Vijay Wadettiwar : राज्यातील राजकारणात गेल्या काही दिवसांपासून चर्चेचा विषय ठरलेल्या सोमनाथ सूर्यवंशी मृत्यू प्रकरणात धक्कादायक अहवाल समोर आल्याने एकच खळबळ उडाली आहे.
परभणी प्रकरणी सोमनाथ सूर्यवंशी याचा मृत्यू नैसर्गिक नसून तो पोलिसांच्या मारहाणीत झाला असा अहवाल राज्य मानवाधिकार आयोगाकडे देण्यात आला आहे. तर आता या प्रकरणी पोलिसांवर गुन्हा दाखल करण्यात यावा अशी मागणी काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांनी केली आहे.
परभणी प्रकरणी सोमनाथ सूर्यवंशी याचा मृत्यू नैसर्गिक नसून तो पोलिसांच्या मारहाणीत झाला असल्याचे आता स्पष्ट झाले आहे. सरकारने या प्रकरणी कितीही लपविण्याचा प्रयत्न केला तरी त्यांची आता पोलखोल झाली आहे अशी टीका काँग्रेस विधिमंडळ विजय वडेट्टीवर यांनी केली.
परभणी संविधानाच्या अवमान प्रकरणी आंदोलन केलेल्या अनेक आंदोलनकर्त्यांचे कॉम्बिंग ऑपरेशन करून पकडण्यात आले. आणि पोलिस कोठडीत बेदम मारहाण करण्यात आली. त्यामुळे सोमनाथ सूर्यवंशी यांच्या मृत्यू साठी जबाबदार असलेल्या पोलिसांवर हत्येचा गुन्हा दाखल करावा अशी मागणी काँग्रेस विधिमंडळ नेते विजय वडेट्टीवार यांनी केली.
सोमनाथ सूर्यवंशी प्रकरणी दोषी पोलिसांना निलंबित करण्यात यावे ,पोलिसांवर कठोर कारवाई करावी. याप्रकरणी दिशाभूल करण्याचा प्रयत्न सरकारने केला आता मात्र सरकार उघडे पडले आहे अशीही टीका काँग्रेस विधिमंडळ नेते विजय वडेट्टीवर यांनी केली.