DNA मराठी

Sujay Vikhe: सुजय विखेंचा त्याग म्हणूनच मी आमदार… कोल्हेंची मंचावरून जाहीर कबुली

vivek kolhe

Sujay Vikhe: अहिल्यानगर विधान परिषद निवडणुकीसाठी सुजय विखे हे देखील इच्छुक होते मात्र त्यांनी त्यांनी त्याग केला म्हणूनच विधान परिषदेला आमचा नंबर लागला असावा उदार मनाचे असे दिलदार व्यक्तिमत्व सुजय विखे यांचे देखील आभार मी या निमित्ताने मानतो अशा शब्दात विधानपरिषदेचे आमदार विवेक कोल्हे यांनी माजी खासदार सुजय विखे पाटील यांचे आभार मानले.

अहिल्यानगर शहरातील सहकार सभागृह येथे नवनिर्वाचित आमदारांचा सत्कार कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. दरम्यान कार्यक्रमाला पोहोचण्यासाठी कोल्हे यांना विलंब झाला यावेळी त्यांनी नगर मनमाडच्या रस्त्यावरून केलेल्या वक्तव्यानंतर एकच सभागृहात अशा पिकला.

यावेळी बोलताना विधान परिषदेचे आमदार विवेक कोल्हे म्हणाले, पंतप्रधान मोदी व गृहमंत्री अमित शहा यांच्या सहकार्यामुळेच मला विधानपरिषदेवरती संधी मिळाली. आज जिल्ह्याला 19 आमदार मिळाले असल्याने आता जनतेच्या अपेक्षा देखील वाढलेले आहेत. आज आजूबाजूक जवळ पुणे, नाशिक आणि संभाजीनगर हे जिल्हे विकसित झाले आहे. आज भौगोलिक दृष्ट्या मोठा असलेल्या आईला नगर जिल्ह्याला देखील आपल्याला विकासाच्या दिशेने घेऊन जायचं आहे असं कोल्हे म्हणाले.

आमचे सहकारी जिल्ह्याचे माजी खासदार सुजय विखे कार्यक्रमाला नाही आहे मात्र मी माध्यमांमध्ये ऐकले की त्यांनी त्याग केला म्हणूनच विधान परिषदेला आमचा नंबर लागला असावा उदार असे दिलदार व्यक्तिमत्व सुजय विखे यांचे देखील आभार मी या निमित्ताने मानतो असे यावेळी कोल्हे म्हणाले.

लोकशाहीमध्ये प्रत्येक पद त्यामध्ये ग्रामपंचायत सदस्य पद असेल अगदी पंतप्रधान पद असेल हे प्रत्येक पद हे महत्त्वाचे आहे यामुळे प्रत्येकाने त्या पदाचा सन्मान हा केला पाहिजे ठेवला गेला पाहिजे कारण आपण ज्या पदासाठी उभे राहतो त्या पदाची दुसऱ्याला देखील आकांक्षा असते, अपेक्षा असते असे सूचक वक्तव्य कोल्हे यांनी केल्याने यांचा रोख नेमका कोणावर होता याचे देखील राजकीय वर्तुळात चर्चा रंगली आहे.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *