DNA मराठी

Gold Price Today: सोने-चांदीच्या दरात घसरण, ग्राहकांना दिलासा; जाणून घ्या नवीन दर

Gold Price Today : देशातील सोने आणि चांदीच्या दरात पुन्हा एकदा घसरण झाल्याने ग्राहकांना दिलासा मिळाला आहे. गेल्या काही दिवसांपासून बाजारात सोने आणि चांदीच्या दरात घसरण सुरू असल्याने बाजारात ग्राहकांची देखील आता वाढत चालली आहे.

इंडियन बुलियन अँड ज्वेलर्स असोसिएशन (IBJA) आणि विविध सराफा बाजारातील ताज्या दरांनुसार, मुंबईत २४ कॅरेट सोन्याचा भाव प्रति १० ग्रॅम १,४४,३२० रुपये, तर २२ कॅरेट सोन्याचा दर १,३२,२९० रुपये आहे. दिल्लीत २४ कॅरेट सोन्याचा दर १,४४,४७० रुपये आणि २२ कॅरेट सोन्याचा दर १,३२,४५० रुपये प्रति १० ग्रॅम नोंदविण्यात आला आहे.

कोलकाता व हैदराबादमध्ये २४ कॅरेट सोन्याचा भाव १,४४,३२० रुपये असून, चेन्नईमध्ये तो १,४५,०८० रुपये प्रति १० ग्रॅम इतका आहे. गेल्या आठवड्यात सोन्याच्या दरात लक्षणीय घट झाली असून, २४ कॅरेट सोन्याचा दर सुमारे ४,३७० रुपयांनी कमी झाला आहे. २२ कॅरेट सोन्याच्या किमतीतही जवळपास ४ हजार रुपयांची घसरण झाली आहे.

चांदीच्या किमतीतही मोठी घसरण झाली असून, तिचा दर प्रति किलो २,३४,९०० रुपयांवर आला आहे. गेल्या आठवड्यात चांदी सुमारे १५ हजार रुपयांनी स्वस्त झाली आहे.

बाजारातील तज्ज्ञांच्या मते, जागतिक बाजारातील हालचाली आणि डॉलरच्या मूल्यातील बदलांचा परिणाम मौल्यवान धातूंच्या किमतीवर होत आहे. सध्याच्या घसरलेल्या दरामुळे दागिने खरेदी करणारे ग्राहक आणि गुंतवणूकदारांसाठी ही अनुकूल संधी मानली जात आहे.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *