Dnamarathi.com

Ram Shinde : भाजपकडून लोकसभेचे उमेदवारांची यादी जाहीर झाली यामध्ये नगर दक्षिण मधून सुजय विखे यांना उमेदवारी जाहीर झाली. लोकसभेच्या अनुषंगाने  नगर शहरांमध्ये भाजपाच्या पदाधिकाऱ्यांची बैठक पार पडली.

यावेळी भाजप आमदार राम शिंदे यांनी मंचावरच सुजय विखे यांना  शुभेच्छा देत त्यांचा सत्कार देखील केला. खासदार सुजय विखे यांनी देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पुन्हा एकदा पंतप्रधान करायचा आहे त्यासाठी सर्व एकत्र येऊन  काम करणार असल्याचं दोघांनी सांगितलं,

लोकसभेची यादी जाहीर होतात येणाऱ्या निवडणुकीच्या अनुषंगाने भाजपची नगर शहरात आढावा बैठक पार पडली आहे. लोकसभेची रणनीती काय असणार यावरती करण्यात आली.

यावेळी भाजपाचे उमेदवार सुजय विखे तसेच आमदार बबनराव पाचपुते, आमदार मोनिका राजळे, आमदार राम शिंदे तसेच माजी आमदार शिवाजी कर्डिले यांच्यासह अनेक कार्यकर्ते तसेच पदाधिकारी उपस्थित होते.

याप्रसंगी आमदार राम शिंदे बोलताना म्हणाले की, भाजपकडून नगर दक्षिण लोकसभेसाठी सुजय विखे यांना उमेदवारी जाहीर करण्यात आली. मी देखील लोकसभेच्या उमेदवारीसाठी इच्छुक होतो मात्र पक्षाने घेतलेल्या निर्णयाचं मी स्वागत केलं तसेच मी सुजय विखे यांना निवडणुकीसाठी शुभेच्छा देखील दिले आहे. तर एकत्र येऊन काम करत असल्याचा सुजय विखे यांनी सांगितलं.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *