Dnamarathi.com

Chandrashekhar Bawankule :  शिंदे गटाचे आमदार संजय गायकवाड यांनी राहुल गांधी यांच्यावर वादग्रस्त वक्तव्य केल्याने राज्यातील राजकारण चांगलंच तापला आहे. यातच भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी राहुल गांधी यांनी सुद्धा तोंड सांभाळून बोललं पाहिजे असा सल्ला दिला आहे. त्यामुळे पुन्हा एकदा राज्यात काँग्रेस आणि भाजपमध्ये आरोप प्रत्यारोप सुरू होण्याची शक्यता आहे. 

माध्यमांशी बोलताना चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले, संजय गायकवाड आणि अनिल बोंडे यांच्या अश्या बोलण्याचं समर्थन होऊ शकत नाहीय, असं बोलनही योग्य नाहीय, कुठल्याही व्यक्तीने असं बोलू नये. पण राहुल गांधीने सुद्धा तोंड सांभाळून बोललं पाहिजे. राहुल गांधींनी ज्या पद्धतीने ओबीसी, एस सी, एस टी यांचं आरक्षण काढून टाकू क्लियर आहे त्यांच्या बोलण्या मधे. आता बघा हे लोक आता मोदींच्या विरोधात प्रचार करत सुटले होते की मोदीजी संविधान बदलणार, मोदींनी कधीही संविधान बदलण्याची भाषा केली नव्हती. दहा वर्ष मोदी होते कधी संविधान बदललं नाहीय आणि आताही संविधान बदलणार नाहीय आणि तो बदलूच शकत नाहीय.

 आता राहुल गांधीनी पोटातलं ओठांवर आणलं की आम्ही आरक्षण बदलणार आहे आम्हला आरक्षण नको आहे. हेच नेहरूजी म्हटलं होत.. की आरक्षण विकासाला बाधा आहे, हेच राजीव गांधींनी म्हटलं होत की आरक्षण हे बुद्धिहीन लोकांना द्यावं लागत आणि हेच आता राहुल गांधींनी म्हटलं की आम्ही आरक्षण थांबवणार आहे.

तीन पिढ्याची भाषा गांधी परिवाराची आरक्षण थांबाविण्याची आहे  राहुल गांधींनी सुद्धा विचार करून बोललं पाहिजे असं भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले. 

तसेच यावेळी त्यांनी माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर देखील जोरदार हल्लाबोल केला.  महाविकास आघाडीत मुख्यमंत्री पदाला घेऊन धुसपूस आहे. शरद पवार यांनी सुप्रिया सुळे यांना मुख्यमंत्री करण्याचा चंग बांधला आहे उद्धव ठाकरे कटोरा घेऊन फिरत आहे, मला मुख्यमंत्री करा, मला मुख्यमंत्री करा, काँग्रेसकडे जातं आहे, शरद पवार कडे जातं आहे. काँग्रेसकडे नाना पटोले सारखे दहा नेते तयार झाले आहे. 

महाविकास आघाडीकडे मुख्यमंत्री साठी चढाओढ आहे पण आमच्याकडे डबल इंजिन सरकार आलं पाहिजे 

2029 पर्यंत केंद्रात मोदीच सरकार आहे आणि राज्यातलं सरकार एका विचारच आलं आणि दोन्ही सरकार एका विचाराचे आले तर महाराष्ट्राच्या 14 कोटी जनतेला फायदा होऊ शकतो. म्हणून महाराष्ट्रात डबल इंजिनच महायुतीच सरकार पाहिजे असेही यावेळी ते म्हणाले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *