Ahmednagar News: अहमदनगर जिल्ह्यातील राहुरी तालुक्यामधील गुहा या ठिकाणी रमजान बाबा दर्गामध्ये बसविण्यात आलेली मूर्ती हटविण्यात यावी या मागणीसाठी आज जिल्हाधिकारी कार्यालयावर समस्त मुस्लिम समाजच्या वतीने निदर्शने करण्यात आली तसेच दर्गामध्ये मूर्ती बसविण्यासाठी संबंधित पोलीस, तलाठी आणी तहसीलदार यांच्यावर देखील गुन्हे दाखल करण्याची मागणी यावेळी करण्यात आली आहे.
राहुरी तालुक्यातील गुहा या गावांमध्ये एकाच जागेवर असलेले दैवत दर्गा की मंदिर यावरून वाद चालू आहे हा वाद सध्या कोर्टात चालू आहे व या जागेवर कोणताही धार्मिक विधी करू नये असे स्पष्ट आदेश न्यायालयाने दिले असताना देखील पोलीस अधीक्षकांसह संबंधित पोलीस अधिकारी तलाठी व तहसीलदार यांनी काही जातीयवादी संघटनांना मिळून वादग्रस्त असलेल्या जागेतील रमजान बाबा दर्गामध्ये अनधिकृतपणे मूर्ती बसवली आहे.
त्यामुळे बसविण्यात आलेले मूर्ती ही त्वरित हटवण्यात यावी तसेच जातीयवादी संघटनेला मदत करणाऱ्या पोलीस तलाठी तसेच तहसीलदार यांच्यावर गुन्हे दाखल करण्याची मागणी यावेळी मुस्लिम समाजाच्या वतीने करण्यात आली व न्यायालयाच्या आदेशाचे उल्लंघन करीत बसविण्यात आलेली मूर्ती ही येत्या पंधरा दिवसात काढावी अन्यथा कोणतीही पूर्व सूचना न देता आंदोलन करण्यात येईल असा इशाराच मुस्लिम समाजाच्या वतीने देण्यात आला आहे .