DNA मराठी

ahmednagar news

Virat Kohli

Virat Kohli : भारताला धक्का! तिसऱ्या आणि चौथ्या सामन्यात खेळणार नाही विराट कोहली; ‘हे’ आहे कारण

Virat Kohli : भारत आणि इंग्लंड यांच्या दरम्यान 5 कसोटी सामन्याची मालिका सुरू आहे. या मालिकेतील दुसऱ्या सामन्यात भारतीय संघाने चमकदारी कामगिरी करत इंग्लंडचा पराभव केला आहे. त्यामुळे आताही मालिका 1-1 ने बरोबरीत आहेत. तर दुसरीकडे पुढील तीन सामन्यासाठी लवकरच भारतीय संघाची घोषणा होणार आहे, मात्र त्यापूर्वी भारतीय संघाला एक मोठा धक्का बसला आहे.  समोर आलेल्या माहितीनुसार भारताचा स्टार फलंदाज विराट कोहली तिसऱ्या आणि चौथ्या कसोटी सामन्यातून बाहेर पडला आहे.  असे मानले जात आहे की विराट कोहली भारताचे आणखी दोन आगामी सामने गमावू शकतो. यामुळे यजमान संघाच्या अडचणी वाढणार हे नक्की.  कोहली तिसरा आणि चौथा सामनाही खेळणार नाही  कसोटी मालिकेत आघाडी घेण्याच्या इराद्याने भारतीय संघ 15 फेब्रुवारीला तिसरा सामना खेळणार आहे. हा सामना राजकोटच्या मैदानावर खेळला जाईल. हा कसोटी सामना सुरू होण्याआधी टीम इंडियाच्या अडचणी खूप वाढल्या आहेत.  म्हणून कोहली खेळू शकणार नाही भारतीय संघातील दिग्गज खेळाडूंपैकी एक विराट कोहली आगामी दोन सामन्यांमध्ये सहभागी होणार नाही, ज्याचे कारण जाणून घेणे खूप महत्त्वाचे आहे.  बीसीसीआयने ही माहिती दिली. बीसीसीआयने सांगितले होते की, किंग कोहली वैयक्तिक कारणांमुळे पहिल्या दोन कसोटींमधून बाहेर पडला आहे. यानंतर दक्षिण आफ्रिकेचा माजी कर्णधार एबी डिव्हिलियर्सने खुलासा केला होता की कोहली दुसऱ्यांदा पिता होणार आहे आणि त्यामुळे तो संघासोबत नाही.  सध्या भारतीय संघ स्वतःच्या होस्टिंग अंतर्गत 5 कसोटी सामन्यांची मालिका खेळत आहे. दोन सामने खेळले गेले आहेत, ज्यामध्ये दोन्ही संघ 1-1 ने बरोबरीत आहेत. आता सगळ्यांचे लक्ष शेवटच्या तीन सामन्यांवर लागले आहे.

Virat Kohli : भारताला धक्का! तिसऱ्या आणि चौथ्या सामन्यात खेळणार नाही विराट कोहली; ‘हे’ आहे कारण Read More »

IMG 20240208 WA0002

Sujay Vikhe: खा. सुजय विखे पाटील यांनी अयोध्येत जाऊन प्रभू श्रीरामांना अर्पण केले लाडू..

Sujay Vikhe: आज खासदार डॉ. सुजय विखे पाटील यांनी अयोध्येत प्रभू श्रीरामांच्या जन्मभूमीत जाऊन अहमदनगर जिल्ह्यातील माता भगिनींनी बनवलेले नैवेद्यासाठीचे लाडू प्रभू श्रीरामांना चरणी अर्पण केले. श्रीराम प्राणप्रतिष्ठा सोहळ्याच्या निमित्ताने डॉ. सुजय विखे पाटील यांच्या माध्यमातून जिल्ह्यात मोफत साखर वाटप करण्यात आली होती. या साखरेपासून लाडू बनवून 22 जानेवारी रोजी सर्वांनी प्रभू श्रीरामांना प्रसाद म्हणून अर्पण करावेत असे आवाहन त्यांनी जिल्ह्यातील समस्त नागरिकांना केले होते.  दरम्यान आज नगर जिल्ह्यातील माता भगिनींनी बनवलेले नैवेद्यासाठीचे लाडू स्वतः खासदार सुजय विखे यांनी अयोध्येत जाऊन प्रभू श्रीरामांना अर्पण केले असून माता भगिनींनी इतक्या आपुलकीने बनवलेला हा प्रसाद प्रभू श्रीरामांच्या पुढे ठेवण्यासाठी अयोध्येत येण्याचे भाग्य मला लाभले याचा विशेष आनंद होत आहे. माझ्या जीवनातील हा एक अविस्मरणीय असा क्षण असल्याचे मी समजतो असे मत त्यांनी यावेळी मांडले. मला विश्वास आहे की या लाडूंच्या माध्यमातून अहमदनगर जिल्ह्याच्या आमच्या माता भगिनींनी केलेल्या सर्व प्रार्थना आणि मनोकामना पूर्ण होतील असे सांगून त्यांनी सर्वांना सुखी समाधानी आयुष्य लाभो अशी प्रार्थना प्रभू श्रीरामांच्या चरणी केली.

Sujay Vikhe: खा. सुजय विखे पाटील यांनी अयोध्येत जाऊन प्रभू श्रीरामांना अर्पण केले लाडू.. Read More »

Maruti Wagon R

होणार बंपर बचत! आता Maruti Wagon R खरेदी करा अवघ्या 1.15 लाखात; जाणुन घ्या कसं

Maruti Wagon R: येत्या काही दिवसात तुम्ही देखील तुमच्यासाठी नवीन कार खरेदी करण्याचा विचार करत असाल तर तुमच्यासाठी बाजारात एक सुवर्णसंधी उपलब्ध झाली आहे. या संधीचा पुरेपूर फायदा घेत तुम्ही बाजारात धुमाकूळ घालणारी लोकप्रिय कार मारुती वॅगन आर अवघ्या 1.15 लाखात घरी आणू शकता. मारुती वॅगन आरमध्ये तुम्हाला 1061 cc इंजिन मिळते जे 67 bhp पॉवर आणि 34 NM टॉर्क जनरेट करते. ही 5 सीटर कार आहे ज्याच्या व्हील्सचा आकार 13 इंच आहे. याच बरोबर पॉवर स्टीयरिंग, पॉवर विंडो, रीयर सीट हेडरेस्ट आणि कप होल्डर देखील कारमध्ये उपलब्ध आहेत. एअर कंडिशनर, हीटर, इलेक्ट्रॉनिक मल्टी ट्रिप मीटर, फॅब्रिक अपहोल्स्ट्री, ग्लोव्ह कंपार्टमेंट देखील कारमध्ये देण्यात आले आहे. सेफ्टीसाठी  सेंट्रल लॉकिंग, चाइल्ड सेफ्टी लॉक, डे नाईट रिअर व्ह्यू मिरर, सीट बेल्ट वॉर्निंग, रियर सीट बेल्ट साइड, इम्पॅक्ट टीम ॲडजस्टेबल सीट्स आणि इंजिन इमोबिलायझर या सुविधाही उपलब्ध आहेत.  cardekho.com वर सेकंड हॅण्ड मारुती वॅगन आर 1.15 लाखात खरेदी करु शकता. आतापर्यंत एकूण ही कार फक्त 26000 किलोमीटर चालली आहे. ही पेट्रोल इंजिन असलेली मॅन्युअल ट्रान्समिशन कार आहे.  जर तुम्ही ही कार बाजारात खरेदी करण्यासाठी गेलात तर तिची ऑन रोड किंमत 3.28 लाख ते 4.06 लाख रुपयांच्या दरम्यान असेल. 

होणार बंपर बचत! आता Maruti Wagon R खरेदी करा अवघ्या 1.15 लाखात; जाणुन घ्या कसं Read More »

Newzeland

WTC Point Table: न्यूझीलंडने दिला भारत-ऑस्ट्रेलियाला धक्का! WTC गुणतालिकेत मोठा बदल

WTC Point Table : न्यूझीलंडने आयसीसी वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप 2023-25 गुणतालिकेत अव्वल स्थान गाठले आहे. दक्षिण आफ्रिकेवर 281 धावांनी शानदार विजय मिळवल्यानंतर न्यूझीलंडने गुणतालिकेत अव्वल स्थानावर झेप घेतली आहे. आयसीसी वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप पॉइंट टेबलच्या ताज्या अपडेटमध्ये, न्यूझीलंडच्या दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या जोरदार विजयाने त्यांना प्रतिष्ठित अव्वल स्थानावर नेले आहे. दोन सामन्यांच्या मालिकेतील पहिल्या कसोटीतील त्यांच्या प्रभावी कामगिरीने त्यांना केवळ दणदणीत विजय मिळवून दिला नाही तर चॅम्पियनशिपमधील त्यांच्या स्थितीत लक्षणीय वाढही झाली. दरम्यान, न्यूझीलंडच्या यशामुळे ऑस्ट्रेलिया आणि भारत या दोन्ही संघांना धक्का बसला. इंग्लंडविरुद्धच्या विजयानंतर डब्ल्यूटीसी गुणतालिकेत आधी दुसऱ्या स्थानावर असलेला भारत आता तिसऱ्या क्रमांकावर घसरला आहे, तर न्यूझीलंडच्या वाढीमुळे ऑस्ट्रेलियाला दुसऱ्या स्थानावर ढकलले आहे. न्यूझीलंडच्या उत्कृष्ट विक्रमामध्ये या चक्रात खेळल्या गेलेल्या तीन कसोटी सामन्यांपैकी दोन विजयांचा समावेश आहे, परिणामी गुणांची टक्केवारी 66.66 इतकी आहे. ऑस्ट्रेलियाने दहा सामन्यांतून सहा विजयांसह 55.00 गुणांची टक्केवारी राखली आहे. तर भारताने सहा कसोटी सामन्यांमध्ये तीन जिंकले आहेत आणि दोन गमावले आहेत आणि एक अनिर्णित आहे, परिणामी गुणांची टक्केवारी 52.77 आहे. इतरत्र क्रमवारीत बांगलादेश चौथ्या स्थानावर आहे, तर पाकिस्तान पाचव्या स्थानावर आहे. दक्षिण आफ्रिकेच्या पराभवामुळे त्यांची सातव्या स्थानावर घसरण झाली आहे तर वेस्ट इंडिज, इंग्लंड आणि श्रीलंका अनुक्रमे सहाव्या, आठव्या आणि नवव्या स्थानावर आहेत. नुकत्याच झालेल्या सामन्यात न्यूझीलंडच्या उत्कृष्ट कामगिरीमुळे पहिल्या डावात 511 धावांची मजबूत धावसंख्या उभी राहिली, ज्यात दक्षिण आफ्रिकेचा डाव अवघ्या 162 धावांवर आटोपला.  दुसऱ्या डावात 178/4 वर डाव घोषित केल्याने दक्षिण आफ्रिकेचा डाव 247 धावांवर संपुष्टात आल्याने आणखी एका प्रभावी कामगिरीसाठी मजल मारली.

WTC Point Table: न्यूझीलंडने दिला भारत-ऑस्ट्रेलियाला धक्का! WTC गुणतालिकेत मोठा बदल Read More »

IMG 20240207 WA0014

Ahmednagar News: प्रश्न लागणार का मार्गी? ‘त्या’ प्रकरणात खा. सुजय विखेंनी घेतली केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांची भेट

Ahmednagar News: केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांची खासदार डॉ. सुजय विखे पाटील यांनी दिल्ली येथे भेट घेऊन कांदा निर्यात बंदी उठवण्यासंदर्भात आणि शेतकऱ्यांचे प्रश्न मार्गी लावण्यासाठी सकारात्मक चर्चा केली.  कांदा प्रश्नावर अमित शाह यांना राज्यातील शेतकऱ्यांसमोर येत असलेल्या अडचणी, कांदा खरेदी आणि योग्य भाव आदी विषयाची माहिती खा.विखे पाटील यांनी करून दिली असून शाह यांनीही याबाबत लवकरच कांदा उत्पादक शेतकऱ्यांच्या हिताचा निर्णय केंद्र सरकार घेईल असे आश्वासन दिले असल्याचे सांगण्यात आले आहे. दरम्यान याबाबत खासदार सुजय विखे पाटील यांना विचारले असता त्यांनी सांगितले की, सध्या कांद्याचे भाव गडगडले असून शेतकऱ्यांच्या दृष्टीने आणि त्यांना कांदा पिकविण्यासाठी लागणाऱ्या एकूण खर्चाचा जर विचार केला तर सध्या कांद्याला बाजारपेठेत मिळणारा भाव हा कमी आहे.  नगर, नाशिक,पुणे या कांदा पट्यात कांदा पीक घेणारा शेतकरी वर्ग मोठा असून निर्यात बंदीचा मोठा आर्थिक फटका बसत असल्याची वस्तुस्थिती खा.विखेंनी शाह यांच्या समोर मांडली आणि हा मुद्दा गृहमंत्री अमित शाह यांच्या लक्षात आणून दिला. निर्यातबंदीचा परिणाम म्हणून कांदा खरेदी केंद्रावर येणाऱ्या कांद्याला पाहिजे तसा भाव मिळत नाही.  कांद्याला एकरी येणारा खर्चही निघत नसल्याने शेतकरी हवालदिल झाला आहे. यावर शेतकरी वर्गातून केंद्र सरकार कडून मार्ग निघण्याची आशा आहे. कांद्याच्या प्रती क्विंटल मागे असलेले दर हे वाढले पाहिजे.  या अनुषंगाने केंद्र सरकारकडून सकारात्मक विचार व्हावा आणि या दृष्टिकोनातून निर्यातबंदी उठवणे किंवा नाफेड मार्फत कांदा खरेदी करण्याच्या दृष्टीकोनातून शेतकऱ्यांना दिलासा मिळावा अशी विनंती केंद्रीय मंत्र्यांना खा.विखे पाटील यांनी शाह यांची भेट घेऊन केली आहे.  यावेळी खा.सुजय विखेंना आश्वस्त करताना अमित शाह यांनी केंद्र सरकार शेतकऱ्यांच्या नेहमीच पाठीशी असून अनेक शेतकरी हिताच्या योजना हाती घेतलेल्या आहेत. सरकार शेतकऱ्यांचे नुकसान होऊ देणार नाही.  या दृष्टिकोनातून लवकरात लवकर शेतकऱ्यांच्या हिताचा निर्णय घेतला जाईल आणि केंद्र सरकार शेतकऱ्यांचे प्रश्न सोडविण्यासाठी कटिबद्ध आहे असे आश्वासन गृहमंत्र्यांनी दिले असल्याची माहिती खासदार डॉ. सुजय विखे पाटील यांनी दिली.

Ahmednagar News: प्रश्न लागणार का मार्गी? ‘त्या’ प्रकरणात खा. सुजय विखेंनी घेतली केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांची भेट Read More »

IMG 20240206 WA0006

Ahmednagar News: निळवंडे उजव्या कालव्यातून पाणी सोडण्याचा निर्णय ऐतिहासिक – धनश्री विखे पाटील

Ahmednagar News:  उत्तर नगर जिल्ह्याला वरदान ठरणाऱ्या निळवंडे उजव्या कालव्यातून पाणी सोडण्याचा निर्णय लाभक्षेत्रातील शेतकऱ्यांकरीता निश्चितच ऐतिहासिक आणि आनंदाचा क्षण असल्याचे  प्रतिपादन रणरागिणी महिला मंडळाच्या अध्यक्षा धनश्री सुजय विखे पाटील यांनी केले. निळवंडे उजव्या कालव्यामुळे शेतकरी नक्कीच सुखावेल असा विश्वास व्यक्त करून  राज्यातील महायुती सरकारमुळे धरणाच्या दोन्ही कालव्याच्या कामाला गती मिळून पाणी सोडण्याच्या निर्णय शेतकऱ्यांच्या उज्वल भविष्यासाठी महत्वपूर्ण ठरणारा असल्याचे त्यांनी सांगितले. उत्तर नगर जिल्ह्यासह राहुरी तालुक्यासाठी वरदान असणारे निळवंडे धरणाच्या उजव्या कालव्याचे तांभेरे,कानडगाव, निंभेरे, तुळापूर, तांदूळनेर,वडनेर,कनगर,चिंचविहरे ,गुहायेथे  जलपूजन रणरागिणी महिला मंडळाच्या अध्यक्षा धनश्रीताई विखे पाटील व जिल्हा सहकारी बँकेचे अध्यक्ष शिवाजी राव कर्डीले यांच्या हस्ते करण्यात आले. धनश्री विखे यांनी सांगितले की जिल्ह्याच्या विकासासाठी महसूलमंत्री ना. राधाकृष्ण विखे पाटील आणि खा.डॉ सुजय विखे पाटील  सदैव प्रयत्नशील आहेत त्यांनी केलेल्या विकास कामामुळे जिल्ह्याचा विकास होत असल्याचे स्पष्ट करून, निळवंडे कालवा व्हावा ना. विखे पाटील यांचा पाठपुरवा महत्वपूर्ण ठरला असल्याचे सौ.विखे म्हणाल्या. यावेळी भाजपचे तालुका अध्यक्ष सुरेश बानकर, जिल्हा उपाध्यक्ष अमोल भनगडे,रवींद्र म्हसे, भिमराज हारदे, नानासाहेब गागरे,डॉ बापूसाहेब मुसमाडे, सरपंच निशा गागरे,उत्तम राव मुसमाडे,संदीप गीते,मारुती नालकर,सर्जेराव गाडगे, संदिप गाडगे ,आणा पाटील बलमे, बबनराव कोळसे,विजय बलमे, यांच्या सह सर्व व पदाधिकारी ,अधिकारी व ग्रामस्थ उपस्तीत होते.

Ahmednagar News: निळवंडे उजव्या कालव्यातून पाणी सोडण्याचा निर्णय ऐतिहासिक – धनश्री विखे पाटील Read More »

IMG 20240206 WA0005

Ahmednagar News: मिळणार रोजगार! बेलवंडी 618 एकरमध्ये उभारली जाणार उद्योग नगरी

Ahmednagar News:  आज मुंबई येथे राज्याचे महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या अध्यक्षेखाली व उद्योगमंत्री उदय सांमत यांच्या प्रमुख उपस्थितीत अहमदनगर जिल्ह्याच्या दृष्टीने महत्त्वाची बैठक संपन्न झाली. यावेळी जिल्ह्यातील बेलवंडी ता. श्रीगोंदा येथील शेती महामंडळाच्या 618 एकर जमिनीवर एमआयडीसी उभारण्याला तत्वतः मान्यता देण्यात आली आहे. सदर एमआयडीसीच्या आराखड्यासंदर्भात पाहणी व सर्वेक्षण लवकरात लवकर पूर्ण करून त्या संबंधित सर्व कामे काल मर्यादेत करण्यात यावीत असे निर्देश महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी यावेळी अधिकारांना दिले. एमआयडीसी सुरू करण्यासंदर्भात मोजणीचा अहवाल मागविण्यात आला आहे. पुढील प्रकियेस गती देण्यात येणार असून, तात्काळ हे काम पुर्ण करण्यात येणार असल्याची माहिती उद्योग मंत्री उदय सामंत यांनी दिली. तसेच, जिल्हाधिकारी यांनी आजच उद्योग विभागाकडे विनंती प्रस्ताव सादर करावा असेही त्यांनी यावेळी सांगितले. श्रीगोंदा तालूक्यातील बेलवंडी फार्म येथे शेती महामंडळाची मौजे पर्वतवाडी आणि महादेववाडी येथील 618 एकर जमीन उद्योग विभागला देण्याची तत्वत: मान्यता यावेळी देण्यात आली. या एमआयडीसी करिता खासदार डॉ. सुजय विखे पाटील आणि माजी मंत्री आमदार बबनराव पाचपुते यांनी पाठपुरावा केला होता.  उद्योगनगरीसाठी जमीन दिल्याने खासदार डॉ. सुजय विखे पाटील यांनी राज्याचे महसूल मंत्री श्री. राधाकृष्ण विखे पाटील आणि उद्योगमंत्री श्री. उदय सांमत यांचे आभार व्यक्त केले.  खासदार डॉ.सुजय विखे पाटील यांनी सांगितले की बेलवंडी मध्ये रस्ते वाहतूक, पाणी तसेच रेल्वे वाहतुक सुविधा उपलब्ध तर आहेच शिवाय शिर्डी, पुणे आणि नाशिक एमआयडीसी केंद्र नजीक असल्याने येणाऱ्या काळात बेलवंडी उद्योजकांना मोठी पर्वणीच ठरणार आहे. या एमआयडीसी मुळे जिल्ह्यात उद्योगाला चालना मिळून मोठ्या प्रमाणात रोजगार उपलब्ध  होईल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. दरम्यान, श्रीरामपूर तालुका व राहता तालुक्यातील शेती महामंडळाकडे असलेल्या जमिनीच्या समस्यांबाबत चर्चा करण्यात आली. खंडकरी शेतकऱ्यांना वाटप केलेल्या जमिनींचा भोगवटादार वर्ग / मधुन भोगवटादार वर्ग 1 करणे तसेच सार्वजनिक प्रयोजनार्थ शेती महामंडळाची जमीन वाटप करणे संदर्भातील कामांचा आढावा मंत्री विखे पाटील यांनी घेतला. सदर बैठकीत खासदार डॉ. सुजय विखे पाटील, माजी मंत्री आमदार श्री.बबनराव पाचपुते, महसूल विभागाचे अप्पर सचिव श्री. राजगोपाल देवरा, अहमदनगरचे जिल्हाधिकारी श्री.सिद्धराम सालीमठ, शेती महामंडळाचे व्यवस्थापकीय संचालक श्री. विश्वजित माने यांच्यासह महसूल आणि शेती महामंडळ पुणे यांचे अधिकारी उपस्थित होते.

Ahmednagar News: मिळणार रोजगार! बेलवंडी 618 एकरमध्ये उभारली जाणार उद्योग नगरी Read More »

Titanic

Titanic Photo: टायटॅनिक जहाज 112 वर्षानंतरही समुद्रातून बाहेर का आलं नाही? ‘हे’ आहे कारण

Titanic Photo: 15 एप्रिल 1912 रोजी समुद्रात टायटॅनिक जहाज बुडाला होता. जेव्हा टायटॅनिक हे जहाज तयार करण्यात आला होता तेव्हा हा जहाज पाण्यात कधीच बुडू शकत नाही असा दावा करण्यात आला होता. पण टायटॅनिक पाण्यात शिरल्यानंतर काही वेळातच बुडाले. टायटॅनिकचे अवशेष शोधायला बरीच वर्षे लागली. तब्बल 73 वर्षांनंतर 1985 मध्ये टायटॅनिकचा अवशेष सापडला. 112 वर्षांनंतरही टायटॅनिकचा माल पाण्याबाहेर काढता आला नाही. चला तर मग जाणून घेऊया यामागचे कारण काय आहे. टायटॅनिक का बाहेर काढता आले नाही? टायटॅनिक बुडून इतकी वर्षे झाली तरी अजूनही समुद्राच्या खोल खोलवर आहे. तो अद्याप काढण्यात आलेला नाही. यामागील कारण म्हणजे टायटॅनिक इतके खोल बुडाले आहे की इतक्या खोलवर जाऊन त्याला परत आणणे आता शक्य नाही. इतकं जड जहाज बाहेर काढू शकणारी हायटेक पाणबुडी तयार करण्यात शास्त्रज्ञांनाही अद्याप यश आलेलं नाही. याचे आणखी एक कारण म्हणजे पाण्याचा दाब. पाण्याच्या दाबामुळे जहाजाचे वजन इतके वाढले आहे की ते बाहेर पडणे शक्य नाही आणि यामुळेच टायटॅनिकला आजतागायत पाण्यातून बाहेर काढता आलेले नाही.

Titanic Photo: टायटॅनिक जहाज 112 वर्षानंतरही समुद्रातून बाहेर का आलं नाही? ‘हे’ आहे कारण Read More »

IT Rade

Nashik IT Raid : मोठी बातमी! ‘या’ भागात आयटीचा छापा, 8 कोटींची रोकड, तीन कोटींचे सोने जप्त

Nashik IT Raid: एक मोठी बातमी समोर आली आहे. या बातमीनुसार आयकर विभागाने मोठी कारवाई करत नाशिकमध्ये अनेक सरकारी कंत्राटदारांवर छापे टाकून त्यांच्याकडून कोट्यवधी रुपयांची बेहिशेबी मालमत्ता जप्त केली आहे. माहितीनुसार गेल्या चार दिवसांपासून हा छापा सुरू आहे. सुमारे 200 अधिकारी व कर्मचाऱ्यांचे पथक या छाप्यात सहभागी आहे. पैशांनी भरलेल्या पुठ्ठ्याचे बॉक्स सापडले आयकर विभागाला 850 कोटी रुपयांपेक्षा जास्त किमतीची बेहिशेबी मालमत्ता आणि व्यवहार झाल्याचा संशय आहे. कंत्राटदारांच्या आठहून अधिक ठिकाणी आयटीचे छापे टाकण्यात आल्याचे सांगण्यात येत आहे.  सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, या छाप्यात विविध ठिकाणांहून आठ कोटी रुपयांची रोकड, सोन्याचे दागिने आणि तीन कोटी रुपयांची सोन्याची बिस्किटे जप्त करण्यात आली आहेत. आयकर विभागाच्या पथकाने नाशिकमध्ये एकाच वेळी डझनहून अधिक ठिकाणी छापे टाकले. शहरातील बड्या सरकारी कंत्राटदारांची निवासस्थाने, कार्यालये आणि इतर परिसरांची झडती घेण्यात आली. त्यांच्याशी संबंधित बँक खाती, संगणक आणि व्यवहार यांची चौकशी सुरू आहे.  छाप्यादरम्यान आयकर विभागाने तपासासाठी कोट्यवधी रुपयांच्या व्यवहारांशी संबंधित कागदपत्रे, पेन ड्राइव्ह आणि हार्ड डिस्क जप्त केल्या आहेत. छाप्यात अनेक ‘धनकुबेर’ पकडले नाशिकमध्ये आयकर विभागाने सरकारी कंत्राटदारांच्या मुसक्या आवळल्या आहेत. महापालिकेच्या 8 कंत्राटदारांवर गेल्या चार-पाच दिवसांपासून ही कारवाई सुरू आहे. अतिशय नियोजनबद्ध पद्धतीने ही कारवाई सुरू आहे. आयकर अधिकाऱ्यांना पाहिल्यानंतर काहींनी त्यांची रोकड त्यांच्या कारमध्ये आणि झुडपात लपवून ठेवली, तर काहींनी अधिकाऱ्यांपासून त्यांची बेहिशेबी संपत्ती लपवण्यासाठी छतावर आणि पंख्यांमध्ये व्यवहाराची कागदपत्रे आणि पेनड्राइव्ह लपवून ठेवल्या. काही कंत्राटदारांनी घराच्या वेगवेगळ्या ठिकाणी त्यांच्या मालमत्तेची माहिती असलेली पेन ड्राइव्ह आणि हार्डडिस्क लपवून ठेवली होती. त्यातील एकाने घरातील पंख्यामध्ये बेहिशेबी व्यवहारांची माहिती असलेला 2 जीबीचा पेन ड्राईव्ह लपवून ठेवला होता.  त्याचवेळी गाडीत रोकड ठेवून झुडपात लपवून ठेवली होती. आयकर विभागाची कारवाई अजूनही सुरूच आहे. येत्या काही दिवसांत मोठे खुलासे होण्याची शक्यता आहे.

Nashik IT Raid : मोठी बातमी! ‘या’ भागात आयटीचा छापा, 8 कोटींची रोकड, तीन कोटींचे सोने जप्त Read More »

IMG 20240205 WA0013

Ahmednagar News: स्थानिक गुन्हेची मोठी कारवाई, 2 गावठी कट्टे व 04 जिवंत काडतुसासह 2 आरोपींना अटक

Ahmednagar News:  अहमदनगर स्थानिक गुन्हे शाखेने मोठी कारवाई करत गावठी कट्टे बाळगणाऱ्या 02 आरोपींना 2 गावठी कट्टे व 04 जिवंत काडतुसासह जेरबंद केले आहे. अहमदनगर जिल्हा पोलीस अधीक्षक राकेश ओला यांनी आगामी लोकसभा निवडणुकीचे अनुषंगाने जिल्ह्यात अवैध अग्नीशस्त्रे व हत्यारे बाळगणारे इसमांचा शोध घेवुन कारवाई करणेबाबत दिनेश आहेर पोलीस निरीक्षक स्थानिक गुन्हे शाखा यांना आदेश दिले होते.  या आदेशानुसार दिनेश आहेर यांना गुप्तबातमीदाराकडून 03 फेब्रुवारी रोजी विकास सुधाकर सरोदे आणि त्याचा साथीदारासह शेंडी बायपास या ठिकाणी ठकन उर्फ नितीन भाऊसाहेब आल्हाट व त्याचा साथीदारासह नागरदेवळे गावचे शिवारात कापुरवाडी गावाकडे जाणारे रोडवर गावठी कट्टे (अग्निशस्त्र) विकण्यासाठी येणार असल्याची महिती मिळाली.   पोनि/दिनेश आहेर यांनी स्थानिक गुन्हे शाखेतील पोलीस अंमलदार यांचे दोन स्वंतत्र पथके नेमुन मिळालेल्या बातमीनुसार खात्री करुन कारवाई करण्याबाबत आदेश दिले.   स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने अहमदनगर ते छ. संभाजीनगर रोडवरील शेंडी बायपास या ठिकाणी सापळा लावुन आरोपी विकास सुधाकर सरोदे, (वय – 23 वर्षे, रा. गुंजाळे ता. राहुरी, जिल्हा अहमदनगर) यास ताब्यात घेवुन त्याची अंगझडती घेता त्याचे अंगझडतीमध्ये 01 गावठी बनावटीचा कट्टा (अग्निशस्त्र) व 02 जिवंत काडतुस मिळुन आले. तर त्याचा साथीदार  लखन सुधाकर सरोदे (रा. गुंजाळे ता. राहुरी, जि. अहमदनगर) हा सदर ठिकाणावरुन पळुन गेला आहे.   दरम्यान मिळालेल्या बातमीतील ठिकाणी नागरदेवळे गावाचे शिवारात वारुळवाडी गावाकडे जाणारे रोडवरुन आरोपी  ठकन उर्फ नितीन भाऊसाहेब आल्हाट, (वय – 33 वर्षे, रा. मोरे चिंचोरा, ता. नेवासा, जिल्हा अहमदनगर) यास ताब्यात घेवुन त्याचे अंगझडतीमध्ये 01 गावठी बनावटीचा कट्टा (अग्निशस्त्र) व 02 जिवंत काडतुस मिळुन आले असुन त्याचा साथीदार भैया शेख (रा. कुकाणा, ता. नेवासा, जि. अहमदनगर )हा सदर ठिकाणावरुन पळुन गेला आहे.   दोन्ही ठिकाणावरुन आरोपी विकास सुधाकर सरोदे व ठकन उर्फ नितीन भाऊसाहेब आल्हाट यांचे कब्जामध्ये 02 गावठी बनावटीचे कट्टे (अग्निशस्त्रे) 04 जिवंत काडतुस असा एकुण 62,000 रुपये किमतीचा मुद्देमाल मिळुन आल्याने त्यांचेविरुध्द एम.आय.डी.सी. पोलीस ठाण्यात आर्म ऍ़क्ट कायदा कलम 3/25, 7 प्रमाणे आणि भिंगार कॅम्प पोलीस ठाण्यात आर्म ऍ़क्ट कायदा कलम 3/25, 7 प्रमाणे दोन गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.

Ahmednagar News: स्थानिक गुन्हेची मोठी कारवाई, 2 गावठी कट्टे व 04 जिवंत काडतुसासह 2 आरोपींना अटक Read More »