Ladki Bahin Yojana : आजपासून लाडक्या बहिणींना फेब्रुवारी महिन्याचे 1500 मिळणार आहे. माहितीनुसार, अर्थ विभागाकडून महिला व बालविकास विभागाला 3490 कोटी रुपयांचा निधी यासाठी देण्यात आला आहे. मात्र फेब्रुवारी महिन्यात लाडक्या बहिणींची संख्या कमी होणार आहे.
लाडकी बहिण योजनेचे हफ्त्यासाठी अर्थ विभागाकडून 3490 कोटी रुपयांचा निधी महिला व बाल विकास विभागाला देण्यात आला आहे. मात्र आता सरकारकडून
लाडकी बहीण योजनेचे निर्षकाची कठोर अंमलबजावणी करण्यात येत असल्याने लाडक्या बहिणींच्या संख्येत घट होत आहे.
डिसेंबर महिन्यात 2 कोटी 46 लाख महिलांच्या खात्यात हफ्ता जमा करण्यात आला होता तर जानेवारी महिन्यात 2 कोटी 41 लाख महिलांना लाभ देण्यात आला. तर फेब्रुवारी महिन्यात 2 कोटी 37 लाख महिलांना 1500 रुपये मिळणार असल्याचं सांगण्यात येत आहे.
विधानसभा निवडणुकीपूर्वी राज्य सरकारने लाडकी बहिण योजना सुरू केली होती. निवडणुकीपूर्वी या योजनेच्या माध्यमातून जास्तीत जास्त महिला मतदाराकडे पोहोचण्याचा महायुतीचा प्रयत्न होता.
त्यामुळे या योजनेत भरुन घेऊन लाभार्थींची संख्या वाढवण्यावर भर दिला गेला. यामुळं पडताळणी न करता अर्ज भरुन घेतले गेले आणि महिलांना लाभाची रक्कम दिली गेली. राज्य सरकारनं जवळपास सहा हप्त्यांती रक्कम महिलांच्या खात्यात जमा केली. राज्यात महायुतीचं सरकार पुन्हा आल्यानंतर लाभार्थ्यांची पडताळणी सुरु झाली. त्यामधून लाभार्थी संख्या कमी होण्यास सुरुवात झाली.