Dnamarathi.com

Ahmednagar News: वसीम गुलाब शेख ,समीर अब्दुल शेख ,तन्वीर निसार शेख ,आरिफ ईस्माईल कुरेशी हे चारही लोकं आर टी ओ कार्यालय जवळ वाहनाला रेडियम लावण्याचे काम करतात तेथेच सल्लाउद्दीन शेख उर्फ SS पण रेडियम लावण्याचे व्यवसाय करतात.

सल्लाउद्दीन शेख उर्फ SS हे वारंवार वरील सगळ्यांना धमकी द्यायचे काम करतात तुम्ही इथे काम करायचे नाही मी येथे 25 वर्षा पासून काम करतो इथे माझा राज चालणार इथे काम करायचा तर माझ्याकडे करायचा नाही तर काम करू देणार नाही तुम्हाला जीवे मारून टाकीन माझे नेटवर्क लई मोठे आहे.

 तुमच्यावर खोटे गुन्हे दाखल करून अडकवेन माझा कोण काही वाकडं करू शकत नाही पोलिसांबरोबर आणि आर टी ओ बरोबर पण माझे संबंध आहे. राजकारणात पण माझा चांगला वजण आहे. तुम्हाला आयुष्यातून संपून टाकेन अशी धमकी वारंवार दिल्याने वैतागून वरील वसीम गुलाब शेख याने श्रीरामपूर शहर पोलीस ठाण्यात फिर्याद 19 एप्रिल 2023 रोजी दिली.

या प्रकरणात पोलिसांनी  504,506 प्रमाणे NC दाखल करून घेतले . सल्लाउद्दीन शेख उर्फ SS याने वसीम शेख याला परत रस्त्यात अडवले व सांगितले कि तू जी NC दाखल केली ना त्या NC ने मला काही फरक पडत नाही ते तर बॉण्ड जामीन वर माझा जामीन होऊन जाईल पण मी तुला जिवंत ठेवणार नाही.

नंतर काही राजकारणी यांना मध्यस्ती करायला लावून हे वाद मिटवून घेतला परंतु हे वाद मिटलेले असतांना सल्लाउद्दीन शेख उर्फ SS याने 29 डिसेंबर 2023 रोजी परत वसीम गुलाब शेख आणि इतर तिघांना परत जीवे मारण्याची धमकी दिल्याने हे लोक परत श्रीरामपूर पोलीस ठाण्यात गेले व तेथे सल्लाउद्दीन शेख उर्फ SS याच्यावर  504 , 506 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *