DNA मराठी

IMD Rain Alert: मोठी बातमी! यंदा देशात सरासरीपेक्षा कमी पाऊस; जाणून घ्या नवीन अंदाज

IMD Rain Alert : देशातील अनेक शहरांमधे उष्णतेची लाट वाढत असल्याने शेतकऱ्यांसह नागरिकांना अनेक अडचणींना सामना करावा लागत आहे. वाढत असणाऱ्या उन्हाळ्यामुळे नागरिकांचे हाल होताना दिसत आहे. त्यामुळे सर्वांचे नजरा मान्सूनकडे लागले आहे. तर दुसरीकडे यंदा देशात सरासरीपेक्षा कमी पाऊस पडणार असल्याचा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे.

भारतीय हवामान विभागाने (IMD) नवी दिल्लीत घेतलेल्या पत्रकार परिषदेत यंदाच्या मान्सूनचा दुसरा दीर्घकालीन अंदाज जाहीर केला आहे.

त्यानुसार यावर्षी पाऊस सरासरीपेक्षा कमी राहणार आहे. यंदा देशात मान्सूनच्या काळात (जून ते सप्टेंबर) सरासरीच्या फक्त 90 टक्के पाऊस पडण्याचा अंदाज आहे. एप्रिलमधील अंदाजापेक्षा (92 टक्के) यात आणखी घट झाली आहे.

जून महिन्यात देशातील बहुतांश भागात कमाल तापमान सरासरीपेक्षा जास्त असेल. मध्य, पूर्व आणि उत्तर-पश्चिम भारतात उष्णतेच्या लाटेचे दिवस नेहमीपेक्षा जास्त राहतील, असा अंदाज आहे.

26 मे रोजी मान्सून केरळमध्ये दाखल होणार होता मात्र आतापर्यंत केरळ राज्यात मान्सून दाखल न झाल्याने महाराष्ट्रात देखील मान्सूनचा आगमन लांबणार आहे. केरळ राज्यात मान्सून दाखल झाल्यानंतर एका आठवड्याने मान्सून महाराष्ट्रात दाखल होत असतो.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *