Ahmednagar News: लाच मागितल्याच्या गुन्ह्यात अहमदनगर महापालिकेचे माजी आयुक्त डॉ. पंकज जावळे यांचा अटकपूर्व जामीन न्यायालयाने पंकज जावळे फेटाळला.
अटकपूर्व अर्जावर न्यायालयात पाच दिवस सुनावणी झाली. अतिरिक्त जिल्हा सत्र न्यायाधीश निरंजन नाईकवाडी यांनी अटकपूर्व जामीन फेटाळून आहे.
अहमदनगर शहरातील बांधकाम व्यवसायाकडे आठ लाखांची लाच मागितल्या प्रकरणी महानगरपालिकेच्या आयुक्त पंकज जावळे यांच्या विरोधात गुन्हा दाखल झाला होता.
या प्रकरणांमध्ये जामिनसाठी जावळे यांनी अहमदनगरच्या न्यायालयामध्ये अर्ज केला होता न्यायालयाने दोन्ही बाजू ऐकल्यानंतर आयुक्त पंकज जावळे यांचा जामीन नाकारला आहे.
दरम्यान जावळे हे अद्याप फरार असून त्यांचा शोध घेण्याच काम सुरू आहे.