DNA मराठी

ताज्या बातम्या

Health Tips: गुणकारी आहे आंबेहळद; जाणून घ्या ‘हे’ फायदे व्हाल थक्क

Health Tips: बदलत्या लाईफस्टाईल यामुळे आज आपल्या आजूबाजूला अनेक आजार पसरले आहे. यामुळे केव्हा कोणाला काय होणार? हे सांगता येत नाही.  मात्र पूर्वीच्या काळी पायाला मुक्कामार लागला किंवा पायाला सूज आली यावर घरघुती उपाय म्हणून आंबेहळदीचा वापर मोठ्या प्रमाणात होत होता.   आंबेहळद ही अत्यंत गुणकारी आहे. त्यामुळे फार कमी जणांच्या घरात किंवा आयुर्वेदिक दुकानात आंबेहळद मिळते. विशेष म्हणजे आंबेहळद की वेळ मार लागल्यावरच वापरतात हा एक समज आहे.  आंबेहळदीचे अनेक गुणकारी फायदे आहेत.त्यामुळे हे फायदे कोणते ते जाणून घेऊयात. १. मुक्कामार किंवा सूज आल्यावर आंबेहळद उगाळून त्याचा लेप लावा त्यामुळे सूज कमी होते. २. शरीराचा एखादा भाग दुखत असल्यास त्यावर आंबेहळदीचा लेप लावल्यास वेदना कमी होतात. ३. साकलेल्या रक्ताचा प्रवाह सुरळीत होतो. यासाठी आंबेहळद उगाळून कोमट करुन ती रक्त साकळलेल्या जागेवर लावावी. ४. शरीरातील कोणत्याही भागात गाठ आली असेल तर आंबेहळदीचा लेप लावावा. ५.अंगावरील पूरळ दूर होतात. ६.आंबेहळद आणि साय एकत्र करुन त्याचा लेप लावल्यास त्वचेचा रंग उजळतो.  दरम्यान, आंबेहळद ही तीक्ष्ण असून ती कधीही खात नाहीत. त्यामुळे तिचा वापर कायम बाह्यअंगावरच केला जातो.

Health Tips: गुणकारी आहे आंबेहळद; जाणून घ्या ‘हे’ फायदे व्हाल थक्क Read More »

Health Care Tips:  तुमच्या ‘या’ वाईट सवयींमुळे होऊ शकतो सांधेदुखीचा त्रास, करू नका दुर्लक्ष

Health Care Tips : आज अनेकांना दैनंदिन जीवनातील काही वाईट सवयीमुळे सांधेदुखीची समस्या वाढत चालली आहे.  यामुळे जर या सवयींकडे दुर्लक्ष केल्यास भविष्यात गंभीर समस्यांचा सामना करावा लागू शकते. सांधेदुखीच्या समस्येमुळे संपूर्ण शरीरावर दुष्परिणाम होतात. साधारणतः ही समस्या वयोवृद्ध व्यक्तींमध्ये जास्त प्रमाणात आढळते. पण हल्ली बदलती जीवनशैली, वेळी-अवेळी खाणेपिणे, झोपणे इत्यादी गोष्टींमुळे तरुणांमध्ये सांधेदुखीची समस्या वाढतेय.  या समस्येवर वेळीच वैद्यकीय उपचार घेणे आवश्यक आहे, अन्यथा भविष्यात तुम्हाला गंभीर परिणामांना सामोरे जावे लागेल. बहुतांश लोक सुरुवातीला याकडे दुर्लक्ष करण्याची चूक करतात. जेव्हा वेदना असह्य होऊ लागतात, तेव्हाच लोक स्नायूंच्या वेदनांवर उपचार करण्यासाठी डॉक्टरांकडे धाव घेतात. पण शरीरात तीव्र स्वरुपातील वेदना अचानक का उद्भवते, यामागील कारणे आपणास माहीत आहेत का? शरीरामध्ये एखादी इजा किंवा दुखापत झाल्यास सांधेदुखीचा त्रास उद्भवू शकतो. तसंच तुमच्या काही वाईट सवयींमुळेही शरीराच्या वेगवेगळ्या भागांमध्ये वेदना निर्माण होऊ शकतात. जाणून घेऊया सविस्तर माहिती. शरीराचे वजन जास्त असणे शरीराचे वजन जास्त असणाऱ्या लोकांना संधिवात होण्याचा धोका अधिक असतो. शरीराचे वजन जास्त वाढल्याने फिटनेससह शरीराच्या वेगवेगळ्या अवयवांवरही वाईट परिणाम होतात. अवयवावर अतिरिक्त दबाव निर्माण झाल्यानं शारीरिक वेदना होऊ लागतात.  शरीराचे वजन वाढल्याने कंबर, पाठ, पाय आणि नितंबांवर अधिक भार येतो व शरीराच्या स्नायूंचे दुखणे वाढते. शारीरिक ताणतणावामुळेही सांधेदुखीचा त्रास होऊ शकतो. दीर्घकाळापर्यंत एकाच स्थितीमध्ये बसणे जर आपण एकाच ठिकाणी तास-न्-तास बसून काम करत असाल तर यामुळे कंबरदुखीचा त्रास होऊ शकतो. यामुळे वारंवार पाठीतही वेदना निर्माण होतात. काही लोकांना स्लिप डिस्कच्या समस्येचाही सामना करावा लागण्याची शक्यता असते. बहुतांश लोक कम्प्युटरसमोर कित्येक तास एकाच स्थितीमध्ये बसून काम करतात. यामुळे पाठीच्या कण्यावर अतिरिक्त ताण येतो. ज्यामुळे तीव्र स्वरुपात पाठ-कंबरदुखी होते. ही समस्या टाळण्यासाठी अधूनमधून विश्रांती घेणे आवश्यक आहे. वजनदार बॅग पाठीवर घेणे वजनदार बॅग खूप वेळ पाठीवर असल्यासही सांधेदुखीचा त्रास होऊ शकतो. पाठदुखीनंतर हळूहळू कंबरदुखीची समस्या निर्माण होऊ शकते. यामुळेच वजनदार वस्तू देखील कमी प्रमाणात उचलाव्यात. पाण्याने भरलेली वजनदार बादली उचल्यास हातांच्या स्नायूंवर ताण येतो. ज्यामुळे सांध्यांचे दुखणे वाढू शकते. मोबाइलवर वारंवार चॅटिंग करणे मोबाइन फोनवर वारंवार मेसेज टाइप केल्यानंही सांध्यांचे दुखणे वाढू शकते. चॅटिंगसाठी अंगठ्याचा मोठ्या प्रमाणात वापर केला जातो. यामुळे आपल्या हातांमध्ये वेदना जाणवू शकतात. पोटावर झोपणे तुम्हाला पोटावर झोपण्याची सवय असेल तर वेळीच सावध व्हा. कारण यामुळे पाठीचे दुखणे वाढते. पोटावर झोपण्याच्या सवयीमुळे कंबर आणि पाठीच्या कण्यावर वाईट परिणाम होतात. परिणामी पाठदुखीची समस्या वाढत जाते. याव्यतिरिक्त कधी-कधी मान देखील दुखू लागते. हाय हील्सचा वापर करणे कम्फर्टेबल फुटवेअरचा वापर न केल्यासही सांधेदुखीची समस्या निर्माण होऊ शकते. बहुतांश लोक हाय हील्सचा वापर करतात. यामुळे पायांवर ताण येतो. हाय हील्सच्या वापरामुळे गुडघ्यांपासून ते मांड्यांपर्यंतच्या स्नायूंवर दबाव येतो. ज्यामुळे गुडघ्यांसह पायांचेही दुखणे वाढते. ही समस्या टाळण्यासाठी शक्यतो कम्फर्टेबल फुटवेअरचा वापर करावा.

Health Care Tips:  तुमच्या ‘या’ वाईट सवयींमुळे होऊ शकतो सांधेदुखीचा त्रास, करू नका दुर्लक्ष Read More »

WTC Point Table: न्यूझीलंडने दिला भारत-ऑस्ट्रेलियाला धक्का! WTC गुणतालिकेत मोठा बदल

WTC Point Table : न्यूझीलंडने आयसीसी वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप 2023-25 गुणतालिकेत अव्वल स्थान गाठले आहे. दक्षिण आफ्रिकेवर 281 धावांनी शानदार विजय मिळवल्यानंतर न्यूझीलंडने गुणतालिकेत अव्वल स्थानावर झेप घेतली आहे. आयसीसी वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप पॉइंट टेबलच्या ताज्या अपडेटमध्ये, न्यूझीलंडच्या दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या जोरदार विजयाने त्यांना प्रतिष्ठित अव्वल स्थानावर नेले आहे. दोन सामन्यांच्या मालिकेतील पहिल्या कसोटीतील त्यांच्या प्रभावी कामगिरीने त्यांना केवळ दणदणीत विजय मिळवून दिला नाही तर चॅम्पियनशिपमधील त्यांच्या स्थितीत लक्षणीय वाढही झाली. दरम्यान, न्यूझीलंडच्या यशामुळे ऑस्ट्रेलिया आणि भारत या दोन्ही संघांना धक्का बसला. इंग्लंडविरुद्धच्या विजयानंतर डब्ल्यूटीसी गुणतालिकेत आधी दुसऱ्या स्थानावर असलेला भारत आता तिसऱ्या क्रमांकावर घसरला आहे, तर न्यूझीलंडच्या वाढीमुळे ऑस्ट्रेलियाला दुसऱ्या स्थानावर ढकलले आहे. न्यूझीलंडच्या उत्कृष्ट विक्रमामध्ये या चक्रात खेळल्या गेलेल्या तीन कसोटी सामन्यांपैकी दोन विजयांचा समावेश आहे, परिणामी गुणांची टक्केवारी 66.66 इतकी आहे. ऑस्ट्रेलियाने दहा सामन्यांतून सहा विजयांसह 55.00 गुणांची टक्केवारी राखली आहे. तर भारताने सहा कसोटी सामन्यांमध्ये तीन जिंकले आहेत आणि दोन गमावले आहेत आणि एक अनिर्णित आहे, परिणामी गुणांची टक्केवारी 52.77 आहे. इतरत्र क्रमवारीत बांगलादेश चौथ्या स्थानावर आहे, तर पाकिस्तान पाचव्या स्थानावर आहे. दक्षिण आफ्रिकेच्या पराभवामुळे त्यांची सातव्या स्थानावर घसरण झाली आहे तर वेस्ट इंडिज, इंग्लंड आणि श्रीलंका अनुक्रमे सहाव्या, आठव्या आणि नवव्या स्थानावर आहेत. नुकत्याच झालेल्या सामन्यात न्यूझीलंडच्या उत्कृष्ट कामगिरीमुळे पहिल्या डावात 511 धावांची मजबूत धावसंख्या उभी राहिली, ज्यात दक्षिण आफ्रिकेचा डाव अवघ्या 162 धावांवर आटोपला.  दुसऱ्या डावात 178/4 वर डाव घोषित केल्याने दक्षिण आफ्रिकेचा डाव 247 धावांवर संपुष्टात आल्याने आणखी एका प्रभावी कामगिरीसाठी मजल मारली.

WTC Point Table: न्यूझीलंडने दिला भारत-ऑस्ट्रेलियाला धक्का! WTC गुणतालिकेत मोठा बदल Read More »

Ahmednagar News: प्रश्न लागणार का मार्गी? ‘त्या’ प्रकरणात खा. सुजय विखेंनी घेतली केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांची भेट

Ahmednagar News: केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांची खासदार डॉ. सुजय विखे पाटील यांनी दिल्ली येथे भेट घेऊन कांदा निर्यात बंदी उठवण्यासंदर्भात आणि शेतकऱ्यांचे प्रश्न मार्गी लावण्यासाठी सकारात्मक चर्चा केली.  कांदा प्रश्नावर अमित शाह यांना राज्यातील शेतकऱ्यांसमोर येत असलेल्या अडचणी, कांदा खरेदी आणि योग्य भाव आदी विषयाची माहिती खा.विखे पाटील यांनी करून दिली असून शाह यांनीही याबाबत लवकरच कांदा उत्पादक शेतकऱ्यांच्या हिताचा निर्णय केंद्र सरकार घेईल असे आश्वासन दिले असल्याचे सांगण्यात आले आहे. दरम्यान याबाबत खासदार सुजय विखे पाटील यांना विचारले असता त्यांनी सांगितले की, सध्या कांद्याचे भाव गडगडले असून शेतकऱ्यांच्या दृष्टीने आणि त्यांना कांदा पिकविण्यासाठी लागणाऱ्या एकूण खर्चाचा जर विचार केला तर सध्या कांद्याला बाजारपेठेत मिळणारा भाव हा कमी आहे.  नगर, नाशिक,पुणे या कांदा पट्यात कांदा पीक घेणारा शेतकरी वर्ग मोठा असून निर्यात बंदीचा मोठा आर्थिक फटका बसत असल्याची वस्तुस्थिती खा.विखेंनी शाह यांच्या समोर मांडली आणि हा मुद्दा गृहमंत्री अमित शाह यांच्या लक्षात आणून दिला. निर्यातबंदीचा परिणाम म्हणून कांदा खरेदी केंद्रावर येणाऱ्या कांद्याला पाहिजे तसा भाव मिळत नाही.  कांद्याला एकरी येणारा खर्चही निघत नसल्याने शेतकरी हवालदिल झाला आहे. यावर शेतकरी वर्गातून केंद्र सरकार कडून मार्ग निघण्याची आशा आहे. कांद्याच्या प्रती क्विंटल मागे असलेले दर हे वाढले पाहिजे.  या अनुषंगाने केंद्र सरकारकडून सकारात्मक विचार व्हावा आणि या दृष्टिकोनातून निर्यातबंदी उठवणे किंवा नाफेड मार्फत कांदा खरेदी करण्याच्या दृष्टीकोनातून शेतकऱ्यांना दिलासा मिळावा अशी विनंती केंद्रीय मंत्र्यांना खा.विखे पाटील यांनी शाह यांची भेट घेऊन केली आहे.  यावेळी खा.सुजय विखेंना आश्वस्त करताना अमित शाह यांनी केंद्र सरकार शेतकऱ्यांच्या नेहमीच पाठीशी असून अनेक शेतकरी हिताच्या योजना हाती घेतलेल्या आहेत. सरकार शेतकऱ्यांचे नुकसान होऊ देणार नाही.  या दृष्टिकोनातून लवकरात लवकर शेतकऱ्यांच्या हिताचा निर्णय घेतला जाईल आणि केंद्र सरकार शेतकऱ्यांचे प्रश्न सोडविण्यासाठी कटिबद्ध आहे असे आश्वासन गृहमंत्र्यांनी दिले असल्याची माहिती खासदार डॉ. सुजय विखे पाटील यांनी दिली.

Ahmednagar News: प्रश्न लागणार का मार्गी? ‘त्या’ प्रकरणात खा. सुजय विखेंनी घेतली केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांची भेट Read More »

Ahmednagar News: निळवंडे उजव्या कालव्यातून पाणी सोडण्याचा निर्णय ऐतिहासिक – धनश्री विखे पाटील

Ahmednagar News:  उत्तर नगर जिल्ह्याला वरदान ठरणाऱ्या निळवंडे उजव्या कालव्यातून पाणी सोडण्याचा निर्णय लाभक्षेत्रातील शेतकऱ्यांकरीता निश्चितच ऐतिहासिक आणि आनंदाचा क्षण असल्याचे  प्रतिपादन रणरागिणी महिला मंडळाच्या अध्यक्षा धनश्री सुजय विखे पाटील यांनी केले. निळवंडे उजव्या कालव्यामुळे शेतकरी नक्कीच सुखावेल असा विश्वास व्यक्त करून  राज्यातील महायुती सरकारमुळे धरणाच्या दोन्ही कालव्याच्या कामाला गती मिळून पाणी सोडण्याच्या निर्णय शेतकऱ्यांच्या उज्वल भविष्यासाठी महत्वपूर्ण ठरणारा असल्याचे त्यांनी सांगितले. उत्तर नगर जिल्ह्यासह राहुरी तालुक्यासाठी वरदान असणारे निळवंडे धरणाच्या उजव्या कालव्याचे तांभेरे,कानडगाव, निंभेरे, तुळापूर, तांदूळनेर,वडनेर,कनगर,चिंचविहरे ,गुहायेथे  जलपूजन रणरागिणी महिला मंडळाच्या अध्यक्षा धनश्रीताई विखे पाटील व जिल्हा सहकारी बँकेचे अध्यक्ष शिवाजी राव कर्डीले यांच्या हस्ते करण्यात आले. धनश्री विखे यांनी सांगितले की जिल्ह्याच्या विकासासाठी महसूलमंत्री ना. राधाकृष्ण विखे पाटील आणि खा.डॉ सुजय विखे पाटील  सदैव प्रयत्नशील आहेत त्यांनी केलेल्या विकास कामामुळे जिल्ह्याचा विकास होत असल्याचे स्पष्ट करून, निळवंडे कालवा व्हावा ना. विखे पाटील यांचा पाठपुरवा महत्वपूर्ण ठरला असल्याचे सौ.विखे म्हणाल्या. यावेळी भाजपचे तालुका अध्यक्ष सुरेश बानकर, जिल्हा उपाध्यक्ष अमोल भनगडे,रवींद्र म्हसे, भिमराज हारदे, नानासाहेब गागरे,डॉ बापूसाहेब मुसमाडे, सरपंच निशा गागरे,उत्तम राव मुसमाडे,संदीप गीते,मारुती नालकर,सर्जेराव गाडगे, संदिप गाडगे ,आणा पाटील बलमे, बबनराव कोळसे,विजय बलमे, यांच्या सह सर्व व पदाधिकारी ,अधिकारी व ग्रामस्थ उपस्तीत होते.

Ahmednagar News: निळवंडे उजव्या कालव्यातून पाणी सोडण्याचा निर्णय ऐतिहासिक – धनश्री विखे पाटील Read More »

Ahmednagar News: मिळणार रोजगार! बेलवंडी 618 एकरमध्ये उभारली जाणार उद्योग नगरी

Ahmednagar News:  आज मुंबई येथे राज्याचे महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या अध्यक्षेखाली व उद्योगमंत्री उदय सांमत यांच्या प्रमुख उपस्थितीत अहमदनगर जिल्ह्याच्या दृष्टीने महत्त्वाची बैठक संपन्न झाली. यावेळी जिल्ह्यातील बेलवंडी ता. श्रीगोंदा येथील शेती महामंडळाच्या 618 एकर जमिनीवर एमआयडीसी उभारण्याला तत्वतः मान्यता देण्यात आली आहे. सदर एमआयडीसीच्या आराखड्यासंदर्भात पाहणी व सर्वेक्षण लवकरात लवकर पूर्ण करून त्या संबंधित सर्व कामे काल मर्यादेत करण्यात यावीत असे निर्देश महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी यावेळी अधिकारांना दिले. एमआयडीसी सुरू करण्यासंदर्भात मोजणीचा अहवाल मागविण्यात आला आहे. पुढील प्रकियेस गती देण्यात येणार असून, तात्काळ हे काम पुर्ण करण्यात येणार असल्याची माहिती उद्योग मंत्री उदय सामंत यांनी दिली. तसेच, जिल्हाधिकारी यांनी आजच उद्योग विभागाकडे विनंती प्रस्ताव सादर करावा असेही त्यांनी यावेळी सांगितले. श्रीगोंदा तालूक्यातील बेलवंडी फार्म येथे शेती महामंडळाची मौजे पर्वतवाडी आणि महादेववाडी येथील 618 एकर जमीन उद्योग विभागला देण्याची तत्वत: मान्यता यावेळी देण्यात आली. या एमआयडीसी करिता खासदार डॉ. सुजय विखे पाटील आणि माजी मंत्री आमदार बबनराव पाचपुते यांनी पाठपुरावा केला होता.  उद्योगनगरीसाठी जमीन दिल्याने खासदार डॉ. सुजय विखे पाटील यांनी राज्याचे महसूल मंत्री श्री. राधाकृष्ण विखे पाटील आणि उद्योगमंत्री श्री. उदय सांमत यांचे आभार व्यक्त केले.  खासदार डॉ.सुजय विखे पाटील यांनी सांगितले की बेलवंडी मध्ये रस्ते वाहतूक, पाणी तसेच रेल्वे वाहतुक सुविधा उपलब्ध तर आहेच शिवाय शिर्डी, पुणे आणि नाशिक एमआयडीसी केंद्र नजीक असल्याने येणाऱ्या काळात बेलवंडी उद्योजकांना मोठी पर्वणीच ठरणार आहे. या एमआयडीसी मुळे जिल्ह्यात उद्योगाला चालना मिळून मोठ्या प्रमाणात रोजगार उपलब्ध  होईल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. दरम्यान, श्रीरामपूर तालुका व राहता तालुक्यातील शेती महामंडळाकडे असलेल्या जमिनीच्या समस्यांबाबत चर्चा करण्यात आली. खंडकरी शेतकऱ्यांना वाटप केलेल्या जमिनींचा भोगवटादार वर्ग / मधुन भोगवटादार वर्ग 1 करणे तसेच सार्वजनिक प्रयोजनार्थ शेती महामंडळाची जमीन वाटप करणे संदर्भातील कामांचा आढावा मंत्री विखे पाटील यांनी घेतला. सदर बैठकीत खासदार डॉ. सुजय विखे पाटील, माजी मंत्री आमदार श्री.बबनराव पाचपुते, महसूल विभागाचे अप्पर सचिव श्री. राजगोपाल देवरा, अहमदनगरचे जिल्हाधिकारी श्री.सिद्धराम सालीमठ, शेती महामंडळाचे व्यवस्थापकीय संचालक श्री. विश्वजित माने यांच्यासह महसूल आणि शेती महामंडळ पुणे यांचे अधिकारी उपस्थित होते.

Ahmednagar News: मिळणार रोजगार! बेलवंडी 618 एकरमध्ये उभारली जाणार उद्योग नगरी Read More »

Titanic Photo: टायटॅनिक जहाज 112 वर्षानंतरही समुद्रातून बाहेर का आलं नाही? ‘हे’ आहे कारण

Titanic Photo: 15 एप्रिल 1912 रोजी समुद्रात टायटॅनिक जहाज बुडाला होता. जेव्हा टायटॅनिक हे जहाज तयार करण्यात आला होता तेव्हा हा जहाज पाण्यात कधीच बुडू शकत नाही असा दावा करण्यात आला होता. पण टायटॅनिक पाण्यात शिरल्यानंतर काही वेळातच बुडाले. टायटॅनिकचे अवशेष शोधायला बरीच वर्षे लागली. तब्बल 73 वर्षांनंतर 1985 मध्ये टायटॅनिकचा अवशेष सापडला. 112 वर्षांनंतरही टायटॅनिकचा माल पाण्याबाहेर काढता आला नाही. चला तर मग जाणून घेऊया यामागचे कारण काय आहे. टायटॅनिक का बाहेर काढता आले नाही? टायटॅनिक बुडून इतकी वर्षे झाली तरी अजूनही समुद्राच्या खोल खोलवर आहे. तो अद्याप काढण्यात आलेला नाही. यामागील कारण म्हणजे टायटॅनिक इतके खोल बुडाले आहे की इतक्या खोलवर जाऊन त्याला परत आणणे आता शक्य नाही. इतकं जड जहाज बाहेर काढू शकणारी हायटेक पाणबुडी तयार करण्यात शास्त्रज्ञांनाही अद्याप यश आलेलं नाही. याचे आणखी एक कारण म्हणजे पाण्याचा दाब. पाण्याच्या दाबामुळे जहाजाचे वजन इतके वाढले आहे की ते बाहेर पडणे शक्य नाही आणि यामुळेच टायटॅनिकला आजतागायत पाण्यातून बाहेर काढता आलेले नाही.

Titanic Photo: टायटॅनिक जहाज 112 वर्षानंतरही समुद्रातून बाहेर का आलं नाही? ‘हे’ आहे कारण Read More »

Nashik IT Raid : मोठी बातमी! ‘या’ भागात आयटीचा छापा, 8 कोटींची रोकड, तीन कोटींचे सोने जप्त

Nashik IT Raid: एक मोठी बातमी समोर आली आहे. या बातमीनुसार आयकर विभागाने मोठी कारवाई करत नाशिकमध्ये अनेक सरकारी कंत्राटदारांवर छापे टाकून त्यांच्याकडून कोट्यवधी रुपयांची बेहिशेबी मालमत्ता जप्त केली आहे. माहितीनुसार गेल्या चार दिवसांपासून हा छापा सुरू आहे. सुमारे 200 अधिकारी व कर्मचाऱ्यांचे पथक या छाप्यात सहभागी आहे. पैशांनी भरलेल्या पुठ्ठ्याचे बॉक्स सापडले आयकर विभागाला 850 कोटी रुपयांपेक्षा जास्त किमतीची बेहिशेबी मालमत्ता आणि व्यवहार झाल्याचा संशय आहे. कंत्राटदारांच्या आठहून अधिक ठिकाणी आयटीचे छापे टाकण्यात आल्याचे सांगण्यात येत आहे.  सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, या छाप्यात विविध ठिकाणांहून आठ कोटी रुपयांची रोकड, सोन्याचे दागिने आणि तीन कोटी रुपयांची सोन्याची बिस्किटे जप्त करण्यात आली आहेत. आयकर विभागाच्या पथकाने नाशिकमध्ये एकाच वेळी डझनहून अधिक ठिकाणी छापे टाकले. शहरातील बड्या सरकारी कंत्राटदारांची निवासस्थाने, कार्यालये आणि इतर परिसरांची झडती घेण्यात आली. त्यांच्याशी संबंधित बँक खाती, संगणक आणि व्यवहार यांची चौकशी सुरू आहे.  छाप्यादरम्यान आयकर विभागाने तपासासाठी कोट्यवधी रुपयांच्या व्यवहारांशी संबंधित कागदपत्रे, पेन ड्राइव्ह आणि हार्ड डिस्क जप्त केल्या आहेत. छाप्यात अनेक ‘धनकुबेर’ पकडले नाशिकमध्ये आयकर विभागाने सरकारी कंत्राटदारांच्या मुसक्या आवळल्या आहेत. महापालिकेच्या 8 कंत्राटदारांवर गेल्या चार-पाच दिवसांपासून ही कारवाई सुरू आहे. अतिशय नियोजनबद्ध पद्धतीने ही कारवाई सुरू आहे. आयकर अधिकाऱ्यांना पाहिल्यानंतर काहींनी त्यांची रोकड त्यांच्या कारमध्ये आणि झुडपात लपवून ठेवली, तर काहींनी अधिकाऱ्यांपासून त्यांची बेहिशेबी संपत्ती लपवण्यासाठी छतावर आणि पंख्यांमध्ये व्यवहाराची कागदपत्रे आणि पेनड्राइव्ह लपवून ठेवल्या. काही कंत्राटदारांनी घराच्या वेगवेगळ्या ठिकाणी त्यांच्या मालमत्तेची माहिती असलेली पेन ड्राइव्ह आणि हार्डडिस्क लपवून ठेवली होती. त्यातील एकाने घरातील पंख्यामध्ये बेहिशेबी व्यवहारांची माहिती असलेला 2 जीबीचा पेन ड्राईव्ह लपवून ठेवला होता.  त्याचवेळी गाडीत रोकड ठेवून झुडपात लपवून ठेवली होती. आयकर विभागाची कारवाई अजूनही सुरूच आहे. येत्या काही दिवसांत मोठे खुलासे होण्याची शक्यता आहे.

Nashik IT Raid : मोठी बातमी! ‘या’ भागात आयटीचा छापा, 8 कोटींची रोकड, तीन कोटींचे सोने जप्त Read More »

Asaduddin Owaisi : राज्यात ओवेसी करणार गेम! ‘इतक्या’ जागांवर लढवणार लोकसभा निवडणूक

Asaduddin Owaisi: आगामी लोकसभा निवडणुकीसाठी सध्या प्रत्येक राजकीय पक्षाने तयारी पूर्ण केली आहे. सर्व पक्ष आपल्या ताकदीनुसार लोकसभा निवडणुक लढवण्याची तयारी करताना दिसत आहे.  समोर आलेल्या माहितीनुसार, निवडणूक आयोग पुढील महिन्यात लोकसभा निवडणुकीच्या तारखा जाहीर करू शकतो. देशात सध्या ‘एनडीए’ आणि ‘इंडिया’ युतीमध्ये थेट लढत होणार असून राज्यात सत्ताधारी महायुती आणि महाविकास आघाडी यांच्यात लढत पाहायला मिळणार आहे.  राज्यातील 48 पैकी 45 जागांवर झेंडा फडकवण्यासाठी महायुतीने मेगा प्लान तयार केला आहे तर MVA ने देखील जवळपास जागा वाटपाचा फॉर्मुला तयार केला आहे.   तर दुसरीकडे आगामी लोकसभा निवडणुकीत राज्यात असदुद्दीन ओवेसी यांचा पक्ष ऑल इंडिया मजलिस-ए-इत्तेहादुल मुस्लीमीन (AIMIM) देखील निवडणूक लढवणार आहे. समोर आलेल्या माहितीनुसार एआयएमआयएम राज्यातील पाच लोकसभा जागांवर निवडणूक लढवणार आहे.  भिवंडीत पत्रकारांशी बोलताना एआयएमआयएम महाराष्ट्र युनिटचे कार्याध्यक्ष डॉ अब्दुल गफार कादरी म्हणाले की, राज्यातील उत्तर मुंबई, धुळे, नांदेड, भिवंडी आणि छत्रपती संभाजीनगर (औरंगाबाद) या जागांवर पक्ष आपले उमेदवार उभे करण्याचा विचार करत आहे. कादरी म्हणाले की, एआयएमआयएम निवडणुकीची प्रभावी रणनीती बनवण्यासाठी या जागांवर सर्वेक्षण करत आहे.   महाराष्ट्रात लोकसभेच्या 48 जागा आहेत. 2019 च्या लोकसभा निवडणुकीत भाजपने 25 जागा आणि अविभाजित शिवसेनेने 23 जागा लढवल्या. यामध्ये भाजपला 23 तर शिवसेनेला 18 जागांवर यश मिळाले. काँग्रेसला एक तर राष्ट्रवादीला चार जागा मिळाल्या. AIMIM चे एकमेव औरंगाबादचे उमेदवार इम्तियाज जलील सय्यद विजयी झाले होते.

Asaduddin Owaisi : राज्यात ओवेसी करणार गेम! ‘इतक्या’ जागांवर लढवणार लोकसभा निवडणूक Read More »

Surya Grahan 2024 :  वर्षातील पहिले सूर्यग्रहण 8 एप्रिलला, ‘या’ गोष्टी चुकूनही करू नका

Surya Grahan 2024 : 2024 मधील पहिले सूर्यग्रहण 08 एप्रिल 2024 दिसणार आहे. हे जाणून घ्या कि, हा सूर्यग्रहण संपूर्ण सूर्यग्रहण होणार आहे. सुतक कालावधी ग्रहणाच्या 12 तास आधी सुरू होतो. मात्र हे ग्रहण भारतात दिसणार नाही. तर मेक्सिको, कॅनडा आणि अमेरिकेच्या काही भागात हे ग्रहण पाहता येणार आहे. तुम्हाला हा अनोखा क्षण यूट्यूबवर लाईव्ह स्ट्रीमद्वारेही पाहता येणार आहे. खगोलशास्त्रज्ञांच्या मते, जेव्हा चंद्र सूर्य आणि पृथ्वीच्या मध्ये येतो तेव्हा त्याला सूर्यग्रहण म्हणतात.   सूर्यग्रहणाची वेळ सूर्यग्रहण 08 एप्रिल 2024 रोजी रात्री 9.12 पासून सुरू होईल आणि दुपारी 1.25 पर्यंत चालेल.  ग्रहण 8 एप्रिल आणि 9 एप्रिल या दोन्ही दिवशी होईल. 8 एप्रिल 2024 रोजी वर्षातील संपूर्ण सूर्यग्रहण मीन आणि रेवती नक्षत्रात चैत्र महिन्यात होणार आहे. पूर्ण सूर्यग्रहण 8 एप्रिल 2024 रोजी रात्री 9:12 वाजता सुरू होईल आणि 9 एप्रिल 2024 रोजी पहाटे 2:22 वाजता समाप्त होईल. 8 एप्रिल 2024 रोजी होणारे संपूर्ण सूर्यग्रहण भारतात दिसणार नाही. तसेच, त्या दिवशी भारतात सुतक नसेल, कारण देशात सूर्यग्रहण दिसणार नाही. ग्रहण काळात या गोष्टी करू नका हिंदू धर्मग्रंथानुसार सूर्यग्रहणाच्या काळात आपण कोणत्याही प्रकारचे अन्न सेवन करू नये. असे म्हटले जाते की सूर्यग्रहण दरम्यान काहीही खाल्ल्याने आपल्या जीवनावर खोलवर परिणाम होतो. सूर्यग्रहण काळात फळे आणि भाज्या तोडणे टाळावे.  ग्रहणकाळात गरोदर महिलांनी घराबाहेर पडू नये, असा समज आहे.

Surya Grahan 2024 :  वर्षातील पहिले सूर्यग्रहण 8 एप्रिलला, ‘या’ गोष्टी चुकूनही करू नका Read More »