DNA मराठी

बदनापूर कॅनरा बँकेत 7 कोटींचा घोटाळा; बँक अधिकारीच सोन्याची चोरी करताना CCTV त कैद

canera bank

Jalna Crime : जालना जिल्ह्यातील बदनापूर येथील कॅनरा बँकेत तब्बल ७ कोटी ३१ लाख रुपयांचा अपहार झाल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. या प्रकरणात बँकेतील अधिकारीच सोन्याच्या दागिन्यांची चोरी करताना सीसीटीव्ही फुटेजमध्ये स्पष्टपणे दिसून आल्याने खळबळ उडाली आहे.स्ट्राँग रूममधील तिजोरीतून सोन्याचे दागिने काढतानाचा प्रकार कॅमेऱ्यात कैद झाला असून, आरोपींनी बनावट सोने तारण ठेवून आणि मूळ सोने लंपास करून हा घोटाळा केल्याचे समोर आले आहे.

या प्रकरणी तिघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून दोघांना अटक करण्यात आली आहे.

बदनापूर येथील कॅनरा बँकेत घडलेल्या या प्रकाराने बँकिंग क्षेत्रात खळबळ उडाली आहे. सीसीटीव्ही फुटेजमध्ये बँकेतील अधिकारी स्ट्राँग रूममध्ये प्रवेश करून सोन्याचे दागिने काढताना दिसत आहेत.प्राथमिक तपासानुसार, बनावट सोने तारण ठेवून आणि प्रत्यक्ष सोने गायब करून हा मोठा आर्थिक अपहार करण्यात आल्याचे समोर आले आहे. तब्बल ७ कोटी ३१ लाख रुपयांचा हा घोटाळा असल्याचे पोलिसांनी स्पष्ट केले आहे.

बदनापूर पोलिसांनी गुन्हा दाखल करून पुढील तपास सुरू केला असल्याची माहिती पोलीस निरीक्षक मच्छिंद्र सुरवसे यांनी दिली आहे.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *