Dnamarathi.com

प्रतिनिधी : सय्यद शाकीर 

Maharashtra Politics : भारतीय निवडणूक आयोग येत्या काही दिवसात लोकसभा निवडणूक जाहीर करणार आहे. यामुळे आत्तापासूनच सर्व राजकीय पक्षांनी आपापल्या तयारीला सुरुवात केली आहे. सर्व पक्ष आता जागा वाटपावरून एकमेकांशी बोलताना दिसत आहे. 

तर दुसरीकडे राज्यात आणि केंद्रामध्ये सत्तेत असणारे भारतीय जनता पक्षाने मुंबईसाठी एक मास्टर प्लॅन तयार केला आहे. समोर आलेल्या माहितीनुसार भाजप मुंबई सर्वाधिक लोकसभा जागा लढू शकते. यामुळे शिंदे गटाला मुंबईत लोकसभेचे किती जागा मिळणार आता हे पाहावे लागणार आहे. 

 राज्याची सध्याची राजकीय परिस्थिती पाहता राज्यात बहुतेक ठिकाणी महाविकास आघाडी आणि महायुती अशी थेट लढत होणार आहे. यामुळे कोणत्या पक्षाला किती जागा मिळणार याकडे संपूर्ण राज्याचे लक्ष लागून आहे.

 2019 च्या लोकसभा निवडणुकीत मुंबईतील साही जागांवर भाजप शिवसेनेने विजय मिळवला होता मात्र आता मुंबईत ठाकरे गट विरुद्ध शिंदे गट आणि भाजप अशी लढत होणार आहे. यामुळे भाजपने एक खास प्लॅन रेडी केला आहे. 

मिळालेल्या माहितीनुसार मुंबईतील सहा लोकसभा जागांपैकी 2024 च्या लोकसभा निवडणुकीत भारतीय जनता पक्ष चार जागांवर निवडणूक लढवू शकते. भाजप उत्तर मुंबई, उत्तर पूर्व मुंबई आणि उत्तर मध्य मुंबईसह भाजप दक्षिण मुंबईच्या लोकसभेच्या जागेवर उमेदवार देऊ शकते.

जर असं झालं तर शिंदे गटाला फक्त 2 लोकसभा जागा मुंबईमध्ये मिळणार. शिंदे गटाला भाजप उत्तर पश्चिम आणि मुंबई साऊथची जागा देणार असल्याची माहिती समोर आली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *