Dnamarathi.com

Health Tips: बदलत्या लाईफस्टाईल यामुळे आज आपल्या आजूबाजूला अनेक आजार पसरले आहे. यामुळे केव्हा कोणाला काय होणार? हे सांगता येत नाही. 

मात्र पूर्वीच्या काळी पायाला मुक्कामार लागला किंवा पायाला सूज आली यावर घरघुती उपाय म्हणून आंबेहळदीचा वापर मोठ्या प्रमाणात होत होता. 

 आंबेहळद ही अत्यंत गुणकारी आहे. त्यामुळे फार कमी जणांच्या घरात किंवा आयुर्वेदिक दुकानात आंबेहळद मिळते. विशेष म्हणजे आंबेहळद की वेळ मार लागल्यावरच वापरतात हा एक समज आहे. 

आंबेहळदीचे अनेक गुणकारी फायदे आहेत.त्यामुळे हे फायदे कोणते ते जाणून घेऊयात.

१. मुक्कामार किंवा सूज आल्यावर आंबेहळद उगाळून त्याचा लेप लावा त्यामुळे सूज कमी होते.

२. शरीराचा एखादा भाग दुखत असल्यास त्यावर आंबेहळदीचा लेप लावल्यास वेदना कमी होतात.

३. साकलेल्या रक्ताचा प्रवाह सुरळीत होतो. यासाठी आंबेहळद उगाळून कोमट करुन ती रक्त साकळलेल्या जागेवर लावावी.

४. शरीरातील कोणत्याही भागात गाठ आली असेल तर आंबेहळदीचा लेप लावावा.

५.अंगावरील पूरळ दूर होतात.

६.आंबेहळद आणि साय एकत्र करुन त्याचा लेप लावल्यास त्वचेचा रंग उजळतो. 

दरम्यान, आंबेहळद ही तीक्ष्ण असून ती कधीही खात नाहीत. त्यामुळे तिचा वापर कायम बाह्यअंगावरच केला जातो.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *