DNA मराठी

Maharashtra

bear attacks

Buldhana News : करवंड शिवारात दोघावर अस्वलाचा हल्ला, 2 जण गंभीर जखमी

Buldhana News : ज्ञानगंगा अभयारण्याला लागून असलेल्या करवंड शिवारात शेतात काम करणाऱ्या 2 जणावर अस्वलाने हल्ला केला आहे. यात एक जण गंभीर जखमी झाला असून त्याला पुढील उपचारासाठी अकोला रेफर करण्यात आले तर दुसऱ्यावर बुलडाणा येथील जिल्हा सामान्य रुग्णालयात उपचार सुरू आहे. या घटनेने परिसरातील शेतकरी व नागरिकात भीतीचे वातावरण पसरलेले आहे. चिखली तालुक्यातील करवंड शिवारात रोहिदास हंजारी राठोड वय 42 वर्ष हे शेतात फवारणी करत असताना त्यांच्यावर अस्वलाने हल्ला चढविला आजूबाजूच्या शेतकऱ्यांनी आरडाओरड केल्याने अस्वलाने पळ काढला. मात्र पुढे दुसऱ्या शेतात काम करणाऱ्या दत्तात्रय दगडू लहाने वय 52 वर्ष रा. करवंड यांच्यावर देखील अस्वलाने हल्ला केला. यात ते देखील जखमी झाले आहे. दोन्ही जखमींना बुलडाणा येथील जिल्हा सामान्य रुग्णालयात दाखल करण्यात आले. त्यापैकी रोहिदास राठोड हे गंभीर जखमी असल्याने त्यांना पुढील उपचारासाठी अकोला रेफर करण्यात आले आहे.

Buldhana News : करवंड शिवारात दोघावर अस्वलाचा हल्ला, 2 जण गंभीर जखमी Read More »

devendra fadnavis

Devendra Fadnavis: इतके कंफ्यूज विरोधक जीवनात कधी पहिले नव्हते ; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

Devendra Fadnavis: महाविकास आघाडीचे नेते आणि मनसे प्रमुख राज ठाकरे यांनी आज राज्य निवडणूक आयोगाची भेट घेत मतदार यादीत घोळ असल्याने आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका घेऊ नये अशी मागणी केली आहे. तसेच राज्यात पाच वर्षांपासून निवडणुका झालेल्या नाही आणि आणखी सहा महिने झाले नाहीतर काही फरक पडणार नाही असं राज ठाकरे यांनी म्हटले आहे. तर जेव्हापर्यंत मतदार यादीमध्ये असलेला घोळ दूर होत नाही तोपर्यंत निवडणुका घेऊ नका अशी मागणी राज्याचे माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केली आहे. तर आता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विरोधकांवर जोरदार हल्लाबोल करत इतके कंफ्यूज विरोधक जीवनात कधी पहिले नव्हते असा टोला लावला आहे. सोलापुरात माध्यमांशी बोलताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले की, इतके कंफ्यूज विरोधक जीवनात कधी पहिले नव्हते. आगामी निवडणुकीत पराभव दिसत असल्याने आधीच नेरेटिव्ह तयार करण्याचा प्रयत्न करण्यात येत आहे. तसेच विरोधकांमध्ये सर्वात समजदार हे शरद पवार आहेत. मतदार यादीत सुधारणा करण्यास माझा पाठिंबा आहे असं माध्यमांशी बोलताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले.

Devendra Fadnavis: इतके कंफ्यूज विरोधक जीवनात कधी पहिले नव्हते ; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस Read More »

cidco lottery

Devendra Fadnavis: मोठी बातमी! दिवाळीत निघणारी सिडकोची लॉटरी पुन्हा लांबणीवर

Devendra Fadnavis: दिवाळीत निघणारी सिडकोची लॉटरी पुन्हा लांबणीवर असल्याची माहिती समोर आली आहे. राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि दोन्ही उपमुख्यमंत्री सिडकोच्या घराच्या किमती कमी करण्यासंदर्भामध्ये बैठक आयोजित करणार होते मात्र आता ही बैठक पुढे ढकलण्यात आली असल्याची माहिती समोर आली आहे. मुख्यमंत्री नवी मुंबईमध्ये आल्यानंतर पंधरा दिवसात सिडकोच्या घरांच्या किमती कमी करण्यासंदर्भामध्ये बैठक लावू असे आश्वासन माथाडी कामगार मेळाव्यात देण्यात आलं होतं मात्र सिडकोच्या घराच्या किमती कमी करण्यासंदर्भामध्ये सिडको आणि मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांकडून अद्याप कोणताही निर्णय न घेतल्यामुळे सिडकोची लॉटरी आता लांबणीवर पडली आहे. सिडकोच्या लॉटरीत 22 हजारपेक्षा जास्त घरे काढणार आहेत. मात्र सर्वसामान्य नागरिकांना ह्या घरांच्या किमती न परवडणाऱ्या असल्याने वारंवार किमती कमी करण्याची मागणी होत आहे. त्यामुळे दिवाळीत निघणारी सिडकोची लॉटरी आता लांबणीवर पडल्याने नागरिकांचे स्वप्न भंग झालं असंच म्हणायला हवं.

Devendra Fadnavis: मोठी बातमी! दिवाळीत निघणारी सिडकोची लॉटरी पुन्हा लांबणीवर Read More »

mns

Raj Thackeray: मनविसेकडून ABVP कार्यालयाला टाळं, प्रत्युत्तरात ABVP चीही घोषणाबाजी…

Raj Thackeray: पुणे शहरात महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेना (मनविसे) आणि अखिल भारतीय विद्यार्थी परिषद (ABVP) यांच्यात तणावाचे वातावरण निर्माण झाले. वाडिया कॉलेज परिसरात ABVP ने ‘बायकॉट मनविसे’ अशी पोस्टर्स लावल्याचा आरोप करत मनविसे कार्यकर्त्यांनी संताप व्यक्त केला. या निषेधार्थ मनविसे कार्यकर्त्यांनी टिळक रोडवरील ABVP च्या पुणे कार्यालयावर धडक देत कुलूप ठोकले. कार्यालयाबाहेर घोषणाबाजी करत त्यांनी जोरदार आंदोलन केले. मनविसेच्या कार्यकर्त्यांचा आरोप आहे की ABVP जाणूनबुजून वाद निर्माण करत आहे. दरम्यान, या घटनेनंतर ABVP कार्यकर्त्यांनीही त्यांच्या बंद कार्यालयाबाहेर प्रतिउत्तरात घोषणाबाजी करत आंदोलन सुरू केले. त्यामुळे पुण्यात दोन्ही विद्यार्थी संघटनांमध्ये संघर्षाचे वातावरण चिघळले आहे. दरम्यान आता यामध्ये पोलिसांनी मध्यस्थी केली असून पुढील कारवाई सुरू केली असल्याची माहिती कृषिकेश रावले,पोलीस उपायुक्त झोन-1 यांनी दिली.

Raj Thackeray: मनविसेकडून ABVP कार्यालयाला टाळं, प्रत्युत्तरात ABVP चीही घोषणाबाजी… Read More »

chandrashekhar bawankule

Chandrashekhar Bawankule : मोठी बातमी! महसूल विभागात जमीन मोजणी आता फक्त 30 दिवसांत

Chandrashekhar Bawankule : जमीन मोजणी आता फक्त 30 दिवसांत करण्याचा निर्णय महसूल विभागाने घेतला आहे. महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या या निर्णयामुळे जमीन मोजणीचे कोट्यवधी प्रकरणे आता मार्गी लागणार आहे. राज्य सरकारकडून देण्यात आलेल्या माहितीनुसार, पोटहिस्सा, हद्द कायम, बिनशेती, गुंठेवारी, संयुक्त भूसंपादन मोजणी, वनहक्क दावे मोजणी, नगर भूमापन मोजणी, गावठाण भूमापन मोजणी व सिमांकन आणि मालकीहक्कासाठी मोजणी प्रक्रिया अत्यावश्यक मोजणी प्रकरणांचा 30 दिवसांत निपटारा करण्यासाठी परवानाधारक खाजगी भूमापकांची नियुक्ती करण्यात येणार आहे. याबाबत राज्य सरकारकडून अधिसूचना देखील जारी करण्यात आली आहे. त्यामुळे आता राज्यात जमीन मोजणी फक्त 30 दिवसात होणार आहे.

Chandrashekhar Bawankule : मोठी बातमी! महसूल विभागात जमीन मोजणी आता फक्त 30 दिवसांत Read More »

img 20251009 wa0004

Manoj Jarang: मराठा आंदोलकांवरील 11 गुन्हे मागे घेण्यास पात्र; जिल्हा त्रिसदस्यीय समितीची मान्यता

Manoj Jarang : गणेशोत्सवाच्या काळात सप्टेंबर महिन्यात मुंबई येथे मराठा संघर्ष योद्धा मनोज जरांगे पाटील यांच्या मराठा आरक्षणाच्यासंदर्भात सुरू असलेल्या आंदोलनाच्या समारोपात मराठा आरक्षण कृती समितीचे अध्यक्ष व नगरचे पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी जरांगे पाटील यांना दिलेल्या आश्वासनानुसार मराठा आंदोलकांवरील गुन्हे मागे घेण्याची प्रक्रिया सुरू झाली असून, नगर जिल्ह्यात मागच्या 2024 वर्षात झालेल्या आंदोलनांबद्दल दाखल गुन्ह्यांपैकी 11 गुन्हे मागे घेण्यासाठी जिल्हास्तरावर स्थापन करण्यात आलेल्या त्रिस्तरीय समितीने पात्र केले आहेत. त्यांची पुढील न्यायालयीन प्रक्रियाही पोलिसांद्वारे सुरू करण्यात आली आहे. या गुन्ह्यांमध्ये कोपरगाव, नगर एमआयडीसी, भिंगार कॅम्प व श्रीगोंदे पोलिस ठाण्यातील प्रत्येकी दोन तर कोतवाली, शेवगाव व श्रीरामपूर पोलिस ठाण्यांतील प्रत्येकी एका गुन्ह्याचा समावेश आहे. दरम्यान, मागे घेण्यास पात्र 11 गुन्हे वगळता अन्य गुन्हेही मागे घेण्याबाबत समितीद्वारे तपासणी सुरू असल्याचे सांगण्यात आले. हैदराबाद गॅझेटमधील नोंदीनुसार मराठा समाजाला कुणबी प्रमाणपत्र दिले जावे, या मागणीसाठी जरांगे पाटील यांनी मुंबईत पाच दिवस आंदोलन केले होते. त्यानंतर सरकारने तसा निर्णय घेतला व हैदराबाद गॅझेटीयरमधील नोंदीनुसार कुणबी प्रमाणपत्र वितरणाचा आदेश काढून त्याची अंमलबजावणीही सुरू केली आहे. जलसंपदा मंत्री व पालकमंत्री राधाकृष्ण विखे यांनी मुंबई उपोषणाच्या सांगतेच्यावेळी दाखल गुन्हे मागे घेण्याचे आश्वासन जरांगे पाटील यांना दिले होते. त्यानुसार त्रिस्तरीय समिती स्थापन करून दाखल गुन्ह्यांची तपासणी करण्यात आली व या तपासणीनंतर 11 गुन्हे मागे घेण्यास पात्र ठरवले गेले आहे. 2024 मध्ये दाखल या गुन्ह्यांचे दोषारोप पत्र न्यायालयात दाखल करण्यात आले आहे. त्यामुळे आता हे गुन्हे मागे घेण्यास पात्र ठरल्याने पुढील न्यायालयीन प्रक्रिया केली जाणार आहे. भारतीय दंड विधान कलम 341, 143, 188 तसेच महाराष्ट्र पोलिस अधिनियम 37 (1) 135, 37 (1) (3) 135 व 37 (1) (3) आदी कलमांन्वये हे गुन्हे दाखल होते. मागे घेण्यास पात्र ठरलेल्या 11 गुन्ह्यांमध्ये श्रीरामपूर तालुका पोलिस ठाणे (क्रमांक 85-2024), कोपरगाव शहर पोलिस ठाणे (84-2024), कोपरगाव तालुका पोलिस ठाणे (52-2024), भिंगार कॅम्प पोलिस ठाणे (171-2024) व भिंगार कॅम्प पोलिस ठाणे (172-2024), कोतवाली पोलिस ठाणे (213-2024), एमआयडीसी पोलिस ठाणे (171-2024), एमआयडीसी पोलिस ठाणे (172-2024), श्रीगोंदा पोलिस ठाणे (215-2024), श्रीगोंदा पोलिस ठाणे (216-2024) व शेवगाव पोलिस ठाणे (155-2024) या गुन्ह्यांचा समावेश आहे. शिष्टमंडळाने केली चर्चा जरांगे पाटील यांचे उपोषण सोडविण्याच्या वेळी सरकारने राधाकृष्ण विखे पाटील यांच्या माध्यमातून दिलेल्या शब्दाप्रमाणे आंदोलनादरम्यान मराठा समाजातील बांधवांवर दाखल करण्यात आलेले गुन्हे मागे घेण्यात यावे या मागणीच्या अनुषंगाने अहिल्यानगर सकल मराठा समाजाच्या शिष्टमंडळाने जिल्हा पोलिस अधीक्षक सोमनाथ घार्गे यांची नुकतीच भेट घेतली व जिल्ह्यातील सर्व मराठा आरक्षण आंदोलकांवर दाखल झालेले गुन्हे मागे घेण्यात यावे यासंदर्भात चर्चा केली. त्यानुसार जिल्हा पोलिस अधीक्षक घार्गे यांनी त्रिसदस्य समिती गठीत करून गुन्हे माघारी घेण्याची प्रक्रिया केली आहे व त्यानुसार जिल्ह्यातील साधारण 11 पोलिस ठाण्यांतील गुन्हे तपासून माघारीची प्रक्रिया सुरू आहे व बाकीच्या राहिलेले गुन्ह्यांची तपासणी सुरू आहे, अशी माहिती दिली. या कार्यवाहीबद्दल सकल मराठा समाजाच्या शिष्टमंडळाने कृतज्ञता व्यक्त केली. या शिष्टमंडळात अहिल्यानगर सकल मराठा समाजाच्यावतीने अ‍ॅड. अनुराधा येवले, अ‍ॅड गजेंद्र दांगट, अ‍ॅड हरीश भामरे यांच्यासह मदन आढाव, वैभव भोगाडे, स्वप्निल दगडे, अभय शेडगे, निलेश सुबे, राम जरांगे, संदीप जगताप, प्रमोद कोरडे, सिद्धांत पानसरे, भारत भोसले, रमेश मुंगसे, सागर भोसले, जगन्नाथ निमसे, सोमनाथ गुंड, राम सातपुते आदी उपस्थित होते.

Manoj Jarang: मराठा आंदोलकांवरील 11 गुन्हे मागे घेण्यास पात्र; जिल्हा त्रिसदस्यीय समितीची मान्यता Read More »

saif ali khan

पत्नी की गर्लफ्रेंड कुणासोबत काम काम करणं अवघड? Saif Ali Khan म्हणतो…

Saif Ali Khan : बॉलीवूडमधील सुपरस्टार अभिनेता सैफ अली खान नेहमी सोशल मीडियावर काही ना काही कारणाने चर्चेत असतो. नुकतंच त्याने एका मुलाखतीमध्ये सर्वांना धक्का देणारा विधान केला आहे ज्यामुळे तो सोशल मीडियावर चर्चेत आहे. त्याने त्याची प्रेयसी आणि पत्नीसोबत काम करण्याबाबत आपले मत व्यक्त केले. कोणासोबत काम करणे ही सर्वात मोठी चूक आहे? एस्क्वायर इंडियाला दिलेल्या मुलाखतीत सैफने 90 च्या दशकातील त्याच्या चित्रपटांवर आणि 2000 नंतर आलेल्या बदलांवर चर्चा केली. त्याने असेही म्हटले की त्याची पत्नी आणि प्रेयसीसोबत काम करणे नेहमीच चांगली कल्पना नसते. 90 च्या दशकातील त्याच्या कारकिर्दीची सुरुवात आठवून सैफ म्हणाला की लोक त्याला इतक्या संधी मिळाल्याबद्दल भाग्यवान मानत होते. तथापि, त्याने असेही स्पष्ट केले की त्यावेळी त्याला इंडस्ट्रीमध्ये सर्वोत्तम चित्रपट मिळत नव्हते आणि त्याला क्वचितच मुख्य भूमिकांमध्ये कास्ट केले जात असे. पत्नी आणि प्रेयसीसोबत काम करणे ही चांगली कल्पना का नाही असे विचारले असता, सैफ म्हणाला की कालांतराने त्याला जाणवले की तो त्याच्या सहकलाकारांसोबत निरोगी स्पर्धेत चांगले काम करतो. म्हणूनच त्याला वाटते की पत्नी आणि प्रेयसीसोबत काम करणे नेहमीच फायदेशीर नसते. सैफचा धक्कादायक खुलासा सैफने याबद्दल बोलण्याची ही पहिलीच वेळ नाही. 2021 मध्ये पिंकव्हिलाला दिलेल्या मुलाखतीत त्याने म्हटले होते की जर त्याला आणि करीनाला चांगला प्रोजेक्ट मिळाला तर त्यांना घरातील कामांमध्ये बदल करावे लागतील. तो पुढे म्हणाला की तो अशा दिग्दर्शकाचा शोध घेईल जो त्यांना फक्त पती-पत्नी म्हणून नव्हे तर ते अभिनेते आहेत म्हणून कास्ट करेल.

पत्नी की गर्लफ्रेंड कुणासोबत काम काम करणं अवघड? Saif Ali Khan म्हणतो… Read More »

Crime 1

Pune Crime News : पुण्यात तलवारीचा थरार, घरात घुसून महिलेस व मुलास मारहाण

Pune Crime News: पुण्यातील येरवडा परिसरात एक धक्कादायक घटना घडली. माहितीनुसार, लक्ष्मीनगर येथे रविवारी सकाळी चार जणांनी घरात शिरून एका महिलेस आणि तिच्या मुलावर तलवारीने हल्ला केला. या प्रकारामुळे नागरिकांमध्ये प्रचंड भीती आणि संतापाचे वातावरण आहे. फिर्यादी रहीसा महंमद शेख (वय 44, रा. कामराजनगर, येरवडा) यांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी जहूर शेख (28), सुलतान खान (20), आझाद खान (22) आणि मुस्तफा खान (21) हे सर्व एकाच परिसरातील रहिवासी असून, अचानक त्यांच्या घरात घुसले. “माझ्या आईला का मारले?” असा प्रश्न विचारत जहूर शेख याने हातातील तलवारीने फिर्यादी महिला आणि तिच्या मुलगा साजिदवर वार केले. यात दोघे गंभीर जखमी झाले. दरम्यान इतर आरोपींनी घरातील वस्तूंचे नुकसान केले तसेच शिवीगाळ करत दहशत निर्माण केली. या घटनेची माहिती मिळताच येरवडा पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत तपास सुरू केला आहे. आरोपींनी केलेल्या हल्ल्यामुळे स्थानिकांमध्ये भीतीचे वातावरण असून, नागरिकांनी पोलिसांकडून तत्काळ कठोर कारवाईची मागणी केली आहे.

Pune Crime News : पुण्यात तलवारीचा थरार, घरात घुसून महिलेस व मुलास मारहाण Read More »

Rohit Pawar

Rohit Pawar: क्रिकेटच्या मैदानात आमदार रोहित पवारांची फटकेबाजी

Rohit Pawar: जळगाव शहरात आयोजित एका शालेय क्रिकेट स्पर्धेच्या मैदानावर राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट) चे आमदार रोहित पवार यांनी आज भेट देत महाराष्ट्र आणि उत्तराखंड संघातील सामना पाहिला. सामना संपल्यानंतर त्यांनी स्वतः मैदानात उतरून काही फटकार ठोकत प्रेक्षकांचे लक्ष वेधून घेतले. खेळ संपल्यानंतर त्यांनी माध्यमांशी संवाद साधताना राजकीय क्षेत्रात येताना येणाऱ्या ‘गुगली, स्पिन आणि स्पेस’ डिल करणं शिकावं लागतं असं सांगितलं. पण, ‘गावठी शॉट’ म्हणजेच खालच्या पातळीचं वक्तव्य टाळावं लागतं, असं त्यांनी स्पष्टपणे नमूद केलं. यावेळी रोहित पवार यांनी मराठी मीडियालाही आपला ‘कोच’ संबोधत, “मीडिया वेळोवेळी वेडी वाकडी पण अभ्यासपूर्ण प्रश्न विचारतं. त्यांना टाळण्यापेक्षा योग्य उत्तरं देण्याचा प्रयत्न केल्यामुळेच मी कोणत्याही वादात अडकलेलो नाही,” अशी प्रतिक्रिया देखील रोहित पवार यांनी दिली.

Rohit Pawar: क्रिकेटच्या मैदानात आमदार रोहित पवारांची फटकेबाजी Read More »

asaduddin owais

Asaduddin Owais: ठरलं! 09 ऑक्टोबरला नगर शहरात खासदार ओवैसी घेणार जाहीर सभा; MIM कडून तयारी सुरू

Asaduddin Owais: ऑल इंडिया मजलिस-ए-इत्तेहादुल मुस्लीमीन ( AIMIM) चे प्रमुख आणि खासदार असदुद्दीन ओवैसी 9 ऑक्टोबर रोजी नगर शहरात जाहीर सभा घेणार असल्याची माहिती पक्षाकडून देण्यात आली आहे. खासदार ओवैसी यांची ही सभा मुकुंदनगर मधील सीआयव्ही ग्राउंड येथे संध्याकाळी 6 वाजता होणार आहे. यापूर्वी खासदार असदुद्दीन ओवैसी 30 सप्टेंबर रोजी नगर शहरात जाहीर सभा घेणार होते मात्र 29 सप्टेंबर रोजी शहरात दोन गटात वाद निर्माण झाल्याने पोलीस प्रशासनाने केलेल्या विनंतीनंतर खासदार ओवैसी यांनी सभा पुढे ढकलण्याचा निर्णय घेतला होता. तर आता ही सभा 09 ऑक्टोबर रोजी होणार असल्याची माहिती अहमदनगर एमआयएमकडून देण्यात आली आहे. तर दुसरीकडे खासदार असदुद्दीन ओवैसी यांची नगर शहरात पहिल्यांदाच होणाऱ्या या सभेत एमआयएम कडून आगामी पालिका निवडणुकीसाठी कोणती घोषणा होणार याकडे सर्वांचे लक्ष लागून आहे. खासदार असदुद्दीन ओवैसी यांच्यासह एमआयएम पक्षाचे प्रदेशाध्यक्ष आणि माजी खासदार इम्तियाज जलील देखील नगर शहरात 09 ऑक्टोबर रोजी येणार आहे.

Asaduddin Owais: ठरलं! 09 ऑक्टोबरला नगर शहरात खासदार ओवैसी घेणार जाहीर सभा; MIM कडून तयारी सुरू Read More »