DNA मराठी

Parvez Ashrafi : बेलेश्वर मंदिरात विटंबना करणाऱ्या आरोपीचा धर्म न बघता गुन्हा दाखल करा; MIM ची मागणी

parvez ashrafi

Parvez Ashrafi : बेलेश्वर मंदिरात विटंबना करणाऱ्या आरोपीचा धर्म न बघता गुन्हा दाखल करण्यात यावा अशी मागणी एमआयएमचे जिल्हाध्यक्ष परवेझ अशरफी यांनी केली आहे.

त्यांनी दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, भिंगार येथे जातांना बेलेश्वर मंदिर येथे अनेक भाविक दररोज पूजा अर्चना आणि दर्शनासाठी येत असतात. ८ जुन २०२६ रोजी एक तरुण बूट घालून मंदिरात घुसतो आणि महादेवाच्या पिंडावर स्वतःचा बुटा सहीत पाय ठेवतो.

साहेब सदर घटना हि खूप निंदणीय असून समस्त भारतीय समाजा तर्फे आम्ही या घटनेचा जाहीर निषेध करत आहे. सदर घटनेत जो आरोपी पकडण्यात आला आहे आपण त्याच्यावर जात किंवा त्याचा धर्म न पाहता गुन्हा दाखल करून त्याची सखोल चौकशी करून कारवाई करावी आणि सर्व हकीकत जनते समोर आणावी असे निवेदन एम आय एम तर्फे जिल्हा पोलिस अधिक्षक यांना देण्यात आले आहे.

एमआयएम तर्फे शहरात मागील काही दिवसात घडलेल्या घटना, मुस्लिम समाजा विरोधात करण्यात येणारे षडयंत्र असल्याचे एमआयएम जिल्हा अध्यक्ष डॉ परवेज अशरफी यांनी सांगितले.

डॉ परवेज अशरफी पुढे म्हणाले की देशात काही दंगलखोर संघटन सातत्याने मुस्लिम समाजाला बदनाम करण्याचे हेतूने बुरखा घालून काही कृत्य करतांना पोलिसांनी पकडले आहे. अहमदनगर मध्ये देखील मागील काही दिवसापासून मुस्लीम समाजाला बदनाम करण्याच्या हेतूंनी घटना घडवण्यात आले आहे. गंगा उद्यानात बुरखा परिधान करून नमाज पठन करने आणि आता बेलेश्वर मंदिरात महादेवाची विटंबना करने हे सर्व प्रकार कुठेतरी एक मेकांशी जुडले असल्याची शंका व्यक्त करण्यात येत आहे. काही जातीवादी दंगलखोर संघटना नगर शहर आणि जिल्ह्याचा वातावरण खराब करून शांतता भंग करण्याच्या उद्देशाने कट रचत असल्याची चिंता व्यक्त करण्यात आली आहे.

काही संघटना विटंबना ही मुस्लीम समाजाच्या लोकांनी केली असल्याचे चित्र तयार करत आहे. पोलिसांनी आरोपीचा नाव आणि त्याची जात धर्म जनते समोर आणावी जेणेकरून अशा घाणेरडा कृत्य करणारयाचा मुस्लिम समाजाशी काही संबंध नाही. ज्या मुळे मुस्लीम समाजाची होणारी बदनामी थांबेल.

पोलिसांनी पकडलेल्या आरोपी मागचा सूत्रधार शोधणे शहरत आणि जिल्ह्यात शांतते साठी खूप गरजेचे आहे. पोलिसांनी या तिन्ही घटनेची सखोल चौकशी केल्यास केलेल्या तक्रारीत तथ्य असल्याचे निदर्शनास येईल असे निवेदनात नमूद करण्यात आले आहे.

बेलेश्वर मंदिर घटनेत अद्याप कोणताही गुन्हा नोंदवण्यात आलेले नसल्याने गुन्हा दाखल न करण्याचे कारण अद्याप समोर आले नाही. पोलिस प्रशासन या घटनेकडे कसे बघतात व वागतात याकडे जनतेचे लक्ष लागले असल्याचे निवेदनात नमूद करण्यात आले आहे.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *