Maharashtra Politics: एक मोठी बातमी समोर येत आहे. या बातमीनुसार शिवसेना आमदार अर्जुन खोतकर यांच्या अडचणीत वाढ होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. समोर आलेल्या माहितीनुसार, काँग्रेसचे पराभूत उमेदवार कैलास गोरंटयाल यांच्याकडून इलेक्शन पिटीशन दाखल करण्यात आली आहे.
मुंबई उच्च न्यायालयाच्या संभाजीनगर खंडपीठात कैलास गोरंटयाल यांच्याकडून इलेक्शन पिटीशन दाखल करण्यात आली आहे.
अर्जुन खोतकरांनी चुकीच्या फॉरमॅटमध्ये उमेदवारी अर्ज दाखल केला असल्याचा आरोप या याचिकेत कैलास गोरंटयाल यांनी केला आहे. तसेच निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी चुकीच्या पद्धतीने खोतकरांचा अर्ज आक्षेपानंतरही कायम ठेवल्याचा गोरंटयाल यांचा आरोप आहे.
तर दुसरीकडे निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांच्या निर्णयाला आव्हान देण्यासाठी याचिका दाखला करण्यात आली असल्याची माहिती गोरंटयाल यांनी दिली आहे. तसेच न्यायदेवता आम्हाला योग्य न्याय देईल अशी अपेक्षाही गोरंटयाल यांनी व्यक्त केली आहे.