DNA मराठी

Maharashtra

img 20251006 wa0000

Ahilyanagar News : सेनापती बापट साहित्य संमेलनाची संयोजन समिती जाहीर; अध्यक्षपदी सचिन चोभे

Ahilyanagar News : स्वातंत्र्यसैनिक सेनापती बापट साहित्य संमेलन नोव्हेंबर महिन्यात होणार आहे. त्यासाठीचे नियोजन मराठी भाषा विभाग व महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळ यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे. यासाठीच्या संयोजन समितीच्या अध्यक्षपदी लेखक सचिन मोहन चोभे यांची, तर कार्याध्यक्षपदी सिद्धनाथ मेटे महाराज आणि समन्वयक पदावर लेखक रामदास कोतकर यांची निवड करण्यात आली आहे. रविवारी (दि. ५ ऑक्टोबर २०२५) झालेल्या बैठकीत संमेलनाची रूपरेषा ठरवण्यात आली. याबद्दलची माहिती आयोजक संस्था आत्मनिर्धार फाउंडेशनचे अध्यक्ष महादेव गवळी यांनी दिली. त्यांनी सांगितले की, आजच्या तिसऱ्या बैठकीत विविध मुद्द्यांवर चर्चा झाली. काहींनी समक्ष तर अनेकजणांनी व्हिडिओ कॉलच्या माध्यमातून या बैठकीत हजेरी लावली. सर्व मुद्द्यांवर चर्चा करून त्यानुसार संमेलनात महिला, नवसाहित्यिक, दिव्यांग आणि वंचित घटकांना सहभागी करून घेऊन संमेलन यशस्वी करण्याचा ठराव सर्वानुमते मंजूर करण्यात आला. रमेश आमले यांनी संयोजन समितीचा ठराव मांडला. त्यास आनंदा साळवे यांनी अनुमोदन दिले. संयोजन समितीच्या सह समन्वयक पदावर कवयित्री स्वाती पाटील यांची निवड करण्यात आली. निमंत्रण समितीमध्ये शब्बीरभाई शेख, हेमलता पाटील, रमेश आमले, सुभाष सोनवणे, अमोल इथापे, शेख रज्जाक, ऋतिक लोंढे आदींची निवड करण्यात आली. तर, व्यवस्थापन समितीमध्ये संदीप गेरंगे, भानुदास कोतकर, वसंत कर्डीले, नामदेव लोंढे, प्रा. शरद दारकुंडे, ॲड. सचिन चंदनशिव, मच्छिंद्रनाथ म्हस्के, प्रा. अमोल सायंबर, अजिंक्य काटकर, मेहेक वाणी, राजेंद्र खुंटाळे, देविदास बुधवंत यांनी सर्व जबाबदारी पार पाडण्याची तयारी दाखवली. संमेलनाचे प्रसिद्धीप्रमूख म्हणून ॲड. राहुल ठाणगे व मकरंद घोडके यांनी जबाबदारी स्वीकारली आहे. लवकरच साहित्य संमेलनाची तारीख आणि संमेलनाध्यक्ष निवड करण्यात येईल अशी माहिती गवळी यांनी दिली.

Ahilyanagar News : सेनापती बापट साहित्य संमेलनाची संयोजन समिती जाहीर; अध्यक्षपदी सचिन चोभे Read More »

kotwali police

Ahilyanagar Police: विनापरवाना गुटखा बाळगणारे इसमास अटक, कोतवाली पोलिसांची कारवाई

Ahilyanagar Police: नगर शहरात कोतवाली पोलिसांनी मोठी कारवाई करत विनापरवाना गुटखा बाळगणारे एका इसमास चारचाकी वाहनासह ताब्यात घेतले आहे.कोतवाली पोलीस स्टेशन पोलिस निरीक्षक संभाजी गायकवाड यांना मिळालेल्या माहितीवरून ही कारवाई करण्यात आली आहे. या प्रकरणात मिळालेल्या माहितीनुसार, संभाजी गायकवाड 2 ऑक्टोबर पहाटे 5 च्या सुमारास काळया रंगाच्या गाडीमधे एक इसम गुटखा व सुंगधी तंबाखु घेवुन अहिल्यानगर शहरात येणार असल्याची माहिती संभाजी गायकवाड यांना मिळाली होती. या माहितीवरून दिपक पोपटराव लोखंडे याला पोलिसांनी ताब्यात घेत त्याच्यावर बी एन एस कलम 123.223.274.275 प्रमाणे गुन्हा गुन्हा दाखल केला आहे. तसेच या प्रकरणाचा पुढील तपासही कोतवाली पोलिसांनी सुरू केला आहे.

Ahilyanagar Police: विनापरवाना गुटखा बाळगणारे इसमास अटक, कोतवाली पोलिसांची कारवाई Read More »

atul save

Maharashtra Government: मोठी बातमी, राज्यात दुग्धव्यवसाय विकासासाठी अभ्यास समिती गठीत

Maharashtra Government: राज्यात दूध व दुग्धजन्य पदार्थांची उत्पादकता वाढविण्यासाठी आणि शेतकऱ्यांच्या आर्थिक बळकटीकरणासाठी राज्यस्तरीय दुग्धव्यवसाय अभ्यास समिती गठीत करण्यात आली आहे. या समितीचा उद्देश राज्यातील दूध उत्पादन कमी असलेल्या भागांमध्ये दूध उत्पादन वाढीसाठी दिर्घकालीन उपाययोजना सुचविणे आणि सहकारी व खाजगी दूध संघांसह शेतकऱ्यांच्या अडचणींचे निराकरण करणे हा असल्याचे दुग्धविकास मंत्री अतुल सावे यांनी सांगितले. मंत्री सावे म्हणाले, अभ्यास समितीचे अध्यक्ष आयुक्त, पशुसंवर्धन असून, सदस्य सचिव म्हणून आयुक्त, दुग्धव्यवसाय विकास हे आहेत. समिती राज्यातील दुग्धव्यवसायाच्या परिस्थितीचा आढावा घेईल. तसेच, दूध उत्पादक शेतकरी, खाजगी व सहकारी दूध संघ यांचेकडून प्राप्त सूचना लक्षात घेऊन उपाययोजना सुचवण्याचे काम समिती करणार आहे. समितीच्या कार्यात “विकसित महाराष्ट्र 2047” या उद्दिष्टाचा विचार केला जाईल. राज्यात राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर अग्रगण्य दुग्धव्यवसाय व पशुसंवर्धन विभाग म्हणून कामगिरी करण्यासाठी देशभरातील विविध राज्यांतील योजना अभ्यासून सर्वोत्तम योजना राज्यात राबविण्याचे मार्गदर्शन समिती करणार आहे. ही अभ्यास समिती पशुसंवर्धन व दुग्धव्यवसाय क्षेत्रातील तज्ञ व्यक्ती, दुग्ध उद्योगांचे प्रतिनिधी आणि प्रगतिशील दूध उत्पादक शेतकरी यांना आवश्यकतेनुसार आमंत्रित करेल. समितीच्या मार्गदर्शनाखाली महिलांना दुग्धव्यवसायात रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देणे, तसेच बचतगट/शेतकरी उत्पादक गटांच्या माध्यमातून महिला आर्थिकदृष्ट्या सक्षम होतील आणि त्यांची आर्थिक परिस्थिती सुधारेल, या बाबींचेही नियोजन केले जाणार असल्याचे मंत्री सावे यांनी सांगितले.

Maharashtra Government: मोठी बातमी, राज्यात दुग्धव्यवसाय विकासासाठी अभ्यास समिती गठीत Read More »

nilesh ghaywal

Nilesh Ghaywal : दोन जिल्ह्यात काढली बायको अन् स्वतःची ओळखपत्र…, निलेश घायवळचा आणखी एक प्रताप

Nilesh Ghaywal : गुन्हेगारी पार्श्वभूमी असलेला निलेश घायवळ सतत वेगवेगळ्या कारणांनी चर्चेत असतो. त्याच्यावर अनेक गुन्हे दाखल असूनही त्याने पासपोर्ट आणि व्हिसा सहज मिळवून परदेश गाठल्याने प्रशासनावरच्या कामकाजावर प्रश्नचिन्ह निर्माण झाली आहे. आता त्याच्याशी संबंधित आणखी एक प्रकरण समोर आल आहे. घायवळने पुणे आणि अहिल्यानगरमध्ये दुहेरी मतदान नोंदणी करून आपल्या अन बायकोच्या नावे ओळखपत्र मिळवली आहे. सामाजिक कार्यकर्ते विजय कुंभार यांनी दिलेल्या माहितीनुसार, निलेश घायवळ आणि त्याच्या पत्नीच्या नावावर दोन वेगवेगळ्या जिल्ह्यांमध्ये मतदान ओळखपत्रे तयार करण्यात आली आहेत. पुणे आणि अहमदनगर या ठिकाणी एकाच व्यक्तीच्या दोन नावांनी व दोन वयोगटात ओळखपत्रे मिळवण्यात आली असल्याचा आरोप त्यांनी केला आहे. ओळखपत्रातील विसंगती 1. पती – निलेशकुमार बन्सीलाल गायवळ • क्रमांक: DRD1360288 • मतदारसंघ: कोथरूड, पुणे • दाखवलेले वय: 47 2. पती – निलेश बन्सीलाल गायवळ • क्रमांक: TKM8217994 • मतदारसंघ: कर्जत-जामखेड, अहमदनगर • दाखवलेले वय: 48 3. पत्नी – स्वाती निलेश गायवळ • क्रमांक: SAO7387947 • मतदारसंघ: कोथरूड, पुणे • दाखवलेले वय: 42 4. पत्नी – स्वाती निलेश गायवळ • क्रमांक: TKM8218026 • मतदारसंघ: कर्जत-जामखेड, अहमदनगर • दाखवलेले वय: 33 अहमदनगर व पुणे या दोन्ही जिल्ह्यांमध्ये वेगवेगळ्या नावाने व वयात बदल करून ही ओळखपत्रे मिळवण्यात आली. इतकेच नव्हे, तर कर्जत-जामखेड मतदारसंघात घायवळ दांपत्याची नावे सलग क्रमांकावर नोंदवली गेल्याचेही उघड झाले आहे. यामुळे ही संपूर्ण प्रक्रिया केवळ नावातील फेरफार व खोट्या माहितीवर आधारित असल्याचे स्पष्ट होत आहे. दरम्यान, घायवळ हे सर्व कुणाच्या आश्रयाने करतो? प्रशासनातील कोणत्या अधिकाऱ्यांच्या संगनमतामुळे दुहेरी ओळखपत्रे बनवली गेली? हे प्रश्न आता पुढे येत आहेत. यामुळे त्याच्या जवळील असलेल्या राजकीय मंडळींवरही संशयाची सुई फिरू लागली आहे. त्यामुळे हे प्रकरण प्रशासन किती गांभीर्याने घेत आणि काय कारवाई करत हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.

Nilesh Ghaywal : दोन जिल्ह्यात काढली बायको अन् स्वतःची ओळखपत्र…, निलेश घायवळचा आणखी एक प्रताप Read More »

raj thackeray

Raj Thackeray: रविवारपासून राज ठाकरे मराठवाडा दौऱ्यावर; पूरग्रस्त शेतकऱ्यांना करणार मदत

Raj Thackeray: राज्यातील अनेक गावात अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांचे प्रचंड नुकसान झाले आहे. अनेक गावात पूरस्थिती निर्माण झाल्याने पिके वाहून गेली आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना लवकरात लवकर पंचनामे करून नुकसान भरपाई देण्यात यावी तसेच शेतकऱ्यांना कर्जमाफी देण्यात यावी अशी मागणी आता विरोधकांकडून जोर धरत आहे. तर दुसरीकडे सरकारमधील अनेक मंत्री तसेच विरोधी पक्षातील नेते पूरग्रस्त भागाचा दौरा करत परिस्थिती जाणून घेत आहे. तर आता मनसे प्रमुख राज ठाकरे देखील रविवारपासून मराठवाडा दौऱ्यावर असणार आहे. मनसेकडून देण्यात आलेल्या माहितीनुसार राज ठाकरे या दौऱ्यात लातूर, नांदेड, सोलापूर, धाराशिव आणि इतर काही जिल्ह्यात जाणार आहे. तर दुसरीकडे पूरग्रस्त शेतकऱ्यांना बीज बियाणे आणि खते मनसेकडून दिली जाणार. मनसे नेते बाळा नांदगावकर आणि मनोज चव्हाण रविवारपासून मदत घेऊन मराठवाड्याच्या दौऱ्यावर जाणार. लातूर, नांदेड, सोलापूर, धाराशिव आणि इतर भागातही मनसेची मदत पोहोचवली जाणार. शेतकऱ्यांना शेतीसाठी आवश्यक असलेली बी-बीयाने आणि खते मनसेकडून दिली जाणार असल्याची माहिती मनसेकडून देण्यात आली आहे.

Raj Thackeray: रविवारपासून राज ठाकरे मराठवाडा दौऱ्यावर; पूरग्रस्त शेतकऱ्यांना करणार मदत Read More »

ajit pawar

Ajit Pawar: त्रास होणार नाही, पारनेर – सुपा MIDC च्या विकासासाठी सहकार्य करा; अजित पवार स्पष्टच बोलले

Ajit Pawar: राज्यातील उद्योग क्षेत्राचा जास्तीत जास्त विकास करून रोजगार निर्मितीला शासन प्राधान्य देत आहे. उद्योजकांना संरक्षण देणे हे शासनाचे कर्तव्य असून, पारनेर – सुपा औद्योगिक वसाहतीच्या विकासासाठी प्रशासनाने उद्योजकांना सर्वोतोपरी सहकार्य करावे, असे निर्देश उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिले. उद्योजकांनी कुठल्याही दबावाला बळी न पडता आपले काम करण्याचे आवाहन त्यांनी केले. उपमुख्यमंत्री पवार हे पारनेर येथील शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्थेत पारनेर – सुपा औद्योगिक वसाहतीमधील विविध विषयासंबंधी आयोजित आढावा बैठकीत बोलत होते. बैठकीस आमदार काशीनाथ दाते, जिल्हाधिकारी डॉ. पंकज आशिया, जिल्हा पोलीस अधीक्षक सोमनाथ घार्गे, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आनंद भंडारी, औद्योगिक विकास महामंडळाचे विभागीय अधिकारी गणेश राठोड, जिल्हा उद्योग केंद्राचे उद्योग अधिकारी अशोक बेनके, जिल्हा व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण अधिकारी सुनील शिंदे, कौशल्य विकास विभागाचे सहाय्यक आयुक्त रविकुमार पंतम आदी उपस्थित होते. उपमुख्यमंत्री अजित पवार म्हणाले, उद्योगासाठी शासनाचे नेहमीच सकारात्मक धोरण राहिले आहे. पारनेर – सुपा औद्योगिक क्षेत्रातील उद्योजकांना कुठल्याही प्रकारचा त्रास होणार नाही, याची पोलीस प्रशासनाने काळजी घ्यावी. उद्योजकांना वेठीस धरून दबाव टाकणाऱ्यांवर कठोर कारवाई करण्यात यावी. औद्योगिक वसाहतीमध्ये कायदा व सुव्यवस्था अबाधित राहील यासाठी पोलीस विभागाने अधिक कार्यक्षम व दक्षतेने काम करावे. उद्योग टिकून राहावेत यासाठी उद्योजकांनीही कामगारांना उद्योगामध्ये सामावून घेण्याचे आवाहन केले. सुपा – पारनेर औद्योगिक क्षेत्रात वीज पुरवठा सातत्याने खंडित होत असल्यामुळे उद्योजकांना मोठे आर्थिक नुकसान होत आहे. या तक्रारीवर तातडीने उपाययोजना करून उद्योगक्षेत्राला अखंडित वीज पुरवठा तसेच पाणी पुरवठा सुनिश्चित केला जावा. औद्योगिक क्षेत्रात कामगार महिलांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने पोलीस विभागाने साध्या वेषातील पोलिसांमार्फत गस्त वाढवावी. उद्योगांनी सीसीटीव्ही यंत्रणा बसवावी. तसेच, औद्योगिक क्षेत्रात प्रदूषणमुक्त वातावरण राखले जावे आणि नागरिकांचे आरोग्य सुरक्षित राहावे, यासाठी उद्योगांनी खबरदारी घेण्यास निर्देशही त्यांनी दिले. कौशल्यावर आधारित प्रशिक्षणाला अधिक महत्त्व दिले जात असून, कौशल्य विकास विभागामार्फत विद्यार्थी व विद्यार्थिनींना मोफत प्रशिक्षण दिले जात आहे. सी ट्रिपल आय.टी. च्या माध्यमातून उद्योगासाठी उपयुक्त मनुष्यबळ तयार करण्यावर भर देण्यात येत आहे. जर्मन भाषा अवगत असलेल्या बेरोजगारांना सुमारे दहा लाख रोजगार उपलब्ध असल्याची माहितीही उपमुख्यमंत्र्यांनी दिली. बैठकीत उपस्थित उद्योजकांनी त्यांच्या अडचणी उपमुख्यमंत्री पवार यांच्यासमोर मांडल्या. संबंधित विभागाचे प्रमुख अधिकारी व उद्योजक देखील उपस्थित होते.

Ajit Pawar: त्रास होणार नाही, पारनेर – सुपा MIDC च्या विकासासाठी सहकार्य करा; अजित पवार स्पष्टच बोलले Read More »

court

Ahilyanagar News : मोठी बातमी, गोळीबार प्रकरणात आरोपीस तीन वर्षांची शिक्षा

Ahilyanagar Crime News : कर्जत तालुक्यातील गोळीबार प्रकरणात आरोपी विनोद मोहन मुरकुटे (वय ३३, रा. मुरकुटे वस्ती) यास श्रीगोंदा येथील जिल्हा व सत्र न्यायाधीश डी. पी. शिंगाडे यांनी शिक्षा सुनावली. भा.दं.वि. कलम ३२४ अंतर्गत तीन वर्षे सक्तमजुरी व ५ हजार रुपये दंड, तसेच भारतीय शस्त्र अधिनियम कलम २७(१) अंतर्गत आणखी तीन वर्षे शिक्षा व ५ हजार रुपये दंड अशी शिक्षा ठोठावण्यात आली आहे. दंड न भरल्यास सहा महिन्यांच्या कारावासाची शिक्षा भोगावी लागेल. प्रकरणाची हकीगत अशी की, ४ मार्च २०२३ रोजी सायंकाळी पाचच्या सुमारास फिर्यादी प्रमोद आतार (वय १९, रा. आतारवस्ती, कर्जत) हा आपल्या चुलत चुलत्यासोबत उसाचे वाढे गोळा करत असताना, आरोपी विनोद मुरकुटे याने पिस्तुलातून गोळी झाडून फिर्यादीच्या पायावर गोळीबार केला. यात तो गंभीर जखमी झाला. उपचारासाठी त्याला कर्जत, त्यानंतर अहमदनगर जिल्हा रुग्णालयात हलवण्यात आले. या घटनेवरून कर्जत पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. या खटल्यात सरकार पक्षाच्या वतीने आठ साक्षीदार तपासण्यात आले. त्यात फिर्यादी, पंच साक्षीदार, ससून रुग्णालयातील डॉक्टर, वैज्ञानिक विश्लेषक महेश कदम तसेच तपास अधिकारी यांची साक्ष महत्त्वाची ठरली. सरकार पक्षाचा युक्तिवाद अतिरिक्त सरकारी वकिल पुष्पा कापसे (गायके) यांनी केला. सरकारी पक्षाने मांडलेल्या पुराव्यांचा स्वीकार करत न्यायालयाने आरोपीस शिक्षा सुनावली. या खटल्यात पैरवी अधिकारी आशा खामकर यांनी सहकार्य केले.

Ahilyanagar News : मोठी बातमी, गोळीबार प्रकरणात आरोपीस तीन वर्षांची शिक्षा Read More »

devendra fadnavis

Devendra Fadnavis अनुकंपाचा अनुशेष संपणार; 10,309 नियुक्तीपत्रे प्रदान करणार

Devendra Fadnavis: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी वर्षानुवर्षे रखडलेली अनुकंपा प्रकरणे मार्गी लावण्याच्या सूचना दिल्यानंतर आता ही प्रक्रिया अंतिम टप्प्यात आली असून, येत्या 4 ऑक्टोबर रोजी 5187 अनुकंपा उमेदवारांना शासकीय नोकरीची नियुक्तीपत्रे प्रदान केली जाणार आहेत. याचवेळी 5122 एमपीएससीद्वारे नियुक्तांनाही प्रमाणपत्र दिली जाणार असून, एकाचदिवशी 10,309 उमेदवार शासकीय नोकरीत दाखल होतील. अशाप्रकारचा हा इतिहासातील एक अनोखा कार्यक्रम ठरेल. शासकीय नोकरीत असताना कर्मचार्‍याचा मृत्यू झाल्यास त्याच्या पत्नी अथवा अपत्याला नोकरी दिली जाते. पण, कधी तांत्रिक कारणाने तर कधी प्रशासकीय दिरंगाईने या नियुक्त्या रखडत होत्या. त्यामुळे त्यांना दीर्घ प्रतिक्षा करावी लागते. अशात या संवेदनशील विषयात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी लक्ष घातले. त्यांनी सामान्य प्रशासन विभागाला सूचना केल्या. सातत्याने प्रशासकीय बैठकांमध्ये त्याचा आढावा घेतला आणि नवीन अनुकंपा धोरण तयार करण्यात आले. त्याचा परिणाम म्हणून अनुकंपा प्रतिक्षायादीतील 5187 अनुकंपा उमेदवारांना एकाचवेळी नियुक्तीपत्रे दिली जाणार आहेत. यामुळे अनुकंपाचा एक मोठा अनुशेष संपुष्टात येणार आहे. 4 ऑक्टोबरला मुख्य कार्यक्रम हा मुंबईत होईल आणि त्याला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजित पवार हे उपस्थित असतील, तर पालकमंत्री आपआपल्या जिल्ह्यात नियुक्तीपत्रे वितरित करतील. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आधी 100 दिवस आणि नंतर 150 दिवसांच्या प्रशासकीय सुधारणांच्या हाती घेतलेल्या कार्यक्रमातील हा महत्त्वाचा टप्पा होता. यासोबतच एमपीएससीतर्फे परीक्षा घेण्यात आलेल्या लिपीक-टायपिस्ट श्रेणीतील 5122 उमेदवारांना सुद्धा नियुक्तीपत्रे दिली जाणार आहेत. एकूण 10,309 उमेदवारांपैकी सर्वाधिक 3078 उमेदवार हे कोकण विभागातील असून, 2597 हे विदर्भातील आहेत. पुणे विभागात 1674, नाशिक विभागात 1250, तर मराठवाड्यातील 1710 उमेदवार आहेत.

Devendra Fadnavis अनुकंपाचा अनुशेष संपणार; 10,309 नियुक्तीपत्रे प्रदान करणार Read More »

asaduddin owais

Asaduddin Owais: नगर शहरात 30 सप्टेंबरला ओवैसींची जाहीर सभा; करणार मोठी घोषणा?

Asaduddin Owais: ऑल इंडिया मजलिस-ए-इत्तेहादुल मुस्लीमीन ( AIMIM) चे प्रमुख आणि खासदार असदुद्दीन ओवैसी यांची 30 सप्टेंबर रोजी अहमदनगर शहरात जाहीर सभा होणार असल्याची माहिती एआयएमआयएमचे जिल्हाध्यक्ष परवेज अशरफी आणि महाराष्ट्र युवक अध्यक्ष अंजर खान यांनी माध्यमांशी बोलताना दिली. खासदार असदुद्दीन ओवैसी यांची जाहीर सभा नगर शहरातील मुकुंदनगर भागातील सीआयव्ही कॉलनी ग्राउंड येथे संध्याकाळी 7.00 वाजता होणार असून या सभेतून खासदार ओवैसी आगामी महानगरपालिका निवडणुकीसाठी मोठी घोषणा करणार का? याकडे सर्वांचे लक्ष लागून आहे. तर दुसरीकडे खासदार असदुद्दीन ओवैसी यांच्यासह 30 सप्टेंबर रोजी शहरात एआयएमआयएमचे प्रदेशाध्यक्ष आणि माजी खासदार इम्तियाज जलील देखील उपस्थित राहणार आहे. त्यामुळे या सभेतून अहमदनगर शहरासाठी एमआयएमकडून कोणती मोठी घोषणा करण्यात येणार याबाबत जिल्ह्याच्या राजकारणात अनेक चर्चांना उधाण आले आहे.

Asaduddin Owais: नगर शहरात 30 सप्टेंबरला ओवैसींची जाहीर सभा; करणार मोठी घोषणा? Read More »

nitesh rane attack on uddhav thackeray

Nitesh Rane on Uddhav Thackeray : उद्धव ठाकरेंनी स्वतःचा कुर्ता खराब करण्यासाठी रस्त्यावर उतराव; मंत्री राणेंचा हल्लाबोल

Nitesh Rane on Uddhav Thackeray : आम्ही सगळे जमिनीवरचे आहोत. घरात बसून राजकारण करणारे लोक नाही. कधी तरी स्वतःचा कुर्ता खराब करण्यासाठी रस्त्यावर उतराव अशी टीका राज्याचे मंत्री नितेश राणे यांनी ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांच्यावर केली आहे. राज्यातील अनेक भागात अतिवृष्टी झाल्याने शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. त्यामुळे पीएम केअर फंडमधून शेतकऱ्यांना कर्ज माफी देण्यात यावी अशी मागणी शिवसेना ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरेंनी केली आहे. तर आता या मागणीवर प्रतिक्रिया देत स्वतः मुख्यमंत्री असताना काय केलं असा सवाल मंत्री नितेश राणे यांनी विचारला आहे. माध्यमांशी बोलताना मंत्री नितेश राणे म्हणाले की, स्वतः मुख्यमंत्री असताना काय केलं त्यांनी. पंतप्रधान मोदी आणि आम्ही सगळे जमिनीवरचे आहोत. घरात बसून राजकारण करणारे लोक नाही. कधी तरी स्वतःचा कुर्ता खराब करण्यासाठी रस्त्यावर उतराव असं माध्यमांशी बोलताना मंत्री राणे म्हणाले. तर दुसरीकडे त्यांनी यावेळी पंतप्रधान मोदी आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या भेटीवर देखील प्रतिक्रिया दिली. यावेळी मंत्री राणे म्हणाले की, सकारात्मक गोष्ट आहे. दोन दिवस मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी प्रत्येक भागाचा दौरा केला. आमच डबल इंजिनच सरकार आहे, याचा फायदा आमच्या राज्याला होणार. केंद्र सरकारने महाराष्ट्राला कधीच खाली हात पाठवलं नाही. या संकटाच्या काळात सुद्धा पंतप्रधान नरेंद्र मोदी आमच्या राज्याला भरभरून देतील.

Nitesh Rane on Uddhav Thackeray : उद्धव ठाकरेंनी स्वतःचा कुर्ता खराब करण्यासाठी रस्त्यावर उतराव; मंत्री राणेंचा हल्लाबोल Read More »