Nilesh Lanke: खासदार निलेश लंके चर्चेत; भोंदूबाबा नानासाहेब विरकरचा आशीर्वाद घेतानाचे फोटो व्हायरल

oplus 131072

Nilesh Lanke: नाशिक जिल्ह्यात खरात प्रकरण अजूनही ताजेच असताना, सोलापूर जिल्ह्यातील माढा तालुक्यातून रविवारी एक धक्कादायक घटना समोर आली. माढा तालुक्यातील आहेगाव येथे दरबार भरवणारा कथित भोंदूबाबा नानासाहेब विरकर उर्फ गुरु माऊली महाराज आणि त्याच्या भावाला पोलिसांनी अटक केली आहे. भोंदूगिरी, फसवणूक आणि आर्थिक लुबाडणुकीसह विविध कलमांखाली गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. तर दुसरीकडे भोंदूबाबा नानासाहेब विरकर आणि अहिल्यानगरचे खासदार निलेश लंके यांचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

गुरु माऊली महाराज हा आहेगाव येथील स्वतःच्या पाच एकर जागेत एसी दरबार भरवत होता. दरबारात आलेल्या भक्तांनी फक्त नाव सांगितल्यानंतर त्यांच्या बँक खात्याचा क्रमांक आणि खात्यातील शिल्लक रक्कम अचूक सांगत असल्याचा दावा केला जात होता. त्यामुळे अनेक भाविक त्याच्याकडे आकर्षित होत होते.दरम्यान, खासदार निलेश लंके आणि त्यांच्या पत्नी राणी लंके यांचे या गुरुमाऊलीसोबतचे काही जुने फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत. विशेषतः या भोंदू बाबाचा आशीर्वाद घेताना निलेश लंके दिसत आहे.

राणी लंके जिल्हा परिषद सदस्य असताना गुरुमाऊली भक्त परिवाराने त्यांना वाढदिवसानिमित्त शुभेच्छा दिल्याचा फोटो देखील समोर आला आहे. तसेच एका फोटोमध्ये खासदार निलेश लंके यांनी गुरुमाऊलीला शाल घालून सन्मान केल्याचे दिसत आहे.

खासदार निलेश लंके यांच्या सोशल मीडियावरील एका पोस्टमध्ये “करेक्ट नियोजन, परफेक्ट कार्यक्रम” अशी कॅप्शन देत गुरुमाऊलीचा आशीर्वाद मिळाल्याचा उल्लेख करण्यात आला होता. त्यामुळे आता या फोटो आणि पोस्टवरून विविध राजकीय चर्चांना उधाण आले आहे.

स्थानिक स्तरावर गुरुमाऊलीबाबत अनेक दावे केले जात होते. बंगालमध्ये सात-आठ वर्षे राहून त्याने “काळी विद्या” शिकल्याची चर्चा होती. तसेच तो स्वतःला हनुमानाचा अवतार असल्याचे सांगत असल्याचाही दावा केला जात आहे.राजकारणात विजय मिळवून देण्याची क्षमता असल्याचे तो सांगत असल्याने, 2024 च्या लोकसभा निवडणुकीदरम्यान त्याचा काही प्रभाव होता का, अशा चर्चाही आता सुरू झाल्या आहेत. मात्र, या सर्व दाव्यांना अद्याप कोणतीही अधिकृत पुष्टी मिळालेली नाही.

पोलिस तपासानंतरच सत्य स्पष्ट होणार सध्या पोलिस या संपूर्ण प्रकरणाचा तपास करत असून, आर्थिक फसवणूक आणि भोंदूगिरीच्या आरोपांची चौकशी सुरू आहे.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *


Fatal error: Uncaught Error: Class "Elementor\Plugin" not found in /home/u374334301/domains/dnamarathi.com/public_html/wp-content/plugins/essential-addons-for-elementor-lite/includes/Traits/Elements.php:454 Stack trace: #0 /home/u374334301/domains/dnamarathi.com/public_html/wp-includes/class-wp-hook.php(324): Essential_Addons_Elementor\Classes\Bootstrap->render_global_html() #1 /home/u374334301/domains/dnamarathi.com/public_html/wp-includes/class-wp-hook.php(348): WP_Hook->apply_filters() #2 /home/u374334301/domains/dnamarathi.com/public_html/wp-includes/plugin.php(517): WP_Hook->do_action() #3 /home/u374334301/domains/dnamarathi.com/public_html/wp-includes/general-template.php(3208): do_action() #4 /home/u374334301/domains/dnamarathi.com/public_html/wp-content/themes/astra/footer.php(33): wp_footer() #5 /home/u374334301/domains/dnamarathi.com/public_html/wp-includes/template.php(810): require_once('/home/u37433430...') #6 /home/u374334301/domains/dnamarathi.com/public_html/wp-includes/template.php(745): load_template() #7 /home/u374334301/domains/dnamarathi.com/public_html/wp-includes/general-template.php(92): locate_template() #8 /home/u374334301/domains/dnamarathi.com/public_html/wp-content/themes/astra/single.php(39): get_footer() #9 /home/u374334301/domains/dnamarathi.com/public_html/wp-includes/template-loader.php(113): include('/home/u37433430...') #10 /home/u374334301/domains/dnamarathi.com/public_html/wp-blog-header.php(19): require_once('/home/u37433430...') #11 /home/u374334301/domains/dnamarathi.com/public_html/index.php(17): require('/home/u37433430...') #12 {main} thrown in /home/u374334301/domains/dnamarathi.com/public_html/wp-content/plugins/essential-addons-for-elementor-lite/includes/Traits/Elements.php on line 454