Dnamarathi.com

Loksabha Election 2024: आगामी लोकसभा निवडणुकीमध्ये नगर दक्षिण लोकसभा जागेवर अजित पवार गटात असलेले आमदार निलेश लंके शरद पवार गटाकडून लोकसभा लढवणार का याबाबत तर्क वितर्क लावले जात असतानाच यावर आमदार प्राजक तनपुरे यांनी महत्त्वाचे विधान केले आहे. 

अनेक लोक हातातील घड्याळ काढून तुतारी वाजविण्यास सज्ज असतील असा आम्हाला आशा आहे असा विश्वास यावेळी आमदार तनपुरे यांनी व्यक्त केला. निलेश लंके देखील लवकरच शरद पवार गटात येतं लोकसभा निवडणूक लढवतील असा विश्वास यावेळी आमदार प्राजक्त तनपुरे यांनी व्यक्त केला.

यावेळी बोलताना आमदार तनपुरे म्हणाले की, लोकसभेसाठी माझं नाव चर्चेत नसून मी स्वतः लोकसभा लढवणार नाही मी विधानसभा लढवणार आहे असं तनपुरे यांनी स्पष्ट केलं तसेच पुढे बोलताना ते म्हणाले की, लंके यांनी घेतलेल्या महानाट्य मोठा जनप्रतिसाद मिळाला.

 तसेच येणाऱ्या काळामध्ये अनेक लोक हातातली घड्याळ काढून तुतारी फंकण्यास सज्ज राहतील अशी आशा आम्हाला आहे.

 लंकेचा पक्षप्रवेश होणार काय यावरती बोलताना ते म्हणाले की लंके का येणार नाही असे म्हणतच एक प्रकारे लंकेंचा लवकरच पक्ष प्रवेश होणार असं असं सुचक विधान यावेळी तनपुरे यांनी केलं. 

महाविकास आघाडीकडून नगर दक्षिणेसाठी अगदी तोला मोलाचा उमेदवार दिला जाईल  याबाबत कुठलेही शंका नाही असं देखील यावेळी बोलताना प्राजक्ता तनपुरे यांनी स्पष्ट केले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *