Dnamarathi.com

BJP News:  जामखेडच्या राजकारणात मोठा राजकीय भूकंप झाला असून, राष्ट्रवादीचे युवानेते व जामखेड नगरपरिषदेचे नगरसेवक पवनराजे राळेभात यांनी राष्ट्रवादीला रामराम ठोकला आहे. आमदार प्रा. राम शिंदे यांच्या नेतृत्वावर विश्वास दाखवत  राळेभात यांनी भाजपात जाहीर प्रवेश केला. 

पवनराजे राळेभात यांनी बुधवारी (ता.३१) चौंडी येथे आ प्रा राम शिंदे यांच्या निवासस्थानी आपल्या शेकडो समर्थकांसह भाजपामध्ये प्रवेश केला. यावेळी भाजपाचे विधानसभाक्षेत्र प्रमुख रवी सुरवसे, तालुकाध्यक्ष अजय काशीद, बाजार समितीचे सभापती शरद कार्ले, माजी सभापती डाॅ.भगवान मुरूमकर, सौ अर्चना ताई राळेभात ; संपत राळेभात ;सचिन पोठरे, माजी उपसभापती दादासाहेब रिठे,  गौतम उत्तेकर, नगरसेवक अमीत चिंतामणी, बिबिशन धनवडे, सोमनाथ राळेभात, तात्याराम पोकळे,, खर्ड्याच्या सरपंच  संजीवनी पाटील, जवळयाचे सरपंच सुशील आव्हाड, उपसरपंच प्रशांत शिंदे, युवानेते राहूल पाटील, डाॅ.ज्ञानेश्वर झेंडे , प्रवीण सानप, मोहन गडदे, डाॅ.विठ्ठल राळेभात यांच्यासह मोठया संख्येने पदाधिकारी उपस्थित होते.

दरम्यान पवनराजे राळेभात यांच्या भाजपा प्रवेशाने आ रोहित पवार यांना मोठा धक्का मानला जात आहे.

राष्ट्रवादी काँग्रेसचा जामखेड शहरातील प्रमुख चेहरा असलेले पवनराजे राळेभात यांचा शहरात मोठा समर्थक वर्ग असल्याने जामखेड शहरात भाजपाची ताकद वाढणार आहे. तर राळेभात यांच्या भाजपा प्रवेशाने  राष्ट्रवादीला पुन्हा एकदा मोठे खिंडार पडले आहे.

 यावेळी आमदार राम शिंदे व पवन राळेभात यांनी आपल्या प्रतिक्रिया व्यक्त केल्या.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *