DNA मराठी

ताज्या बातम्या

nilesh lanke

Nilesh Lanke: मोठी बातमी! खासदार लंकेची तब्येत बिघडली; उपचारासाठी पुण्याला रवाना

Nilesh Lanke: अहिल्यानगर राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाचे अहिल्यानगरचे खासदार निलेश लंके यांची तब्येत अचानक बिघडल्याची माहिती समोर येत असून त्यांना तातडीने पुढील उपचारासाठी पुण्यातील रुग्णालयांमध्ये दाखल करण्यात आले आहे. खासदार निलेश लंके यांची गेल्या दोन-चार दिवसांपासून प्रकृती ही अस्वस्थ होती त्यांच्यावरती नगरमध्येच उपचार सुरू होते मात्र आज त्यांची प्रकृती अधिक बिघडल्याने त्यांना तातडीने पुण्याकडे स्थलांतरित करण्यात आले असल्याची माहिती समोर आली आहे. तर दुसरीकडे खासदार निलेश लंके यांची प्रकृती बाबतची माहिती समजतात लंके समर्थक व कार्यकर्त्यांमध्ये चिंतेचे वातावरण पसरले असून अनेक कार्यकर्ते त्यांची प्रकृतीची माहिती घेण्यासाठी पुण्याकडे रवाना होत असल्याचे देखील समजते आहे. दरम्यान नुकत्याच झालेल्या महाराष्ट्र दिनी खासदार निलेश लंके हे तामिळनाडू येथील जिंजी किल्ला येथे गेले होते. आपला मावळा या संघटनेच्या माध्यमातून शिवरायांचे गड किल्ले यांचे संवर्धन करण्याची मोहीम खासदार निलेश लंके यांच्या अध्यक्षतेखाली सुरू आहे. यावेळी स्वतः लंके हे गडकिल्ल्यांची स्वच्छता करतात तसेच व्यस्त जीवनशैलीमुळे त्यांच्या प्रकृती खालवली असल्याचा देखील त्यांचे समर्थक सांगतात.

Nilesh Lanke: मोठी बातमी! खासदार लंकेची तब्येत बिघडली; उपचारासाठी पुण्याला रवाना Read More »

img 20260507 wa0027

Matka King च्या दुसऱ्या पर्वाची घोषणा: प्राइम व्हिडिओवर पुन्हा रंगणार मटक्याचा खेळ

Matka King : पहिल्या पर्वाच्या ऐतिहासिक यशानंतर, ज्याने प्रदर्शित झालेल्या आठवड्यात १७ देशांमध्ये पहिला क्रमांक मिळवला आणि ३७ देशांमध्ये अव्वल दहामध्ये स्थान पटकावले, प्राइम व्हिडिओने अधिकृतपणे या गाजलेल्या मूळ मालिकेच्या दुसऱ्या पर्वाच्या निर्मितीची घोषणा केली आहे. प्राइम व्हिडिओ या भारतातील लोकप्रिय मनोरंजन व्यासपीठाने आज जाहीर केले की त्यांची गाजलेली मूळ नाट्यमालिका ‘मटका किंग’चे दुसरे पर्व सध्या निर्मिती प्रक्रियेत आहे. पहिल्या पर्वाला मिळालेल्या प्रचंड यशानंतर ही घोषणा करण्यात आली आहे. १९६० च्या दशकातील वेगाने बदलणाऱ्या मुंबईच्या पार्श्वभूमीवर आधारित या उच्च-दावांच्या नाट्यमालिकेने महत्त्वाकांक्षा, सत्ता आणि ओळख यांची कथा प्रभावी अभिनय आणि जिवंत कथनशैलीतून मांडत प्रेक्षकांशी घट्ट नाळ जोडली. पहिले पर्व गेल्या दोन वर्षांत या व्यासपीठावरील सर्वाधिक पाहिले गेलेले नवीन लिखित स्वरूपातील मालिका ठरले. प्रदर्शित झालेल्या पहिल्याच आठवड्यात ३७ देशांतील अव्वल दहामध्ये स्थान मिळवत १७ देशांमध्ये पहिला क्रमांक पटकावला. प्रेक्षकांकडून मिळालेल्या भरभरून प्रतिसादामुळे पुन्हा एकदा हे सिद्ध झाले की मातीतल्या आणि वास्तवाशी जोडलेल्या कथा भारतीय प्रेक्षकांच्या मनात खोलवर घर करतात. ‘मटका किंग’च्या पहिल्या पर्वाची निर्मिती आणि लेखन अभय कोराणे यांनी केले असून नागराज पोपटराव मंजुळे यांनी निर्मिती, लेखन आणि दिग्दर्शनाची जबाबदारी सांभाळली आहे. रॉय कपूर फिल्म्स, आटपाट आणि एसएमआर एंटरटेनमेंट यांच्या बॅनरखाली सिद्धार्थ रॉय कपूर, नागराज पोपटराव मंजुळे, गार्गी कुलकर्णी, अश्विनी सिडवानी आणि आशीष आर्यन यांनी याची निर्मिती केली आहे. आठ भागांच्या या मालिकेत विजय वर्मा प्रमुख भूमिकेत असून त्यांच्यासोबत कृतिका कामरा, सई ताम्हणकर, सिद्धार्थ जाधव, भूपेंद्र जदावत आणि गुलशन ग्रोवर महत्त्वाच्या भूमिकांमध्ये आहेत. तसेच भरत जाधव, गिरीश कुलकर्णी, जेमी लीवर, किशोर कदम, सायरस साहूकार, अर्पिता सेठिया, संभाजी तांगडे, इश्त्याक खान, संजीव जोतांगिया आणि सिमरन अश्विनी यांनी आपल्या प्रभावी अभिनयाने कथेला अधिक वास्तव आणि खोली दिली आहे. १७ एप्रिल रोजी प्रदर्शित झालेले ‘मटका किंग’चे पहिले पर्व प्राइम व्हिडिओवर भारतासह जगभरातील २४० देश आणि प्रदेशांमध्ये विशेष स्वरूपात पाहण्यासाठी उपलब्ध आहे. मटक्याचा खेळ अजून संपलेला नाही आणि बृज भाटीचे राज्यही कायम आहे. ‘मटका किंग’च्या दुसऱ्या पर्वात खरे डाव सुरू होणार आहेत.

Matka King च्या दुसऱ्या पर्वाची घोषणा: प्राइम व्हिडिओवर पुन्हा रंगणार मटक्याचा खेळ Read More »

raam shinde

Ram Shinde: कर्जत – जामखेड तालुक्यात अखंडित वीज पुरवठ्यासाठी तातडीच्या उपाययोजना राबवाव्यात – सभापती प्रा. राम शिंदे

Ram Shinde : कर्जत-जामखेड तालुक्यातील नागरिकांना अखंडित व सुरळीत वीज पुरवठा मिळावा यासाठी तातडीने परिणामकारक उपाययोजना अंमलात आणाव्यात, असे निर्देश विधानपरिषदेचे सभापती प्रा. राम शिंदे यांनी दिले. शासकीय विश्रामगृहात वीज वितरण कंपनीच्या अधिकाऱ्यांसमवेत तालुक्यातील वीज पुरवठ्याबाबत आढावा बैठक पार पडली. त्यावेळी ते बोलत होते. बैठकीस अधीक्षक अभियंता रमेश पवार, कार्यकारी अभियंता कौस्तुभ डबीर, उपकार्यकारी अभियंता प्रवीण वारे व प्रदीप कटकधोंड यांच्यासह कर्जत – जामखेड येथील पदाधिकारी व नागरिक उपस्थित होते. प्रा. शिंदे म्हणाले की, कर्जत-जामखेड परिसरात वारंवार वीज खंडित होणे, अनियमित लोडशेडिंग तसेच तांत्रिक अडचणींमुळे नागरिकांना मोठा त्रास सहन करावा लागत आहे. याचा थेट परिणाम शेतकरी, लघुउद्योजक, व्यापारी तसेच सर्वसामान्यांच्या दैनंदिन जीवनावर होत असून, वीज पुरवठा व्यवस्थेत तातडीने सुधारणा करणे आवश्यक आहे. विशेषतः सायंकाळी ६ ते १० या कालावधीत वीज पुरवठा अखंडित राहावा, यासाठी नियोजनबद्ध उपाययोजना कराव्यात, अशा सूचनाही त्यांनी दिल्या. वीज वितरण कंपनीने ट्रान्सफॉर्मरची क्षमता वाढविणे, जुन्या वीजवाहिन्यांचे नूतनीकरण करणे तसेच तांत्रिक बिघाड त्वरित दुरुस्त करण्यासाठी सक्षम यंत्रणा उभी करावी. आपत्कालीन परिस्थितीत त्वरित प्रतिसाद देण्यासाठी नियंत्रण कक्ष अधिक कार्यक्षम करणे आवश्यक आहे. तसेच नागरिकांकडून प्राप्त होणाऱ्या तक्रारींचे तत्काळ निराकरण करून सेवा अधिक पारदर्शक व परिणामकारक करावी, असेही त्यांनी नमूद केले. उन्हाळ्याच्या पार्श्वभूमीवर विजेची मागणी वाढत असल्याने संबंधित यंत्रणांनी सज्ज राहून नियोजनबद्ध काम करावे. कोणत्याही परिस्थितीत नागरिकांना अडचण येऊ नये, यासाठी आवश्यक सर्व बाबींची पूर्तता करावी, असे निर्देशही प्रा. शिंदे यांनी दिले.

Ram Shinde: कर्जत – जामखेड तालुक्यात अखंडित वीज पुरवठ्यासाठी तातडीच्या उपाययोजना राबवाव्यात – सभापती प्रा. राम शिंदे Read More »

aamras

Ahilyanagar News: जावई धोंडा अन् आमरसाची मेजवानी; भैरवनाथ देवस्थानाचा उपक्रम

Ahilyanagar News : नगर तालुक्यातील आगडगाव येथील काळ भैरवनाथ देवस्थानच्या वतीने अधिकमासानिमित्त जावयांसाठी धोंडा जेवण उपक्रम राबविण्यात येणार आहे. रविवारी (ता. १७) दुपारी १२ वाजता महाआरतीनंतर उपक्रमास सुरुवात होईल, असे देवस्थान ट्रस्टच्या वतीने सांगण्यात आले. अधिक मासानिमित्त अन्नदानाला विशेष महत्त्व आहे. जावयाला धोंडा जेवण देण्याची परंपरा आहे. देवस्थानाच्या वतीने अनेक वर्षांपासून असा उपक्रम राबविण्यात येतो. आगडगाव व पंचक्रोशीतील रतडगाव, देवगाव, खांडके, कापूरवाडी, बुऱ्हाणनगर, कोल्हार, डमाळवाडी अशा गावांबरोबरच नगर शहर व राज्यभरातून भाविक या अन्नदानासाठी नावनोंदणी करतात. नोंदणी झाल्यानंतर लगेचच संबंधित लेक व जावयाला पाचीपोषाख दिला जातो. त्यामध्ये पैठणी, तांब्याचे ताट, निरंजन, अनारसे, बत्ताशे, जावयाला कुर्ता-पायजमा, टोपी, पंचा आदींचा समावेश आहे. देवस्थानाजवळ येऊन नाव नोंदणी करून लगेचच पाचीपोषाख ताब्यात दिला जातो. या उपक्रमानिमित्त भाविकांना नगरहून येण्यासाठी एसटीच्या जादा बसची व्यवस्था करण्यात येणार आहे. तसेच देवस्थानची बसही सेवेत असेल. उन्हापासून संरक्षण होण्यासाठी सावलीची व्यवस्था, स्वच्छ पाणी, प्रशस्त पार्किंग असे नियोजन करण्यात आले असल्याचे ग्रामस्थांच्या वतीने सांगण्यात आले. साडेतीन हजार किलो आंबे धोंडा, रस या उपक्रमासाठी साडेतीन हजार किलो आंबे खरेदी करण्यात येणार आहेत. पुरण-पोळी, धोंडा यासाठी एक हजार किलो डाळीचे नियोजन आहे. शंभर अन्नदात्यांचा समावेश करण्याचे नियोजन आहे. प्रथम नावनोंदणी करणारास प्राधान्य दिले जाणार आहे. मागील तीन वर्षांपूर्वी राबविलेल्या या उपक्रमात सुमारे २० हजार भाविकांनी महाप्रसादाचा लाभ घेतला होता. या वर्षीही मोठ्या प्रमाणात भाविक येणार आहेत. त्यादृष्टीने नियोजन करण्यात येत आहे.

Ahilyanagar News: जावई धोंडा अन् आमरसाची मेजवानी; भैरवनाथ देवस्थानाचा उपक्रम Read More »

Maharashtra BJP: भाजपची मोर्चेबांधणी; 2029 विधानसभा निवडणुकीसाठी मोठा निर्णय

Maharashtra BJP :  आगामी काळातील राजकीय आव्हाने आणि पक्षाच्या संघटनात्मक विस्तारासाठी भारतीय जनता पार्टीने कंबर कसली आहे. भाजप महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष  रवींद्र चव्हाण यांनी राज्याच्या सहा महत्त्वाच्या विभागांसाठी नवीन समन्वयक, संयोजक आणि सहसंयोजकांच्या नियुक्त्या जाहीर केल्या आहेत. पक्षाचे ध्येयधोरण तळागाळापर्यंत पोहोचवणे आणि विभागवार कार्यक्रमांची प्रभावी अंमलबजावणी करणे, ही या नियुक्त्यांमागची मुख्य भूमिका आहे. या नव्या निवडीनुसार, मुंबई विभागाच्या समन्वयाची महत्त्वाची जबाबदारी प्रदेश सरचिटणीस राजेश पांडे यांच्याकडे सोपवण्यात आली आहे. ते मुंबई भाजप समन्वयक म्हणून काम पाहतीलच, शिवाय त्यांच्याकडे प्रदेश कार्यालयाच्या समन्वयाचीही अतिरिक्त जबाबदारी असेल. ठाणे-कोकण विभागासाठी आमदार योगेश सागर यांची समन्वयक म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. त्यांच्यासोबत माजी आमदार प्रमोद जठार संयोजक म्हणून, तर संजय वाघुले सहसंयोजक म्हणून कार्यभार सांभाळतील.पश्चिम महाराष्ट्रात आमदार निरंजन डावखरे यांच्याकडे समन्वयाची धुरा देण्यात आली आहे. त्यांना विक्रम पावसकर (संयोजक) आणि विक्रम देशमुख (सहसंयोजक) यांची साथ लाभणार आहे. उत्तर महाराष्ट्राच्या जबाबदारीत प्रदेश सरचिटणीस आमदार माधवी नाईक समन्वयक असतील. त्यांच्या सोबतीला विजय चौधरी संयोजक म्हणून आणि आमदार मंगेश चव्हाण सहसंयोजक म्हणून काम पाहतील. मराठवाडा विभागासाठी प्रदेश सरचिटणीस सुनील राणे यांची समन्वयक म्हणून निवड झाली आहे. त्यांच्या पथकात अ‍ॅड. नितीन काळे संयोजक, तर राहुल लोणीकर सहसंयोजक म्हणून कार्यरत राहतील. विदर्भासाठी आमदार संजय कुटे यांची समन्वयक म्हणून नियुक्ती करण्यात आली असून, प्रा. दिनेश सूर्यवंशी संयोजक आणि आमदार प्रवीण दटके सहसंयोजक म्हणून जबाबदारी पार पाडतील. या सर्व नियुक्त्या 5 मे 2026 पासून तात्काळ लागू करण्यात आल्या आहेत. या फेरबदलांमुळे आगामी काळात भाजपची संघटनात्मक ताकद वाढण्यास आणि कार्यकर्त्यांचे जाळे अधिक घट्ट होण्यास मदत होईल, अशी चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे.

Maharashtra BJP: भाजपची मोर्चेबांधणी; 2029 विधानसभा निवडणुकीसाठी मोठा निर्णय Read More »

img 20260506 wa0003

NCMC Card:  एसटीच्या NCMC कार्डची जादा दराने विक्री केल्यास परवाना रद्द होणार

NCMC Card: महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या (एसटी) वतीने सवलतधारक प्रवाशांना NCMC (National Common Mobility Card) स्मार्ट कार्डचे वितरण सुरू करण्यात आले आहे. यासाठी राज्यभरात 3000 हून अधिक अधिकृत विक्रेत्यांची नियुक्ती करण्यात आली असून, प्रत्येक आगार व प्रमुख बसस्थानकांवरही ही कार्डे उपलब्ध करून देण्यात येत आहेत. नवीन NCMC कार्ड घेणाऱ्या प्रवाशांसाठी 199 रुपये, तर यापूर्वी स्मार्ट कार्ड असलेल्या प्रवाशांसाठी 149 रुपये असा दर निश्चित करण्यात आला आहे. मात्र, काही अधिकृत विक्रेत्यांकडून सवलतधारक प्रवाशांना जादा दराने कार्ड विक्री केल्याच्या तक्रारी प्राप्त झाल्या आहेत. या पार्श्वभूमीवर, अवाजवी दर आकारणाऱ्या परवानाधारक विक्रेत्यांचे परवाने तात्काळ प्रभावाने रद्द करण्यात येतील, असा स्पष्ट इशारा परिवहन मंत्री तथा एसटी महामंडळाचे अध्यक्ष प्रताप सरनाईक यांनी दिला आहे. यानुसार, काही विक्रेत्यांचे परवाने रद्द करण्यात आल्याची माहितीही त्यांनी दिली. दरम्यान, एसटी महामंडळाने प्रवाशांना दिल्या जाणाऱ्या सवलती अधिक सुसंगत, पारदर्शक आणि डिजिटल पद्धतीने देण्यासाठी NCMC कार्ड कार्यप्रणाली लागू करण्याचा निर्णय घेतला आहे. सध्या महिला, ज्येष्ठ नागरिक आणि ‘अमृत’ ज्येष्ठ नागरिक यांची नोंदणी व कार्ड वितरण प्रक्रिया सुरू असून, टप्प्याटप्प्याने इतर सवलतधारक प्रवाशांचाही या योजनेत समावेश करण्यात येणार आहे. महामंडळाच्या सूचनेनुसार, लवकरच सर्व सवलतधारक प्रवाशांसाठी एसटी प्रवासादरम्यान NCMC कार्ड वापरणे अनिवार्य केले जाणार आहे. त्यामुळे प्रवास अधिक सुलभ होण्याबरोबरच सवलतींचा लाभ अचूक आणि डिजिटल पद्धतीने देणे शक्य होणार आहे. तसेच, NCMC कार्डद्वारे तिकीट वितरण, कार्ड टॉप-अप आणि इतर व्यवहारांसाठी एकसंध मानक कार्यपद्धती (SOP) निश्चित करण्यात आली आहे. सर्व आगार व्यवस्थापकांना ही कार्यपद्धती काटेकोरपणे राबविण्याचे निर्देश देण्यात आले असून, प्रवाशांना कोणतीही अडचण येऊ नये यासाठी आवश्यक ती दक्षता घेण्याचे आदेशही देण्यात आले आहेत. या उपक्रमामुळे एसटी सेवा अधिक आधुनिक, पारदर्शक आणि प्रवासी-केंद्रित होण्याच्या दिशेने महत्त्वाचे पाऊल उचलले गेले असल्याचे मंत्री सरनाईक यांनी नमूद केले.

NCMC Card:  एसटीच्या NCMC कार्डची जादा दराने विक्री केल्यास परवाना रद्द होणार Read More »

aditi tatkare

Aditi Tatkare : बलात्कार प्रकरणातील दोषींना पॅरोल देऊ नका; मंत्री आदिती तटकरेंची मागणी

Aditi Tatkare : बलात्कार व लैंगिक अत्याचारासारख्या गंभीर गुन्ह्यांतील दोषींना पॅरोलवर सोडण्यात येवू नये, अशी तरतूद प्रचलित कायद्यात करण्याची मागणी महिला व बालविकास मंत्री अदिती तटकरे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवार यांच्याकडे निवेदनाद्वारे मंत्रिमंडळ बैठकीत केली. या मागणीची दखल घेत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधी व न्याय विभागाच्या सचिवांना यासंदर्भात आवश्यक कायदेशीर तरतूद करण्याबाबतचा प्रस्ताव सादर करण्याचे निर्देश दिले आहेत. महिला व बाल विकास मंत्री आदिती तटकरे यांनी निवेदनात नमूद केले आहे की, बलात्कारासारख्या गंभीर गुन्ह्यांमध्ये दोषी ठरलेले आरोपी पॅरोलवर सुटल्यानंतर पुन्हा गुन्हे करत असल्याचे वारंवार निदर्शनास येत आहे.ही बाब अत्यंत गंभीर असून या पार्श्वभूमीवर, अशा गुन्ह्यांतील दोषींना कोणत्याही परिस्थितीत पॅरोल देण्यात येवू नये, अशी कायद्यात तरतूद करण्याची आवश्यकता आहे. जेणेकरून समाजात सकारात्मक संदेश जाऊन व्यवस्थेबाबत विश्वास निर्माण होईल.महिलांच्या सुरक्षेबाबत कडक धोरणात्मक निर्णय घेण्यात येत असल्याचेही त्यांनी नमूद केले आहे.

Aditi Tatkare : बलात्कार प्रकरणातील दोषींना पॅरोल देऊ नका; मंत्री आदिती तटकरेंची मागणी Read More »

Ahilyanagar Accident: मुरबाडमध्ये बस व स्कॉर्पिओचा भीषण अपघात; अहिल्यानगर जिल्ह्यातील चौघे ठार

Ahilyanagar Accident : काही कल्याण-अहिल्यानगर राष्ट्रीय महामार्गावर अपघातांची मालिका सुरूच असून मंगळवारी (ता. ५) सकाळी साडेदहाच्या सुमारास मुरबाड तालुक्यातील टोकावडे पोलीस ठाण्याच्या हद्दीत वैशाखरे फाट्याजवळ राज्य परिवहन मंडळाची बस व स्कॉर्पिओचा भीषण अपघात झाला. या दुर्घटनेत स्कॉर्पिओ गाडीतून प्रवास करणाऱ्या एकाच कुटुंबातील चौघांचा जागीच मृत्यू झाला असून अन्य चार जण गंभीर जखमी झाले आहेत. अहिल्यानगर जिल्ह्यातील नेवासा येथील हे कुटुंब मुंबईच्या दिशेने जात असताना वैशाखरे फाट्याजवळ समोरून येणाऱ्या एसेटी बसशी त्यांच्या वाहनाची जोरदार धडक झाली. या अपघातात अविनाश रामचंद्र काकडे, अभिषेक भाऊसाहेब मोटे (दोघे रा. वडाळा, ता. नेवासा), निता अशोक धुरे आणि मीना कल्याण मडके (दोघी रा. भेंडा, ता. नेवासा) यांचा जागीच मृत्यू झाला. तर मोनिका अभिषेक मोटे, आराध्या अभिषेक मोटे, वेदांश अभिषेक मोटे आणि मनीषा रामदास बहक हे गंभीर जखमी झाले आहेत. त्यांना तातडीने उपचारासाठी कल्याण येथील रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे, अशी माहिती तहसिलदार अभिजित देशमुख यांनी दिली. ‘कल्याण-अहिल्यानगर राष्ट्रीय महामार्गाच्या रुंदीकरण आणि काँक्रिटीकरणामुळे वाहनांचा वेग वाढला आहे. मात्र बेशिस्त आणि बेदरकार वाहन चालकांमुळे अपघातांचे प्रमाणही वाढले आहेत. गेल्याच महिन्यात १३ एप्रिल रोजी रायते पुलावर झालेल्या अपघातात ११ जणांना प्राण गमवावे लागले होते. त्या घटनेला महिना उलटत नाही तोच आज पुन्हा चौघांचा बळी गेल्याने प्रवाशांच्या सुरक्षिततेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. हा अपघात कशामुळे झाला, नेमकी चूक कुणाची हे मात्र स्पष्ट होऊ शकले नाही. घटनेची माहिती मिळताच टोकावडे पोलीस आणि स्थानिक नागरिकांनी मदतीसाठी धाव घेतली. अपघातामुळे महामार्गावरील वाहतूक काही काळ विस्कळीत झाली होती.

Ahilyanagar Accident: मुरबाडमध्ये बस व स्कॉर्पिओचा भीषण अपघात; अहिल्यानगर जिल्ह्यातील चौघे ठार Read More »

congress

Rahul Gandhi: काँग्रेसचे हिंदू उमेदवार मतदार नाकारतात? आसाम, केरळ आणि बंगालच्या निकालांनी उडवली झोप!

Rahul Gandhi: २०२६ च्या विधानसभा निवडणुकांचे निकाल केवळ काँग्रेसच्या पराभवाचे पुरावे नसून, पक्षाच्या सामाजिक ढासळत्या पायाचे सर्वात भीषण चित्र समोर आणणारे ठरले आहेत. आसाम, केरळ आणि पश्चिम बंगालमधील आकडेवारी पाहिली तर एक धक्कादायक वास्तव समोर आले आहे. या राज्यांत हिंदू मतदारांनी काँग्रेसकडे पाठ फिरवली आहेच, पण काँग्रेसने उभे केलेले हिंदू उमेदवारही सपशेल नाकारले गेले आहेत. जिथे काँग्रेसचे हिंदू उमेदवार निवडून आले आहेत, तिथेही त्यांच्या विजयाची दोरी ही ‘अल्पसंख्याक’ मतदारांच्या हातात असल्याचे दिसून येते. गौरव गोगोईंचा पराभव आसाममध्ये काँग्रेसने १९ जागा जिंकल्या, पण त्यातील १८ आमदार मुस्लिम आहेत. सर्वात मोठा धक्का म्हणजे आसाम काँग्रेसचे अध्यक्ष आणि पक्षाचा मुख्य चेहरा गौरव गोगोई यांचा स्वतःच्या हिंदू बहुल मतदारसंघातून झालेला पराभव. एकमेव हिंदू आमदार काँग्रेसचे एकमेव हिंदू आमदार प्रदीप सरकार हे अभयपुरी दक्षिण (Abhayapuri South) मतदारसंघातून निवडून आले आहेत. धक्कादायक बाब म्हणजे, हा मतदारसंघ बोंगाईगाव जिल्ह्यात येत असून येथे मुस्लिम मतदारांची संख्या ६०% पेक्षा जास्त आहे. म्हणजेच, काँग्रेसच्या एकमेव हिंदू आमदारालाही निवडून आणण्यासाठी मुस्लिम मतदारांच्या कौलाची गरज भासली. तर दुसरीकडे जनेइया, धुब्री, जलेश्वर आणि गौरिपूर यांसारख्या पूर्णतः मुस्लिम बहुल (८०% हून अधिक लोकसंख्या) पट्ट्यातूनच काँग्रेसचे उर्वरित १८ उमेदवार विधानसभेत पोहोचले आहेत. केरळ: ‘ख्रिश्चन-मुस्लिम’ जोरावर विजय केरळमध्ये काँग्रेसप्रणित यूडीएफ (UDF) ला ६३ जागा मिळाल्या असल्या तरी, विजयाचा चेहरा हिंदू उमेदवारांसाठी चिंतेचा आहे. ६३ पैकी ४६ ख्रिश्चन आणि १२ मुस्लिम उमेदवार निवडून आले आहेत. तर ९२ पैकी तब्बल ८७ हिंदू मतदारसंघांमध्ये काँग्रेसचे हिंदू उमेदवार सपशेल फेल ठरले आहेत. पक्षाचे केवळ ५ हिंदू आमदार विधानसभेत पोहोचू शकले. हिंदू मतदारांनी काँग्रेसच्या हिंदू उमेदवारांना डावलून एकतर डाव्या आघाडीला (LDF) किंवा भाजपच्या वाढत्या प्रभावाकडे कल दिला आहे. पश्चिम बंगाल: काँग्रेसचे अस्तित्व ‘मुर्शिदाबाद’पुरते मर्यादित बंगालमध्ये भाजपने २०६ जागांसह सत्ता मिळवली असताना, काँग्रेसच्या वाटेला आलेल्या २ जागांचे वास्तव अधिक दाहक आहे. राणीनगर (Raninagar) येथून काँग्रेसचे झुल्फिकर अली विजयी झाले आहेत. हा मतदारसंघ मुर्शिदाबाद जिल्ह्यात असून येथे मुस्लिम लोकसंख्या ८०% च्या आसपास आहे. फराक्का (Farakka) येथून काँग्रेसचे मोताब शेख विजयी झाले आहेत. येथेही मुस्लिम मतदारांचे प्रमाण ६८% हून अधिक आहे. हिंदू मतदारांचा ‘शून्य’ कौल: बंगालच्या हिंदू मतदारांनी काँग्रेसला पूर्णपणे नाकारले असून, पक्षाचा एकही हिंदू उमेदवार विधानसभेत पाय ठेवू शकलेला नाही.

Rahul Gandhi: काँग्रेसचे हिंदू उमेदवार मतदार नाकारतात? आसाम, केरळ आणि बंगालच्या निकालांनी उडवली झोप! Read More »

atul save osd

Atul Save OSD : पत्नीच्या खुनाचा प्रयत्न अन्मा मुलाला मारहाण, भाजप मंत्र्यांच्या OSD वर गुन्हा दाखल…

Atul Save OSD : पुण्यातील क्वीन्स गार्डन परिसरात कौटुंबिक वादातून गंभीर प्रकार उघडकीस आला आहे. पत्नीचा जीव घेण्याचा प्रयत्न आणि मुलावर हल्ला केल्याच्या आरोपावरून एका शासकीय अधिकाऱ्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून, या घटनेमुळे परिसरात मोठी खळबळ माजली आहे. विजय धुलचंद कारंडे असे आरोपीचे नाव आहे. त्यांच्या पत्नीने (वय ३०) रविवारी कोरेगाव पार्क पोलीस ठाण्यात तक्रार नोंदवली. कारंडे हे मूळ नांदेड येथील समाजकल्याण विभागात कार्यरत असून सध्या मुंबईतील मंत्रालयात मंत्री अतुल सावे यांचे विशेष कर्तव्य अधिकारी (OSD) म्हणून प्रतिनियुक्तीवर कार्यरत आहेत. तक्रारीनुसार, ३० एप्रिल रोजी सायंकाळच्या सुमारास त्यांच्या क्वीन्स गार्डन येथील घरात हा प्रकार घडला. पत्नीने कारंडे यांच्या मोबाईलमधील काही चॅट्सबाबत विचारणा करत पासवर्ड मागितल्याने वाद झाला. त्यातून संतापलेल्या कारंडे यांनी पत्नीला बॅटने मारहाण केली आणि तिचा गळा दाबून ठार मारण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप आहे. या वेळी आईला वाचवण्यासाठी पुढे आलेल्या मुलावरही त्यांनी बॅटने हल्ला केल्याचे तक्रारीत नमूद आहे. मात्र प्रसंगावधान राखत संबंधित महिलेनं कारंडे यांना दूर ढकलले आणि मुलासह घराबाहेर पडत स्वतःचा जीव वाचवला. यानंतर महिलेने तात्काळ पोलिसांत धाव घेतली. तिच्या तक्रारीवरून कोरेगाव पार्क पोलिसांनी विजय कारंडे यांच्याविरुद्ध भारतीय न्याय संहिता (BNS) अंतर्गत कलम १०९(१) (खून करण्याचा प्रयत्न), ११८(१) (जाणीवपूर्वक दुखापत) आणि ३५१(२) (गुन्हेगारी धमकी) यांनुसार गुन्हा नोंदवला आहे. पुढील तपास सुरू आहे.

Atul Save OSD : पत्नीच्या खुनाचा प्रयत्न अन्मा मुलाला मारहाण, भाजप मंत्र्यांच्या OSD वर गुन्हा दाखल… Read More »