Dnamarathi.com

Surya Grahan 2024 : 2024 मधील पहिले सूर्यग्रहण 08 एप्रिल 2024 दिसणार आहे. हे जाणून घ्या कि, हा सूर्यग्रहण संपूर्ण सूर्यग्रहण होणार आहे. सुतक कालावधी ग्रहणाच्या 12 तास आधी सुरू होतो. मात्र हे ग्रहण भारतात दिसणार नाही.

तर मेक्सिको, कॅनडा आणि अमेरिकेच्या काही भागात हे ग्रहण पाहता येणार आहे. तुम्हाला हा अनोखा क्षण यूट्यूबवर लाईव्ह स्ट्रीमद्वारेही पाहता येणार आहे.

खगोलशास्त्रज्ञांच्या मते, जेव्हा चंद्र सूर्य आणि पृथ्वीच्या मध्ये येतो तेव्हा त्याला सूर्यग्रहण म्हणतात.  

सूर्यग्रहणाची वेळ

सूर्यग्रहण 08 एप्रिल 2024 रोजी रात्री 9.12 पासून सुरू होईल आणि दुपारी 1.25 पर्यंत चालेल.  ग्रहण 8 एप्रिल आणि 9 एप्रिल या दोन्ही दिवशी होईल. 8 एप्रिल 2024 रोजी वर्षातील संपूर्ण सूर्यग्रहण मीन आणि रेवती नक्षत्रात चैत्र महिन्यात होणार आहे.

पूर्ण सूर्यग्रहण 8 एप्रिल 2024 रोजी रात्री 9:12 वाजता सुरू होईल आणि 9 एप्रिल 2024 रोजी पहाटे 2:22 वाजता समाप्त होईल.

8 एप्रिल 2024 रोजी होणारे संपूर्ण सूर्यग्रहण भारतात दिसणार नाही. तसेच, त्या दिवशी भारतात सुतक नसेल, कारण देशात सूर्यग्रहण दिसणार नाही.

ग्रहण काळात या गोष्टी करू नका

हिंदू धर्मग्रंथानुसार सूर्यग्रहणाच्या काळात आपण कोणत्याही प्रकारचे अन्न सेवन करू नये. असे म्हटले जाते की सूर्यग्रहण दरम्यान काहीही खाल्ल्याने आपल्या जीवनावर खोलवर परिणाम होतो. सूर्यग्रहण काळात फळे आणि भाज्या तोडणे टाळावे. 

ग्रहणकाळात गरोदर महिलांनी घराबाहेर पडू नये, असा समज आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *