DNA मराठी

ahmednagar news

सावेडी जमीन संशयास्पद व्यवहार : गुजरातचे येतात, जमीन घेतात… आणि महाराष्ट्राचे अधिकारी बघ्याची भूमिका घेतात!

land Scam Sawedi : अहिल्यानगर शहरातील नगर-मनमाड रोडवरील सावेडी नाक्याच्या पुढे असलेल्या तब्बल १ हेक्टर ३५ आर क्षेत्रफळाच्या जमिनीच्या ३५ वर्षांनंतर झालेल्या संशयास्पद नोंदणीने सध्या शहरवासीयांमध्ये प्रचंड खळबळ उडवली आहे. हा केवळ एक जमीन व्यवहार नाही, तर प्रशासनातील बेजबाबदारपणा, सत्ताधाऱ्यांचा वरदहस्त आणि भ्रष्ट यंत्रणेचे दर्शन घडवणारा प्रकार आहे. सावेडी मधील सर्व्हे नंबर २४५/ब १ आणि २४५/ब २ या जमिनीचे व्यवहार अचानक इतक्या वर्षांनी होणे आणि त्याचे खरेदीखत गुपचूप तयार होणे हेच पुरेसे संशय वाढवणारे आहे. इतक्या मोठ्या व्यवहारासाठी कोणतीही जाहिर सूचना नाही, आणि पारदर्शक प्रक्रियेचा लवलेशही नाही! हाडांचा कारखाना म्हणून ओळखल्या जाणाऱ्या या जमिनीवरील जुन्या भिंती पाडल्या जातात आणि नव्या भिंती उभारण्याचे काम झपाट्याने सुरू होते. हे सगळं लोकांच्या नजरेआड करण्याचा केविलवाणा प्रयत्न नाहीतर काय? आणखी गंभीर बाब म्हणजे गुजरातमधून थेट बाहेरील लोक येऊन बांधकाम सुरू करतात आणि स्थानिक प्रशासन मूकदर्शक बनते. प्रांताधिकारी, तहसीलदार, अप्पर तहसीलदार, सर्कल अधिकारी आणि तलाठी यांच्याकडे तक्रारी गेल्यानंतरही काम थांबत नाही, उलट वेगाने सुरू राहते. यामागे सत्ताधाऱ्यांचा वरदहस्त नसेल तर काय असेल? ९० कोटींपेक्षा जास्त किंमतीची जमीन असे सहज ताब्यात घेतली जात असेल, तर सामान्य नागरिकांनी काय करायचे? या प्रकरणात तत्कालीन तलाठी, सर्कल अधिकारी यांची भूमिका सखोल तपासली गेली पाहिजे. त्यांच्या निष्काळजीपणामुळे किंवा संभाव्य संगनमतामुळे इतका मोठा गैरव्यवहार झाला असेल, तर त्यांना शिक्षा झालीच पाहिजे. नागरिकांनी आता जागरूक राहून उच्चस्तरीय चौकशीची मागणी जोर धरायला हवी. प्रशासन आणि सरकारने हे लक्षात घ्यायला हवे की, जमिनीवर भूखंडमाफियाचे सावट निर्माण झाले तर विकासाचे स्वप्न नेहमीच उध्वस्त होईल. आणि यात गरीब मारतो.. कोट्यवधींच्या जमिनीच्या लाटणीसाठी एखादा मोठा अनर्थ व्हावा लागेल का, म्हणजे प्रशासन जागे होईल? हा प्रश्न आज प्रत्येक अहिल्यानगरकराच्या मनात खोलवर टोचतो आहे. आता वेळ आली आहे की, पारदर्शक चौकशी करून दोषींना कठोर शिक्षा व्हावी आणि भूमाफियांना पुन्हा अशा प्रकारची हिंमत करता कामा नये, याची व्यवस्था प्रशासनाने करावी. अन्यथा सावेडी प्रकरण हे भविष्यात अशा भूखंड लाटणाऱ्या टोळ्यांसाठी मार्गदर्शक ठरेल, आणि नागरी हक्कांचा आणि विकासाचा गळा घोटला जाईल, यात शंका नाही.

सावेडी जमीन संशयास्पद व्यवहार : गुजरातचे येतात, जमीन घेतात… आणि महाराष्ट्राचे अधिकारी बघ्याची भूमिका घेतात! Read More »

land Scam sawedi-हाडांचा कारखान्याच्या जमिनीच्या नोंदणीवरून वाद विवाद; मालकीसाठी दावे-प्रतिदावे.

land Scam Sawedi :- अहिल्यानगर – नगर-मनमाड रोडवरील सावेडी नाक्याच्या पुढे ओढ्यालगत असलेल्या “हाडांचा कारखाना” “bone factory” म्हणून ओळखल्या जाणाऱ्या भागातील 1 हेक्टर 35 आर क्षेत्रफळाची जमीन सध्या वादाच्या भोवऱ्यात अडकली आहे. तब्बल 35 वर्षांनंतर या जमिनीची संशयास्पद नोंदणी झाल्याने, या नोंदणीमुळे विविध दावे-प्रतिदाव्यांनी वातावरण चिघळले आहे. सावेडीतील सर्व्हे नंबर 245/ब 1 (0.72 हेक्टर आर) आणि 245/ब 2 (0.63 हेक्टर आर) या जमिनीची नोंदणी थेट तीन दशकांहून अधिक काळाने झाली. विशेष म्हणजे ही नोंदणी अनेक तर्कवितर्कांना कारणीभूत ठरत असून, अनेकांनी आपल्या मालकीचे दावे पुढे रेटले आहेत. कुणी खरेदीखत, कुणी साठेखात, तर कुणी हिजाबनाम्याचा आधार देत मालकीसाठी जोर लावू लागले आहे. हाडांचा कारखाना” “bone factory” असल्यामुळेपूर्वी या परिसरात भीतीचे सावट असायचे या परिसरात कुणीही फिरकत नव्हते आता या परिसरात इतर जमीन विकसित झाल्यामुळे या जमिनीला आता सोन्याचे मोल आले आहे. परिसराचा झपाट्याने झालेला विकास आणि वाढलेली जमीन किंमत बघता, जमिनीवर हक्क सांगणाऱ्यांची रांगच लागली आहे. दरम्यान, या प्रकरणात तलाठी कार्यालय आणि सर्कल कार्यालयावर गंभीर आरोप होत असून, नोंदणी करताना दाखवलेला बेफिकिरीचा आणि निष्काळजीपणाचा प्रकार धक्कादायक आहे, असे स्थानिकांचे म्हणणे आहे. नोंदणी करताना दस्तऐवजांची नीट पडताळणी न करता मंजुरी दिली गेली का, यावर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे. या प्रकरणाची सखोल चौकशी व्हावी आणि दोषींवर कठोर कारवाई करावी, अशी मागणी नागरिकांमधून जोर धरू लागली आहे. जिल्हाधिकारी आणि वरिष्ठ प्रशासन या प्रकरणाकडे गांभीर्याने लक्ष देतील का, याकडे सर्वांचे लक्ष लागून राहिले आहे. पुढील भागात “सरकारी अधिकार्यान पेक्षा खाजगी लोकांची चालती” आणि त्यांचा या प्रकरणात सहभाग

land Scam sawedi-हाडांचा कारखान्याच्या जमिनीच्या नोंदणीवरून वाद विवाद; मालकीसाठी दावे-प्रतिदावे. Read More »

land Scam Sawedi “35 वर्षांची नोंदणी, 35 वर्षांचा प्रश्न!”

land Scam Sawedi अहिल्यानगर – Sawedi Land Scam एखादी गोष्ट इतकी अशक्य वाटावी की ती काल्पनिक वाटावी, पण जेव्हा ती सत्यात उतरते, तेव्हा प्रशासकीय व्यवस्थेचा गळक्या भिंती अधिक ठळकपणे समोर येतात. सावेडी येथील सर्व्हे नंबर 245/ब 1 आणि 245/ब 2 या एकूण 1 हेक्टर 35 आर जमिनीवर 1991 मध्ये खरेदीखत दाखवले गेले. मात्र त्याचे नोंदणी दस्ताऐवज 2025 मध्ये, तब्बल 35 वर्षांनी उगम पावतात – हा योगायोग नसून ठरवून केलेला दुर्दैवी ‘प्रयोग’ आहे, आणि या मागील यंत्रणांची मूक सहमती अधिकच धक्कादायक आहे. 1992 मध्ये गटाचे विभाजन होतो, पण एक वर्ष आधीच्या म्हणजे 1991 च्या गट क्रमांकाने खरेदी दाखवणे ही कायदेशीर अशक्यता आहे. परंतु हे अशक्य शक्य झाले — आणि हे शक्य होण्यामागे नोंदणी कार्यालयातील भ्रष्टतंत्राचे दडपण आहे. दस्तावेज कधी तयार झाले? त्या वेळी गट अस्तित्वातच नव्हता! तरीही ते मान्य केले गेले. ही चुकीची आणि खोटी कागदपत्रे स्वीकारणारे अधिकारी कुठल्या दबावाखाली होते? कि पैसा ? यात आणखी चिंतेची बाब म्हणजे — ज्या अधिकार्‍यांनी ही नोंदणी केली, त्यांना वाचवण्यासाठी वरिष्ठ पातळीवरून प्रयत्न सुरु आहेत. खरेदीखताचा आधार खोटा आहे, असा संशय व्यक्त होऊनही, प्रशासनातील काही मंडळी त्याच धर्तीवर मागील तारखेचा अर्ज घेऊन ते नियमात कसे बसवता येईल यासाठी प्रयत्न होण्याची शक्यता नाकरता येत नाही. ते नियमित करण्दयासाठी राजकीय किवा पैशाचा दबाव अनु शकतात.कारण  याचा अर्थ फक्त हीच जमीन नाही, तर याआधीही अनेक अशा जमिनी गिळंकृत करण्यात आल्या असण्याची शक्यता नाकारता येत नाही. प्रश्न असा आहे की, या सर्व प्रकारनांनवर वरिष्ठ अधिकारी गप्प का आहेत?  मग प्रश्न असा पडतो वरिष्ठ अधिकऱ्यांची याला  त्यांची सहमती समजायची का? लोकशाहीत प्रशासन जबाबदार असतं. पण जेव्हा प्रशासनच स्वतःच्या चुकांची ढाल घेऊन उभं राहतं, तेव्हा जनतेचा न्याय व्यवस्थेवरचा विश्वास ढासळतो. ही केवळ एक प्रकरण नाही, हे एक ढासळलेल्या व्यवस्थेचं लक्षण आहे. आणि जर आज या प्रकरणात दोषींवर कठोर कारवाई झाली नाही, तर अशा बनावट दस्तावेजांच्या आधारावर भविष्यात आणखी जमिनी हडप केल्या जातील. लोकशाही व्यवस्था ही पारदर्शकता, कायदा आणि जनहितावर आधारलेली असावी लागते. मात्र येथे कायदाच गुंतवला जातोय, पारदर्शकतेला काळोखे पांघरून घातले जाते, आणि जनहिताला पायदळी तुडवले जात आहे. आता वेळ आली आहे की जिल्हाधिकारी आणि महसूल विभागाने यावर स्पष्ट भूमिका घ्यावी आणि दोषींवर कठोर कारवाई करून या भ्रष्ट साखळीला रोखावं — अन्यथा ही जमीन कुणाच्या नावावर गेली यापेक्षा विश्वास कुणाच्या हातून गमावला गेला हे अधिक महत्वाचं ठरेल.

land Scam Sawedi “35 वर्षांची नोंदणी, 35 वर्षांचा प्रश्न!” Read More »

land Scam Sawedi सावेडी जमीन घोटाळा : भ्रष्ट अधिकाऱ्यांचे लोटांगण आणि वरिष्ठांची गुप्त कृपा?

land Scam Sawedi :- अहिल्यानगर – सावेडीतील जमीन घोटाळा नोंदणीच्या प्रकरणाने शहरात खळबळ उडवली असतानाच या घोटाळ्यात अडकलेल्या अधिकाऱ्यांनी आता वरिष्ठ अधिकाऱ्यांचे पाय धरून “आम्हाला वाचवा” अशी गाऱ्हाणी केली आहे. लाज न शरम! जे अधिकारी स्वतःच्या भ्रष्ट कारभाराने जनतेचा विश्वासघात करत आहेत, तेच आता प्रकरण दडपण्यासाठी वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या पायांवर लोटांगण घालत आहेत, अशी जोरदार चर्चा आहे. वरिष्ठांचे छत्र — भ्रष्ट अधिकाऱ्यांचे बिनधास्त कारनामेया प्रकरणातच नाही, तर यापूर्वीही ह्या अधिकाऱ्यांनी दुसऱ्या प्रकरणात स्वतःला वाचवण्यासाठी वरिष्ठांकडून आश्वासन मिळवले होते. त्या आश्वासनाची पूर्तता अजूनही सुरूच आहे आणि आता नव्याने उघडकीस आलेल्या या घोटाळ्यासाठीही त्यांना वाचवण्याचा शब्द मिळाल्याचे बोलले जात आहे. त्यामुळे प्रशासन हेच भूमाफियांना आणि त्यांच्या साथीदार अधिकाऱ्यांना पाठीशी घालत असल्याचा आरोप नागरिक करत आहेत. 35 वर्षांनंतर नोंदणीचा खेळ — भूमाफियांना मोकळे रान सावेडीच्या सर्व्हे नंबर 245/ब 1 (0.72 हेक्टर आर) आणि 245/ब 2 (0.63 हेक्टर आर) या एकूण 1 हेक्टर 35 आर जमिनीची नोंदणी 35 वर्षांनी उगम पावली, आणि तिच्यामागील काळजीपूर्वक आखलेला भ्रष्ट कारभार उघड झाला. गटाचे विभाजन 1992 मध्ये झाले, पण 1991 मध्येच गट 245/ब 2 च्या नावाने खरेदीखत दाखवले गेले! अशक्य गोष्ट सहज शक्य करण्यात आली — आणि याचे मूळ मुळात नोंदणी कार्यालयातील सडलेल्या व्यवस्थेत आहे. प्रशासनाची भूमिका संशयाच्या भोवऱ्यातप्रशासनाने या प्रकरणात त्वरित कारवाई केली असती, तर इतक्या मोठ्या प्रमाणात जनतेचा संताप उफाळून आला नसता. परंतु, हेच अधिकारी आणि भूमाफिया यांच्या साटेलोट्याला छुपे पाठबळ दिल्याचा आरोप सध्या जोर धरत आहे. जनतेचा एकच नारा — दोषींवर कारवाई करा!सावेडीतील सामान्य नागरिकांपासून सामाजिक कार्यकर्त्यांपर्यंत सगळेच आता एका सुरात म्हणत आहेत – “दोषींवर कठोर कारवाई करा, भूमाफियांना आणि भ्रष्ट अधिकाऱ्यांना वाचवणाऱ्या वरिष्ठांवरही कारवाई झाली पाहिजे!”जर प्रशासनाने आता पावले उचलली नाहीत, तर जनतेचा उद्रेक होणार हे निश्चित! आणि त्या वेळी या वरिष्ठ अधिकाऱ्यांची ढालही त्यांना वाचवू शकणार नाही.

land Scam Sawedi सावेडी जमीन घोटाळा : भ्रष्ट अधिकाऱ्यांचे लोटांगण आणि वरिष्ठांची गुप्त कृपा? Read More »

अहिल्यानगरमध्ये 35 वर्षांनंतर जमिनीचा संशयास्पद व्यवहार नोंद

अहिल्यानगरमध्ये 35 वर्षांनंतर जमिनीचा संशयास्पद व्यवहार नोंद; भूमाफियांना प्रशासनाचा हात?

अहिल्यानगरमध्ये 35 वर्षांनंतर जमिनीचा संशयास्पद व्यवहार नोंद; भूमाफियांना प्रशासनाचा हात? land Scam Sawedi :- अहिल्यानगर – सध्या राज्यात अहमदनगर मधील शहरी भागातील जमिनींचे भाव दिवसेंदिवस वाढत चालले आहेत त्यातच झटपट आणि कमी काळात श्रीमंत होण्याची स्पर्धा जोरात सुरू आहे जे नागरिक हयात नाहीत किंवा पूर्वी शहर सोडून निघून गेले अशा अशा नागरिकांच्या जमिनी आणि प्लॉट शोधून अधिकाऱ्यांना हाताशी धरून त्या जमिनीचे बनावट खरेदीखत करायचं आणि ती चढ्या भावाने विकायची हा धंद्या सध्या अहिल्यानगर मध्ये जोरात सुरू आहे, अहिल्यानगर (सावेडी) (land Scam Sawedi) येथील सर्वे नंबर 245/ब 1 (क्षेत्रफळ 0.72 हेक्टर आर) व 245/ब 2 (क्षेत्रफळ 0.63 हेक्टर आर), एकूण 1 हेक्टर 35 आर जमिनीचा 35 वर्षांपूर्वीचा खरेदी व्यवहार तब्बल तीन दशकांनंतर सावेडी तलाठी कार्यालयात नोंदवला गेल्याने मोठा गोंधळ उडाला आहे. मूळ मालक अब्दुल अजीज डायाभाई (मूळ पत्ता झेंडीगेट, अहिल्यानगर; सध्या वास्तव्य – मुंबई) यांनी 15 ऑक्टोबर 1991 रोजी पारसमल मश्रीमल शहा यांना विकलेली जमीन एवढ्या दीर्घ काळानंतर शासकीय नोंदवहीत दाखल होणं संशयाचे धुके गडद करत आहे.या प्रकरणात भूमाफियांना शासकीय यंत्रणेतील भ्रष्टाचाराचा आणि राजकीय वरदहस्ताचा आधार मिळाल्याची जोरदार चर्चा आहे. एवढ्या वर्षांनंतर नोंद घेताना मूळ मालकाला कोणतीही नोटीस न देता नोंद प्रक्रिया पूर्ण करण्यात आली, खरेदीखताची मूळ प्रत तपासण्यात आली नाही, यामुळे नोंदवह्यांची शुद्धता आणि शासकीय प्रक्रियेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. *भूमाफियांचे संगनमताने?बाहेरगावी वास्तव्यास असलेल्या किंवा मृत व्यक्तींच्या नावावरील जमिनीवर खोटे दस्तऐवज तयार करून अधिकाऱ्यांना हाताशी धरून जमीन हडप करण्याचे प्रकार दिवसेंदिवस वाढत असल्याचे स्थानिकांनी सांगितले. अशा प्रकरणांमध्ये संबंधित अधिकाऱ्यांना मिळणारा मोठा आर्थिक फायदा, वरिष्ठांचे मूक समर्थन आणि काही राजकीय लोकांचा आशीर्वाद असल्याने हे घोटाळे बेधडक सुरू आहेत, असा आरोप केला जात आहे.उच्चस्तरीय चौकशीची मागणीया संशयास्पद व्यवहाराची सखोल चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करण्यात यावी आणि शासकीय यंत्रणेत पसरलेल्या भ्रष्टाचाराला आळा घालावा, अशी जोरदार मागणी स्थानिक नागरिकांनी प्रशासनाकडे केली आहे. अहिल्यानगर परिसरात भूमाफियांचे वाढते धाडस आणि प्रशासनातील संदिग्ध भूमिका यामुळे जनतेत तीव्र संतापाचे वातावरण आहे. या प्रकरणामुळे भूमी नोंदणी प्रक्रियेत पारदर्शकता आणि शासकीय यंत्रणेच्या जबाबदारीवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.

अहिल्यानगरमध्ये 35 वर्षांनंतर जमिनीचा संशयास्पद व्यवहार नोंद; भूमाफियांना प्रशासनाचा हात? Read More »

Ahilyanagar News : जिल्ह्यात शस्त्रबंदी व जमावबंदी आदेश जारी

Ahilyanagar News : जिल्ह्यातील कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी अपर जिल्हादंडाधिकारी दादासाहेब गिते यांनी मुंबई पोलीस अधिनियम, १९५१ चे कलम ३७ (१) (३) अन्वये २८ जून ते ११ जुलै २०२५, रात्री १२ वाजेपर्यंत शस्त्रबंदी व जमावबंदी आदेश जारी केला आहे. सदर आदेश धार्मिक कार्यक्रम, लग्नकार्य, मिरवणुका किंवा प्रेतयात्रांवरील जमावास लागू राहणार नाही. तसेच पोलीस अधिकारी, कामावर असलेले शासकीय अधिकारी व कर्मचारी, तसेच सभा अथवा मिरवणुका काढण्यासाठी रीतसर परवानगी घेतलेल्या व्यक्तींनाही हा आदेश लागू होणार नाही. या आदेशाचा भंग करणाऱ्यांविरुद्ध कायदेशीर कारवाई करण्यात येईल, असेही आदेशात नमूद करण्यात आले आहे.

Ahilyanagar News : जिल्ह्यात शस्त्रबंदी व जमावबंदी आदेश जारी Read More »

लक्ष्मीनगरमध्ये अत्यंत कमी दाबाने पाणीपुरवठा; नागरिकांनी आयुक्तांना दिले निवेदन

Ahilyanagar News : तपोवन रोडवरील लक्ष्मीनगर परिसरात गेल्या अनेक दिवसांपासून अत्यंत कमी दाबाने आणि अपुरा पाणीपुरवठा होत असल्याने नागरिकांमध्ये तीव्र नाराजी निर्माण झाली आहे. या त्रासाला कंटाळून परिसरातील रहिवाशांनी महानगरपालिका आयुक्त यशवंत डांगे यांची भेट घेऊन सविस्तर निवेदन सादर केले. या बैठकीस माजी नगरसेवक निखील वारे आणि बाळासाहेब पवार हेही उपस्थित होते. सयाजीराव वाव्हळ, नानासाहेब माळवदे, बंडोपंत ढोले, राजेंद्र डहाळे, संजय कांडेकर, रमेश चौधरी, किरण विरकर, संजय धामने, पोपटराव राठोड, प्रशांत फुगनर, सुरेश बोडखे, भानुदास दातीर, अशोक कोरडे, सुर्यकांत झेंडे आणि पत्रकार साहेबराव कोकणे यांनी नागरिकांचे म्हणणे मांडत सविस्तर चर्चा केली. नागरिकांनी यावेळी स्पष्ट केले की, लक्ष्मीनगरमधील जलवाहिनी ही जुनी व गंजलेली आहे, त्यामुळे पुरेसा दाब मिळत नाही. फेज टू पाण्याकरिता सर्वांनी नियमाप्रमाणे शुल्क भरले असून नवीन नळजोडण्या देखील दिल्या गेल्या आहेत, मात्र अपेक्षित पाणीपुरवठा अद्याप मिळत नाही. यावर आयुक्त यशवंत डांगे यांनी दोन दिवसांत प्रत्यक्ष पाहणी करून परिसरात पुरेशा दाबाने आणि नियमित पाणीपुरवठा सुरू करण्याचे आश्वासन दिले आहे. नागरिकांनी या निर्णयाचे स्वागत करत काम लवकर सुरू होईल, अशी अपेक्षा व्यक्त केली आहे.

लक्ष्मीनगरमध्ये अत्यंत कमी दाबाने पाणीपुरवठा; नागरिकांनी आयुक्तांना दिले निवेदन Read More »

अतिक्रमणाची दाखल न घेतल्याने शिवसेना ठाकरे गटाचे विशाल वालकर यांचे उपोषण सुरू

Ahilyanagar News : शहरातील माणिक चौक या ठिकाणी असलेले पक्के अतिक्रमण महानगरपालिकेच्या प्रशासनाला निवेदन देऊन सुद्धा त्याची दखल न घेतल्यामुळे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे व्यापारी शहर प्रमुख विशाल वालकर यांनी आज महानगरपालिकेच्या समोर प्रशासनाच्या विरोधामध्ये उपोषण सुरू केले. महानगरपालिकेच्या प्रशासनाने अनेक ठिकाणी अतिक्रमण झालेली असताना देखील सुद्धा कारवाई केली नाही उलट अनेक ठिकाणी मोजक्या कारवाई करून वेळ मारून देण्याचा प्रकार घडलेला आहे असेच उदाहरण शहरातील माणिक चौक भागांमध्ये पाहायला मिळालेले आहे. महानगरपालिकेच्या माध्यमातून ठिक ठिकाणी रस्त्याची, ड्रेनेजची कामे चालू आहेत. त्यापैकी एकमुखी दत्त मंदीर चौक, सोपानराव वडेवाला समोर, माणिक चौक येथे आशा टॉकीज चौक ते कापड बाजार येथे चालु असलेल्या ड्रेनेज लाईन व काँक्रीटीकरणचे कामाच्या रस्त्यात अडथळा निर्माण करणारे ओटे, पत्रा शेड इ. अतिक्रमण हटवुन काम पुर्ण करणे अत्यंत गरजेचे आहे. सदर मालमत्ता सि.स.नं. ३६१८/२ या ठिकाणी सन २०१९ पासून अशोक छल्लानी व भागीदार यांनी या मालमत्तेमध्य बेकायदेशीर महानगरपालिकेच्या नगररचना विभागाची कुठलीही परवानगी न घेता विनापरवाना बांधकाम करुन गाळे बांधून महानगरपालिकेच्या जागेमध्ये १० फुटाचा ओटा, पत्र्याची शेड बांधून मोठे अतिक्रमण केले आहे. तसेच अशोक छल्लानी व इतर भागीदार यांनी त्या बेकायदेशीर बांधकाम केलेल्या गाळ्यांमध्ये भाडेकरी टाकले असुन सदर जागेवर डी.एस.पी. फुटवेअर व फुटी फुटवेअर व इतर दुकाने या दोन दुकानदारांनी दुकानासमोर महापालिकेच्या जागेमध्ये वीजेचा खांब पत्रा शेडच्या आत घेऊन रस्त्यावर १० फुट X २० फुट ओटा व पत्राशेड बांधुन मोठे अतिक्रमण केले आहे. तरीपण संबंधीत मालमत्ताधारक हा महानगरपालिकेला न जुमानता वारंवार अतिक्रमण केलेले आहे. सदर अतिक्रमणाबाबत वालकर यांनी मनपास दिनांक ३० मे २०२५ रोजी आयुक्त रितसर तक्रार अर्ज दाखल केला होता. त्या तक्रार अर्जाकडे महापालिका, अतिक्रमण विभाग व प्रभाग समिती नं. २ या विभागांना संबंधित अधिकारी व कर्मचारी यांना समक्ष भेटून तक्रारीचे निरसन करण्याची विनंती केली होती. परंतु सदर सर्व विभागांनी याकडे दुर्लक्ष केलेले होते.त्यामुळे दि.१३ रोजी उपोषणाला बसण्याचे आवाहन केले होते, त्या संदर्भात महानगरपालिका प्रशासनाने मला दिनांक ०9 रोजी पत्र देऊन अश्वासन दिले की, नगर रचना विभागामार्फत माकींग करुन अहवाल सादर झाला की, उचित कारवाई करण्यात येईल असे पत्र देवून संबोधले होते, या करीता मी उपोषण स्थगित केले होते. प्रभाग समिती क्र. २ ने नगर रचना विभागाला रितसर अभिप्राय मिळावा या करीता मागणी केली होती, त्या मागणीचा रोड मार्कीग करुन अतिक्रमण केलेला अभिप्राय त्यांना दि. ९ रोजी प्राप्त झालेला आहे. तरी देखील आज पर्यंत महानगरपालिकेने कुठल्याही प्रकारची कायदेशीर कार्यवाही अद्याप केलेली नाही व रोडचे काम पुर्णत्वाकडे जात आहे. दरम्यान, वालकर यांनी उपोषणाचा इशारा दिल्यानंतर आज सकाळी महानगरपालिकेने त्या ठिकाणी जाऊन फक्त पत्राची शेड बाजूला केली मात्र पक्के बांधकाम तसेच ठेवले आहे. त्यामुळे आज पासून माणिक चौक येथील अतिक्रमण कारवाईच्या संदर्भात प्रशासनाने दिरंगाई केल्यामुळे वालकर यांनी उपोषण सुरू केले आहे.

अतिक्रमणाची दाखल न घेतल्याने शिवसेना ठाकरे गटाचे विशाल वालकर यांचे उपोषण सुरू Read More »

निवडणूक आयोगाने 48 तासात नियम 93 बदलला; नाना पटोलेंचा गंभीर आरोप

Nana Patole : काँग्रेसचे माजी प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी पुन्हा एकदा निवडणूक आयोगावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे. महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत मतांची चोरी करून भाजपा युती सरकार सत्तेत आले आहे. असं त्यांनी पत्रकार परिषदेत म्हटले आहे. तसेच निवडणूक प्रक्रियेत गडबड करून महाराष्ट्रातील निवडणुकीत घोटाळा केला, त्याची चौकशी करण्याची मागणी निवडणूक आयोगाकडे केली असता आयोग समाधानकारक उत्तर देत नाही. हरियाणा निवडणुकीतही असाच घोटाळा करण्यात आला असेही ते म्हणाले. चंदीगड उच्च न्यायालयाने मतदानासंदर्भातील सर्व माहिती व दस्तावेज देण्याचा आदेश आयोगाला दिला होता पण  आपली चोरी पकडली जाणार या भितीने आयोगाने मोदी सरकारच्या मदतीने अत्यंत घाईने अवघ्या ४८ तासात नियम ९३ बदलल्याचा गंभीर आरोप काँग्रेसचे ज्येष्ठ नेते नाना पटोले यांनी केला आहे. नागपूरमध्ये पत्रकारांशी बोलताना नाना पटोले म्हणाले की, संध्याकाळी ५८ टक्के असलेले मतदान दुसऱ्या दिवशी ६५ टक्क्यांच्या वर वाढवण्यात आले. ही वाढ ८ टक्क्यांची असून ते जवळपास ७६ लाख मतदान आहे. हे ७६ लाख मतदान कसे वाढले, यावर निवडणूक आयोग सविस्तर खुलासा करत नाही. संध्याकाळी ५ नंतरच्या मतदानाचे सीसीटीव्ही फूटेज देण्याची मागणी केली पण माहिती देता येणार नाही असा नियमच करून टाकला. उच्च न्यायालयाच्या आदेशाच्या आठवडाभराच्या आतच १७ डिसेंबर २०२४ ला निवडणूक आयोगाने केंद्रीय कायदा मंत्रालयाला पत्र लिहून लोकप्रतिनिधी कायद्याच्या नियम ९३ मध्ये बदल करण्याची विनंती केली. नियम ९३ नुसार मतदानानंतरचे दस्तऐवज आणि माहिती मागवता येते. पण ही माहिती जनतेपर्यंत पोहोचू नये यासाठी केंद्र सरकार आणि निवडणूक आयोगाने अत्यंत वेगाने हालचाली केल्या. १९ डिसेंबर रोजी आयोगाने कायदा मंत्रालयाला पत्र पाठविले होते त्याचा दुसऱ्याच दिवशी म्हणजे २० डिसेंबरला निवडणूक आयोग व कायदा मंत्रालयाच्या अधिकाऱ्यांमध्ये बैठक होऊन त्याच रात्री १०:२३ वाजता नवीन नियम अधिसूचितही करण्यात आला. मतदान प्रक्रियेत काही घोटाळा केलेला नाही तर नियम बदलण्याची घाई कशासाठी केली. यावरून दाल में कुछ काला है हे स्पष्ट दिसते. भारतीय जनता पक्षाने महाराष्ट्र व हरियाणाप्रमाणेच इतर राज्यातही मतांवर दरोडा टाकला आहे. काँग्रेस पक्ष ही लढाई सुरुच ठेवली असून सर्वोच्च न्यायलयात दाद मागणार आहोत असेही नाना पटोले म्हणाले.

निवडणूक आयोगाने 48 तासात नियम 93 बदलला; नाना पटोलेंचा गंभीर आरोप Read More »

राम शिंदेंच्या पराभवामागे षडयंत्र! – महसूल मंत्री बावनकुळेंचा घणाघात”पण कुणी पाडलं?” – राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण

अहिल्यानगर – “राम शिंदे हे कर्तबगार आणि जनतेशी जोडलेले नेते आहेत. त्यांना विधानसभेच्या निवडणुकीत जाणीवपूर्वक षडयंत्र रचून पाडण्यात आलं,” असा घणाघात करत महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी एक नवा राजकीय भडका उडवला आहे. मात्र, त्यांनी कोणावरही थेट नाव घेऊन आरोप न करता, ‘पण कुणी पाडलं?’ या सवालाने राजकीय वर्तुळात खळबळ माजवली आहे. शेवगावमध्ये नुकत्याच पार पडलेल्या कुस्ती स्पर्धेत बोलताना बावनकुळे म्हणाले, “राम शिंदेंनी मैदानात आणि राजकारणात नेहमी झुंज दिली आहे. त्यांच्यावर अन्याय झाला आहे. हा पराभव नैसर्गिक नव्हता, तर हे एक संगनमताचे षडयंत्र होतं.“ राजकीय सूत्रांच्या मते, बावनकुळे यांचा हा इशारा पक्षांतर्गत गटबाजीकडे असल्याची शक्यता आहे. मात्र, बावनकुळे यांनी नामोल्लेख टाळल्याने चर्चा आणि तर्कांना अधिक उधाण आलं आहे. स्थानिक कार्यकर्ते आणि राम शिंदे समर्थकांनी देखील या वक्तव्याला दुजोरा देत, “खरं कुणी पाडलं, हे आता लोकांनी समजून घ्यायला हवं,” अशी प्रतिक्रिया दिली आहे. दरम्यान, या विधानामुळे भाजपच्या अंतर्गत गोटात पुन्हा एकदा खदखद वाढण्याची चिन्हं दिसू लागली आहेत. पुढील काही दिवसांत या आरोपाचा प्रतिध्वनी दिल्लीपासून जिल्हापर्यंत ऐकू येईल, अशी शक्यता वर्तवली जात आहे. राजकीय भूकंप होतोय का? की केवळ इशारा? या आरोपाच्या पडद्यामागे नेमकं काय? – येणाऱ्या काळात स्पष्ट होईल!

राम शिंदेंच्या पराभवामागे षडयंत्र! – महसूल मंत्री बावनकुळेंचा घणाघात”पण कुणी पाडलं?” – राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण Read More »