DNA मराठी

Shrirampur Band : गुन्हेगारी विरोधात आज श्रीरामपूर बंद…

shrirampur band

Shrirampur Band : श्रीरामपूरमध्ये गेल्या काही दिवसांपासून गुन्हेगारी मोठ्या प्रमाणावरती उच्छाद मांडला असून खून मारामाऱ्या अशा घटनांमुळे कायदा व सुव्यवस्था धोक्यात आली आहे यातच श्रीरामपूर मधील एका हॉटेल मालकाच्या हत्येमुळे शहरात एकच खळबळ उडाली वाढती गुन्हेगारी विरोधात श्रीरामपूर शहरांमध्ये आज बंद पाळण्यात आला असून यामध्ये नागरिक व्यापारी व राजकीय नेत्यांनी या बंदमध्ये सहभाग घेतला आहे.

श्रीरामपूर मधील हॉटेल मालक आकाश दुबय्या यांच्या भर दिवसा घडलेल्या हत्याकांडामुळे कायदा व सुव्यवस्थेबाबत चिंता व्यक्त केली जात आहे शहरात वाढती गुन्हेगारी व या गुंडांचा तातडीने बंदोबस्त करण्यात यावा यासाठी आज सकाळपासूनच व्यापाऱ्यांनी स्वतःहून कडकडीत बंद पाळला असून आमदार हेमंत उगले नगराध्यक्ष करण ससाने यांच्यासह स्थानिक नागरिक व व्यापाऱ्यांनी फेरी काढून गुन्हेगारांचा विमोड करण्यासाठी साथ द्यावी असं आव्हान देखील केला आहे.

तसेच शहरातील गुन्हेगारीला आळा घालण्यासाठी मुक्का अंतर्गत कारवाईचे करण्यात यावी अशी मागणी देखील पोलीस प्रशासनाला करण्यात आली आहे दरम्यान आकाश यांच्या कुटुंबीयांनी संबंधित गुन्हेगारावरती कठोर कारवाई करण्यात यावी अशी मागणी केली तरी जोपर्यंत प्रत्यक्ष कारवाई होत नाही तोपर्यंत श्रीरामपूर शहर बंद राहणार असे आवाहन सर्वपक्षीय विविध संघटनांनी केले आहे.

श्रीरामपूर मध्ये अवैध धंदे गुंडांच्या टोळ्या ह्या कार्यरत असून यामुळे गोरगरिबांवती अन्याय महिलांवर अत्याचाराच्या घटना घडत आहेत मात्र पोलिसांनी देखील योग्य वेळी कारवाई केली पाहिजे श्रीरामपूर शहराची ओळख गुन्हेगारी शहर म्हणून निर्माण होत आहे वाळूमुळे अनेक गुन्हेगारी टोळ्या तयार होत असून शासन दरबारी हा विषय प्राधान्याने मांडू व मुख्यमंत्र्यांनी यामध्ये लक्ष घालून या गुंडांचा कायमचा बंदोबस्त करण्यात असल्याचे माहिती राज्याचे जलसंपदा मंत्री तसेच अहिल्यानगरचे पालकमंत्री राधाकृष्ण विखे यांनी दिली आहे.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *