BSNL Recharge: जर तुम्ही देखील स्वस्त रिचार्ज प्लान शोधत असाल तर तुमच्यासाठी बीएसएनएलने जबरदस्त प्लॅन लॉन्च केला आहे. या नवीन रिचार्ज प्लॅन अंतर्गत तुम्हाला तब्बल 300 दिवसांच्या सिम वैधतेची ऑफर मिळणार आहे.
या प्लॅनची खास गोष्ट म्हणजे यात डेटा, फ्री कॉल्स आणि एसएमएसचाही समावेश आहे.
BSNL ने 797 रुपयांचा प्रीपेड रिचार्ज प्लॅन लॉन्च केला आहे जो 300 दिवसांची सिम वैधता देतो. म्हणजेच ग्राहकांना दिवसाला केवळ तीन रुपये खर्च करावे लागणार आहेत. या प्लॅनमध्ये पहिल्या 60 दिवसांसाठी मोफत नॅशनल रोमिंग, दररोज 2GB डेटा आणि 100 SMS मिळतात. 60 दिवसांनंतर, इनकमिंग कॉल सुरू राहतील परंतु डेटा, कॉल आणि एसएमएस मिळविण्यासाठी टॉप-अप करावे लागेल.
BSNL चा दुय्यम सिम वापरणाऱ्यांसाठी ही योजना अतिशय फायदेशीर आहे. पहिल्या दोन महिन्यांसाठी मोफत डेटा, कॉल आणि एसएमएसचा लाभ घेऊन ते याचा जास्तीत जास्त फायदा घेऊ शकतात. मोफत सेवा 60 दिवसांनंतर बंद होत असली तरी सिम 240 दिवस ॲक्टिव्ह राहण्याची हमी बीएसएनएलच्या ग्राहकांसाठी दिलासा देणारी आहे.
खासगी दूरसंचार कंपन्यांनी किमती वाढवल्यानंतर बीएसएनएल आकर्षक प्लॅनसह ग्राहकांना आकर्षित करण्याचा प्रयत्न करत आहे. कमी किमतीत उत्तम सेवा देण्यावर बीएसएनएलचा भर आहे. या रणनीती अंतर्गत, BSNL आपले 4G नेटवर्क देखील वाढवत आहे. अनेक दूरसंचार मंडळांमध्ये 4G सेवा सुरू झाल्या आहेत आणि BSNL ने दूरसंचार मंत्रालयाच्या सहकार्याने 5G चाचण्याही सुरू केल्या आहेत.