DNA मराठी

Maharashtra

Chhagan Bhujbal

Chhagan Bhujbal : ओबीसी प्रवर्गात आम्हाला दुसरी वाटेकरी नको, छगन भुजबळांकडून भूमिका स्पष्ट

Chhagan Bhujbal : जरांगे म्हणतात मराठा समाज मागास नाही पण सुप्रीम कोर्ट म्हणाले मराठा कुणबी एकच मानने सामाजिक मूर्खपणा आहे अशी टीका राज्याचे मंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते छगन भुजबळ यांनी मनोज जरांगे पाटील यांच्यावर केली आहे. राज्यात पुन्हा एकदा आरक्षणावरून वातावरण तापले असून मनोज जरांगे ओबीसीमधून आरक्षणाची मागणी करत आहे. तर दुसरीकडे मंत्री छगन भुजबळ यांनी पत्रकार परिषद घेत जरांगे पाटील यांच्यावर टीका करत मराठा समाजाला ओबीसीमधून आरक्षण नको अशी भूमिका घेतली आहे. पत्रकार परिषदेत छगन भुजबळ म्हणाले की, जरांगे म्हणतात मराठा समाज मागास नाही पण सुप्रीम कोर्ट म्हणाले मराठा कुणबी एकच मानने सामाजिक मूर्खपणा आहे. ओबीसी प्रवर्गात आम्हाला दुसरी वाटेकरी नको. 50% च्या आतील आरक्षण सामाजिक दृष्ट्या मागास वर्गासाठी आहे. ओबीसीतून आरक्षण देणे कोणत्याही मुख्यमंत्र्यांच्या हाती नाही. असं म्हणत जर आमच्यावर अन्याय झाल्यास लाखोंच्या संख्येने मुंबईत येणार असा इशारा देखील त्यांनी यावेळी दिला.

Chhagan Bhujbal : ओबीसी प्रवर्गात आम्हाला दुसरी वाटेकरी नको, छगन भुजबळांकडून भूमिका स्पष्ट Read More »

img 20250830 wa0024

Maratha Reservation: आझाद मैदानावरील मराठा आरक्षण आंदोलनावर महत्त्वाची बैठक

Maratha Reservation : आझाद मैदानावर मराठा समाजाला आरक्षण मिळावे, या मागणीसाठी मनोज जरांगे पाटील उपोषणाला बसलेले आहेत. या पार्श्वभूमीवर आज मराठा आरक्षण उपसमितीचे अध्यक्ष तथा राज्याचे मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या निवासस्थानी महत्त्वाची बैठक झाली. मराठा आरक्षणाचा तातडीने तोडगा निघावा, मनोज मागण्या मान्य करण्यात याव्यात, अशी ठाम भूमिका मांडण्यात आली. तसेच आंदोलनकर्त्या मराठा बांधवांना आझाद मैदान परिसरात मूलभूत सोयीसुविधा उपलब्ध करून द्याव्यात, अशीही मागणी करण्यात आली. “आंदोलन करणे हा लोकशाहीतील एक मूलभूत अधिकार आहे,” याची जाणीव या वेळी करून देण्यात आली. बैठकीला शिवेंद्रसिंहराजे भोसले,मंत्री दादा भुसे, बाबासाहेब पाटील, मकरंद पाटील, माणिकराव कोकाटे, प्रकाश सोळंके, सुरेश धस आणि  विजयसिंह पंडित उपस्थित होते. बैठकीनंतर प्रशासनाला तातडीने आवश्यक त्या सूचनाही देण्यात आल्याचे समोर आले आहे.

Maratha Reservation: आझाद मैदानावरील मराठा आरक्षण आंदोलनावर महत्त्वाची बैठक Read More »

img 20250830 wa0006

Sawedi Land Scam : “पालकमंत्रीही थांबले, जिल्हाधिकारीही थांबले… पण अप्पर तहसीलदार धावले!”

Sawedi Land Scam : ” सावेडी येथील स.नं. 245/2ब मधील फेरफार क्रमांक 73107 या वादग्रस्त प्रकरणात पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील म्हणाले चौकशी करा, जिल्हाधिकारी यांच्याकडेही चौकशी सुरू असताना अप्पर तहसीलदार यांनी मात्र निबंधकार्यालयाला पत्र देऊन टाकले, याचा अर्थ पालकमंत्री आणि जिल्हाधिकाऱ्यांपेक्षाही मोठे पद अप्पर तहसीलदारांचे आहे का? अहिल्यानगर – शहरातील सावेडी येथील स.नं. 245/2ब मधील फेरफार क्रमांक 73107 या वादग्रस्त प्रकरणाने महसूल विभागाच्या कामकाजावर गंभीर प्रश्नचिन्ह उभे केले आहे. सुनावणी प्रलंबित असताना व्यवहार थांबवण्याचे आदेश सह निबंधकांनी दिले होते. मात्र, आश्चर्यकारक घडामोडीत याच प्रकरणात अप्पर तहसीलदारांनी एका दिवसात उलट पत्र काढत व्यवहार सुरू ठेवण्याचा मार्ग मोकळा केला. जिल्हाधिकारी आणि पालकमंत्री यांनाही जे जमले नाही, ते अप्पर तहसीलदारांनी करून दाखवल्याने या प्रकरणामागे ” ₹” प्रभाव आणि अधिकाऱ्यांचे संगनमत असल्याच्या चर्चा जिल्ह्यात जोर धरत आहेत. मौजे सावेडी येथील स.नं. 245/2ब मधील फेरफार क्रमांक 73107 या प्रकरणाने जिल्हा प्रशासन आणि महसूल खात्याच्या कामकाजावर मोठा प्रश्नचिन्ह निर्माण केले आहे. तक्रारदार रमाकांत सोनवणे यांनी प्रांताधिकारी सुधीर पाटील यांच्याकडे तक्रार दाखल केल्यानंतर हे प्रकरण पुढे सरकले. कायद्याने सुनावणी सुरू असताना संबंधित जमिनीवर कुठलेही व्यवहार होऊ नयेत, असा नियम असतानाही व्यवहार रोखण्याऐवजी वेगळ्याच दिशेने हालचाली झाल्याने प्रशासन आणि स्थानिक अधिकाऱ्यांविषयी संशय गडद होत आहे. प्रांताधिकारी सुधीर पाटील यांनी सुरुवातीला याबाबतचा अहवाल अप्पर तहसीलदार स्वप्निल ढवळे यांच्याकडे मागवला. त्यांनी तो सावेडी सर्कल अधिकाऱ्यांकडे पाठवून, वारस व इतर भागधारकांना नोटिसा बजावल्या. यानंतर सह दुय्यम निबंधक, अहिल्यानगर यांनी सुनावणी संपेपर्यंत कोणताही खरेदी-विक्री व्यवहार नोंदवू नये, असे स्पष्ट पत्र जारी केले. कायद्याच्या दृष्टीने ही भूमिका योग्य ठरत होती. मात्र, या पत्रामुळे नाराज झालेल्या पारसमल मश्रीमल शहा यांच्या वतीने गणेश शिवराम पाचर्णे यांनी उलट मागणी पुढे केली. अप्पर तहसीलदारांनीच अहवाल तयार करावा, असा आग्रह धरला. यानंतर प्रांत अधिकारी स्तरावर हा अहवाल पोहोचण्यास जाणीवपूर्वक 15 ते 20 दिवस उशीर लावण्यात आला, त्यानंतर प्रांताधिकारी सुधीर पाटील यांनी तो अहवाल जिल्हाधिकारी यांना पाठवला आणि सुनावणी अद्याप प्रलंबित आहे. याच दरम्यान पाचर्णे यांनी पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्याकडे तक्रार दाखल केली. पालकमंत्र्यांनी खुलासा मागवला, मात्र त्यावर कुठलीही सुनावणी झाली नाही. पण आश्चर्याची बाब म्हणजे, 14 ऑगस्ट रोजी पाचर्णे यांनी अप्पर तहसीलदारांकडे अर्ज दाखल केला आणि त्याच दिवशी म्हणजे 14 ऑगस्टला अप्पर तहसीलदार स्वप्निल ढवळे यांनी उपनिबंधकांना पत्र पाठवले. या पत्रात महसूल विभागाला खरेदी-विक्री थांबविण्याचा अधिकार नाही, तो फक्त दिवाणी न्यायालयाचा आहे, असे नमूद करण्यात आले. त्यामुळे या पत्राचा अर्थ असा निघतो की यावर खरेदी विक्री करण्यास कुठलाही अडचण महसूल ची नाही असे स्पष्ट होते, यामुळे सर्वत्र चर्चा सुरू झाली की, जिल्हाधिकारी व पालकमंत्र्यांना जे जमले नाही ते अप्पर तहसीलदारांनी एका दिवसात कसे केले? सामान्य माणसाला साध्या पत्रासाठी महिनोन्‌महिने चकरा माराव्या लागतात, पण सावेडीच्या या वादग्रस्त जमिनीवर मात्र एका दिवसात अर्ज, त्यावर निर्णय आणि आदेशही निघाला. हा वेग “…₹….” (गाळलेली जागा तुम्ही भरा) च्या जोरावर आला की काय, असा प्रश्न उपस्थित होतो. सावेडी सर्कल अधिकाऱ्यांनी दिलेले पहिले पत्र कायदेशीरदृष्ट्या अधिक भक्कम होते. कारण सुनावणी सुरू असताना कोणताही व्यवहार न होणे, हा कायद्याचा गाभा आहे. मात्र, अप्पर तहसीलदारांच्या तातडीच्या हालचालींनी संबंधित आणि अधिकाऱ्यांचे संगनमत असल्याची शंका लोकांमध्ये वाढली आहे. प्रश्न असे की पालकमंत्री यांच्या अर्जावर अद्याप सुनावणी किंवा निर्णय नाही? जिल्हाधिकारी स्तरावर सुनावणी प्रलंबित असताना अप्पर तहसीलदारांनी एवढ्या घाईने आदेश का दिला? एखाद्या सामान्य अर्जदाराला महिनोनिमहिनो दार ठोठावावे लागते, मग या प्रकरणात एका दिवसात आदेश का? सुनावणी असतानाही व्यवहार मोकळे ठेवण्याचा निर्णय कसल्या आधारे घेतला गेला? या घडामोडीमुळे महसूल विभागाच्या पारदर्शकतेवरच प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. जमिनीच्या व्यवहारांमध्ये लक्ष्मीचा प्रभाव अधिकाऱ्यांच्या निर्णयक्षमतेवर मात करतोय का, असा संशय नागरिकांमध्ये बळावतो आहे. एकंदरीत, सावेडीतील जमीन वाद हा केवळ मालकीचा प्रश्न नसून ‘लक्ष्मी आणि अधिकाऱ्यांचे संगनमत’ या गंभीर शंकेने ग्रासलेला आहे.

Sawedi Land Scam : “पालकमंत्रीही थांबले, जिल्हाधिकारीही थांबले… पण अप्पर तहसीलदार धावले!” Read More »

maratha reservation

Maratha Reservation : आरक्षण : नेत्यांचा डाव – जनतेचं काय?

Maratha Reservation: आरक्षणाचा विषय हा आपल्या राजकारणातील सर्वात ज्वलंत मुद्दा बनला आहे. समाजातील मागास, वंचित घटकांना न्याय मिळावा, त्यांना शिक्षण, नोकरी व सत्तेतील प्रतिनिधित्व यामध्ये समान संधी मिळावी या मूळ हेतूने आरक्षणाची कल्पना पुढे आली होती. पण आज चित्र पूर्णपणे वेगळं आहे. आरक्षण हा समाजउत्थानाचा हक्क राहिलेला नसून सत्ताप्राप्तीचा शिडी बनला आहे. सत्तेच्या गादीवर पोहोचण्यासाठी जातीय समीकरणं मांडली जातात. प्रत्येक निवडणुकीत एखाद्या समाजाला “आरक्षण” हा दिलासा दिला जातो. ज्या समाजाला आधी आरक्षण मिळालं, त्यांची मागणी “अधिक टक्केवारी” अशी असते. तर ज्यांना अजून मिळालेलं नाही, त्यांची मागणी “आम्हालाही हक्क हवा” अशी होते. अशा स्पर्धात्मक मागण्यांच्या ओघात सामान्य गरीब माणूस, त्याची खरी अडचण, त्याची जगण्यासाठीची धडपड कुठेतरी हरवून जाते. आरक्षणाच्या नावाने जेव्हा समाजातील गट–तट उभे केले जातात, तेव्हा नेत्यांना त्याचा राजकीय फायदा होतो. एखाद्या समाजाला आपल्याकडे वळवून निवडणुकीचा अंकगणिती ताळेबंद जुळवणे हीच खरी यामागची नीती असते. आरक्षणाचा खरा लाभार्थी तो गरीब विद्यार्थी, शेतकरी मुलगा, कष्टकरी तरुण आहे का की तो नेत्यांचा वारसदार आहे? हा प्रश्न जनतेच्या मनात वारंवार उभा राहतो. याचा दुसरा गंभीर परिणाम म्हणजे समाजात परस्पर अविश्वास, तणाव आणि जातीय ध्रुवीकरण वाढतं. आरक्षणासाठी रस्त्यावर आंदोलने होतात, समाजात फुट पडते, पण त्याचा राजकीय फायदा मात्र काही नेत्यांच्या गळ्यातील हार ठरतो. सर्वात मोठा प्रश्न असा की, आरक्षण खरंच वंचितांपर्यंत पोहोचतंय का? गावागावात असंख्य गरीब कुटुंबं आहेत, ज्यांना जातीचा आधार नाही. ते आरक्षणाबाहेर आहेत. त्यांचा गरीबपणा कोण मोजणार? हा मुद्दा कोणीच मांडत नाही. कारण जातीच्या चौकटीबाहेर विचार करणं नेत्यांच्या डावपेचात बसत नाही. म्हणूनच आता वेळ आली आहे की आरक्षणाच्या राजकारणाकडे नव्याने पाहायला हवं. जात हा निकष ठेवून केलेलं राजकारण देशाला पुढे नेणार नाही. गरीब हा गरीबच असतो मग तो कोणत्याही जातीचा असो. खरा वंचित हा सर्वसमावेशक दृष्टिकोनातून ओळखला जायलाच हवा. अन्यथा आरक्षण ही फक्त निवडणुकीच्या हिशोबाची “नोटा” ठरेल, आणि सामान्य जनतेच्या हाती फक्त आश्वासनं व भ्रमनिरास उरणार.

Maratha Reservation : आरक्षण : नेत्यांचा डाव – जनतेचं काय? Read More »

Harshwardhan Sapkal

Harshwardhan Sapkal: मराठा समाजाला आंदोलनासाठी एक दिवसाची परवानगी देणे हास्यास्पद

Harshwardhan Sapkal: सरकारने ठरवले तर पाच मिनिटात मराठा आरक्षणाचा प्रश्न मार्गी लागू शकतो पण सरकार ते करत नाही. भारतीय जनता पक्ष व देवेंद्र फडणवीस यांनी मराठा समाजाला दिलेल्या आश्वासन पाळावे. केंद्रात व राज्यात भाजपाचे सरकार आहे. राज्यात प्रचंड मोठे बहुमत असून त्यांनी दिल्लीत जाऊन आरक्षणाची ५० टक्क्यांची मर्यादा हटवावी. राजधर्माचे पालन करत तातडीने मराठा समाजाला आरक्षण देण्याची घोषणा करावी, असे महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी म्हटले आहे. टिळक भवन येथे पत्रकार परिषदेत बोलताना काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ म्हणाले की, मराठा समाजाला आरक्षण मिळावे यासाठी मनोज जरांगे पाटील समाजासह मुंबईत पोहचत असताना सरकारने या आंदोलनात अडथळे आणण्याचा प्रयत्न केला. आता केवळ एक दिवसाची परवानगी दिली ती हास्यास्पद असून तीन महिन्याआधी आंदोलनाची घोषणा केली होती तर सरकार एवढे दिवस काय झोपा काढत होते का? काँग्रेस आघाडी सरकारने मराठा समाजाला आरक्षण दिले होते. महाराष्ट्र विधिमंडळात भाजपा युती सरकारच्या काळात मराठा आरक्षणाचा ठराव पास केला त्याला काँग्रेस पक्षाने पाठिंबा दिला होता. सत्तेत येताच ७ दिवसात मराठा आरक्षण देतो अशी भीमगर्जना देवेंद्र फडणवीस यांनी केली होती त्याचे काय झाले? धनगर समाजाला मंत्रिमंडळाच्या पहिल्याच बैठकीत आरक्षण देण्याचे आश्वासन फडणविसांनी दिले होते, त्याचे काय झाले? ‘सागर’ बंगल्यावर मंथन करून अमृत पिऊन विष मात्र समाजावर व विरोधी पक्षावर टाकण्याचे पाप फडणवीस व भाजपा करत आहे. फोडा व राज्य करा या इंग्रजांच्या नितीप्रमाणे भाजपा व फडणवीस काम करत आहे. एकनाथ शिंदे यांनी मुख्यमंत्री असताना नवी मुंबईत रात्रीच छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यासमोर शपथ घेऊन गुलाल उधळला होता, त्याचे काय झाले? या प्रश्नांची उत्तरे दिली पाहिजेत. आज जे तीन पक्ष सत्तेत आहेत तेच त्यावेळीही सत्तेत होते असे काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ म्हणाले. आरक्षणावर जातनिहाय जनगणना हा रामबाण उपाय आहे हे लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी स्पष्ट केले असून त्यासाठी त्यांचा आग्रहही आहे. काँग्रेसशासित तेलंगणा व कर्नाटकात जातनिहाय जनगणना केलेली आहे. भाजपा सरकारमध्ये जर इच्छाशक्ती असेल तर त्यांनीही जातनिहाय जनगणना करावी व मराठा आरक्षणाचा प्रश्न सोडवावा असेही काँग्रेस प्रदेशाध्यक्ष म्हणाले.

Harshwardhan Sapkal: मराठा समाजाला आंदोलनासाठी एक दिवसाची परवानगी देणे हास्यास्पद Read More »

gadchiroli police

Gadchiroli Police : गडचिरोलीत मोठी कारवाई, आठ तासांच्या चकमकीनंतर 4 नक्षलवादी ठार

Gadchiroli Police : गडचिरोली पोलिसांनी मोठी कारवाई करत 4 नक्षलवादी ठार केले आहे. तब्बल आठ तास चाललेल्या चकमकीनंतर पोलिसांनी 4 नक्षलवादी ठार (01 पुरुष आणि 03 महिला) केले असल्याची माहिती अपर पोलीस अधीक्षक अभियान एम. रमेश यांनी दिली आहे. याबाबत मिळालेल्या माहितीनुसार, 25 ऑगस्ट रोजी गडचिरोली–नारायणपूर सीमेवरील कोपर्शी जंगल परिसरात गडचिरोली विभागाचे गट्टा दलम, कंपनी क्रमांक 10 व इतर माओवादी दबा धरून बसले असल्याची विश्वासार्ह गोपनीय माहिती मिळाल्यानंतर अपर पोलीस अधीक्षक अभियान एम. रमेश यांचे नेतृत्वाखाली C-60 ची 19 पथके आणि CRPF QAT ची 02 पथके सदर जंगल परिसरात रवाना करण्यात आली होती. सदर भागात सुरू असणाऱ्या प्रचंड पावसादरम्यान दोन दिवसानंतर पोलीस पथके आज सकाळी सदर जंगल परिसरात पोहोचून शोध मोहीम राबवत असताना माओवाद्यांनी पोलीस पथकांवर अंदाधुंद गोळीबार सुरू केला, ज्याला पोलीस पथकाने प्रभावी प्रत्युत्तर दिले. सुमारे आठ तास चाललेल्या चकमकीनंतर सदर परिसरात शोध घेतला असता एकूण 04 जहाल माओवाद्यांचे मृतदेह (01 पुरुष आणि 03 महिला) मिळाळे आहेत. याशिवाय घटनास्थळावरून 01 SLR रायफल, 02 INSAS रायफल व 01 .303 रायफल जप्त करण्यात आले आहेत. सदर भागात उर्वरित माओवाद्यांचा शोध घेण्यासाठी माओवाद विरोधी अभियान सुरू आहे.

Gadchiroli Police : गडचिरोलीत मोठी कारवाई, आठ तासांच्या चकमकीनंतर 4 नक्षलवादी ठार Read More »

nagpur gondiya access expressway

Maharashtra News: नागपूरकरांना दिलासा, नागपूर – गोंदिया प्रवेश द्रुतगती महामार्ग उभारणीस मान्यता

Maharashtra News: नागपूर-गोंदिया प्रवेश द्रुतगती महामार्ग प्रकल्पाच्या आखणीस तसेच हा प्रकल्प महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळामार्फत राबवण्यास आणि यासाठीच्या भूसंपादनाकरिता प्रशासकीय मान्यता देण्याचा निर्णय मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आला आहे. बैठकीच्या अध्यक्षस्थानी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस होते. नागपूर ते गोंदिया सध्याच्या महामार्गाने पोहचण्यासाठी साधारणपणे ३ तासापेक्षा जास्त वेळ लागतो. नागपूर-गोंदिया प्रवेश द्रुतगती महामार्गाच्या अंमलबजावणीद्वारे प्रवासाचे अंतर १५ कि.मी. ने कमी होऊन प्रवासाचा कालावधी सव्वा तासावर येणार आहे. हा महामार्ग नागपूर, भंडारा आणि गोंदिया जिल्ह्यातील एकूण १० तालुके, ११५ गावांतून जात आहे. यामध्ये २६ उड्डाणपूल, प्राण्यांसाठी ८ अंडरपास, १५ मोठे व ६३ लहान पूल, ७१ कालवा क्रॉसिंग आदिंचा समावेश आहे. गवसी, पाचगाव, ठाना, रोटरी, पांजरा, पालडोंगरी, लोहरी व सावरी अशा आठ ठिकाणी इंटरचेंज असणार आहे. नागपूर-मुंबई हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे महाराष्ट्र समृद्धी महामार्गाचे ७०१ किमी लांबीचे बांधकाम पूर्ण झाले आहे. हा महामार्ग गोंदियापर्यंत विस्तारण्यात येत आहे. समृद्धी महामार्गाचा भाग असलेल्या नागपूर-गोंदिया प्रवेश नियंत्रीत द्रुतगती महामार्गाच्या १६२.५७७ कि. मी.लांबीस यापुर्वीच २०२३ मध्ये मान्यता देण्यात आली आहे. यामध्ये नागपूर बाह्य वळण मार्गावरील गावसी मनापूर इंटरचेंज पासून लोधी तोळा (जि. गोंदिया) पर्यंत, नागपूर ते भंडारा ७२.५०० कि.मी., भंडारा ते गोंदिया ७२.६००, तिरोडा जोडरस्ता ३.७६५ कि.मी. आणि गोंदिया बाह्य वळण रस्ता १३.७१२ कि.मी. अशा एकूण १६२.५७७ कि.मी. लांबीचा रस्ता बांधण्यात येणार आहे. हा प्रकल्प महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळामार्फत राबवण्यास मान्यता देण्यात आली. या प्रकल्पासाठी भूसंपादनाची कार्यवाही महामंडळामार्फत करण्यास मान्यता देण्यात असून त्यासाठी रु.३ हजार १६२.१८ कोटीच्या तरतुदीस मान्यता देण्यात आली आहे. या द्रुतगती महामार्गामुळे दुर्गम, मागास व आदिवासीबहुल भाग नागपूर-मुंबईशी जोडला जाणार आहे. यामुळे भंडारा, गोंदिया जिल्ह्यांच्या विकासाला गती मिळणार आहे. आदिवासी क्षेत्र मुख्य प्रवाहाशी जोडले जाऊन त्या परिसराचा सामाजिक व आर्थिक विकास होण्यास मदत होऊन नवीन उद्योगास चालना मिळेल, यातून मोठ्या प्रमाणात रोजगार निर्मिती होईल.

Maharashtra News: नागपूरकरांना दिलासा, नागपूर – गोंदिया प्रवेश द्रुतगती महामार्ग उभारणीस मान्यता Read More »

sawedi land scam repair or misuse serious question mark on revenue records

सावेडी जमीन व्यवहारात दुरुस्ती की दुरुपयोग? महसूल नोंदींवर गंभीर प्रश्नचिन्ह

अहिल्यानगर | प्रतिनिधी अहिल्यानगर जिल्ह्यातील जमिनींच्या मालकी हक्काशी निगडित वादविवाद, चुक दुरुस्ती व अभिलेखातील फेरफार या विषयांवर पुन्हा एकदा गंभीर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे. जमीनसंबंधी कागदपत्रे व नोंदींमध्ये तफावत असल्याने प्रशासनाच्या कारभारावरील विश्वासार्हतेवर गालबोट लागते आहे. सावेडी येथील सर्वे क्रमांक २४५ मधील जमीन व्यवहारात गंभीर शंका निर्माण झाली असून खरेदी दस्त, चुक दुरुस्ती लेख व तहसीलदारांचा वाटप आदेश या तिन्ही नोंदींमध्ये विसंगती आढळत आहे. या प्रकरणामुळे महसूल विभागातील नोंदींच्या अचूकतेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. दि. १३ जुलै १९९२ रोजी जमिनीचे वाटप झालेले दिसते, तर चुक दुरुस्ती दि. २७ ऑगस्ट १९९२ रोजी झाल्याची नोंद आहे. यातील सर्वात महत्त्वाची बाब म्हणजे — वाटपाच्या नोंदींप्रमाणे माहिती चुक दुरुस्तीमध्ये परावर्तित होत नाही. उदाहरणार्थ, सर्व्हे नं. २४५/वर चे एकूण क्षेत्रफळ ०.६३ हे.आर. हे अब्दुल अजीज डायाभाई (वडील) यांच्या नावावर दिसून येते. तर, वाटपामध्ये मात्र सर्व्हे नं. २४९/बर चे ०.६३ हे.आर. क्षेत्र डायाआई अब्दुल अजीज (मुलगा) यांच्या नावावर आहे. ही विसंगती गंभीर शंका उपस्थित करते. म्हणजेच, चुक दुरुस्ती लेखाबाबतच शाशंकता निर्माण झाली आहे. याशिवाय, सूची क्र. २ मध्ये देखील स्पष्ट तफावत दिसते. अधिकार अभिलेखात ही सूची हस्तलिखित स्वरूपात नांद घेताना आढळते. परंतु सरकारी कामकाजाकरिता मागणी केली असता त्याच सूचीत प्रिंटेड स्वरूप समोर येते. ही बाब स्वतःमध्ये धक्कादायक आहे. एकाच दस्ताची दोन वेगवेगळ्या स्वरूपात नोंद कशी काय असू शकते, हा मूलभूत प्रश्न प्रशासनासमोर उभा ठाकतो. ही उदाहरणे वेगळी नाहीत. जमिनीच्या फेरफाराच्या कहाण्या महाराष्ट्रात नित्याच्या झाल्या आहेत. मूळ अभिलेख, नंतर केलेली चुक दुरुस्ती, आणि सरकारी कार्यालयात सादर होणारी कागदपत्रे या सगळ्या प्रक्रियेत जेव्हा विसंगती निर्माण होते, तेव्हा ती फक्त तांत्रिक चूक म्हणून सोडवणे योग्य नाही. अशा चुका हेतुपुरस्सर घडवून आणल्या जात असल्याचा संशय बळावतो. जमिनीच्या नोंदींमध्ये एका बाजूला वडिलांचे नाव, तर दुसऱ्या बाजूला मुलाचे नाव येते; हस्तलिखित सूची आणि प्रिंटेड सूचीतील फरक दिसतो –  ही परिस्थिती फक्त मालकांसाठीच नव्हे तर प्रशासनासाठीही धोक्याची आहे. कारण या विसंगतीमुळे न्यायालयीन लढाया, वाद, आणि सामाजिक तणाव निर्माण होतो. आजच्या घडीला, रेकॉर्ड ऑफ राईट्स व ७/१२ उतारे हेच शेतकऱ्यांचे बायबल मानले जातात. जर या उताऱ्यांच्या मूळपणावर आणि अधिकृततेवर प्रश्नचिन्ह उभे राहिले, तर शेवटी शेतकऱ्यांचा विश्वासच डळमळीत होईल. जमीनसंबंधी फेरफारांच्या प्रकरणांमध्ये प्रशासनाने पारदर्शकता आणि तातडीची जबाबदारी घेणे आवश्यक आहे. अन्यथा, “भूमाफिया” या शब्दाला अधिक बळकटी मिळत राहील. यातून पुढचा प्रश्न असा उभा राहतो की चुका दुरुस्त करायच्या की चुका लपवायच्या? जमिनीचे प्रकरण जिथे भावनिक आणि आर्थिकदृष्ट्या संवेदनशील आहे, तिथे ही प्रशासकीय ढिसाळपणा वादग्रस्त ठरणारच. मिळालेल्या माहितीनुसार, खरेदीदार पारस मश्रीमल शहा यांनी खरेदी दस्त क्र. ४३०/१९९१, दि. १५ ऑक्टोबर १९९१ अन्वये सावेडी स. नं. २४५/वर मधील ०.७२ हे.आर. आणि स. नं. २४५/बर मधील ०.६३ हे.आर., असे एकूण १.३५ हे.आर. क्षेत्र अब्दुल अजीज डायाभाई यांच्याकडून खरेदी केलेले दाखविले आहे. यानंतर खरेदीदाराने चुक दुरुस्ती लेख (दस्त क्र. ४३४८/१९९२, दि. २७ ऑगस्ट १९९२) निबंधक कार्यालयात सादर केला. यात स. नं. २४५/बर चे ०.६३ हे.आर. क्षेत्र अब्दुल अजीज डायाभाई यांच्या वाट्याचे असल्याचे नमूद केले आहे. मात्र, नगर तहसीलदारांचा आदेश क्र. १६/१९९२, दि. १३ जुलै १९९२ पाहता, स. नं. २४५/बर मधील ०.६३ हे.आर. क्षेत्र हे “डायाभाई अब्दुल अजीज” (मुलगा) यांच्या नावावर नोंदवलेले आहे. यामुळे खरेदी दस्त आणि चुक दुरुस्ती लेखात वडिलांचे नाव तर वाटप आदेशात मुलाचे नाव दिसत असल्याने नोंदीत विसंगती निर्माण झाली आहे. याच कारणास्तव या जमीन खरेदी व्यवहाराबाबत शंका निर्माण झाली असून महसूल नोंदींच्या शुद्धतेवर प्रश्नचिन्ह उभे राहिले आहे. दिनांकाचा विरोधाभास वाटप आदेश : १३/०७/१९९२ चुक दुरुस्ती लेख : २७/०८/१९९२👉 म्हणजे चुक दुरुस्ती हा वाटपानंतर करण्यात आला. पण दुरुस्ती करताना वाटपाचा आधार घेतलेला दिसत नाही. पण महसूल वाटप आदेशात ती जमीन मुलाच्या नावे दाखवली.👉 त्यामुळे खरेदी व्यवहार नेमका कोणत्या व्यक्तीकडून झाला याबाबत शंका निर्माण झाली. नावातील तफावत चुक दुरुस्तीमध्ये : “अब्दुल अजीज डायाभाई” (वडील) वाटप आदेशात : “डायाभाई अब्दुल अजीज” (मुलगा)👉 एकाच क्षेत्रफळावर (०.६३ हे.आर.) वडील व मुलगा असे दोन वेगवेगळे नावे आल्याने नोंदीत गोंधळ निर्माण. शाशंकता खरेदी दस्त व दुरुस्ती पत्रकानुसार जमीन वडिलांकडे होती.

सावेडी जमीन व्यवहारात दुरुस्ती की दुरुपयोग? महसूल नोंदींवर गंभीर प्रश्नचिन्ह Read More »

pravara river

Rain Alert: प्रवरा नदीकाठच्या नागरिकांना सतर्कतेचा इशारा ; धरणांमधून पाण्याचा विसर्ग सुरू

Rain Alert : जिल्ह्यातील प्रवरा नदीच्या पाणलोट क्षेत्रात होत असलेल्या सततच्या पावसामुळे भंडारदरा व निळवंडे धरणातून पाण्याचा विसर्ग सुरू करण्यात आला आहे. यामुळे नदीच्या पाणी पातळीत वाढ झाली असून, नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. काल सायंकाळी ६ वाजताच्या नोंदीनुसार, भंडारदरा धरणातून १३,३४४ क्युसेक, तर निळवंडे धरणातून १५,३५७ क्युसेक पाणी सोडले जात आहे. याव्यतिरिक्त, ओझर बंधाऱ्यावरूनही ६,३०१ क्युसेक पाण्याचा विसर्ग सुरू आहे. धरणक्षेत्रात पाऊस असाच सुरू राहिल्यास विसर्गाचे प्रमाण आणखी वाढण्याची शक्यता आहे. जिल्हा प्रशासनाने सर्व संबंधित विभागांना आणि आपत्ती व्यवस्थापन कक्षाला सतर्क राहण्याचे निर्देश दिले आहेत. नागरिकांनी नदीपात्रापासून दूर राहावे, पाणी वाहत असताना पूल ओलांडू नये, आणि पूरप्रवण भागांत गर्दी करू नये, असे आवाहन करण्यात आले आहे. धोकादायक परिस्थितीत नागरिकांना सुरक्षित ठिकाणी स्थलांतरित करण्यासाठी तातडीने उपाययोजना करण्याच्या सूचनाही देण्यात आल्या आहेत.

Rain Alert: प्रवरा नदीकाठच्या नागरिकांना सतर्कतेचा इशारा ; धरणांमधून पाण्याचा विसर्ग सुरू Read More »

Rain 1

Maharashtra Weather Update : राज्यात पुन्हा धो धो पाऊस; ‘या’ जिल्ह्यांना यलो अलर्ट

Maharashtra Weather Update : राज्यात पुन्हा एकदा मान्सून सक्रिय होणार असून राज्यातील काही भागात मुसळधार पावसाचा अंदाज हवामान विभागाकडून वर्तवण्यात आला आहे. हवामान विभागाकडून देण्यात आलेल्या माहितीनुसार, पुढील 2 ते 3 दिवस राज्यातील अनेक जिल्ह्यात मुसळधार पावसाची शक्यता आहे. त्यामुळे हवामान विभागाकडून रायगड, रत्नागिरी, पुणे घाट, नाशिक, धुळे, नंदुरबार, जळगाव, नांदेड, हिंगोली, परभणी, लातूर या जिल्ह्यांना यलो अलर्ट जारी करण्यात आला आहे. याचबरोबर नागरिकांनी सर्तक रहावे असे आवाहन देखील हवामान विभागाकडून करण्यात आले आहे. तर दुसरीकडे 26 ऑगस्टपासून राज्यातील अनेक जिल्ह्यांमध्ये पुन्हा एकदा पावसाचा जोर वाढणार असल्याची माहिती देखील हवामान विभागाने दिली आहे. नांदेड जिल्ह्यात मुसळधार पावसामुळे सर्वसामान्यांसह शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले असून शेतकऱ्यांना लवकरात लवकर नुकसान भरपाई मिळावी अशी मागणी विरोधकांनी केली आहे.

Maharashtra Weather Update : राज्यात पुन्हा धो धो पाऊस; ‘या’ जिल्ह्यांना यलो अलर्ट Read More »