Dnamarathi.com

Reagan Airport: अमेरिकेतील वॉशिंग्टन डीसी येथे असणाऱ्या रीगन विमानतळावर एक मोठा विमान अपघात झाला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, विचिटा कॅन्ससहून येणारे अमेरिकन एअरलाइन्सचे विमान 5342 हे रेगन राष्ट्रीय विमानतळावर उतरताना एका हेलिकॉप्टरशी धडकले. अपघातानंतर रेगन विमानतळावरील सर्व लँडिंग आणि टेकऑफ स्थगित करण्यात आले आहेत. मदत आणि बचाव कार्य सुरू आहे. पोटोमॅकवर एका हेलिकॉप्टरची एका व्यावसायिक विमानाशी टक्कर झाल्याचा प्राथमिक अहवालात दावा करण्यात आला आहे. त्यानंतर हा अपघात झाला.

अपघातात 60 जणांचा मृत्यू
या अपघातानंतर फेडरल एव्हिएशन अॅडमिनिस्ट्रेशनने रेगन राष्ट्रीय विमानतळावरील सर्व उड्डाणे रद्द केली आहेत. रीगन नॅशनल एअरपोर्टने सोशल मीडियावरील पोस्टमध्ये म्हटले आहे की डीसीएमधील सर्व टेकऑफ आणि लँडिंग थांबवण्यात आले आहेत. आपत्कालीन कर्मचारी एअरफील्डवर झालेल्या विमान अपघाताची चौकशी करत आहेत.

मिळालेल्या माहितीनुसार, अमेरिकन एअरलाइन्सचे विमान ब्लॅक हॉक हेलिकॉप्टरशी धडकल्यानंतर आतापर्यंत 60 जणांचा मृत्यू झाल्याची माहिती आहे. पोलिस स्कॅनरनुसार, बळींचे मृतदेह अजूनही खाली आणण्याचे काम सुरू आहे. राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांना अपघाताची माहिती देण्यात आली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *