Ahilyanagar News: शिवदोही प्रशांत कोरटकर, नागपुर बावर राष्ट्रद्रोहाचा गुन्हा दाखल करण्यात यावा या मागणीसाठी आज जिजाऊ ब्रिगेड, अखंड मराठा समाज आणि वंचित बहुजन आघाडीच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालयात निवेदन देण्यात आले आहे.
या निवेदनात म्हटले आहे की, प्रशांत कोरटकर, नागपुर या विक्षिप्त इसमांने इतिहास संशोधक मा. इंद्रजीत सावंत साहेब यांच्या सोबत फोनवर झालेल्या संभाषणात राजमाता जिजाऊ मा साहेब, अखंड हिंदुस्तानचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज व स्वराज्य रक्षक छत्रपती संभाजी महाराज यांचेबाबत अतिशय हिनदर्जाचे अवमानकारक तथ्यहीन वक्तव्य केलेले आहे. त्यामुळे शिद्रोही प्रशांत कोरटकर वर राष्ट्रद्रोहाचा गुन्हा दाखल करुन त्यास तात्काळ कठोर शासन करावे आणि त्यावर राष्ट्रद्रोहाचा गुन्हा अहिल्यानगर जिल्हा न्यायालयमध्ये चालवावा अशी विनंती अखंड मराठा समाज व सर्व शिवप्रेमी यांच्यावतीने करत आहोत.
अशा विकृत प्रवृत्ती असणा-या इसमावर कडक कारवाई न झाल्यास जी काही गंभीर परिस्थिती उध्दभवेल त्या सर्व परिस्थितीस महाराष्ट्र राज्य सरकार व अहिल्यानगर जिल्हा प्रशासन जबाबदार राहील याची नोंद घ्यावी. असा इशारा देखील या निवेदनाच्या मार्फत देण्यात आला आहे.