Dnamarathi.com

BJP News: महायुतीचे उमेदवार खा. डॉ. सुजय विखे पाटील यांचा वाढता जनसंपर्क पाहता विविध सामाजिक संघटना, धार्मिक संघटना आणि छोटेमोठे राजकीय पक्ष त्यांच्या समर्थासाठी पुढे येत आहेत. त्यात आता जनता जल सेक्युलर पक्षाची पडली आहे. अहमदनगर जनता दल से. चे जिल्हाध्यक्ष भगवान बांगर यांनी सुजय विखे पाटील यांना जाहिर पाठिंबा दर्शविला आहे. यामुळे सुजय विखे पाटील यांना अधिक बळ मिळाले आहे. 

सुजय विखे पाटील हे अहिल्यानगरचे विद्यमान खासदार असून महायुतीच्या माध्यमातून भाजपचे उमेदवार म्हणुन रिंगणात आहेत. मागील पाच वर्षात केलेल्या विकास कामाच्या जोरावर ते मतदारांपुढे जात आहेत. महायुतीतील घटक पक्षांची त्यांना साथ मिळाल्याने त्यांची बाजू उजवी असल्याचे दिसून येत आहे. त्यात अनेक स्थानिक सामाजिक, धार्मिक संघटना त्यांना सहकार्य करत आहेत. यामुळे त्यांच्या विजयाचे मार्ग अधिक प्रबळ होत आहेत. त्यात आता जनता दल सेक्युलर जोडीला आल्याने जिल्ह्यातील त्यांचे मताधिक्य वाढणार असल्याचे सांगितले जात आहे. 

जनता दल से. चे जिल्हाध्यक्ष भगवान बांगर यांनी सांगितले की, सुजय विखे पाटील यांनी मागील पाच वर्षात केलेल्या विकास कामाच्या जोरावर त्यांना आम्ही आमच्या पक्षाचा पाठिंबा जाहिर केला आहे. त्यासाठी जनता दलाचे महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष नाथाभाऊ शेवाळे, यांनी राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि महायुतीचे समन्वयक प्रसाद लाड यांच्याशी पाठिंब्या बाबत चर्चा केली असून त्यांच्या आदेशानुसार आम्ही त्यांना हा पाठिंबा पत्राद्वारे घोषित केला आहे.

येणाऱ्या काळात सुजय विखे पाटील हे जिल्ह्याच्या विकासासाठी कामे करतील यावर आमचा विश्वास आहे. असे त्यांनी यावेळी पत्रकारांशी बोलताना सांगितले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *