DNA मराठी

Nilesh Lanke News

nilesh lanke

Nilesh Lanke: नाशिक–अहिल्यानगर–सोलापूर महामार्गास मंजुरी; निलेश लंकेंच्या प्रयत्नांना यश

Nilesh Lanke: केंद्रीय मंत्रिमंडळाने नाशिक–अहिल्यानगर–सोलापूर–अक्कलकोट या ६ पदरी, प्रवेश-नियंत्रित (ॲक्सेस कंट्रोल्ड) ग्रीनफिल्ड महामार्ग प्रकल्पास मंजुरी दिली असून, हा निर्णय अहिल्यानगर जिल्ह्याच्या विकासाच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाचा आणि दूरगामी परिणाम करणारा ठरणार आहे. या प्रकल्पामुळे जिल्ह्याचा समावेश राष्ट्रीय दर्जाच्या द्रुतगती महामार्ग जाळ्यात होणार असून, दळणवळणाच्या दृष्टीने अहिल्यानगरला नवे महत्त्व प्राप्त होणार असल्याची माहिती खासदार नीलेश लंके यांनी दिली. या महामार्गाची एकूण लांबी सुमारे ३७४ किलोमीटर असून, सुमारे १९ हजार १४२ कोटींची गुंतवणूक या प्रकल्पासाठी करण्यात येणार आहे. ‘पीएम गतीशक्ती’ राष्ट्रीय मास्टर प्लॅनअंतर्गत विकसित होणारा हा महामार्ग पश्चिम किनारपट्टीपासून दक्षिण भारतापर्यंतचा एक महत्त्वाचा दळणवळण दुवा ठरणार आहे. परिणामी राज्यातील आणि देशातील प्रमुख आर्थिक केंद्रांशी अहिल्यानगरचा संपर्क अधिक वेगवान व सुलभ होणार आहे. महामार्गामुळे प्रवासाच्या वेळेत सुमारे ४५ टक्के घट होण्याची शक्यता असून, त्याचा थेट लाभ व्यापार, शेती आणि उद्योग क्षेत्राला मिळणार आहे. शेतमाल, दुग्धव्यवसाय तसेच कृषीपूरक उद्योगांच्या वाहतुकीवरील खर्चात लक्षणीय बचत होणार असून, सूक्ष्म, लघु व मध्यम उद्योगांसाठी (एमएसएमई) लॉजिस्टिक्स अधिक सक्षम होणार आहे. यासोबतच औद्योगिक, गोदाम, प्रक्रिया उद्योग आणि सेवा क्षेत्रात नव्या गुंतवणुकीस चालना मिळणार असल्याचे अपेक्षित आहे. या प्रकल्पामुळे अहिल्यानगर जिल्ह्यातील युवकांसाठी थेट व अप्रत्यक्ष स्वरूपात मोठ्या प्रमाणावर रोजगाराच्या संधी निर्माण होणार आहेत. सुधारित दळणवळण व्यवस्था आणि वाढणारी औद्योगिक गुंतवणूक यामुळे जिल्ह्याचा आर्थिक पाया अधिक भक्कम होणार असून, अहिल्यानगर केवळ भौगोलिकदृष्ट्या नव्हे तर आर्थिक व औद्योगिकदृष्ट्याही केंद्रस्थानी येणार आहे. या निर्णयाचे स्वागत करताना खासदार निलेश लंके यांनी सांगितले की, अहिल्यानगर जिल्ह्याच्या सर्वांगीण विकासासाठी हा महामार्ग अत्यंत निर्णायक ठरणार आहे. दळणवळण, व्यापार, शेती, उद्योग आणि रोजगार या सर्वच क्षेत्रांना या प्रकल्पामुळे नवी दिशा मिळेल. केंद्र सरकारने अहिल्यानगरच्या विकास क्षमतेवर दाखवलेला विश्वास महत्त्वाचा असून, या महामार्गाचा जिल्ह्याला जास्तीत जास्त लाभ मिळावा यासाठी केंद्र व राज्य पातळीवर सातत्याने पाठपुरावा केला जाईल, अशी ग्वाही त्यांनी दिली. नाशिक–अहिल्यानगर–सोलापूर ६ पदरी महामार्ग हा अहिल्यानगरच्या भविष्यकालीन विकासाचा कणा ठरणार असून, जिल्ह्याला विकासाच्या नव्या युगात नेणारा हा ऐतिहासिक निर्णय असल्याची भावना व्यक्त होत आहे.

Nilesh Lanke: नाशिक–अहिल्यानगर–सोलापूर महामार्गास मंजुरी; निलेश लंकेंच्या प्रयत्नांना यश Read More »

nilesh lanke

Nilesh Lanke : पावसामुळे झालेल्या नुकसानीचे पंचनामे करून भरपाई द्या ; खासदार नीलेश लंके यांचे जिल्हाधिकाऱ्यांना पत्र

Nilesh Lanke : अहिल्यानगर जिल्ह्यात गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेल्या सलग आणि अतिवृष्टीसमान पावसामुळे शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. या पार्श्वभूमीवर खासदार नीलेश लंके यांनी जिल्हाधिकाऱ्यांना पत्र लिहून तातडीने पंचनामे करून शेतकऱ्यांना नुकसान भरपाई मिळावी अशी मागणी केली आहे. खा. लंके यांनी पत्रात नमुद केले आहे की, तूर कपाशी, सोयाबीन, मका, वाटाणा यांसह खरिपातील इतर पिके पावसामुळे पाण्याखाली गेली आहेत. काही भागांत दुष्काळसदृश परिस्थितीत पिके खुंटलेली असतानाच अचानक झालेल्या पावसाने शेतकऱ्यांच्या आशा पाण्यात गेल्या. विशेषतः शेवगांव तालुक्यातील खामगांव, हिंगणगांव, गुंफा, जोहरापूर, भातकुडगांव तसेच राहुरी, नगर, पारनेर, श्रीगोंदा, कर्जत, जामखेड व पाथर्डी तालुक्यातील अनेक गावांतील शेतकऱ्यांचे नुकसान झाल्याच्या तक्रारी असल्याचे खा. लंके यांनी जिल्हाधिकाऱ्यांच्या निदर्शनास आणून दिले. खा. लंके यांनी या पत्रात नमुद केले आहे की, शेतकऱ्यांनी मोठ्या खर्चाने खते व औषधे टाकून पिके उभी केली होती. मात्र, अतिवृष्टीमुळे कपाशी पिवळी पडली, सोयाबीनची फुले गळून पडली तर तूर व वाटाणा पूर्णपणे उध्वस्त झाले आहेत. यामुळे शेतकरी हवालदिल झाले असून या नुकसानीचे पंचनामे न झाल्याने शेतकरी रोष व्यक्त करत आहेत. तातडीने पंचनामे करा जिल्हाधिकाऱ्यांना दिलेल्या पत्रात खा. लंके यांनी स्पष्ट केले आहे की, महसूल व कृषी विभागाने तातडीने नुकसानग्रस्त भागात जाऊन पंचनामे करावेत व शासनस्तरावरून शेतकऱ्यांना त्वरीत नुकसानभरपाई मिळावी. शेतकऱ्यांच्या तोंडाशी आलेला घास हिरावला गेला आहे, त्यामुळे तात्काळ दिलासा मिळणे गरजेचे आहे असे त्यांनी नमूद केले आहे.

Nilesh Lanke : पावसामुळे झालेल्या नुकसानीचे पंचनामे करून भरपाई द्या ; खासदार नीलेश लंके यांचे जिल्हाधिकाऱ्यांना पत्र Read More »

भिक्षेकरू मृत्यू प्रकरणामध्ये आरोप-प्रत्यारोप सुरू; सुजय विखेंचा लंकेंना प्रत्युत्तर

Maharashtra Politics: अहिल्यानगर येथील शासकीय रुग्णालयात उपचारादरम्यान चार भिक्षेकरूंचा मृत्यू झाल्याच्या घटनेने मोठा राजकीय वाद निर्माण केला आहे. या प्रकरणावरून सत्ताधारी व विरोधकांमध्ये आरोप-प्रत्यारोप सुरू झाले आहेत. खासदार निलेश लंके यांनी या मृत्यूंना ‘बालहट्ट’ जबाबदार असल्याचा गंभीर आरोप केला. त्यांच्या मते, काही जणांच्या हट्टापायी या भिक्षेकरूंना आपला जीव गमवावा लागला. मात्र, त्यांच्या या वक्तव्यावर माजी खासदार डॉ. सुजय विखे यांनी जोरदार प्रत्युत्तर दिलं आहे. सुजय विखे म्हणाले, “जर खासदार लंके यांना माझ्याविषयी राग असेल, तर त्यांनी सरळ कोर्टात जावं आणि माझ्यावर गुन्हा दाखल करावा. मला त्याबद्दल काहीही हरकत नाही. जे काही झाले, ते सर्व न्यायालयाच्या आदेशानुसारच झाले आहे.” तसेच, त्यांनी पुढे स्पष्ट केलं की, “समाज आणि महिलांचे संरक्षण करणे हे माझं कर्तव्य आहे आणि मी शेवटच्या श्वासापर्यंत ते करत राहीन. मात्र, या गोष्टीचा सध्याच्या खासदारांशी कधीच संबंध आलेला नाही, त्यामुळे त्यांच्या कडून कुठलीही अपेक्षा नाही.” या संपूर्ण प्रकरणामुळे राजकीय वातावरण तापलं असून, मृत्यू झालेल्या भिक्षेकरूंना न्याय मिळावा आणि भविष्यात अशी घटना पुन्हा घडू नये, यासाठी योग्य चौकशी व्हावी, अशी मागणी नागरिकांतून केली जात आहे.

भिक्षेकरू मृत्यू प्रकरणामध्ये आरोप-प्रत्यारोप सुरू; सुजय विखेंचा लंकेंना प्रत्युत्तर Read More »

एका युवा नेत्यांच्या हट्टापायी 4 भिक्षुकांचा बळी गेला…, खासदार लंकेंचा नामौल्लेख टाळत विखेंना टोला

Nilesh Lanke : शिर्डी येथे भिक्षा मागून जगणाऱ्या 49 भिक्षुकांना शिर्डी पोलिसांनी ताब्यात घेऊन त्यांना विसापूर कारागृहात पाठवले त्यातील 10 भिक्षुकांना उपचारासाठी जिल्हा रुग्णालयात पाठवण्यात आले होते, त्यातील 2 दिवसात 4 भिक्षुकांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला, हे मृत्यू नसून हत्या आहे असा आरोप खासदार निलेश लंके यांनी केला. खासदार लंकेंनी उपचार घेत असलेल्या भिक्षुकांची जिल्हा रुग्णालयात भेट घेत त्यांची तब्बेतीची विचारपूस केली, त्याचबरोबर प्रशासनाच्या भोंगळ कारभारावर प्रश्न उपस्थित केले, या 10 भिक्षुकांपैकी 3 जण रुग्णालयातून पळून गेले, या वेळी पोलीस आणि रुग्णालय प्रशासन काय करत होते, 10 भिक्षुकांना रुग्णालयात आणल गेल त्यांना कारागृहात डांबून ठेवण्यात आले होते का ? असा प्रश्न देखील उपस्थित केला, तसेच मयत झालेल्या भिक्षुकांची इन कैमरा संभाजीनगर येथील घाटी रुग्णालयात पोस्टमार्टम करून चौकशी करावी अशी मागणी या वेळी केली. नाव न घेता माजी खासदार सुजय विखेंवर निशाणा खासदार लंके म्हणाले एका युवा नेत्याच्या मागणीमुळे कधी नव्हे ती भिक्षुकांवर कारवाई करून त्यांना कारागृहात डांबण्यात आले, ही प्रशासनाची चूक आहे. याची जबाबदारी कोण घेणार असा सवाल यावेळी खासदार लंकेंनी उपस्थित केला.

एका युवा नेत्यांच्या हट्टापायी 4 भिक्षुकांचा बळी गेला…, खासदार लंकेंचा नामौल्लेख टाळत विखेंना टोला Read More »

Nilesh Lanke: अजित पवार गटात प्रवेश करणार? खासदर लंकेंनी स्पष्ट सांगितलं

Nilesh Lanke: राज्यात पुन्हा एकदा राजकीय भूकंप होणार आणि राष्ट्रवादी काँग्रेस शरदचद्र पवार पक्षाचे खासदार अजित पवार गटात प्रवेश करणार असल्याची चर्चा गेल्या काही दिवसांपासून राजकीय वर्तुळात जोराने सुरू आहे. खासदार सुनील तटकरे यांनी खासदारांना संपर्क केला असल्याचा दावा करण्यात येत आहे. तर आता खासदार निलेश लंके यांनी देखील या प्रकरणात प्रतिक्रिया देत आपली भूमिका स्पष्ट केली आहे. माध्यमांशी बोलताना खासदार निलेश लंके म्हणाले की, पक्ष प्रवेशबद्दल चर्चा खोटी आहे. मी किंवा माझ्याबरोबर असलेल्या खासदारासोबत अशी चर्चा झाली नाही.आम्ही सर्वजण संसदेमध्ये आदरणीय सुप्रिया ताई सोबत काम करत आहोत. चर्चा फक्त माध्यमांमध्ये होत आहे. बीड प्रकरण डायव्हर्ट करण्यासाठी ही चर्चा असू शकते. असं निलेश लंके म्हणाले. तसेच आमचे खासदार संपर्क कोणाशी करणार नाही असं देखील ते म्हणाले. तर विधानसभेला पक्षाला जे अपयश आलं त्याबद्दल वेगवेगळे तर्कवितर्क काढले जात आहेत आणि कार्यकर्त्यांमध्ये असलेली अस्वस्थता व पक्ष संघटना कशी मजबूत करायची यावर बैठकीत चर्चा झाल्याची माहिती त्यांनी यावेळी दिली. तसेच पक्ष संघटनेतच्या नेतृत्वात बदल किंवा खांदेपालट असे संकेत दिले गेले नाहीत. सर्वांना सोबत घेऊन घराघरात पक्ष संघटनेचे पोहोचवण्याचा काम करण्याबद्दल मार्गदर्शन करण्यात आले असल्याचीही माहिती त्यांनी दिली. तर दुसरीकडे संतोष देशमुख प्रकरणात कठोर कारवाई करण्याची मागणीही यावेळी त्यांनी केली. जर मुंडेंचा तो जवळचा कार्यकर्ता आहे. नैतिकता म्हणून त्यांनी आपली भूमिका अधिकृत केली पाहिजे. असं खासदार लंके म्हणाले. याच बरोबर महाविकास आघाडीच्या माध्यमातून जिल्हा परिषद, पंचायत समिती, नगरपालिका, महानगरपालिका एकत्र लढवण्याचा प्रयत्न केला जाईल. अशी देखील माहिती त्यांनी दिली.

Nilesh Lanke: अजित पवार गटात प्रवेश करणार? खासदर लंकेंनी स्पष्ट सांगितलं Read More »

Nilesh Lanke: बीडची घटना होऊन इतके दिवस झाले तरी… खासदार लंकेंची सरकारवर टीका

Nilesh Lanke: बीडची घटना होऊन इतके दिवस झाले तरी सरकारने ठोस पाऊल उचलेली नाही. अशी टीका माध्यमांशी बोलताना खासदार निलेश लंके यांनी राज्य सरकारवर केली आहे. माध्यमांशी बोलताना खासदार निलेश लंके म्हणाले की,बीडमध्ये जी घटना घडली ती अतिशय दुर्दैवी आहे. मी संसदेमध्ये सुद्धा प्रश्न आण्याचा प्रयत्न केला.आज स्वतः शरद पवार त्यांना भेटायला जाणार आहे. आरोपीचा प्रत्यक्ष रित्या सबंध आहे. त्यांच्यावर कारवाई झाली पाहिजे. घटना होऊन इतके दिवस झाले तरी सरकारने ठोस पाऊल उचलेल नाही. अतिशय दुर्दैवी घटना घडलेली आहे. अशी प्रतिक्रया खासदार लंके यांनी केली. तसेच याला राजकीय रंग ना देता ज्याचा प्रत्यक्ष सबंध आहे त्यांच्यावर करवाई झाली पाहिजे आणि प्रत्येकाची हीच मागणी आहे. अशी मागणी देखील त्यांनी केली. राष्ट्रवादी एक की दोन?आमचे नेते जी भूमिका घेतील ती आमची भूमिका असेलसुप्रिया सुळे ज्यांच्या बाजूने असतील त्यांच्या बाजूने आम्ही असू. निवडणुकीत ज्या गोष्टी झाल्या त्या तेव्हा सोडून द्यायच्या असतात. असं देखील ते म्हणाले. धडाडीचे नेते आहेत भुजबळतर राज्य सरकारमध्ये छगन भुजबळ यांना स्थान मिळाला पाहिजे होता असं देखील ते म्हणाले. धडाडीचे नेते आहेत भुजबळ. त्यांना योग्य ती संधी मिळाली पाहिजे होती. भुजबळ यांना चांगल खात मिळायला पाहिजे होत. ते एक ताकदीचे नेते आहेत. स्पष्ट वक्ता आहेत भुजबळ जे पोटात ते ओठात. असेही निलेश लंके म्हणाले. तसेच भुजबळ आमच्या पक्षात आलेच तर स्वागत आहे. अशी प्रतिक्रिया माध्यमांशी बोलताना खासदार निलेश लंके यांनी दिली.

Nilesh Lanke: बीडची घटना होऊन इतके दिवस झाले तरी… खासदार लंकेंची सरकारवर टीका Read More »

Ahmednagar News: पारनेरमधील जनता निलेश लंकेवर नाराज : राहुल शिंदे

Ahmednagar News: महाविकास आघाडीचे उमेदवार निलेश लंके यांनी आमदार असताना तालुक्याच्या कुठल्याही प्रश्नांची सोडवणूक केली नाही. केवळ दहशतीला खतपाणी घालण्याचे काम त्यांनी आपल्या बगल बच्च्यांमार्फत केले. यामुळे मतदार संघातील जनता त्यांना कोणताही थारा देणार नाही असा घणाघात पारनेरचे भाजप तालुका अध्यक्ष राहुल शिंदे यांनी केला. त्यात त्यांनी केवळ उमेदवारीसाठी अजित पवारांशी केलेल्या गद्दारीमुळे निष्ठावंत कार्यकर्ते नाराज आहेत असेही शिंदे म्हणाले.  लंके आपल्या आमदारकीच्या काळात केवळ आश्वासने दिली. प्रशासनाला वेठीस धरून केवळ आपल्या आसपासच्या लोकांचा त्यांनी उद्धार केला. कोणतीही ठोस कामे त्यांनी केली नसल्याने मतदारांचा कौल महायुतीच्या उमेदवाराकडे असल्याचे राहूल शिंदे यांनी सांगितले.    पारनेरचे आमदार निलेश लंके हे कोविड काळात केलेल्या नौटंकीचा पर्दाफाश आता झाला आहे. सरकारचे अनुदान घेऊन कोवीड सेंटरच्या माध्यमातून श्रेय लाटण्याचे काम त्यांनी केले. एकीकडे जनता कोविड संकटाने त्रस्त झाली असताना लंके मात्र या संकटातून स्वताला प्रसिद्धी मिळविण्यात दंग होते. ही बाब अत्यंत दुर्दैवी आहे. ही बाब  मतदार संघातील जनतेला रुचलेली नाही.   त्या कोवीड रुग्णालयाचे सत्य माध्यमांनी समोर आल्याने लोकांच्या मनात लंके यांच्या विरोधात प्रचंड चिड निर्माण झाली आहे.  आधीच लोकांनी त्यांना लोकसभेच्या निवडणुकीत उतरू नये असे सांगत   असताना लंके यांनी केवळ लोकसभेच्या उमेदवारीसाठी अजितदादांची साथ सोडली सहा महिन्यात त्यांनी अजित पवारांशी गद्दारी केली. यामुळे मतदार संघातील लोकांचा विश्वास कसा संपादन करतील? असा सवाल त्यांनी उपस्थित केला.   तर दुसरीकडे महायुतीचे उमेदवार यांनी कोविड काळात आपल्या रुग्णालयात लोकांची मोफत सेवा केली. त्याचबरोबर जिल्हाभर आरोग्य शिबीरे राबऊन लोकांना सहकार्य केले. तसेच जिल्ह्यात ऑक्सिजन आणि रेमिडिअरचा तुटवडा असताना त्यांनी जिल्ह्यात शर्तीचे प्रयत्न करत हा पुरवठा कायम ठेवला. पण याची कुठेही प्रसिद्धी केली नाही. कोणता पुरस्कार मिळावा यासाठी आटापिटा केला नाही. या सर्व सेवाभावी कार्याची सहानभूती डॉ. सुजय विखे पाटील यांना निश्चित मिळेल असा विश्वास यांनी व्यक्त केला.

Ahmednagar News: पारनेरमधील जनता निलेश लंकेवर नाराज : राहुल शिंदे Read More »

Nilesh Lanke News : त्यांनी जाणीवपूर्वक जिल्हा भकास ठेवण्याचे काम केले, लंके यांचा विखे कुटुंबावर हल्ला बोल

Nilesh Lanke News : गेली पन्नास,साठ वर्षे आमच्याकडे जिल्ह्याची सत्ता असल्याचे ते आपल्या भाषणातून सांगतात.या काळात त्यांनी केलेले असे एक काम दाखवावे की जे पंचवीस वर्षे जनतेच्या लक्षात राहिले आहे.त्यांच्याकडे मंत्रीपदे होती, आहेत.पण एकही मोठा प्रकल्प त्यांनी जिल्ह्यात आणला नाही.त्यांनी जाणीवपूर्वक संपूर्ण नगर जिल्हा भकास ठेवण्याचे काम केले.असा हल्लाबोल आमदार नीलेश लंके यांनी नाव न घेता विखे पिता पुत्रावर केला.  स्वाभिमान जनसंवाद यात्रेच्या सहाव्या दिवशी राहुरी तालुक्यातील विविध गावांमध्ये नागरीकांशी संवाद साधताना ते बोलत होते. यावेळी आ. प्राजक्त तनपुरे, जि.प.चे मा. अध्यक्ष बाबासाहेब भिटे यांच्यासह विविध मान्यवर उपस्थित होते.  लंके म्हणाले, तुमच्या तालुक्याला खासदार धार्जिण नाही असे भाषणातून सांगण्यात येते. ज्यांनी तुम्हाला मदत केली नाही ते कृतघ्न असतील. परंतू नीलेश लंके हा माणूस असा आहे की एखाद्याने एकदा मदत केली तर मी त्याला आयुष्यभर विसरत नाही. त्याला शंभरवेळा मदत केल्याशिवाय मनाला चैन पडत नाही. आपल्या संकटात ज्यांनी मदत केली त्यांना मदत करण्याची भावना मनात असली पाहिजे.  विखेंना ज्यांनी मदत केली, त्यांनी त्यांच्याच पाठीत खंजीर खुपसला. नगर शहरात अनिलभैय्या राठोड यांनी त्यांना नगर शहर दाखविले. निवडणूकीनंतर त्यांच्या पाठीत खंजीर खुपसला, तुम्ही आम्ही कोण ?असा सवाल लंके यांनी  केला.    राजकारणात जिरवाजिरवी करण्यापेक्षा मी कामाला महत्व देणारा माणूस आहे.तुम्ही म्हणाल खरोखर माणूस भेटला आपल्याला. त्यांच्याकडे कामापेक्षा जिरवाजिरवीला जास्त महत्व असते. मागच्या निवडणूकीत त्यांनी मोठ मोठ्या गप्पा केल्या. सहा महिन्यानंतर प्राजक्त तनपुरे हे निवडणूकीला सामोरे जाणार आहेत. ते प्रचाराला गेल्यावर त्यांच्या कामाचा लेखाजोखा मांडून मते मागतील.  खासदारांनीही कामाचा लेखाजोखा मांंडणे अपेक्षीत असताना अपयश झाकून ठेवण्यासाठी डाळ आणि साखर वाटप करण्याची आयडीया त्यांनी शोधून काढल्याचे लंके म्हणाले.  नादी लावणारांना  घरी पाठविण्याची वेळ  पाण्याची बाटली २० रूपयांना मिळते. शेतकऱ्याचा जोड धंदा असलेल्या दुधाला २२,२३ रूपयांचा भाव मिळतो आहे. पालकमंत्री दुग्धविकास मंत्री आहेत ते दुधाला भाव का वाढून देत नाहीत ? ते म्हणाले, ५ रूपये अनुदान देऊ. कागद गोळा केले, शेतकऱ्यांना नादी लावले अनुदान मात्र मिळालेच नाही. हे लोक नादी लावणारे असून त्यांना आता घरी पाठविण्याची वेळ आली आहे.  रस्त्याचे काम सुरू करून दिले नाही तर नाव बदलेल नगर-पाथर्डी रस्त्यासाठी मी उपोषण केले ते उपोषणही मोडीत काढण्याचा प्रयत्न केला गेला. माझ्या उपोषणानंतर या रस्त्याचे काम मार्गी लागले. १३ तारीख होऊ द्या, नगर-मनमाड रस्त्याचे काम सुरू करून दिले नाही तर मी माझे नाव बदलून ठेवील. आभाळ फाटलंय, कोणतीच यंत्रणा शिवू शकणार नाही ! पूर्वी निवडणूकीच्या प्रचारासाठी एखादा नेता येणार असेल तर हातापाया पडून लोक जमा करावे लागत असत. इथे उलटे झाले आहे. दोन, दोन, तीन, तीन तास लोक वाट पाहत आहेत. जिल्हयात असे भासविले जाते की यंत्रणा, यंत्रणेचा याला फोन, त्याला फोन. कसली यंत्रणा ? यंत्रणा फिंत्रणा काही नाही ! आभाळ फाटल्यावर कोणीही रोखू शकत नाही. फाटलेले आभाळ शिवायला जगात कोणतीही यंत्रणा नाही असे लंके यांनी सांगितले.

Nilesh Lanke News : त्यांनी जाणीवपूर्वक जिल्हा भकास ठेवण्याचे काम केले, लंके यांचा विखे कुटुंबावर हल्ला बोल Read More »

Nilesh Lanke: होय, मी गुंडच आहे पण … लंके यांनी दिला विखेंना उत्तर

Nilesh Lanke: होय, मी गुंडच आहे कारण जेव्हा गोर-गरीबावरती अन्याय होतो आणि ज्या वेळेस दहशतीचे, दादागिरीचे वातावरण निर्माण केले जाते त्यावेळेस आम्ही गुंड होण्याचा देखील पवित्रा घेतो असे प्रतिपादन महाविकास आघाडीचे उमेदवार निलेश लंके यांनी केले.  अहमदनगर दक्षिण लोकसभा मतदारसंघांमध्ये महायुतीचे उमेदवार डॉ. सुजय विखे पाटील यांचे प्रतिस्पर्धी महाविकास आघाडीचे निलेश लंके यांच्या प्रचाराची रणधुमाळी उमेदवारी अर्ज भरण्याआधीच मोठ्या प्रमाणात चालू असून निलेश लंके यांनी मोहटा देवी गडावरून जनसंवाद यात्रेचा नारळ फोडून स्वाभिमानी जनसंवाद यात्रेचा शुभारंभ शरद पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्या हस्ते करून गावागावात जाऊन जनसामान्यांचे प्रश्न जाणून घेत आहेत.  महायुतीचे उमेदवार सुजय विखे पाटील यांनी नगर शहरामध्ये कार्यकर्ता मेळाव्यात लंके यांना एक आव्हान केले आहे.  निलेश लंके यांनी एक महिन्याभरात इंग्रजीत भाषण पाठ करून दाखवावे मी उमेदवारी अर्ज सुद्धा भरणार नाही अशा प्रकारचे वक्तव्य केल्याने आमदार निलेश लंके यांनी देखील त्यांना पत्रकार परिषदेत सडेतोड उत्तर दिले आहे.   संसदेत कुठल्या भाषेमध्ये प्रश्न मांडायचा यापेक्षा संसदेत तुम्ही किती प्रभावीपणे प्रश्न मांडू शकतात हे महत्त्वाचे असून चौका चौकात इंग्रजीत भाषण मी जर करत बसलो तर त्याचा फायदा काय आहे. सर्वसामान्यांना काम पाहिजे भाषण नाही असे निलेश लंके म्हणाले.

Nilesh Lanke: होय, मी गुंडच आहे पण … लंके यांनी दिला विखेंना उत्तर Read More »

Loksabha Election 2024 : निलेश लंके लोकसभेची तुतारी फुंकणार… तनपुरे यांनी सांगूनच टाकलं

Loksabha Election 2024: आगामी लोकसभा निवडणुकीमध्ये नगर दक्षिण लोकसभा जागेवर अजित पवार गटात असलेले आमदार निलेश लंके शरद पवार गटाकडून लोकसभा लढवणार का याबाबत तर्क वितर्क लावले जात असतानाच यावर आमदार प्राजक तनपुरे यांनी महत्त्वाचे विधान केले आहे.  अनेक लोक हातातील घड्याळ काढून तुतारी वाजविण्यास सज्ज असतील असा आम्हाला आशा आहे असा विश्वास यावेळी आमदार तनपुरे यांनी व्यक्त केला. निलेश लंके देखील लवकरच शरद पवार गटात येतं लोकसभा निवडणूक लढवतील असा विश्वास यावेळी आमदार प्राजक्त तनपुरे यांनी व्यक्त केला. यावेळी बोलताना आमदार तनपुरे म्हणाले की, लोकसभेसाठी माझं नाव चर्चेत नसून मी स्वतः लोकसभा लढवणार नाही मी विधानसभा लढवणार आहे असं तनपुरे यांनी स्पष्ट केलं तसेच पुढे बोलताना ते म्हणाले की, लंके यांनी घेतलेल्या महानाट्य मोठा जनप्रतिसाद मिळाला.  तसेच येणाऱ्या काळामध्ये अनेक लोक हातातली घड्याळ काढून तुतारी फंकण्यास सज्ज राहतील अशी आशा आम्हाला आहे.  लंकेचा पक्षप्रवेश होणार काय यावरती बोलताना ते म्हणाले की लंके का येणार नाही असे म्हणतच एक प्रकारे लंकेंचा लवकरच पक्ष प्रवेश होणार असं असं सुचक विधान यावेळी तनपुरे यांनी केलं.  महाविकास आघाडीकडून नगर दक्षिणेसाठी अगदी तोला मोलाचा उमेदवार दिला जाईल  याबाबत कुठलेही शंका नाही असं देखील यावेळी बोलताना प्राजक्ता तनपुरे यांनी स्पष्ट केले.

Loksabha Election 2024 : निलेश लंके लोकसभेची तुतारी फुंकणार… तनपुरे यांनी सांगूनच टाकलं Read More »