Jayant Patil : निष्ठा महत्त्वाची; परिस्थिती बदलत असते’, जयंत पाटलांचा भाजप प्रवेशाच्या चर्चेवर सूचक टोला

Jayant Patil : गेल्या काही दिवसांपासून राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे आमदार जयंत पाटील भाजपमध्ये प्रवेश करणार असून राज्यातील मंत्रिमंडळात त्यांना स्थान देखील भेटणार असल्याची चर्चा जोराने सुरू आहे. तर आता या चर्चांवर जयंत पाटील यांनी प्रतिक्रिया देत विरोधकांना टोला लावला आहे. निष्ठा महत्त्वाची आहे. परिस्थिती बदलत असते अशी प्रतिक्रिया जयंत पाटील यांनी दिली आहे.

जयंत पाटील म्हणाले की, मी राजकारणात आलो त्यावेळी फार वेगाने होतो. माझ्या राजकारणाच्या सुरवातीला फार संघर्ष होता. मी त्यावेळी एक बॅग घेऊन आलो होतो. त्यावेळी दिलीप तात्या होते. उद्याचा सूर्य जयंत पाटील हायवे च्या सर्व भिंती रंगवल्या होत्या. त्यावेळी मी 21 वर्षाचा होतो. मी ज्यावेळी पुस्तक लिहीन याच्या पेक्षा माझं पुस्तक चांगले असेल. सगळ्यांना घेऊन राजकारण करणे म्हणजे दीर्घकालीन राजकारण आणि म्हणून मी बेरजेचे राजकारण मी सुरू केले.

मी राजकारणात आलो अनेक जणांची मन दुखावली. पण बापूच्या निष्ठाई मुले माझा बरोबर राहिले. मी फार चांगले काम केले म्हणून नाही. या सर्वांनी त्याग केला आहे.

बदलत गेले ना तर त्या माणसाची व्हॅल्यू कमी होत जाते. त्यामुळे निष्ठा असणे गरजेचे आहे. पण निष्ठा असायला हवी असं जयंत पाटील म्हणाले.

भाजप प्रवेशावर काय म्हणाले जयंत पाटील?

राजकारण फार महत्वाचे असते. निष्ठा महत्व, पण मागच्या काळात संपले आहे. पण याचे दिवस जात असतात. असे समजू नका. आपण ठाम असले तर परिस्थिती बदलते. निष्ठा बुडल्या सारखी वाटते. पण पूर आला की बुडून जाते पण परिस्थिती नुसार राहायचे असेल तर आम्ही तयार आहे उद्या सकाळी खासदार आणि आमदार.. पण निष्ठा महत्वाची आहे.

बाळ कडू नी संघर्ष करण्याचं या ठिकाणाहून शिकवले आहे. कृष्ण काठच्या माणस आम्ही फार वेगळी आहोत. आमच्या मनात काय आहे हे सहजासहज इतरांना कळत नाही. कृष्णा काठच्या लोकांची आपली परंपरा लढाईची आहे असं जयंत पाटील म्हणाले.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *