Dnamarathi.com

Nilesh Lanke: राज्यात पुन्हा एकदा राजकीय भूकंप होणार आणि राष्ट्रवादी काँग्रेस शरदचद्र पवार पक्षाचे खासदार अजित पवार गटात प्रवेश करणार असल्याची चर्चा गेल्या काही दिवसांपासून राजकीय वर्तुळात जोराने सुरू आहे. खासदार सुनील तटकरे यांनी खासदारांना संपर्क केला असल्याचा दावा करण्यात येत आहे. तर आता खासदार निलेश लंके यांनी देखील या प्रकरणात प्रतिक्रिया देत आपली भूमिका स्पष्ट केली आहे.

माध्यमांशी बोलताना खासदार निलेश लंके म्हणाले की, पक्ष प्रवेशबद्दल चर्चा खोटी आहे. मी किंवा माझ्याबरोबर असलेल्या खासदारासोबत अशी चर्चा झाली नाही.आम्ही सर्वजण संसदेमध्ये आदरणीय सुप्रिया ताई सोबत काम करत आहोत. चर्चा फक्त माध्यमांमध्ये होत आहे. बीड प्रकरण डायव्हर्ट करण्यासाठी ही चर्चा असू शकते. असं निलेश लंके म्हणाले. तसेच आमचे खासदार संपर्क कोणाशी करणार नाही असं देखील ते म्हणाले.

तर विधानसभेला पक्षाला जे अपयश आलं त्याबद्दल वेगवेगळे तर्कवितर्क काढले जात आहेत आणि कार्यकर्त्यांमध्ये असलेली अस्वस्थता व पक्ष संघटना कशी मजबूत करायची यावर बैठकीत चर्चा झाल्याची माहिती त्यांनी यावेळी दिली. तसेच पक्ष संघटनेतच्या नेतृत्वात बदल किंवा खांदेपालट असे संकेत दिले गेले नाहीत. सर्वांना सोबत घेऊन घराघरात पक्ष संघटनेचे पोहोचवण्याचा काम करण्याबद्दल मार्गदर्शन करण्यात आले असल्याचीही माहिती त्यांनी दिली.

तर दुसरीकडे संतोष देशमुख प्रकरणात कठोर कारवाई करण्याची मागणीही यावेळी त्यांनी केली.

जर मुंडेंचा तो जवळचा कार्यकर्ता आहे. नैतिकता म्हणून त्यांनी आपली भूमिका अधिकृत केली पाहिजे. असं खासदार लंके म्हणाले. याच बरोबर महाविकास आघाडीच्या माध्यमातून जिल्हा परिषद, पंचायत समिती, नगरपालिका, महानगरपालिका एकत्र लढवण्याचा प्रयत्न केला जाईल. अशी देखील माहिती त्यांनी दिली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *