DNA मराठी

ताज्या बातम्या

state excise department

Pune Crime: राज्य उत्पादन शुल्क विभागाची मोठी कारवाई; 19 लाखाहून अधिक रुपयाचा मुद्देमाल जप्त

Pune Crime : राज्य उत्पादन शुल्क पुणे विभागाने मोठी कारवाई करत १९ लाख ७१ हजार २०० रुपये किंमतीचा मुद्देमाल जप्त केले आहे. माहितीनुसार, राज्य उत्पादन शुल्क भरारी पथक क्रमांक १ व ३ चे निरीक्षक देवदत्त पोटे यांच्या पथकास मिळालेल्या खात्रीलायक बातमी नुसार मार्केट यार्ड पुणे तसेच शेलपिंपळगाव ता. खेड व आंबी ता. मावळ या तीन वेगवेगळ्या ठिकाणी सापळे रचून ५ वाहनांसह ३ हजार २२० लिटर गावठी हातभट्टी दारु असा एकूण १९ लाख ७१ हजार २०० रुपये किंमतीचा दारूबंदी गुन्ह्यातील मुद्देमाल जप्त करण्यात आला. या प्रकरणी चार जणांना अटक करण्यात आली आहे. या कारवाईत निरीक्षक देवदत्त पोटे, दुय्यम निरीक्षक डी. एस. सूर्यवंशी वाय.एम.चव्हाण, ए.डी. गायकवाड सहाय्यक दुय्यम निरीक्षक सागर साबळे संजय साठे, जवान सर्वश्री. अहमद शेख, भरत नेमाडे, चंद्रकांत नाईक, विजय भानवसे अमर कांबळे, अनिल दांगट, जी. बी. माने, जयदास दाते. जगन्नाथ चव्हाण व महिला जवान अक्षदा कड, जवान नि वाहन चालक प्रमोद खरसडे व शरद हंडगर यांनी सहभाग घेतला. महाराष्ट्र राज्यात प्रतिबंधित मद्य तसेच गावठी हातभट्टी दारूच्या निर्मिती, विक्रीमुळे महसुलाचे मोठ्या प्रमाणात नुकसान होत असते. याबाबत कोणास माहिती मिळाल्यास निरीक्षक, राज्य उत्पादन शुल्क भरारी पथक क्रमांक १ ताडीवाला रोड, पुणे व निरीक्षक राज्य उत्पादन शुल्क भरारी पथक क्रमांक ३, तळेगाव दाभाडे ता. मावळ, या पथकांशी संपर्क साधावा, असे आवाहन निरीक्षक देवदत्त पोटे यांनी प्रसिध्दी पत्रकान्वये केले आहे.

Pune Crime: राज्य उत्पादन शुल्क विभागाची मोठी कारवाई; 19 लाखाहून अधिक रुपयाचा मुद्देमाल जप्त Read More »

Congress On EVM : देवेंद्र फडणवीस ‘चिप मिनिस्टर’; मतचोरीविरोधात काँग्रेस आक्रमक

Congress On EVM : लोकसभेतील विरोधी पक्ष नेते राहुल गांधी यांनी निवडणूक आयोगाच्या मदतीने भाजपाने मतचोरी कशी केली, हे पुराव्यासह मांडल्यानंतर महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसने आक्रमक पवित्रा घेत प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांच्या नेतृत्वाखाली रस्त्यावर उतरून तीव्र आंदोलन केले. दादरमध्ये चक्काजाम करून निवडणूक आयोग व भाजपा सरकार विरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात आली. तासभर चक्काजाम करण्यात आला, या आंदोलनात प्रदेश काँग्रेसचे वरिष्ठ उपाध्यक्ष मोहन जोशी, राजन भोसले, किशोर कन्हेरे वरिष्ठ प्रवक्ते अतुल लोंढे, अनंत गाडगीळ यांच्यासह आंदोलनात शेकडो कार्यकर्ते व पदाधिकाऱ्यांनी भाग घेतला. या आंदोलनाआधी टिळक भवनमधील पत्रकार परिषदेत बोलताना प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी निवडणूक आयोग व भाजपाचा खरपूस समाचार घेतला, राहुल गांधी यांनी अत्यंत तर्कसंगत मांडणी करून मतदानातील मोठा घोटाळा उघड केला, लोकशाहीचा गळा घोटण्याचे काम कसे सुरु आहे? हे दाखवून दिले. निवडणुकीतील हा घोटाळा स्पष्ट दिसत असल्याने सरकारने राजधर्म पाळत एखादी एसआयटी गठीत करायला हवी होती अथवा सर्वोच्च न्यायलयाच्या न्यायमूर्तींकडून या संपूर्ण प्रकरणाची चौकशी केली पाहिजे होती. पण राहुल गांधी यांनी पुरावे देत तथ्य मांडूनही ना केंद्र सरकारने चौकशी करण्याची धमक दाखवली ना निवडणूक आयोगाने काही खुलासा केला, उलट राहुल गांधी यांनाच प्रतिज्ञापत्र सादर करण्यास सांगितले, हा आणखी हास्यास्पद प्रकार आहे. प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ पुढे म्हणाले की, निवडणूक आयोगाच्या 1960 च्या नियमावलीनुसार, जर अशा प्रकारे कोणी हरकत घेतली वा आक्षेप नोंदवला तर नियम 17/18/19 नुसार ताबडतोब चौकशी करावी, असे कायदाच सांगत आहे, मग चौकशी का केली जात नाही? असे सपकाळ म्हणाले. देवेंद्र फडणवीस ‘चिप मिनिस्टर’! निवडणूक आयोगाची पोलखोल केल्यानंतर भाजपाची पिलावळ राहुल गांधी यांच्यावर अत्यंत खालच्या स्तरावर जाऊन टीका करत आहेत. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राहुल गांधी यांच्याबद्दल जी भाषा वापरली त्यातून ते निवडणूक आयोगाचे दलाल आहेत, वकील आहेत की प्रवक्ते असा प्रश्न पडतो. फडणवीस यांच्यात अहंकार दडलेला आहे, या अहंकराचा दर्प नाही तर दुर्गंधी त्यांच्या बोलण्यातून दिसली. हे ‘चिफ मिनिस्टर’ नाही चर ‘चिप मिनिस्टर’ आहेत. जेव्हा जेव्हा निवडणूक आयोगावर बोलले जाते तेव्हा तेंव्हा भाजपा व देवेंद्र फडणवीस यांची तडफड का होते? केंद्रीय गृहमंत्री अमित शाह व फडणवीस आयोगाचा बचाव करण्यास का येतात? कारण ‘दाल में कुछ काला है’ असे नाही तर सर्व दालच काळी आहे. राहुल गांधी यांनी जो घोटाळ दाखवला त्यातून निवडणूक आयोग बरोबरचे हितसंबंध उघडे पडतील याची भिती देवेंद्र फडणवीस यांना वाटत असावी म्हणूनच त्यांची फडफड होत असावी, असेही हर्षवर्धन सपकाळ यांनी म्हटले आहे.

Congress On EVM : देवेंद्र फडणवीस ‘चिप मिनिस्टर’; मतचोरीविरोधात काँग्रेस आक्रमक Read More »

Asia Cup 2025: भारताला धक्का, ‘हा’ खेळाडू आशिया कपमधून अन् वेस्ट इंडिज कसोटी मालिकेतून बाहेर

Asia Cup 2025 : सप्टेंबर महिन्यात होणाऱ्या आशिया कप 2025 पूर्वी भारतीय संघाला मोठा धक्का बसला आहे. भारताचा स्टार खेळाडू ऋषभ पंत आशिया कप 2025 मध्ये दिसणार नाही. तसेच तो ऑक्टोबर महिन्यात वेस्टइंडीज विरुद्ध होणाऱ्या कसोटी मालिकेत देखील खेळताना दिसणार नाही. याबाबत बीसीसीआयकडून माहिती देण्यात आली आहे. नुकत्याच इंग्लंड विरुद्ध झालेल्या अँडरसन-तेंडुलकर ट्रॉफीच्या चौथ्या कसोटी सामन्यात ऋषभ पंतला झालेल्या दुखापतीमुळे हा निर्णय घेण्यात आला आहे. यावेळी आशिया कपचा 17 वा हंगाम 9 सप्टेंबर ते 28 सप्टेंबर 2025 दरम्यान संयुक्त अरब अमिराती (यूएई) मध्ये खेळला जाईल. त्यानंतर काही दिवसांनीच भारताला वेस्ट इंडिज विरुद्ध दोन सामन्यांची घरच्या कसोटी मालिका खेळायची आहे, जी 2 ते 14 ऑक्टोबर दरम्यान खेळली जाईल. पंतच्या अनुपस्थितीमुळे संघ व्यवस्थापनाला नवीन रणनीती बनवावी लागेल. ओल्ड ट्रॅफर्डमध्ये दुखापत मँचेस्टरमध्ये खेळल्या गेलेल्या चौथ्या कसोटी सामन्यादरम्यान पंतला हा धक्का बसला, जेव्हा क्रिस वोक्सचा यॉर्कर त्याच्या उजव्या पायाच्या बोटाला लागला. त्यावेळी पंत फलंदाजी करत होता आणि दुखापत इतकी गंभीर होती की त्याला ताबडतोब मैदानाबाहेर नेण्यात आले. स्कॅनमध्ये पायाच्या बोटाला फ्रॅक्चर झाल्याचे स्पष्ट झाले आणि डॉक्टरांनी किमान सहा आठवडे विश्रांती घेण्याचा सल्ला दिला. पाचव्या कसोटी सामन्यातून बाहेर दुखापतीमुळे पंत अंतिम सामन्यात म्हणजेच ओव्हल येथे झालेल्या पाचव्या कसोटी सामन्यात खेळू शकला नाही. या सामन्यात भारताने इंग्लंडला रोमहर्षक पद्धतीने सहा धावांनी पराभूत केले आणि पाच सामन्यांच्या कसोटी मालिकेचा शेवट 2- 2असा केला. वृत्तानुसार, पंतची प्रकृती आता स्थिर आहे आणि त्याला शस्त्रक्रियेची आवश्यकता नाही. भारताची आशिया कप मोहीम भारतीय संघ 10 सप्टेंबर रोजी युएईविरुद्ध आशिया कप मोहिमेची सुरुवात करेल. संघाचे सर्व सामने दुबईमध्ये खेळण्याची शक्यता आहे. भारताला पाकिस्तान, यूएई आणि ओमानसह ग्रुप ए मध्ये स्थान देण्यात आले आहे. त्याच वेळी ग्रुप बी मध्ये श्रीलंका, बांगलादेश, अफगाणिस्तान आणि हाँगकाँग या संघांचा समावेश आहे. ही स्पर्धा टी-20 स्वरूपात खेळवली जाईल, जेणेकरून आगामी टी-20 विश्वचषकाची तयारी करता येईल.

Asia Cup 2025: भारताला धक्का, ‘हा’ खेळाडू आशिया कपमधून अन् वेस्ट इंडिज कसोटी मालिकेतून बाहेर Read More »

raju shetty

माधुरी हत्तीणी संदर्भातील वाद-विवाद संपला; राजू शेट्टी यांनी मानले अंबानी परिवार आभार

Raju Shetty : कोल्हापूरच्या जनतेचे महादेवीशी असलेले भावनिक नाते आणि तिच्या तातडीच्या वैद्यकीय गरजा लक्षात घेऊन, वनताराने एक अभूतपूर्व उपाय सुचवला आहे. त्यानुसार, महाराष्ट्रात, खास करून कोल्हापूरच्या जवळच नांदणी परिसरात हत्तींसाठी देशातील पहिलं अत्याधुनिक सॅटेलाईट पुनर्वसन केंद्र उभारण्याचा प्रस्ताव देण्यात आला आहे. विशेष म्हणजे हे केंद्र आधुनिक सुविधांनी युक्त असणार आहे. वनताराने प्रस्तावित केलेल्या या केंद्रात महादेवीसाठी सर्व अत्याधुनिक आणि वैज्ञानिक सुविधा असतील. ज्यामुळे तिला उत्तम दर्जाची वैद्यकीय सेवा मिळेल. लोकभावना, मठाचे नेतृत्व आणि प्राणी कल्याण या तिन्ही गोष्टींचा आदर करत वनताराने हा एक अनोखा तोडगा काढला काढल्यानंतर स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते, माजी खासदार राजू शेट्टी यांनी या निर्णयाचे स्वागत करत आपली भूमिका जाहीर केली आहे. राजू शेट्टी यांनी अंबानी परिवार आणि विशेषतः अनंत अंबानी यांचे मनापासून आभार मानले आहेत. अनंत अंबानींच्या मोठेपणामुळे तसेच या निर्णयामुळे महादेवी (माधुरी) हत्तीणी संदर्भातील वाद-विवाद संपला असल्याचे राजू शेट्टी यांनी सांगितले. आम्ही जैन समाजाचे असून जिओ और जिने दो या तत्वाने जगत असतो. माधुरी हत्तीची काळजी घेत नसल्याचा व तिचा छळ करण्याचा आरोप पेटाने आमच्यावर लावला. हा आरोप आम्हाला सहन नाही झाला. जीव, जंतू आणि जनावर यांच्यावर प्रेम असल्यामुळे आम्हाला त्रास झाला. यामुळे थोडा रोष निर्माण झाला होता. मात्र आता शेवट छान होत असून यामध्ये अनंत अंबानींची विशेष भूमिका राहिल्याने राजू शेट्टी यांनी अंबानी परिवाराचे आभार मानले.

माधुरी हत्तीणी संदर्भातील वाद-विवाद संपला; राजू शेट्टी यांनी मानले अंबानी परिवार आभार Read More »

suspicious documents, pending decisions still a purchase transaction in savadi

सावेडी जमीनप्रकरणात खरेदीखत आणि दुरुस्तीवर संशय; तरीही खरेदीची तयारी?

अहिल्यानगर | प्रतिनिधी Sawedi Land Scam – सावेडी येथील (जुना हाडांचा कारखाना) सर्वे नंबर २७९ व त्यानंतर वाटपानुसार २४५/ब/१ व २४५/ब/२ या जमिनींच्या खरेदी व्यवहारात कायदेशीर आणि तांत्रिक बाबतीत गंभीर विसंगती समोर येत असताना, अद्यापही जमीन खरेदीची तयारी सुरू असल्याचे चित्र आहे. विशेष म्हणजे, मूळ खरेदीखत व त्यानंतर करण्यात आलेल्या ‘चूक दुरुस्ती लेखा’वर संशयाची छाया असूनही, ही प्रक्रिया राबवली जात असल्याचे दिसत आहे. या प्रकरणात रमाकांत सोनावणे यांनी प्रांत अधिकारी यांच्याकडे तक्रार दाखल करण्यात आली आहे, त्यावर प्रांत अधिकारी यांनी अप्पर तहशीलदार यांच्याकडे अवाहाल मागितलं होता त्यांच्या अवाहालानंतर या प्रकरणात जिल्हधिकारी यांच्याकडे अवाहाल देण्यात आलाय, अजून यावर निर्णयाय येणे बाकी आहे तरीही  या प्रकरणात परीसमल मश्रीमल शहा यांच्यकडून खरेदी करण्याचे प्रयत्न सुरु झाले आहे. मग प्रश्न हा पडतो. खरेदीखत आणि दुरुस्तीवर संशय आहे तर मग खरेदी व्यवहार कसा. नियम डावलून सह दुय्यम निबधक खरेदी व्यवहार करणार का हा गंभीर प्रश्न पडतो.    १. अहवालांची मालिका, पण कारवाई शून्य २. शेतजमिनीचा वापर, पण परवानगी नाही ३. खरेदीवेळी शेतकरी पुरावा कुठे? ४. मयत व्यक्तीच्या नावावर खरेदीखत? ५. चूक दुरुस्ती लेख ‘अचानक’ सादर ६. कागदपत्रे गायब – हे फक्त योगायोग? ठळक मुद्दा: “खरेदीखत आणि चूक दुरुस्ती यावर गंभीर संशय असूनही, जमीन खरेदी पुढे रेटली जात आहे, ही बाब केवळ प्रशासनाच्या निष्क्रियतेची नव्हे, तर त्याच्या भूमिका संशयास्पद ठरणारी आहे.” ७. आता जिल्हाधिकाऱ्यांच्या निर्णयाची प्रतीक्षा सावेडी प्रकरणात निव्वळ दस्तऐवजातील “कारखाना” शब्दाचा गैरफायदा घेत, बिगरशेतीचा बनावट वापर, शेतकरी नसताना जमीन खरेदी, आणि मयत व्यक्तीच्या नावावर नोंदणी हे सर्व प्रकार समोर येत असताना, संबंधित अधिकाऱ्यांनी दोषींवर कारवाई न करता ‘संशयास्पद’ वर्तन दाखवले आहे. त्यामुळे हा संपूर्ण व्यवहार नव्या चौकशीचा विषय ठरू शकतो.

सावेडी जमीनप्रकरणात खरेदीखत आणि दुरुस्तीवर संशय; तरीही खरेदीची तयारी? Read More »

the demonic form of the teacher in pathardi

शिक्षकाचं राक्षसी रूप l चौथीतील विद्यार्थिनीवर बलात्काराचा आरोप, गावात आर्थिक तडजोडीच्या चर्चेने खळबळ

अहिल्यानगर | प्रतिनिधी – पाथर्डी तालुक्यातील एका जिल्हा परिषद शाळेत चौथीत शिकणाऱ्या अल्पवयीन विद्यार्थिनीवर शिक्षकाने लैंगिक अत्याचार केल्याचा आरोप समोर आल्याने खळबळ उडाली आहे. या गंभीर प्रकरणात गावातील सरपंचपतीने मध्यस्थी करत कथितपणे आर्थिक तडजोड घडवून आणल्याची चर्चा ग्रामस्थांमध्ये दबक्या आवाजात सुरू आहे. पीडित मुलगी परप्रांतीय असल्याची माहिती असून, तिच्या कुटुंबीयांना आर्थिक मदतीच्या मोबदल्यात मौन बाळगण्यास भाग पाडल्याचे बोलले जात आहे. या प्रकारामुळे गावकऱ्यांमध्ये संतापाची लाट पसरली असून, सरपंचपतीच्या भूमिकेवर गंभीर प्रश्न उपस्थित होत आहेत. विशेष म्हणजे, पीडिता अल्पवयीन असल्यामुळे हा प्रकार ‘पॉक्सो कायद्या’च्या (Protection of Children from Sexual Offences Act) चौकटीत येतो. मात्र, अद्यापही या प्रकरणी कोणतीही अधिकृत तक्रार दाखल करण्यात आलेली नाही, तसेच पोलिसांकडूनही कोणतीही कारवाई झालेली नाही. स्थानिक पातळीवर दबाव आणि राजकीय हस्तक्षेपामुळे संपूर्ण प्रकरण दडपले जात असल्याचा आरोप ग्रामस्थांनी केला आहे. पीडितेला न्याय मिळावा, आरोपी शिक्षकाला निलंबित करून कठोर कारवाई व्हावी, अशी मागणी गावकरी करत आहेत. दरम्यान, महिला व बालकल्याण विभाग, पोलीस प्रशासन आणि जिल्हा परिषदेने या गंभीर प्रकरणाची तत्काळ दखल घेऊन चौकशी सुरू करावी, अशी मागणी सामाजिक कार्यकर्त्यांकडून केली जात आहे. प्रमुख मुद्दे:

शिक्षकाचं राक्षसी रूप l चौथीतील विद्यार्थिनीवर बलात्काराचा आरोप, गावात आर्थिक तडजोडीच्या चर्चेने खळबळ Read More »

Vijay Wadettiwar on Election: स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका VVPAT मशिनवरच घ्या ; विजय वडेट्टीवार

Vijay Wadettiwar: स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत VVPAT मशीन नसणार अशी माहिती राज्य निवडणूक आयोगाच्या आयुक्तांनी दिल्यानंतर विरोधक याचा विरोध करत आहे. एक प्रभागात जास्त उमेदवार असणार, मतदारांना एकावेळी चार मते द्यावी लागणार त्यामुळे प्रक्रियेला वेळ लागेल आणि मतदान केंद्रावर गर्दी होण्याची शक्यता आहे. असे स्पष्टीकरण राज्य निवडणूक आयोगाच्या आयुक्तांनी दिले आहे. तर आता निवडणुका पारदर्शक पद्धतीने होण्यासाठी VVPAT ची आवश्यकता आहे. मतदाराने कुणाला मत दिले हे त्यांना समजले पाहिजे. राज्यात होणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका VVPAT मशीन शिवाय घेऊ नये, या मशीन नसतील तर बॅलेटवर निवडणुका घ्याव्यात अशी मागणी काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांनी केली. मुंबईत पत्रकार परिषदेत बोलताना वडेट्टीवार यांनी हे सरकार जैन समाजाची फसवणूक करत असल्याचा आरोप केला. भाजप आमदाराने कबुतरखाने याबाबत प्रश्न उपस्थित केला होता, मुंबई महापालिकेने कारवाई केली. जैन समाज रस्त्यावर उतरला तेव्हा भाजपचे मंत्री या निर्णयाविरोधात जातात. म्हणजे निर्णय हेच सरकार घेणार आणि मग यू टर्न पण घेणार. नसलेले प्रश्न आणि समस्या हे सरकार निर्माण करत आहे आणि जैन समाजाचे तारणहार हे सरकार आहे असा दिखावा तयार करत आहे. येणाऱ्या महापालिका निवडणुका समोर ठेवून मतांसाठी भाजप आपली राजकीय पोळी भाजत आहे ,भाजपची ही दुटप्पी भूमिका असल्याची टीका वडेट्टीवार यांनी केली. आपल्या देशाबाबत केंद्र सरकारला प्रश्न विचारण्याचा अधिकार लोकसभेचे विरोधी पक्ष नेते राहुल गांधी यांना आहे. चीनच्या आक्रमणाबाबत त्यांनी प्रश्न विचारले तर न्यायाधीशांनी सच्चा भारतीय अस विधान करू शकत नाही, अशी टिपण्णी केली, हे योग्य नाही. देशात घडणाऱ्या घटनांबाबत सरकारला प्रश्न विचारण्याचे कर्तव्य विरोधी पक्ष नेत्यांचे आहे. पण कोण खरा भारतीय, कोण नाही याचे प्रशस्तीपत्रक न्यायाधीशांनी देऊ नये अशी स्पष्ट भूमिका वडेट्टीवार यांनी मांडली. एकीकडे भाजप प्रवक्तेपदी असलेली व्यक्ती उच्च न्यायालयात न्यायाधीश होणार दुसरीकडे न्यायाधीश विरोधी पक्ष नेते यांच्यावर टिपण्णी करतात याने न्यायव्यवस्थेवरचा विश्वास लोकांचा उडून जाईल. त्यामुळे देशातील लोकशाहीला गालबोट लागेल अशी विधान किमान न्यायाधीशांनी करू नये, असे वडेट्टीवार म्हणाले.

Vijay Wadettiwar on Election: स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका VVPAT मशिनवरच घ्या ; विजय वडेट्टीवार Read More »

माधुरी हत्तीण कोल्हापूरमध्ये परतणार? मुख्यमंत्री फडणवीस स्पष्टच म्हणाले

Devendra Fadnavis: माधुरी हत्तीण कोल्हापूरमध्ये आणण्याचे कोर्ट आदेश देईल अशी अपेक्षा आहे अशी प्रतिक्रिया माध्यमांशी बोलताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली. गेल्या काही दिवसांपासून राज्यात माधुरी हत्तीण आणि वनतारा मुद्दा गाजत असताना आता पुन्हा एकदा माधुरी हत्तीण राज्यात परतणार आहे. माध्यमांशी बोलताना देवेंद्र फडणवीस म्हणाले की, वनताराच्या अधिकाऱ्यांना बोलावले होते, त्यांच्याशी चर्चा केली. त्या चर्चेमध्ये त्यांनी हे सांगितले की, माधुरी हत्तीणीवर हक्क सांगायची आमची कुठलीही इच्छा नाही. आम्हाला कोर्टाने सांगितल्यामुळे आम्ही हे सर्व केले आहे. त्यानंतर मी त्यांना सांगितले जर असे असेल, तर तुम्ही देखील आमच्यासोबत सुप्रीमकोर्टमध्ये जॉईन झाल पाहिजे, आपण जॉईंटली कोर्टाला विनवणी करू की, माधुरी हत्तीण तेथेच कोल्हापूरमध्ये नागणी मठ मध्ये एक रेस्क्यू सेंटर तयार करून ठेवू. हायपावर कमिटीने जे निर्देश दिले आहेत. त्या निर्देशानुसार सर्व प्रकारच्या सोयी तेथेच करू, तेथेच तो माधुरी हत्तीणीला आणू, तुम्ही त्याला समर्थन द्या. अशी मागणी केली. त्याला त्यांनी समर्थन दिले आहे. असं देवेंद्र फडणवीस म्हणाले. तसेच जर कोर्टाने तसा निर्णय दिला, कोर्ट तसा निर्णय देईल अशी अपेक्षा आहे. तसे झाले तर सर्व तयार करून द्यायला तयार आहेत. असेही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले. तर कबूतरखाना प्रकरणात बोलताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले की, असे वाटते की तिकडे आस्था आहे, लोकभावना आहे. आणि दुसरीकडे लोक आरोग्य देखील आहे, दोघांची सांगड आपल्याला घालावी लागेल. धार्मिक भावना जपण्याच्या दृष्टीने आपल्याला काय करता येईल. आणि त्यातून आरोग्याला कुठलाही धोका होणार नाही, अशा प्रकारचा मार्ग काढण्याचा प्रयत्न आम्ही करतो आहे. काही मार्ग आम्हाला सुचलेले देखील आहे.ते आम्ही कोर्टासमोर मांडू, जेणेकरून इतक्या वर्षाची जी परंपरा आहे. तीदेखील खंडित होणार नाही, आणि आरोग्याचे ही प्रश्न निर्माण होणार नाही. असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले.

माधुरी हत्तीण कोल्हापूरमध्ये परतणार? मुख्यमंत्री फडणवीस स्पष्टच म्हणाले Read More »

maratha mahamandal

बँकांनी लाभार्थ्यांची कर्ज मंजुरीची प्रकरणे वेळेत मार्गी लावावीत; महामंडळाचे अध्यक्ष नरेंद्र पाटील

Narendra Patil : मराठा समाजातील नवउद्योजकांना चालना देण्यासाठी अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळाच्या योजनेंतर्गत पात्र लाभार्थ्यांचे कर्ज प्रस्ताव बँकांनी सुलभ पद्धतीने व विहित कालावधीत मार्गी लावावेत, असे निर्देश महामंडळाचे अध्यक्ष नरेंद्र अण्णासाहेब पाटील यांनी दिले. महामंडळाच्या योजनांचा आढावा घेण्यासाठी जिल्हाधिकारी कार्यालयातील सभागृहात बैठक घेण्यात आली. त्यावेळी पाटील बोलत होते. बैठकीस उपजिल्हाधिकारी अतुल चोरमारे, जिल्हा अग्रणी बँक अधिकारी आशिष नवले, महामंडळाच्या विभागीय समन्वयक पल्लवी मोरे, जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शक केंद्राचे सहायक आयुक्त रविकुमार पंतम, जिल्हा समन्वयक अमोल बोथे,कौशल्य विकास अधिकारी शुभदा पाठक, अनिल मोहिते, दिलीप भालसिंग व विविध बँकांचे अधिकारी उपस्थित होते. पाटील म्हणाले, की महामंडळाच्या योजनांद्वारे राज्यातील १ लाख ५० हजार लाभार्थ्यांना उद्योगासाठी १२,६०० कोटी रुपयांचे कर्ज मंजूर करण्यात आले असून, १,२२२ कोटी रुपयांचा व्याज परतावा देण्यात आला आहे. जिल्ह्यातील १८ हजार लाभार्थ्यांना राष्ट्रीयकृत व सहकारी बँकांमार्फत १,३४० कोटींचे कर्ज व १२३ कोटी रुपयांचा व्याज परतावा मिळाला आहे. महामंडळामार्फत प्रामुख्याने मराठा समाजासाठी, तसेच ज्या प्रवर्गासाठी स्वतंत्र महामंडळ अस्तित्वात नाही अशा घटकांसाठी स्वयंरोजगारासाठी कर्ज व्याज परतावा योजना राबवली जाते. वैयक्तिक कर्ज व्याज परतावा योजना व गट प्रकल्प व्याज परतावा योजना या शासनाच्या महत्त्वाकांक्षी योजना असून, समाजाच्या शेवटच्या घटकापर्यंत या योजनांचा लाभ पोहोचवण्यासाठी त्यांचा व्यापक प्रचार-प्रसार होणे आवश्यक आहे, असेही त्यांनी नमूद केले. बँकांनी योजनेचे स्वरूप समजून घेऊन कर्जवाटपाचे उद्दिष्ट १०० टक्के पूर्ण होईल, यासाठी प्रयत्न करावेत. पात्र लाभार्थ्यांना योजनेचा लाभ देण्यात कोणताही विलंब होऊ नये. प्रस्तावात त्रुटी असल्यास त्यांचे तात्काळ निराकरण करावे व विनाकारण प्रलंबित प्रस्ताव थांबवू नयेत, अशा सूचनाही त्यांनी दिल्या. बैठकीदरम्यान पाटील यांनी बँक अधिकाऱ्यांच्या अडचणी जाणून घेतल्या. तसेच ज्या लाभार्थ्यांचे प्रस्ताव प्रलंबित आहेत, त्यांच्या समस्या समजून घेत त्या सोडवण्याच्या दृष्टीने आवश्यक सूचना केल्या. अर्ज कुठे व कसा करायचा? ऑनलाईन अर्जासाठी: आपण राज्य शासनाच्या अधिकृत पोर्टलवर जाऊन अर्ज करू शकता: ऑनलाईन अर्ज प्रक्रियेसाठी आवश्यक टप्पे:  कागदपत्रे लागणारी शक्यता (योजनेनुसार थोडी बदलू शकतात):  ऑफलाइन / प्रत्यक्ष अर्ज करू इच्छिणाऱ्यांसाठी: जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्रकिंवामहामंडळाचा विभागीय कार्यालय / जिल्हा समन्वयक कार्यालय येथे भेट देऊन सहाय्य मिळवता येते.  अहमदनगर जिल्ह्यासाठी संपर्क करा:जिल्हा समन्वयक – अण्णासाहेब पाटील महामंडळ(आपल्या जिल्हाधिकारी कार्यालयाच्या रोजगार विभागात याबाबत माहिती मिळू शकते)  मदत हवी असल्यास: महामंडळाची हेल्पलाइन किंवा संपर्क क्रमांक वेबसाइटवर दिलेले आहेत.https://annasahebpatilmvcgmc.gov.in/ContactUs

बँकांनी लाभार्थ्यांची कर्ज मंजुरीची प्रकरणे वेळेत मार्गी लावावीत; महामंडळाचे अध्यक्ष नरेंद्र पाटील Read More »

controversy over the film khalid ka shivaji

Khalid Ka Shivaji Movie | ‘खालिद का शिवाजी’ मराठी सिनेमा प्रदर्शनाआधी वादात, हिंदू महासंघ आक्रमक

मुंबई | प्रतिनिधी – Khalid Ka Shivaji – ‘खालिद का शिवाजी’ या नव्याने प्रदर्शित होणाऱ्या हिंदी चित्रपटात छत्रपती शिवाजी महाराजांचे कथित अपमानास्पद चित्रण केल्याचा आरोप केला आहे,  हिंदू महासंघाने राज्यभर निदर्शने सुरू केली आहेत. यामुळे काही शहरांमध्ये तणावाचे वातावरण निर्माण झाले असून, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या भाषणादरम्यानही याचे पडसाद उमटले आहेत. मुंबई, पुणे, औरंगाबादसह इतर शहरांत महासंघाचे कार्यकर्ते रस्त्यावर उतरले होते,  “छत्रपतींचा अपमान सहन केला जाणार नाही” अशा घोषणा देत, चित्रपटावर त्वरित बंदी घालण्याची मागणी केली आहे. काही ठिकाणी आंदोलनं चिघळू नयेत म्हणून पोलीस बंदोबस्त वाढवण्यात आला आहे, प्रशासनाने शांतता आणि कायदा-सुव्यवस्थेचे पालन करावे असे आवाहन केले आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी यासंदर्भात बोलताना सांगितले कि  “शिवाजी महाराज हे महाराष्ट्राच्या अस्मितेचे प्रतीक आहेत. त्यांचा कोणत्याही प्रकारे अवमान होऊ दिला जाणार नाही,” असे त्यांनी स्पष्ट केले आहे. मात्र काही कार्यकर्त्यांनी मुख्यमंत्र्यांच्या या प्रतिक्रियेवर नाराजी व्यक्त केली आहे, ही निवडणूकपूर्व औपचारिक प्रतिक्रिया आहे, असा आरोप कार्यकर्त्यांनी केलाय. दरम्यान, ‘खालिद का शिवाजी’ या  वादग्रस्त ठरलेल्या या चित्रपटाचे निर्माते पुढे येत, “चित्रपटाचा उद्देश कोणत्याही समाजगटाला दुखावण्याचा नाही. अशी भूमिका घेतली आहे, कृपया संपूर्ण चित्रपट पाहिल्यावरच निष्कर्ष काढावा,” असे म्हणत त्यांनी विरोधकांना संयम बाळगण्याचे आवाहन केले आहे. थोडक्यात:

Khalid Ka Shivaji Movie | ‘खालिद का शिवाजी’ मराठी सिनेमा प्रदर्शनाआधी वादात, हिंदू महासंघ आक्रमक Read More »