Dnamarathi.com

Health Care Tips : आज अनेकांना दैनंदिन जीवनातील काही वाईट सवयीमुळे सांधेदुखीची समस्या वाढत चालली आहे. 

यामुळे जर या सवयींकडे दुर्लक्ष केल्यास भविष्यात गंभीर समस्यांचा सामना करावा लागू शकते.

सांधेदुखीच्या समस्येमुळे संपूर्ण शरीरावर दुष्परिणाम होतात. साधारणतः ही समस्या वयोवृद्ध व्यक्तींमध्ये जास्त प्रमाणात आढळते. पण हल्ली बदलती जीवनशैली, वेळी-अवेळी खाणेपिणे, झोपणे इत्यादी गोष्टींमुळे तरुणांमध्ये सांधेदुखीची समस्या वाढतेय. 

या समस्येवर वेळीच वैद्यकीय उपचार घेणे आवश्यक आहे, अन्यथा भविष्यात तुम्हाला गंभीर परिणामांना सामोरे जावे लागेल. बहुतांश लोक सुरुवातीला याकडे दुर्लक्ष करण्याची चूक करतात. जेव्हा वेदना असह्य होऊ लागतात, तेव्हाच लोक स्नायूंच्या वेदनांवर उपचार करण्यासाठी डॉक्टरांकडे धाव घेतात.

पण शरीरात तीव्र स्वरुपातील वेदना अचानक का उद्भवते, यामागील कारणे आपणास माहीत आहेत का? शरीरामध्ये एखादी इजा किंवा दुखापत झाल्यास सांधेदुखीचा त्रास उद्भवू शकतो. तसंच तुमच्या काही वाईट सवयींमुळेही शरीराच्या वेगवेगळ्या भागांमध्ये वेदना निर्माण होऊ शकतात. जाणून घेऊया सविस्तर माहिती.

शरीराचे वजन जास्त असणे

शरीराचे वजन जास्त असणाऱ्या लोकांना संधिवात होण्याचा धोका अधिक असतो. शरीराचे वजन जास्त वाढल्याने फिटनेससह शरीराच्या वेगवेगळ्या अवयवांवरही वाईट परिणाम होतात. अवयवावर अतिरिक्त दबाव निर्माण झाल्यानं शारीरिक वेदना होऊ लागतात. 

शरीराचे वजन वाढल्याने कंबर, पाठ, पाय आणि नितंबांवर अधिक भार येतो व शरीराच्या स्नायूंचे दुखणे वाढते. शारीरिक ताणतणावामुळेही सांधेदुखीचा त्रास होऊ शकतो.

दीर्घकाळापर्यंत एकाच स्थितीमध्ये बसणे

जर आपण एकाच ठिकाणी तास-न्-तास बसून काम करत असाल तर यामुळे कंबरदुखीचा त्रास होऊ शकतो. यामुळे वारंवार पाठीतही वेदना निर्माण होतात. काही लोकांना स्लिप डिस्कच्या समस्येचाही सामना करावा लागण्याची शक्यता असते.

बहुतांश लोक कम्प्युटरसमोर कित्येक तास एकाच स्थितीमध्ये बसून काम करतात. यामुळे पाठीच्या कण्यावर अतिरिक्त ताण येतो. ज्यामुळे तीव्र स्वरुपात पाठ-कंबरदुखी होते. ही समस्या टाळण्यासाठी अधूनमधून विश्रांती घेणे आवश्यक आहे.

वजनदार बॅग पाठीवर घेणे

वजनदार बॅग खूप वेळ पाठीवर असल्यासही सांधेदुखीचा त्रास होऊ शकतो. पाठदुखीनंतर हळूहळू कंबरदुखीची समस्या निर्माण होऊ शकते. यामुळेच वजनदार वस्तू देखील कमी प्रमाणात उचलाव्यात. पाण्याने भरलेली वजनदार बादली उचल्यास हातांच्या स्नायूंवर ताण येतो. ज्यामुळे सांध्यांचे दुखणे वाढू शकते.

मोबाइलवर वारंवार चॅटिंग करणे

मोबाइन फोनवर वारंवार मेसेज टाइप केल्यानंही सांध्यांचे दुखणे वाढू शकते. चॅटिंगसाठी अंगठ्याचा मोठ्या प्रमाणात वापर केला जातो. यामुळे आपल्या हातांमध्ये वेदना जाणवू शकतात.

पोटावर झोपणे

तुम्हाला पोटावर झोपण्याची सवय असेल तर वेळीच सावध व्हा. कारण यामुळे पाठीचे दुखणे वाढते. पोटावर झोपण्याच्या सवयीमुळे कंबर आणि पाठीच्या कण्यावर वाईट परिणाम होतात. परिणामी पाठदुखीची समस्या वाढत जाते. याव्यतिरिक्त कधी-कधी मान देखील दुखू लागते.

हाय हील्सचा वापर करणे

कम्फर्टेबल फुटवेअरचा वापर न केल्यासही सांधेदुखीची समस्या निर्माण होऊ शकते. बहुतांश लोक हाय हील्सचा वापर करतात. यामुळे पायांवर ताण येतो. हाय हील्सच्या वापरामुळे गुडघ्यांपासून ते मांड्यांपर्यंतच्या स्नायूंवर दबाव येतो. ज्यामुळे गुडघ्यांसह पायांचेही दुखणे वाढते. ही समस्या टाळण्यासाठी शक्यतो कम्फर्टेबल फुटवेअरचा वापर करावा.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *