पूर्ण ताकदीनिशी प्रयत्न करत आहे. तर नाशिकमध्ये राष्ट्रवादीचे 2 आणि काँग्रेसचा 1 आमदार आहे. त्यामुळे संख्याबळाचा विचार करता येथे शिवसेनेची ताकद कमी लेखली जात असल्याने राष्ट्रवादी आणि भाजपला ही जागा मिळवायची आहे.  तर मुख्यमंत्री शिंदे यांनी हेमंत गोडसे यांना नाशिकची जागा जाऊ देणार नाही, असे आश्वासन दिले आहे.

Lok Sabha Election 2024  : महायुतीत जागावाटपाचा तिढा सुटेना, ‘या’ 2 जागा भाजपसाठी ठरल्या डोकेदुखी ? Read More »

Shinde And Fadnavis

Loksabha Election 2024 :  ‘या’ जागांवरून भाजप-शिवसेनेमध्ये जोरदार रस्सीखेच, कोण घेणार माघार?

Loksabha Election 2024 : एकीकडे केंद्रीय निवडणूक आयोगाने लोकसभा निवडणुकीच्या 2024 च्या तारखा जाहीर केल्या आहेत.  यावेळी लोकसभा निवडणुकीत देशात 19 एप्रिलपासून एकूण 7 टप्प्यात मतदान होणार आहे. तर या सातपैकी पहिल्या पाच टप्प्यात राज्यात मतदान होणार आहे. मात्र अद्याप देखील राज्यात सत्तेत असणारी महायुतीमध्ये जागा वाटपाचा फॉर्म्युला ठरू शकलेला नाही.  काही दिवसापूर्वी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा राज्यात आले होते तेव्हा त्यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजित पवार, देवेंद्र फडणवीस यांच्याशी जागा वाटपाबाबत चर्चा केली होती. मात्र महायुतीचा जागावाटपाचा फॉर्म्युला ठरू शकला नाही. दुसरीकडे, भाजपने राज्यातील लोकसभेच्या 48 पैकी 20 जागांसाठी उमेदवार जाहीर केले आहेत. 2019 च्या लोकसभा निवडणुकीत भाजपने राज्यात 25 जागा लढवल्या होत्या. यावेळीही त्यापैकी 20 जागांवर उमेदवार उभे करण्यात आले आहेत. ताज्या वृत्तानुसार भाजप आणि शिवसेना यांच्यात चार जागांवर जोरदार रस्सीखेच सुरू आहे. विशेष म्हणजे गेल्या निवडणुकीत या चारही जागा शिवसेनेने (अविभक्त) जिंकल्या होत्या. शिवसेनेत फूट पडल्यानंतर या मतदारसंघातील खासदारांनी एकनाथ शिंदे यांची बाजू घेण्याचा निर्णय घेतला होता. शिवसेना पक्षप्रमुख एकनाथ शिंदे यांनी त्यांना पाठिंबा देणाऱ्या 13 खासदारांची तिकिटे कापू नयेत, अशी मागणी केली आहे. ते मतदारसंघ शिवसेनेसाठी सोडण्याची विनंतीही शिंदे यांनी शहा यांना केली होती. मात्र त्यानंतरही भाजप त्या चार जागांसाठी आग्रही आहे. जागावाटप जिंकण्याच्या क्षमतेच्या आधारे व्हायला हवे, असा युक्तिवाद भाजप करत असल्याचे सूत्रांनी सांगितले. या जागांवर भाजपचा डोळा? वृत्तानुसार भाजपने रामटेक, यवतमाळ-वाशीम, कोल्हापूर आणि उत्तर पश्चिम मुंबईच्या जागांवर दावा केला आहे. सध्या या चार जागांवर शिंदे गटाचे खासदार आहेत. मात्र यावेळी भाजपला या मतदारसंघात आपले उमेदवार उभे करायचे आहेत.  प्रत्यक्षात शिंदेंच्या खासदारांना पुन्हा तिकीट न मिळाल्यास पक्षात अंतर्गत कलह निर्माण होण्याची शक्यता असून अनेक नेतेही शिंदे यांची साथ सोडू शकतात. त्यामुळे कोणत्याही पक्षात नाराजी नको म्हणून जागावाटपाच्या अशा सूत्रावर चर्चा सुरू आहे.

Loksabha Election 2024 :  ‘या’ जागांवरून भाजप-शिवसेनेमध्ये जोरदार रस्सीखेच, कोण घेणार माघार? Read More »

Amit Shah

Amit Shah : अमित शहांचा अचानक महाराष्ट्र दौरा रद्द, अनेक चर्चांना उधाण

Amit Shah : केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांचा छत्रपती संभाजीनगर दौरा रद्द करण्यात आला आहे. भाजपकडून   या दौऱ्याची जोरदार तयारी सुरू होती. मात्र शहा यांचा 15 फेब्रुवारीचा प्रस्तावित दौरा आता पुढे ढकलण्यात आला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, अमित शहा हे 15 फेब्रुवारीला छत्रपती संभाजीनगरमध्ये येणार होते. शाह राज्यातील अकोला, जळगाव आणि छत्रपती संभाजीनगर या 15 लोकसभा मतदारसंघातील तयारीचा आढावा घेणार होते. या भेटीदरम्यान त्यांच्यासोबत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्यासह अन्य दिग्गज नेते उपस्थित राहतील, असे नियोजन करण्यात आले होते. मात्र आता त्यांचा दौरा पुढे ढकलण्यात आला आहे. केंद्रीय मंत्री अमित शहा तीन जिल्ह्यांतील प्रमुख अधिकाऱ्यांना मार्गदर्शन करणार होते आणि त्यांना निवडणूक जिंकण्याचा मंत्र देणार होते. 15 फेब्रुवारी रोजी त्यांनी अकोल्यातील प्रमुख अधिकाऱ्यांच्या बैठकीला सर्वप्रथम संबोधित केले. अकोला बैठकीत अमित शहा अकोला, बुलढाणा, अमरावती, यवतमाळ-वाशीम आणि वर्धा लोकसभा मतदारसंघाचा आढावा घेणार होते. अकोल्यातील बैठकीनंतर अमित शहा उत्तर महाराष्ट्रातील पाच विधानसभा मतदारसंघांचा आढावा घेण्यासाठी जळगावात प्रमुख अधिकाऱ्यांची बैठक घेणार होते. यानंतर सायंकाळी ते छत्रपती संभाजीनगर येथे दर्शनासाठी जाणार होते. यादरम्यान शाह एका मोठ्या जाहीर सभेला संबोधित करणार होते, असे सांगण्यात येत आहे.

Amit Shah : अमित शहांचा अचानक महाराष्ट्र दौरा रद्द, अनेक चर्चांना उधाण Read More »

Devendra Fadnavis

Devendra Fadnavis : छगन भुजबळ यांनी दिला मंत्रिपदाचा राजीनामा! फडणवीस म्हणाले,  मुख्यमंत्री एकनाथ शिंदेच …..

Devendra Fadnavis : राज्यात सध्या मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरून राजकारण तापलं आहे. सरकारने मराठा समाजाला आरक्षण जाहीर केल्यानंतर आता शिंदे सरकारला सर्व बाजूंनी घेरले जात आहे. यातच आता मराठा आरक्षणाच्या निषेधार्थ ओबीसी नेते आणि राज्य सरकारमध्ये मंत्री असणारे छगन भुजबळ यांनी मंत्रिपदाचा राजीनामा दिला आहे. राष्ट्रवादीचे (अजित पवार गट) नेते भुजबळ यांनीच याचा खुलासा केला आहे. गेल्या वर्षी ओबीसींच्या पहिल्या मेळाव्याला संबोधित करण्याच्या एक दिवस आधी त्यांनी मंत्रीपदाचा राजीनामा दिला होता. यावर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी प्रतिक्रिया दिली आहे. 16 नोव्हेंबर 2023 रोजी दोन महिने अगोदर शिंदे सरकारचा राजीनामा दिल्याचा खुलासा ज्येष्ठ नेते छगन भुजबळ यांनी केला. मुख्यमंत्री शिंदे आणि उपमुख्यमंत्री फडणवीस यांनी याबाबत मौन बाळगण्यास सांगितले होते, असा दावा भुजबळ यांनी केला. पण जेव्हा लोक मला बडतर्फ करण्याविषयी बोलत आहेत, तेव्हा मी त्यांना सांगू इच्छितो की, मी दोन महिन्यांपूर्वीच राजीनामा दिला आहे. त्यावर प्रथमच प्रतिक्रिया देताना फडणवीस म्हणाले की, भुजबळांच्या राजीनाम्याबाबत मुख्यमंत्री एकनाथ शिंदेच अधिक माहिती देऊ शकतात. जिल्हा पोलिस दलाच्या वतीने आयोजित कार्यक्रमाला गडचिरोलीत आलेल्या फडणवीस यांनी पत्रकारांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी भुजबळांच्या राजीनाम्यावर प्रतिक्रिया दिली. भुजबळांच्या राजीनाम्याबाबत मुख्यमंत्री शिंदेच सांगू शकतील, असं फडणवीस म्हणाले. आज मी एवढेच सांगेन की आम्ही त्यांचा राजीनामा स्वीकारलेला नाही.  भुजबळ यांच्या राजीनाम्याच्या घोषणेने राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण आले आहे.  भुजबळांनी मराठा आरक्षण सर्वेक्षणावरही प्रश्न उपस्थित केले आहेत. भुजबळ म्हणाले, 360 कोटी रुपये देऊन खोटा रेकॉर्ड तयार केला जात आहे. डेटाशी छेडछाड केली जात आहे. बनावट प्रमाणपत्रे दिली जात आहेत. सर्व मराठ्यांना कुणबी प्रमाणपत्र दिल्यास ओबीसी आरक्षण संपेल. मागासवर्ग आयोगाकडून करण्यात आलेले सर्वेक्षण खोटे आहे. राजीनाम्याबाबत भुजबळ म्हणाले की, राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी यावर बोलू नका असे सांगितले होते. यावर भुजबळ म्हणाले, “मी यावर गप्प राहिलो, मात्र ओबीसींच्या बाजूने बोलल्याबद्दल भुजबळांना मंत्रिमंडळातून हटवा, असे काही लोक म्हणत आहेत. मी शेवटच्या श्वासापर्यंत ओबीसींसाठी लढणार आहे.”

Devendra Fadnavis : छगन भुजबळ यांनी दिला मंत्रिपदाचा राजीनामा! फडणवीस म्हणाले,  मुख्यमंत्री एकनाथ शिंदेच ….. Read More »

Screenshot 2024 02 01 15 59 08 93 6012fa4d4ddec268fc5c7112cbb265e7

BJP News: राष्ट्रवादीचे युवानेते पवनराजे राळेभात यांचा भाजपात प्रवेश

BJP News:  जामखेडच्या राजकारणात मोठा राजकीय भूकंप झाला असून, राष्ट्रवादीचे युवानेते व जामखेड नगरपरिषदेचे नगरसेवक पवनराजे राळेभात यांनी राष्ट्रवादीला रामराम ठोकला आहे. आमदार प्रा. राम शिंदे यांच्या नेतृत्वावर विश्वास दाखवत  राळेभात यांनी भाजपात जाहीर प्रवेश केला.  पवनराजे राळेभात यांनी बुधवारी (ता.३१) चौंडी येथे आ प्रा राम शिंदे यांच्या निवासस्थानी आपल्या शेकडो समर्थकांसह भाजपामध्ये प्रवेश केला. यावेळी भाजपाचे विधानसभाक्षेत्र प्रमुख रवी सुरवसे, तालुकाध्यक्ष अजय काशीद, बाजार समितीचे सभापती शरद कार्ले, माजी सभापती डाॅ.भगवान मुरूमकर, सौ अर्चना ताई राळेभात ; संपत राळेभात ;सचिन पोठरे, माजी उपसभापती दादासाहेब रिठे,  गौतम उत्तेकर, नगरसेवक अमीत चिंतामणी, बिबिशन धनवडे, सोमनाथ राळेभात, तात्याराम पोकळे,, खर्ड्याच्या सरपंच  संजीवनी पाटील, जवळयाचे सरपंच सुशील आव्हाड, उपसरपंच प्रशांत शिंदे, युवानेते राहूल पाटील, डाॅ.ज्ञानेश्वर झेंडे , प्रवीण सानप, मोहन गडदे, डाॅ.विठ्ठल राळेभात यांच्यासह मोठया संख्येने पदाधिकारी उपस्थित होते. दरम्यान पवनराजे राळेभात यांच्या भाजपा प्रवेशाने आ रोहित पवार यांना मोठा धक्का मानला जात आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचा जामखेड शहरातील प्रमुख चेहरा असलेले पवनराजे राळेभात यांचा शहरात मोठा समर्थक वर्ग असल्याने जामखेड शहरात भाजपाची ताकद वाढणार आहे. तर राळेभात यांच्या भाजपा प्रवेशाने  राष्ट्रवादीला पुन्हा एकदा मोठे खिंडार पडले आहे.  यावेळी आमदार राम शिंदे व पवन राळेभात यांनी आपल्या प्रतिक्रिया व्यक्त केल्या.

BJP News: राष्ट्रवादीचे युवानेते पवनराजे राळेभात यांचा भाजपात प्रवेश Read More »