DNA मराठी

ahmednagar news

Leopard

Maharashtra News: नगर शहरात बिबट्याची दहशत, बोल्हेगावमध्ये तरुणावर प्राणघातक हल्ला

Maharashtra News: गेल्या काही दिवसांपासून नगर जिल्ह्यामध्ये बिबट्याकडून नागरिकांवर हल्ले झाल्याचे प्रकार समोर आले आहे. तर आता पुन्हा एकदा धक्कादायक प्रकार नगर शहरात घडल्याने एकच खळबळ उडाली आहे. शहरातील बोल्हेगाव या भागात बिबट्याने एका युवकावर प्राण घातक हल्ला केल्याची घटना समोर आली आहे. या घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली आहे. दरम्यान ही धक्कादायक घटना गुरुवार दि.२६ डिसेंबर २०२४ रोजी सायंकाळच्या सुमारास प्राणघातक हल्ला केला आहे. बोल्हेगावला जोडणाऱ्या सीना नदीवरील पुलाजवळ हि घटना घडली आहे.या ठिकाणी पुलाचे काम चालू आहे.तसेच या नदीजवळ बाहेर राज्यातील लोक मोठ्या कामाला आलेले आहेत तिथे त्यांची लोकवस्ती आहे.बिबट्याने अक्षय चंद्रशेखर गुंजाळ या युवकार प्राणघातक हल्ला केला त्याच्या पायाला बिबट्याने चावा घेतला आहे. दरम्यान भर वस्ती व वर्दळीचे ठिकाण असलेल्या भागामध्ये बिबट्यांकडून हल्ला झाल्याच्या घटनेनं नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे. नगर शहरात तसेच बोल्हेगाव परिसरातील लोकांमध्ये बिबट्याची दहशत निर्माण झाली आहे. जखमी अक्षय गुंजाळ याला पुढील उपचारासाठी दवाखान्यात दाखल करण्यात आले आहे.

Maharashtra News: नगर शहरात बिबट्याची दहशत, बोल्हेगावमध्ये तरुणावर प्राणघातक हल्ला Read More »

Ajit Pawar

Ajit Pawar : खातेवाटप लांबणीवर पडणार, अजितदादा नाराज?

Ajit Pawar: विधानसभा निवडणुकीमध्ये प्रचंड बहुमत घेत देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वात महायुतीने राज्यात सरकार स्थापन केली आहे तर 15 डिसेंबर रोजी महायुतीकडून 39 आमदारांनी मंत्री पदाची शपथ देखील घेतली आहे. मात्र अद्याप खातेवाटप न झाल्याने विरोधकांकडून राज्य सरकारवर जोरदार टीका करण्यात येत आहे. मंत्र्यांचा शपथविधी झाल्यानंतर पुढील दोन – तीन दिवसात खातेवाटप होणार असल्याची माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली होती. मात्र आता एक मोठी अपडेट समोर येत आहे. या माहितीनुसार, खातेवाटप लांबणीवर आहे. याचे मुख्य कारण म्हणजे उपमुख्यमंत्री अजित पवार नाराज असल्याचे सांगण्यात येत आहे. मिळालेल्या माहितीनुसार, अजित पवार यांचे खातेवाटपवर एकमत अजूनही नाही झालेले नाही त्यामुळे खातेवाटप लांबणीवर आहे. अर्थखात पाहिजे आणि राष्ट्रवादीला गृहनिर्माण पाहिजे असं सांगण्यात येत आहे. तर दुसरीकडे भाजप व शिवसेनाचे खातेवाटप तयार आहे. 15 डिसेंबर रोजी झालेल्या शपथविधी कार्यक्रमात भाजपकडून 19 शिवसेनेकडून 11 आणि अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसकडून 09 आमदारांनी मंत्रीपदाची शपथ घेतली होती.

Ajit Pawar : खातेवाटप लांबणीवर पडणार, अजितदादा नाराज? Read More »

Amrita Khanwilkar

Amrita Khanwilkar : उत्तम काम सोबतीला आव्हानं 2024 वर्षात अमृताने केल्या ‘या’ खास गोष्टी !

Amrita Khanwilkar : 2025 अगदी काही दिवसांवर येऊन ठेपल आहे आणि अश्यातच अभिनेत्री अमृता खानविलकर हिने 2024 वर्ष तिच्या साठी कसं होत हे शेयर केलं ! अमृताने 2024 वर्षात अनेक कमालीचे बॉलिवूड प्रोजेक्ट्स केले आणि त्याला प्रेक्षकांची तितकीच पसंती देखील मिळाली. बॉलिवुड मध्ये अमृताने विविध विषयांवर काम केलं आणि त्या भूमिका खास केल्या आता अर्थात या भूमिका दिसायला सोप्प्या असल्या तरी त्या तितक्याच आव्हानात्मक होत्या ! 2024 मध्ये अमृताने खऱ्या अर्थाने ओटीटी बॉलिवुड गाजवल आणि प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य केलं. लुटेरे, चाचा विधायक है हमारे 3, 36 डे बडे हिंदी प्रोजेक्ट्स अमृताने केले. अमृता कायम चर्चेत असलेली अभिनेत्री राहिली आहे आणि तिने हे या वर्षात देखील सिद्ध केल. ” वर्ल्ड ऑफ स्त्री” सारखा शास्त्रीय आणि अर्ध-शास्त्रीय संगीत आणि नृत्याची अनोखी मैफिल तिने या वर्षात प्रेक्षकांना दिली. मराठी सिनेमा आणि अमृताच नात हे अतूट आहे आणि म्हणून 2024 वर्षात तिने वेगळ्या धाटणीच्या भूमिका असलेले चित्रपट केले. लाईक अँड सबस्क्राईब , धर्मरक्षक संभाजी महाराज या चित्रपटातून तिने कमालीच्या भूमिका साकारल्या. अमृताच काम इथेच थांबत नाही तर तिने या वर्षात टेलिव्हीजन विश्वात देखील आपली छाप पाडली नेहमी पेक्षा वेगळ पण तितकच कठीण काम करण्यासाठी ती ड्रामा ज्युनियर्स साठी जज च्या भूमिकेत बसली. कामाच्या दृष्टीने अमृताने अनेक गोष्टी खास प्रोजेक्ट्स तर केले पण तिने मुंबईत स्वतःच हक्काचं घर देखील घेतलं. आगामी वर्षात अमृता आता काय काय प्रोजेक्ट्स करणार हे बघण उत्कंठावर्धक ठरणार आहे.

Amrita Khanwilkar : उत्तम काम सोबतीला आव्हानं 2024 वर्षात अमृताने केल्या ‘या’ खास गोष्टी ! Read More »

IMG 20241212 WA0011

Ahmednagar News: अहमदनगर शहरातील उड्डाण पुलावर पुन्हा अपघात, ट्रक पुलावरून पलटी

Ahmednagar News: अहमदनगर शहरातील उड्डाणपुलावर पुन्हा एकदा अपघात झाल्याची माहिती समोर आली आहे. उड्डाणपुलावर गाडीवरील ड्रायव्हरचे नियंत्रण सुटल्याने अपघात झाला असल्याची प्राथमिक माहिती समोर येत आहे. रात्री 8.30 ते 9 वाजेच्या दरम्यान अपघात घडल्याची माहिती समोर येत आहे. सदरचे वाहन ऊसमाल वाहतूक ट्रक असून उड्डाण पुलाच्या तीव्र वळणावर ट्रक चालकाला वेगावर नियंत्रण मिळविता न आल्याने ट्रक पुलावर पलटी होऊन गाडीतील काही माल पुलावरून थेट खाली कोसळला. दरम्यान थंडी तसेच रात्रीची वेळ असल्याने पूलाखालील वाहतूक कमी होती त्यामुळे पुन्हा एकदा मोठी जीवितहानी टळली. गेल्या वर्षभरात याच बहुचर्चित उड्डाणपुलावर अनेक अपघात घडले असेल तरी अद्याप प्रशासनाकडून कुठलेही ठोस उपाययोजना करण्यात आले नाही.

Ahmednagar News: अहमदनगर शहरातील उड्डाण पुलावर पुन्हा अपघात, ट्रक पुलावरून पलटी Read More »

FB IMG 1733719249782

Maharashtra News: जलसंधारण कामांमुळे करंजीतील फळबागा बहरल्या

Maharashtra News: पाथर्डी तालुक्यातील करंजी गावात प्रधानमंत्री कृषी सिंचन योजनेअंतर्गत जलसंधारणाची विविध कामे केल्याने शाश्वत जलसाठा उपलब्ध झाला असून फळबागांना सिंचनासाठी पाणी उपलब्ध झाले आहे. करंजी हे बाजारपेठेचे गाव म्हणून ओळखले जाते. दिवसभरात दहा ते पंधरा हजार प्रवासी गावात ये-जा करतात. त्यामुळे गावकऱ्यांसोबत या प्रवाशांसाठीदेखील पिण्याचे पाणी आवश्यक असते. गावात फळबागांचे प्रमाणही अधिक अर्थात एकूण पिकांच्या 75 टक्के आहे. या फळबागांसाठीदेखील मुबलक प्रमाणात पाण्याची आवश्यकता असते. पाण्याचे योग्य नियोजन करण्यासोबत पाणीसाठ्यात वाढ करण्याची आवश्यकता लक्षात घेवून गावाने प्रधानमंत्री कृषी सिंचन योनजेअंतर्गत जलसंवर्धनाची विविध कामे हाती घेतली. जलस्रोतांमधील गाळ मोठ्या प्रमाणात काढण्यात आला आणि आवश्यक तिथे दुरूस्तीची कामे करण्यात आली. गाळ काढून परिसरातील शेतात टाकण्यात आल्याने शेतीसाठी त्याचा फायदा झाला. गावात पाणलोट विकास समितीमार्फत 4 ठिकाणी सिमेंट नाला बांध दुरुस्ती आणि 19 सामुहीक शेततलावाची कामे घेण्यात आली. याशिवाय 3 मातीनाला बांध, 8 चेक डॅम, समतल चर, संयुक्त गॅबियन, सलग समतल चर अशी 39 कामे पूर्ण करण्यात आली आहेत. या कामांवर 1 कोटी 34 लाख रुपये खर्च करण्यात आले. या सर्व कामांमुळे गावातील पाणीसाठा वाढण्यास मदत झाली. गावाला आता पाणी टंचाईचा सामना करावा लागणार नाही. पिण्यासाठी आणि सिंचनासाठी मुबलक प्रमाणात पाणी उपलब्ध झाले आहे. एवढ्यावर समाधान न मानता जलसंधारणाची आणखी कामे घेण्याचा ग्रामस्थांचा निर्धार आहे. एकूणच गावात जलसंवर्धनाचे नवे पर्व सुरू झाले आहे. रफिक शेख, सरपंच-एरवी पावसाळ्यानंतर दोन ते तीन महिन्यात विहिरींचे पाणी अटत असे. यावर्षी मात्र विहिरींना चांगल्या प्रमाणात पाणी असल्याने फळबागांना पुरेसे पाणी मिळते आहे. पाण्यामुळे इतरही परिसर बहरला आहे. गावात असणाऱ्या प्रत्येक बंधाऱ्यातील गाळ काढण्यासोबत जलयुक्त शिवार आणि गाळमुक्त धरण गाळयुक्त शिवार योजनेअंतर्गत विविध कामे घ्यायची आहेत.

Maharashtra News: जलसंधारण कामांमुळे करंजीतील फळबागा बहरल्या Read More »

IMG 20241207 WA0001

Shrirampur News: मुकादमाला लुटणाऱ्या टोळीकडून चार मोटारसायकल जप्त, श्रीरामपूर शहर पोलिसांची कामगिरी

Shrirampur News:  श्रीरामपूर शहर पोलीसांनी मुकादमाला लुटणाऱ्या टोळीकडून दिड लाख रुपये किंमतीच्या चार मोटारसायकल जप्त केले आहे. 28 नोव्हेंबर रोजी फिर्यादी दारासिंग तुकाराम डावर (रा. मध्य प्रदेश) हे त्यांच्याकडील काम करणाऱ्या कामगाराचे पैसे देण्याकरीता कांदा मार्केट, श्रीरामपूर येथुन पाच लाख अठरा हजार रुपये घेवुन जात असताना सात आरोपींनी निर्मळ यांच्या पुठ्याच्या कारखाण्याजवळील रोडवर कोयत्याचा धाक दाखवून त्यांच्याकडे असलेली पैश्याची बॅग चोरली होती. या बाबत  श्रीरामपूर शहर पोलिस ठाण्यात  बी.एन.एस. कलम 309 (6),3 (5) प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला होता. तर आता या प्रकरणाचा तपास करत पोलिसांनी  (1) इम्रान आयुब शहा, (वय 28 वर्षे),  2) आनंद अमर पवार, (वय 28 वर्षे), 3) शादाब अब्बास शेख, (वय 21 वर्षे), 4) रितेश बाबासाहेव आढाव, (वय 19 वर्षे),  5) सुरज सोपान मुठे (वय 24 वर्षे),  7) ऋषिकेश उर्फ सोन्या किशोर पागिरे (वय 25 वर्षे)  याला अटक केली आहे.

Shrirampur News: मुकादमाला लुटणाऱ्या टोळीकडून चार मोटारसायकल जप्त, श्रीरामपूर शहर पोलिसांची कामगिरी Read More »

Screenshot 2024 12 05 10 02 09 11 40deb401b9ffe8e1df2f1cc5ba480b12

Maharashtra News: किरकोळ वादानंतर विद्यार्थ्याला बेदम मारहाण, गुन्हा दाखल

Maharashtra News: अहिल्यानगर तालुक्यातील सारोळा कासार गावामध्ये करमवीर भाऊराव पाटील महाविद्यालयात शिक्षण घेणाऱ्या प्रसाद ठोकळ या विद्यार्थ्याला बेदम मारहाण करण्यात आली आहे. वर्गातील एका विद्यार्थीसोबत झालेल्या किरकोळ वादानंतर ही धक्कादायक घटना घडलीय. कार्तिक काळे असं आरोपींचे नाव आहे. माहितीनुसार, प्रसाद ठोकळ याचे त्याच्या वर्गातील एका विद्यार्थी सोबत किरकोळ वाद झाला होता. शाळेतील शिक्षकांच्या मध्यस्थीनी मिटवण्यात आले परंतु त्या वादाचा राग धरून त्या मुलाने गावातील काही गुंड प्रवृत्तीचे 10 ते 15 मुलांना शाळेच्या बाहेर बोलवले व प्रसाद ठोकळला बेदम मारहाण करून तिथून पळ काढला. सध्या प्रसाद ठोकळवर जिल्हा रुग्णालयात उपचार सुरू असून या प्रकरणात तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Maharashtra News: किरकोळ वादानंतर विद्यार्थ्याला बेदम मारहाण, गुन्हा दाखल Read More »

Kotwali Police

Maharashtra News: अश्लील चाळे अन् कोतवाली पोलिसांची एन्ट्री, कोर्ट गल्लीत नेमकं घडलं तरी काय?

Maharashtra News: नगर शहरातील कॅफे कोर्ट गल्लीत कोतवाली पोलिसांनी अश्लील चाळे करण्यासाठी जागा उपलब्ध करुन देणा-या कॅफे चालक व मालक यांचेवर कारवाई केली आहे. कोतवाली पोलिसांनी गुप्त बातमीदारा मार्फत मिळालेल्या माहितीवरून ही कारवाई केली आहे. द परफेक्ट कॅफे, कोर्ट गल्ली, कर्डीले डायग्नोस्टीक समोर प्लायवुडचे कंम्पार्टमेंट करुन पडदे लावुन अंधारकरुन शाळा कॉलेजमधील मुला मुलींना अश्लील चाळे करण्यासाठी जागा उपलब्ध करुन देण्यात आली असल्याची माहिती कोतवाली पोलिसांना मिळाली होती. या माहितीवरून पोलीस निरीक्षक दराडे यांनी सदर ठिकाणी जावुन खात्री करुन तात्काळ छापा टाकुन कारवाई करण्याचे आदेश दिले. कोतवाली गुन्हे शोध पथकाने सदर ठिकाणी पंचा समक्ष पथकाने छापा टाकला. तेव्हा सदर ठिकाणी प्लाऊड बोर्डचे पार्टीशन करुन वेगवेगळे कंपार्टमेंट केलले दिसले त्यात काही कॉलेजचे मुले व मुली अश्लील चाळे करताना मिळुन आले. या कारवाईत पोलिसांनी शिवप्रसाद कुमार (वय 20 वर्ष), कॅफे मॅनेजरला ताब्यात घेतला आहे. तसेच सदर कॉलेजचे मुले व मुली यांना त्यांचे नाव, गाव विचारुन खात्री करुन त्यांचे वय व ओळख पत्राची पाहणी करुन त्यांना तोंडी समज देवुन सोडण्यात आले. तर दुसरीकडे सदर कॉफी शॉपचे चालक व मालक यांचे विरुध्द पोकॉ/ सतिष शिंदे यांचे फिर्यादीवरुन कोतवाली पोलीस स्टेशनमध्ये महाराष्ट्र पोलीस कायदा कलम 129.131 (क) (क) अन्वये प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Maharashtra News: अश्लील चाळे अन् कोतवाली पोलिसांची एन्ट्री, कोर्ट गल्लीत नेमकं घडलं तरी काय? Read More »

EVM

EVM Scam: मोठी बातमी! ईव्हीएम हॅकिंगच्या दाव्यावरून मुंबईत एफआयआर

EVM Scam : महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीनंतर संपूर्ण देशात पुन्हा एकदा ईव्हीएम मशीनमध्ये घोळ असल्याचा आरोप करण्यात येत आहे. तर दुसरीकडे एक मोठी बातमी समोर आली आहे. या बातमीनुसार मुंबई सायबर पोलिसांनी ईव्हीएम हॅक केल्याचा दावा करणाऱ्या व्यक्तीविरुद्ध एफआयआर दाखल केला आहे. सय्यद शुजा नावाच्या व्यक्तीचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला होता, ज्यामध्ये त्याने दावा केला होता की महाराष्ट्र निवडणुकीत ईव्हीएम हॅक होऊ शकतात. महाराष्ट्राच्या मुख्य निवडणूक अधिकाऱ्यांनी ही तक्रार खोटी आणि निराधार असल्याचे सांगून पोलिसात दाखल केली आहे. या तक्रारीच्या आधारे दक्षिण मुंबईतील सायबर पोलिस स्टेशनमध्ये भारतीय दंड संहिता आणि आयटी कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ‘शुजाने 2019 मध्येही असाच दावा केला होता. त्याच्याविरुद्ध दिल्लीत एफआयआर दाखल करण्यात आला होता. महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीमध्ये महायुतीला प्रचंड बहुमत मिळाले असून 288 पैकी 236 जागांवर महायुतीने विजय मिळवला आहे. तर महाविकास आघाडीला 46 जागांवर विजय मिळाला आहे. त्यामुळे ईव्हीएममध्ये मोठ्या प्रमाणात घोळ असल्याचा आरोप आता विरोधकांकडून करण्यात येते. पार्श्वभूमी:– सय्यद शुजा हा 2019 च्या लोकसभा निवडणुकीतही ईव्हीएम हॅकिंगचे असंध्दावे करीत होता, ज्यामुळे दिल्लीत त्याविरुद्ध एफआयआर दाखल झाली होती. – यावेळी त्याच्या व्हिडिओमध्ये असे सांगण्यात आले होते की, ईव्हीएममधील मतदान डेटा बदलला जाऊ शकतो, परंतु निवडणूक आयोगाने (ECI) हे खंडन केले आहे. निवडणूक निकाल आणि विवाद:– **महायुती** (भाजप+शिवसेना-शिंदे+राष्ट्रवादी काँग्रेस-अजित पवार गट) यांना 288 पैकी **236 जागा** मिळाल्या आहेत. – **महाविकास आघाडी** (काँग्रेस+शिवसेना-उद्धव+राष्ट्रवादी काँग्रेस-शरद पवार गट) यांना **46 जागा** मिळाल्या आहेत. – विरोधी पक्षांच्या एका गटाकडून ईव्हीएममध्ये “घोळ” (मस्करी) होत असल्याचे आरोप केले जात आहेत, ज्यामुळे निवडणूक प्रक्रियेवर अविश्वास निर्माण झाला आहे. निवडणूक आयोगाची प्रतिक्रिया:ईव्हीएम हॅक करणे शक्य नसल्याचे ECI ने अनेक वेळा स्पष्ट केले आहे. मशीन्स वेगळ्या प्रणालीवर चालतात, त्यांना ब्ल्यूटूथ/इंटरनेट कनेक्टिव्हिटी नसते आणि प्रत्येक ईव्हीएमला VVPAT (व्होटर व्हेरिफायेबल पेपर ऑडिट ट्रेल) सोबत जोडले जाते, ज्यामुळे पारदर्शकता राखली जाते. निष्कर्ष:सध्या सायबर पोलिस या प्रकरणाची चौकशी करत आहेत. निवडणूक आयोग आणि सरकार यांनी ईव्हीएम प्रणालीवरील विश्वास राखण्यासाठी पुरावे सादर केले आहेत. तथापि, विरोधकांच्या आरोपांमुळे निवडणूक प्रक्रियेच्या पारदर्शकतेवर सतत चर्चा होत आहे.

EVM Scam: मोठी बातमी! ईव्हीएम हॅकिंगच्या दाव्यावरून मुंबईत एफआयआर Read More »

Ahmednagar Collector Office

Maharashtra News: मोठी बातमी! जिल्ह्यात शस्त्रबंदी व जमावबंदी आदेश जारी, ‘हे’ आहे कारण

जिल्ह्यात शस्त्रबंदी व जमावबंदी आदेश लागू : २९ नोव्हेंबर ते १२ डिसेंबरपर्यंत लागू राहणार अहिल्यानगर – जिल्ह्यातील कायदा व सुव्यवस्थेची स्थिति अबाधित राखण्यासाठी जिल्हाधिकारी तथा जिल्हादंडाधिकारी सिद्धाराम सालीमठ यांनी कडक पावले उचलली असून, मुंबई पोलिस अधिनियम १९५१ चे कलम ३७ (१) (३) अन्वये शस्त्रबंदी व जमावबंदी आदेश लागू केला आहे. हा आदेश २९ नोव्हेंबर २०२४ पासून ते १२ डिसेंबर २०२४ रोजी रात्री १२ वाजेपर्यंत प्रभावी राहणार आहे. या आदेशानुसार कोणतीही व्यक्ती शस्त्र, दारूगोळा, धारदार शस्त्रे, काठ्या, किंवा इतर घातक साधने बाळगू शकणार नाही. सार्वजनिक ठिकाणी पाच किंवा अधिक व्यक्तींना एकत्र जमण्यास तसेच कोणतीही सभा किंवा मिरवणूक काढण्यास बंदी घालण्यात आली आहे. तथापि, धार्मिक कार्यक्रम, लग्नकार्य, लग्न मिरवणुका किंवा प्रेतयात्रांवरील जमावावर या आदेशाची अंमलबजावणी होणार नाही. याशिवाय, पोलिस अधिकारी, शासकीय सेवेत कार्यरत अधिकारी व कर्मचारी तसेच पूर्वपरवानगी घेतलेल्या सभा किंवा मिरवणुकांवरही बंदी लागू होणार नाही. या आदेशाचा भंग करणाऱ्यांविरुद्ध कायदेशीर कारवाई करण्यात येईल, असा स्पष्ट इशारा जिल्हा प्रशासनाने दिला आहे. नागरिकांनी कायद्याचे पालन करून शांतता राखावी, असे आवाहनही करण्यात आले आहे.

Maharashtra News: मोठी बातमी! जिल्ह्यात शस्त्रबंदी व जमावबंदी आदेश जारी, ‘हे’ आहे कारण Read More »