DNA मराठी

Ram Shinde: शनी देवाचा कोप म्हणून तुम्ही पराभूत…राम शिंदेंना भाजपमधूनच घरचा आहेर

rishikesh shete

Ram Shinde : जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक निवडणुकीच्या अनुषंगाने विधानपरिषदेचे सभापती राम शिंदे यांनी जिल्ह्यातील नेतेमंडळींची भेटीगाठी घेण्यास सुरुवात केली. नुकतेच त्यांनी माजी खासदार यशववंतराव गडाख यांची भेट घेतली मात्र त्यांच्या याच कृतीमुळे भाजपमधील काही निष्ठावंत नाराज झालेले आहे. तुम्ही शंकर गडाखाकडे गेले तुमच्या वयक्तिक फायद्यासाठी माझी इच्छा नसताना मला तुम्हाला विरोध करण्यास भाग पाडू नका अशा शब्दात भाजपचे युवानेते ऋषिकेश शेटे यांनी शिंदे यांच्या भेटीचा खरपूस शब्दात समाचार घेतला.

माननीय राम शिंदे साहेब सप्रेम नमस्कार माझी इच्छा नसताना मला तुम्हाला विरोध करण्यास भाग पाडू नका. शंकर यशवंतराव गडाख या माणसाने नेवासा तालुक्यातील भाजप कार्यकर्त्याना उबाठा काळात मंत्री असताना भयानक त्रास दिला , गोळीबार केले, भाजप ला सपोर्ट करणाऱ्या शेतकऱ्यांचे शेत तळे फोडले, पाण्याच्या पाइपलाइन फोडल्या, शेतकऱ्याचे उत्पन्नाचे साधन असलेले ऊस पेटून दिले , ऊसाच्या खोडक्या केल्या, खोट्या एट्रोसिटी दाखल केल्या,कलम ३०७ दाखल करून शेतकरी जेल मध्ये पाठवले व त्यांचे प्रपंच संपवले.

तुम्ही शंकर गडाखाकडे गेले तुमच्या वयक्तिक फायद्यासाठी ज्याने भाजप चे असंख्य कार्यकर्त्याला त्रास दिला, तुमची अशी गळाभेट घेणे कार्यकर्त्यांना आवडलेले नाही त्यांची तुमच्यावर प्रचंड नाराजी आहे. शिंगणापूर देवस्थान मध्ये हजारो कोटी भ्रष्टाचार कुणामुळे झाला खरे कारणीभूत तुम्ही आणि बाळासाहेब मुरकुटे आहात तुम्ही पालकमंत्री असताना शिंगणापूर देवस्थान गडाखांना सेटलमेंट करून दिल ते कसे दिले हे जनतेला सांगायला लाऊ नका त्याचे सर्व प्रूफ आमच्याकडे आहेत आणि तुम्ही कितीही यांना भेटले तरी हे मतदान तुम्हाला करणार नाही हे लक्षात ठेवा.

आता हे तुम्हाला मतदान करण्याच्या बोलीवर तुमच्या कडून काहीतरी पाप धुण्याची बोली करणार . शंकर गडाख ह्या व्यक्तीस भाजप मधे घेण्याचा प्रयत्न करू नये .एक लक्षात ठेवा तुम्ही विधानसभेला पराभूत होणे सोपे नव्हते परंतु तुम्ही शनी देवस्थान 2017 – 18 ल सेटलमेंट करून विकले म्हणून तुम्हाला शनी ने उत्तर दिले. गडाखांच्या आयुष्यात सर्व संकट येते त्याला कारण देखील शनिवार आणि शनि देवाचा कोप आहे हा तुम्ही तुमच्यावर घेऊ नका आणि हे सगळं बोलून मला त्रास होणार असेल तर संघर्ष आमच्या रक्तात आहे कारण मी खानदानी भाजपा कार्यकर्ता आहे.

भारतीय जनता पार्टी आणि पक्षासाठी आणि आमचे रक्त सांडले आहे. मात्र तुमच्या अशा सेटलमेंट वृत्तीमुळे, तुमच्या विरोधात भाजप कार्यकर्ते एकवटतील हे लक्षात घ्या अशा शब्दात ऋषिकेश शेटे यांनी आपला राग व्यक्त केला.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *