Dnamarathi.com

Asaduddin Owaisi: आगामी लोकसभा निवडणुकीसाठी सध्या प्रत्येक राजकीय पक्षाने तयारी पूर्ण केली आहे. सर्व पक्ष आपल्या ताकदीनुसार लोकसभा निवडणुक लढवण्याची तयारी करताना दिसत आहे. 

समोर आलेल्या माहितीनुसार, निवडणूक आयोग पुढील महिन्यात लोकसभा निवडणुकीच्या तारखा जाहीर करू शकतो.

देशात सध्या ‘एनडीए’ आणि ‘इंडिया’ युतीमध्ये थेट लढत होणार असून राज्यात सत्ताधारी महायुती आणि महाविकास आघाडी यांच्यात लढत पाहायला मिळणार आहे. 

राज्यातील 48 पैकी 45 जागांवर झेंडा फडकवण्यासाठी महायुतीने मेगा प्लान तयार केला आहे तर MVA ने देखील जवळपास जागा वाटपाचा फॉर्मुला तयार केला आहे. 

 तर दुसरीकडे आगामी लोकसभा निवडणुकीत राज्यात असदुद्दीन ओवेसी यांचा पक्ष ऑल इंडिया मजलिस-ए-इत्तेहादुल मुस्लीमीन (AIMIM) देखील निवडणूक लढवणार आहे.

समोर आलेल्या माहितीनुसार एआयएमआयएम राज्यातील पाच लोकसभा जागांवर निवडणूक लढवणार आहे. 

भिवंडीत पत्रकारांशी बोलताना एआयएमआयएम महाराष्ट्र युनिटचे कार्याध्यक्ष डॉ अब्दुल गफार कादरी म्हणाले की, राज्यातील उत्तर मुंबई, धुळे, नांदेड, भिवंडी आणि छत्रपती संभाजीनगर (औरंगाबाद) या जागांवर पक्ष आपले उमेदवार उभे करण्याचा विचार करत आहे.

कादरी म्हणाले की, एआयएमआयएम निवडणुकीची प्रभावी रणनीती बनवण्यासाठी या जागांवर सर्वेक्षण करत आहे.  

महाराष्ट्रात लोकसभेच्या 48 जागा आहेत. 2019 च्या लोकसभा निवडणुकीत भाजपने 25 जागा आणि अविभाजित शिवसेनेने 23 जागा लढवल्या. यामध्ये भाजपला 23 तर शिवसेनेला 18 जागांवर यश मिळाले. काँग्रेसला एक तर राष्ट्रवादीला चार जागा मिळाल्या. AIMIM चे एकमेव औरंगाबादचे उमेदवार इम्तियाज जलील सय्यद विजयी झाले होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *