Dnamarathi.com

Ajit Pawar:  एकीकडे राज्यात महायुतीच्या नेत्यांकडून लोकसभेच्या जास्तीत जास्त जागा जिंकण्यासाठी जोरदार प्रचार होत आहे. देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी देखील महाराष्ट्रावर विशेष लक्ष देत रोडशो आणि अनेक जाहीर सभा घेत आहे.

तर दुसरीकडे राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार लोकसभा निवडणुकीच्या प्रचारातून अचानक गायब झाल्याने अनेक चर्चांना उधाण आले आहे. वाराणसी लोकसभा मतदारसंघातून पंतप्रधान नरेंद्र मोदींनी तिसऱ्यांदा उमेदवारी अर्ज दाखल केला तेव्हा देखील अजित पवार उपस्थित नव्हते.

 राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यावेळी उपस्थित होते मात्र अजित पवार उपस्थित नसल्याने राजकीय वर्तुळात अनेक तर्क वितर्क लावण्यात येत आहे. यामुळे अजित पवार नेमकं कुठे आहे याबाबत राष्ट्रवादी नेत्यांना प्रश्न विचारला असता त्यांनी अजित पवारांची तब्येत बरी नसल्याचे सांगितले. माञ राजकीय वर्तुळात अजित पवार महायुतीवर नाराज असल्याचे सांगण्यात येत आहे.  यामुळे अचानक लोकसभा प्रचारातून अजित पवार गायब झाले असल्याची चर्चा होत आहे. 

अजित पवार नेमकं कुठे गायब झाले? याबाबत सर्व शरद पवार यांना प्रश्न विचारला होता. यावर उत्तर देत शरद पवार म्हणाले अजित पवारांची तब्येत खराब आहे आणि यामुळे ते आराम करत आहे असं शरद पवार म्हणाले. मात्र अजित पवार महायुतीच्या काही नेत्यांवर नाराज असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू झाली असून मुंबईत आज होणाऱ्या महायुतीच्या सभेत अजित पवार हजर राहणार का? याकडे आता संपूर्ण राज्याचे लक्ष लागून आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *