DNA मराठी

Maharashtra

shankarrao gadakh

Shankarrao Gadakh : नगर जिल्ह्यात ठाकरेंना धक्का, गडाखांचा मोठा निर्णय; ‘या’ पक्षाकडून लढवणार निवडणूक

Shankarrao Gadakh : शिवसेनेचे (ठाकरे गट) माजी मंत्री शंकरराव गडाख यांनी नेवासा नगरपंचायतची निवडणूक पक्षाचे मशाल चिन्हाऐवजी क्रांतिकारी शेतकरी पक्षाच्या माध्यमातून लढवण्याचा निर्णय जाहीर केला आहे. माजी मंत्री गडाख यांच्या या निर्णयानंतर राज्यातील राजकारणात अनेक चर्चांना उधाण आले आहे. गडाख आता शिवसेना सोडण्याची तयारी करत असल्याची देखील चर्चा सध्या राजकीय वर्तुळात वर्तवली आहे. तर दुसरीकडे गडाख यांनी यापूर्वी सन 2017 मध्ये अपक्ष असताना क्रांतिकारी शेतकरी पक्षाच्या माध्यमातून निवडणूक लढवली होती. त्यावेळी त्यांचे सर्वाधिक नगरसेवक विजयी झाले होते. विधानसभेत विजयी झाल्यानंतर अपक्ष असलेले आमदार शंकरराव गडाख यांनी उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेत प्रवेश केला व मंत्रिपद मिळवले होते. मात्र, आता त्यांनी स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीत क्रांतिकारी शेतकरी पक्षाच्या माध्यमातून उतरण्याचा निर्णय जाहीर केला आहे.

Shankarrao Gadakh : नगर जिल्ह्यात ठाकरेंना धक्का, गडाखांचा मोठा निर्णय; ‘या’ पक्षाकडून लढवणार निवडणूक Read More »

prakash ambedkar

प्रकाश आंबेडकर यांनी घेतली डॉ. संपदा मुंडेंच्या कुटुंबीयांची भेट; केली मोठी मागणी

Prakash Ambedkar : वंचित बहुजन आघाडीचे प्रमुख ॲड. प्रकाश आंबेडकर सातारा जिल्ह्यातील फलटण डॉक्टर तरुणी आत्महत्या प्रकरणात बीडच्या वडवणीतील कवडगाव येथे कुटुंबीयांची भेट घेतली. यावेळी ॲड. प्रकाश आंबेडकर यांनी या प्रकरणात चौकशीसाठी एसआयटीची मागणी शासनाकडे केली आणि ती मागणी पूर्ण झाली. दोन दिवसांपूर्वी एसआयटीचे प्रमुख इथे कुटुंबाला भेटून गेले. आलेल्या बातम्यांवरून कळतंय डॉक्टरांना प्रेशराईज केलं जातं होते. वर्षभरात जेवढे पोस्टमार्टम महिला डॉक्टरच्या देखरेखीखाली झाली त्याची चौकशी एसआयटीने करावी. त्या केसमध्ये प्रेशराईज टाकलं जात होतं का नाही हे तपासणं गरजेचं आहे. प्रेशर कोण टाकत होतं? डॉक्टर मंडळी टाकत होती की राजकीय क्षेत्रातील की सामाजिक क्षेत्रातील मंडळी होती? त्यांचे फोन कॉल तपासले पाहिजेत त्यातून या आत्महत्याच खरं कारण कळेल. मुख्यमंत्री जे स्टेटमेंट करतात ते पोलिसांकडून माहिती घेऊनच करतात जे चुकीची माहिती मुख्यमंत्र्याला देतात त्यांच्यावर कारवाई करण्यात यावी. सूर्यवंशी प्रकरणात देखील पोलिसांनी मुख्यमंत्र्यांला चुकीची माहिती दिली आणि ती सभागृहात त्यांनी मांडली. कुटुंबातील एका व्यक्तीला सरकारी नोकरीत घ्या. जे कोणी आरोपी असतील राजकीय क्षेत्रातले असो किंवा इतर क्षेत्रातील असो त्यांच्यावर कारवाई करण्यात यावी अशी मागणी देखील यावेळी त्यांनी केली.

प्रकाश आंबेडकर यांनी घेतली डॉ. संपदा मुंडेंच्या कुटुंबीयांची भेट; केली मोठी मागणी Read More »

parth pawar

Parth Pawar Land Case : मुख्यमंत्री ॲक्शन मोडमध्ये; महिनाभरात मुंढवा जमीन प्रकरणी चौकशी अहवाल सादर होणार

Parth Pawar Land Case : पार्थ पवार जमीन व्यवहार प्रकरणात अनियमिततेतील आरोपांची चौकशी करण्यासाठी महसूल, मुद्रांक व नोंदणी विभागाचे अतिरिक्त मुख्य सचिव विकास खारगे यांच्या अध्यक्षतेखाली पाच सदस्यांची चौकशी समिती सरकारने स्थापन केली. यासंदर्भातील शासन आदेश जारी झाला असून, समितीला एक महिन्यात अहवाल द्यायचा आहे. पुणे शहरातील मुंढवा येथील सर्वे नंबर 88 मधील जमिनीच्या दस्ताच्या खरेदी-विक्री व्यवहार अनियमितता झाल्याचा प्रकार विविध प्रसिद्धी माध्यमांद्वारे समोर आला आहे. या प्रकरणाची सविस्तर चौकशी होणे आवश्यक असल्याने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सूचनेनुसार महसूलमंत्री चंंद्रशेखर बावनकुळे यांनी समिती स्थापन केली. महसूल, मुद्रांक व नोंदणी विभागाचे अपर मुख्य सचिव विकास खारगे यांच्या अध्यक्षतेखालील समितीत पुणे विभागीय आयुक्त, जमाबंदी आयुक्त आणि संचालक भूमी अभिलेख, नोंदणी महानिरीक्षक व मुद्रांक नियंत्रक, पुणे जिल्हाधिकारी व मुद्रांक विभागाचे सहसचिव असे पाच सदस्य आहेत. महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी सांगितले की, चौकशी समितीला प्रस्तुत प्रकरणात नेमकी अनियमितता झाली आहे किंवा नाही, याबाबत सखोल चौकशी करणे, अनियमितता झाल्याचे आढळल्यास, त्यासाठी जबाबदार असलेल्या संबंधितांवर जबाबदारी निश्चित करणे आणि त्यांच्यावर कारवाई करण्याची शिफारस शासनाकडे करणे, अनियमितता सिद्ध झाल्यास, सदर जमीन तिच्या मूळ स्थितीवर (पूर्वःस्थितीवर) आणण्यासाठी आवश्यक त्या उपाययोजना सुचविणे, तसेच भविष्यात अशा प्रकारची प्रकरणे पुन्हा घडू नयेत, यासाठी ठोस उपाययोजना सुचविण्यास सांगण्यात आले आहे.

Parth Pawar Land Case : मुख्यमंत्री ॲक्शन मोडमध्ये; महिनाभरात मुंढवा जमीन प्रकरणी चौकशी अहवाल सादर होणार Read More »

leopard

Ahilyanagar News : जिल्ह्यात विविध भागांत बिबट्याचा वावर…प्रशासनाकडून नागरिकांना महत्त्वाची सुचना

Ahilyanagar News : जिल्ह्याच्या विविध भागांत बिबट्याचा वावर असून सध्या ऊसतोडीचा हंगाम सुरू आहे. त्यामुळे ऊसतोडीच्या वेळी शेतकरी व मजुरांनी आवश्यक ती काळजी घ्यावी, असे आवाहन उपवनसंरक्षक धर्मवीर सालविठ्ठल यांनी केले आहे. ऊसतोड सुरू असताना शेतकरी आणि मजुरांनी आपल्या लहान मुलांना सुरक्षित ठिकाणी ठेवावे. अनेकदा मुलांना ऊसतोड सुरू असलेल्या भागातच खेळायला सोडले जाते. अशा वेळी मुलांना ठेवलेल्या ठिकाणी हातात घुंगराची काठी घेऊन एखाद्या मोठ्या व्यक्तीस थांबवावे, जेणेकरून बिबट्या दिसल्यास मुलांची सुरक्षा करता येईल. फार वाकून ऊसतोड करू नये; कारण अशा वेळी दुसरा एखादा प्राणी आहे असे समजून बिबट्याचा पाठमोरा हल्ला होऊ शकतो. ऊसतोड सुरू असताना ट्रॅक्टरवरील टेपरेकॉर्डर किंवा वायरलेस ब्लूटूथ स्पीकरद्वारे मोठ्या आवाजात गाणी लावावीत. यामुळे बिबट्या जवळ येण्याची शक्यता कमी होते. ऊसतोड किंवा शेतीची कामे करताना शक्यतो समूहाने काम करावे. एकट्या व्यक्तीने ऊसतोड किंवा शेतीची कामे करू नयेत. गावाजवळ, जंगलात, शेतात किंवा गावठाण हद्दीत बिबट दिसल्यास बघण्यासाठी गर्दी करू नये. त्यांना दगड मारून पळवण्याचा किंवा मोबाईलवर फोटो काढण्याचा प्रयत्न करू नये. बिबट तसेच त्याची पिल्ले आढळल्यास तात्काळ संबंधित वनपरिक्षेत्र अधिकाऱ्याशी संपर्क साधावा, असेही आवाहन करण्यात आले आहे.

Ahilyanagar News : जिल्ह्यात विविध भागांत बिबट्याचा वावर…प्रशासनाकडून नागरिकांना महत्त्वाची सुचना Read More »

img 20251105 wa0026

Ahilyanagar News : अतिवृष्टीने बाधित गावातील नुकसानीची केंद्रीय पथकाकडून पाहणी

Ahilyanagar News : जिल्ह्यात सप्टेंबर महिन्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे शेती, घरे, रस्ते, पूल, वीज व पाणीपुरवठा तसेच सार्वजनिक मालमत्तेचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. या पार्श्वभूमीवर केंद्र शासनाच्या उच्चस्तरीय केंद्रीय पथकाने ५ नोव्हेंबर रोजी पाथर्डी तालुक्यातील विविध गावांना भेट देऊन नुकसानीची प्रत्यक्ष पाहणी केली. या पथकाचे नेतृत्व भारत सरकारच्या सहसचिव आर. के. पांडे यांनी केले. त्यांच्यासोबत कृषी व शेतकरी कल्याण विभागाचे संचालक डॉ. अरविंद वाघमारे, तसेच गृह मंत्रालयाचे आशिष गौर, उपस्थित होते. पथकासोबत जिल्हाधिकारी डॉ. पंकज आशिया, जिल्हा परिषदेचे अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी विजय मुळीक, उपविभागीय अधिकारी प्रसाद मते, तहसीलदार उद्धव नाईक, जिल्हा अधीक्षक कृषि अधिकारी सुधाकर बोराळे, जिल्हा जलसंधारण अधिकारी पांडुरंग गायसमुद्रे व इतर अधिकारी उपस्थित होते. पथकाने पाथर्डी तालुक्यातील करंजी, देवराई, पारेवाडी व सोमठाणे खुर्द या गावांना भेट दिली. करंजी येथे राष्ट्रीय महामार्गावरील नुकसानग्रस्त पुलाची पाहणी करण्यात आली. यावेळी पावसाचे पाणी घरात शिरल्याने नुकसान झालेल्या ग्रामस्थ राजेंद्र पारेकर यांच्याशी पथकाने संवाद साधून परिस्थितीची माहिती घेतली. तसेच शेतकरी बबनराव दानवे यांच्या संत्रा फळबागेची व पावसामुळे खरडून गेलेल्या जमिनीची पाहणी केली. यावेळी पथकाने भविष्यात अशा आपत्तीजनक परिस्थिती उद्भवू नयेत यासाठी कायमस्वरूपी उपाययोजना करण्याच्या सूचना संबंधित अधिकाऱ्यांना दिल्या. यानंतर पथकाने देवराई येथील बंधारे व पारेवाडी येथील पाण्यामुळे क्षतिग्रस्त झालेल्या पुलाचीही पाहणी केली. जिल्ह्यातील नुकसानग्रस्त पुलांची व बंधाऱ्यांची सविस्तर माहिती घेत पथकाने आवश्यक त्या ठिकाणी पुनर्बांधणी करण्याच्या सूचना दिल्या. तसेच सोमठाणे खुर्द येथील शेतकरी मोहन शिदोरे यांच्या शेतातील तूर व बाजरी पिकांचे झालेले नुकसान प्रत्यक्ष पाहून पथकाने संबंधित अधिकाऱ्यांकडून शेतकऱ्यांना दिलेल्या तातडीच्या मदतीची माहितीही जाणून घेतली. केंद्रीय पथकाने संपूर्ण पाहणीदरम्यान ग्रामस्थांशी संवाद साधत नुकसानग्रस्तांना दिलासा देत त्यांच्या नुकसानीची माहिती जाणून घेतली.

Ahilyanagar News : अतिवृष्टीने बाधित गावातील नुकसानीची केंद्रीय पथकाकडून पाहणी Read More »

sunil tatkare

Sunil Tatkare : राष्ट्रवादी काँग्रेस निवडणुकीला सज्ज; पुढील तीन दिवसात चर्चा; महायुतीवर सुनिल तटकरे स्पष्टच म्हणाले

Sunil Tatkare: तळागाळातील राष्ट्रवादी काँग्रेसचा कार्यकर्ता या निवडणुकीला सज्ज झाला असून आता राज्य व जिल्हास्तरावर महायुती म्हणून सामोरे जात असताना कशाकशापध्दतीने सामोरे जायचे हे ठरवायचे आहे.यासंदर्भात पुढील तीन दिवसात चर्चा होईल अशी माहिती राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष खासदार सुनिल तटकरे यांनी आढावा बैठकीनंतर माध्यमांशी बोलताना दिली. पालघर, ठाणे शहर, ग्रामीण मुंबई शहर, रायगड, रत्नागिरी या जिल्हयांची आढावा बैठक पार पडली. या बैठकीला राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष आणि उपमुख्यमंत्री अजितदादा पवार, राष्ट्रीय कार्याध्यक्ष खासदार प्रफुल पटेल, ज्येष्ठ नेते आणि माजी मंत्री नवाब मलिक, माजी मंत्री दिलीप वळसे पाटील आणि त्या- त्या जिल्ह्याचे संपर्कमंत्री, आमदार, माजी खासदार उपस्थित होते. सोमवारपासून सुरू झालेल्या या बैठकांना कार्यकर्त्यांचा मोठ्या प्रमाणात उत्साह पहायला मिळत आहे. प्रत्येक जिल्ह्यातील कार्यक्षेत्रातून इच्छुक उमेदवारांचे अर्ज मागविण्यात आले होते ती माहिती सर्वांनी सादर केली. आज भाजप नेते चंद्रशेखर बावनकुळे यांची आणि माझी चर्चा झाली. त्यामुळे येत्या मंगळवारी दुपारी मंत्रीमंडळाची बैठक झाल्यावर समन्वय समितीची बैठक होणार आहे. त्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या आढावा बैठकीत आम्ही ज्या भावना जिल्ह्याने मांडल्या त्या मला ज्ञात आहेत. शिवाय भाजप – शिवसेनाच्याही बैठका झाल्या. त्यांच्या नेत्यांना त्या ज्ञात आहेत.त्यामुळे मंगळवारच्या बैठकीत आम्ही नगरपरिषदा आणि नगरपंचायतीच्या निवडणूका जाहीर झाल्या त्या महायुती म्हणून ठरवणार आहोत अशी माहितीही सुनिल तटकरे यांनी दिली. राष्ट्रवादी काँग्रेसच्या बैठकांमध्ये प्रत्येक जिल्ह्यात जी काही राजकीय समीकरणे आहेत ती समजून घेत आहोत. त्यामुळे जाहीर झालेल्या निवडणुकीनंतर पक्षाचे कार्यकर्ते निवडणूकीच्या मोडवर गेले आहेत असेही सुनिल तटकरे यांनी स्पष्ट केले. शिवसेनेने जाहीरपणे रायगड जिल्ह्यात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाबरोबर युती नको असे त्यांच्या तिन्ही आमदारांनी आणि जिल्हाप्रमुखांनी मत व्यक्त केले आहे. मात्र राष्ट्रवादी काँग्रेसने कधीही जाहीरपणे याबद्दल मत व्यक्त केलेले नाही आणि कधी केलेही नव्हते. अजितदादांसमोर रायगड जिल्हाध्यक्षांनी याबद्दल सर्व माहिती दिली ही वस्तुस्थिती खरी आहे. आम्ही रायगडमध्ये बायकॉट करण्याचा संबंधच नाही. शिवसेनेने गेले काही दिवस स्वच्छपणाची भूमिका रायगड जिल्हयात मांडलेली आहे. त्याची माहिती जिल्हाध्यक्षांनी आमच्या राष्ट्रीय अध्यक्षांना दिली आहे. रायगडमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस ‘वेट अ‍ॅण्ड वॉच’ च्या भूमिकेत आहे त्यामूळे योग्यवेळी योग्य निर्णय होईल असेही सुनिल तटकरे यांनी पत्रकारांच्या प्रश्नांना उत्तर देताना सांगितले. भाजप आणि शिवसेनेसोबत वेगवेगळ्या पातळीवर संवाद सुरू आहेच. रायगड पुरते बोलायचे झाले तर रायगडमध्ये शिवसेनाच राष्ट्रवादी काँग्रेसबरोबर बोलणार नाही अशी उघड भूमिका घेतल्याने राष्ट्रवादीने त्यांच्याशी चर्चा करण्याचा प्रश्न उद्भवत नाही असेही सुनिल तटकरे यांनी पत्रकारांनी विचारलेल्या प्रश्नाला उत्तर देताना स्पष्ट केले.

Sunil Tatkare : राष्ट्रवादी काँग्रेस निवडणुकीला सज्ज; पुढील तीन दिवसात चर्चा; महायुतीवर सुनिल तटकरे स्पष्टच म्हणाले Read More »

BJP

Maharashtra Election: पुण्यात भाजपचा ‘‘देवाभाऊ पॅटर्न’’; ‘या’ आमदारांवर मोठी जबाबदारी

Maharashtra Election : राज्यात स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीत ‘‘शतप्रतिशत भाजपा’’ असा निर्धार करण्यात आला असून, भाजपा पक्षश्रेष्ठींनी जिल्हा निवडणूक प्रमुख आणि प्रभारी यांनी नियुक्ती करीत ‘एक पाऊल पुढे’ टाकले आहे. माहितीनुसार, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचा बालेकिल्ला असलेल्या पुणे जिल्ह्यात भाजपा ‘‘देवाभाऊ पॅटर्न’’ राबवण्याच्या तयारी करत आहे. स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीसाठी भाजपाने जिल्हा निवडणूक प्रमुख आणि प्रभारी यांची घोषणा केली. पुणे जिल्ह्यात उपमुख्यमंत्री पवार यांचे ग्रामीण भागात चांगले वर्चस्व आहे. या ठिकाणी भाजपा विरुद्ध राष्ट्रवादी असाच सामना रंगणार आहे. त्यामुळे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आपल्या हक्काचे दोन हुकमी एक्के बाहेर काढले आहेत. पिंपरी-चिंचवडमधून भाजपाचे भोसरी विधानसभेतील आमदार महेश लांडगे यांना पुणे उत्तर (मावळ) मध्ये ‘‘जिल्हा निवडणूक प्रमुख’’ अशी जबाबदारी देण्यात आली आहे. तर दक्षिण पुणे जिल्हा (बारामती) निवडणूक प्रमुखपदी आमदार राहुल कुल यांना जबाबदारी सोपवली आहे. लांडगे आणि कूल दोघेही उपमुख्यमंत्री अजित पवार यांना स्थानिक पातळीवर आव्हान देणारे लोकप्रतिनिधी म्हणून ओळखले जातात. मध्यंतरी आमदार महेश लांडगे यांनी ‘‘पुणे जिल्ह्याचे विभाजन करा आणि उत्तर पुणे जिल्ह्याला ‘‘शिवनेरी’’ असे नाव द्या’’ अशी जाहीर मागणी केली होती. यावरुन अजित पवार विरुद्ध महेश लांडगे असा राजकीय संघर्ष सुरू झाला होता. त्यानंतर विधानसभा निवडणुकीतही लांडगे यांनी पवार यांच्याविरोधात दंड थोपाटले होते. 2017 मध्ये दिवंगत आमदार लक्ष्मण जगताप यांच्यासोबत महेश लांडगे यांनी पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेत भाजपाची सत्ता खेचून आणली आणि अजित पवार यांचा बालेकिल्ला काबिज केला होता. दुसरीकडे, आमदार राहुल कुल यांच्या सौभाग्यवती कांचन कुल यांनी 2019 मध्ये बारामतीच्या खासदार सुप्रिया सुळे यांच्या विरोधात लोकसभा निवडणूक लढवली होती. त्यापूर्वी, 2009 मध्ये राष्ट्रवादीने विधानसभा निवडणुकीत बंडखोर उमेदवाराला मदत केली, त्यावरुन नाराज झालेल्या राहुल कुल यांनी सुरूवातीला रासप आणि 2019 मध्ये भाजपात प्रवेश केला होता. पवार कुटुंबियांना थेट आव्हान देणारा नेता म्हणून कुल यांची ओळख आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आमदार महेश लांडगे आणि आमदार राहुल कुल यांना मोठी ताकद दिली आहे. त्यामुळे आगामी स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीत पुणे उत्तर आणि दक्षिण दिग्विजय करण्यासाठी भाजपाने ‘‘देवाभाऊ पॅटर्न’’ राबवण्याचे निश्चित केले आहे, असे निरीक्षण राजकीय जाणकारांनी नोंदवले आहे. पुणे जिल्ह्यात देवाभाऊंची ‘‘कमांड’’ विशेष म्हणजे, पुण्यात मंत्री चंद्रकांत पाटील, माधुरी मिसाळ, आमदार सिद्धार्थ शिरोळे असे मातब्बर असताना नवख्या गणेश बिडकर यांच्याकडे धुरा सोपवण्यात आली. तर पिंपरी-चिंचवडमध्ये माजी खासदार अमर साबळे, विधान परिषद आमदार अमित गोरखे, प्राधिकरणाचे माजी अध्यक्ष सदाशिव खाडे असे नेते आहेत. त्यांच्याकडे जबाबदारी न देता आमदार शंकर जगताप यांची निवडणूक प्रमुखपदी नियुक्ती केली आहे. तसेच, पुणे जिल्हा निवडणूक प्रभारी म्हणून केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांच्याकडे धुरा आहे. पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाचे पदसिद्ध अध्यक्ष मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आहेत. त्यामुळे फडणवीस यांनी पहिल्याच टप्प्यात पुणे जिल्ह्यातील स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकांवर ‘‘कमांड’’ मिळवली आहे, असे चित्र आहे. पुण्यात बिडकर, पिंपरी-चिंचवडमध्ये जगताप… पुणे महानगरपालिका क्षेत्रात स्थानिक स्वराज्य संस्था निवडणूक प्रमुख म्हणून गणेश बिडकर यांची नियुक्ती झाली आहे. तर पिंपरी-चिंचवडमध्ये निवडणूक प्रमुख म्हणून चिंचवडचे आमदार शंकर जगताप यांना जबाबदारी दिली आहे. बिडकर आणि जगताप हेसुद्धा मुख्यमंत्री फडणवीस यांच्या शब्दाबाहेर नाहीत. पिंपरी-चिंचवड आणि पुण्यातील शहराध्यक्ष पदाच्या नियुक्तीवरुन काही प्रमाणात कुरबुरी होत्या. पुण्यात घाटेंना आणि पिंपरी-चिंचवडमध्ये काटेंना शहराध्यक्षपदी संधी दिल्यामुळे बिडकर आणि जगताप यांच्यात नाराजी होती, असे बोलले जाते. या ‘गृहकलहाचा’ परिणाम आगामी महापालिका निवडणुकीत होवू नये. या करिता शहराध्यक्षांना निवडणूक प्रमुखपदाची जबाबदारी न देता पुण्यातून बिडकर आणि पिंपरी-चिंचवडमधून जगताप यांच्याकडे धुरा दिली आहे. महापालिका निवडणूक स्वबळावर झाल्यास, जगताप आणि बिडकर यांना भाजपाच्या ‘‘परफॉर्मन्स’’ची जबाबदारीही घ्यावी लागणार आहे. किंबहुना, राष्ट्रवादी अजित पवार गटासोबत दोन हात करण्यासाठी स्थानिक पातळीवर रणनिती आखावी लागणार आहे.

Maharashtra Election: पुण्यात भाजपचा ‘‘देवाभाऊ पॅटर्न’’; ‘या’ आमदारांवर मोठी जबाबदारी Read More »

crime

Pune Crime: धक्कादायक, अंधश्रद्धेच्या जाळ्यात आयटी अभियंता अडकला; भोंदूनी 14 कोटींचा गंडा घातला…

Pune Crime: पुण्यात अंधश्रद्धेचा आणखी एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. शहरातील एका आयटी क्षेत्रातील अभियंत्याची तब्बल 14 कोटी रुपयांची फसवणूक एका तथाकथित ‘गुरु’ आणि त्याच्या शिष्येने केल्याचे उघड झाले आहे. ‘दैवी शक्ती अंगात येते’ या नावाखाली या भोंदू जोडीने अभियंता आणि त्यांच्या कुटुंबाची आर्थिक व मानसिकपणे मोठी फसवणूक केली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, फसवणुकीचा बळी ठरलेले अभियंता दीपक डोळस हे काही वर्षे इंग्लंडमध्ये नोकरी करत होते. त्यांच्या दोन मुली आजारपणाने त्रस्त असल्याने त्यांनी उपचारासाठी अनेक ठिकाणी धावपळ केली. त्याच काळात त्यांची ओळख राजेंद्र उर्फ दीपक खडके आणि त्याची शिष्या वेदिका पंढरपुरकर यांच्याशी झाली. या दोघांनी ‘शंकर महाराज आमच्यात अवतरतात आणि ते दुर्धर आजार बरे करतात’ असा दावा करत डोळस कुटुंबाचा विश्वास संपादन केला. वेदिका हिने स्वतःच्या अंगात ‘शंकर महाराज’ आले आहेत असा आभास निर्माण केला. त्यानंतर त्यांनी डोळस यांना सांगितले की, पूजा करून आणि धन ‘दैवी शक्ती’साठी वापरल्यास त्यांच्या मुलींचे आजार दूर होतील. या बहाण्याने दोघांनी डोळस दांपत्याकडील सर्व बँक ठेवी आणि बचत निधी आपल्या खात्यात वळवून घेतला. एवढ्यावर न थांबता, डोळस यांचे इंग्लंडमधील घर आणि फार्महाऊस विकून त्याचे पैसेही वेदिका पंढरपुरकरच्या खात्यात जमा करण्यात आले. तरीही मुलींच्या तब्येतीत सुधारणा न झाल्याने डोळस यांनी कारण विचारले असता, खडके-पंढरपुरकर जोडीने त्यांच्या घरात ‘दोष’ असल्याचे सांगून आणखी पैसे मागितले. त्यांनी पुण्यातील मालमत्ता विकण्यास सांगितले, आणि जेव्हा काहीच उरले नाही, तेव्हा घरावर आणि वैयक्तिक कर्ज काढण्यास भाग पाडले. 2018 पासून सुरू असलेल्या या फसवणुकीतून या भोंदू जोडीने एकूण 14 कोटी रुपये डोळस यांच्याकडून घेतले. पोलिस तपासात समोर आले आहे की, या पैशातून दोघांनी कोथरुडमधील महात्मा सोसायटी परिसरात एक आलिशान बंगला खरेदी केला आहे. या घटनेनंतर डोळस कुटुंबाचे संपूर्ण आयुष्य उद्ध्वस्त झाले असून, सध्या पोलिसांनी या दोघांविरुद्ध गुन्हा दाखल करून तपास सुरू केला आहे. अंधश्रद्धेच्या नावाखाली होत असलेल्या अशा आर्थिक फसवणुकीने पुन्हा एकदा समाजात जागरूकतेची गरज अधोरेखित केली आहे.

Pune Crime: धक्कादायक, अंधश्रद्धेच्या जाळ्यात आयटी अभियंता अडकला; भोंदूनी 14 कोटींचा गंडा घातला… Read More »

devendra fadnavis

Devendra Fadnavis: भारतीय संघातील महाराष्ट्रीयन खेळाडूंना रोख पारितोषिक देणार मुख्यमंत्री फडणवीसांची मोठी घोषणा

Devendra Fadnavis: भारतीय महिला संघाने शानदार कामगिरी करत महिला क्रिकेट विश्वचषकातील अंतिम सामन्यात दक्षिण आफ्रिकेचा पराभव करत या स्पर्धेच्या इतिहासात पहिल्यांदाच आपलं नावं विश्वचषकावर कोरले. तर आता भारतीय महिला क्रिकेट संघाच्या या शानदार कामगिरीनंतर राज्य सरकारकडून या संघात सहभागी असणारे महाराष्ट्रीयन खेळाडूंचा सत्कार करण्यात येणार असल्याची माहिती माध्यमांशी बोलताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली. राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीनंतर त्यांनी माध्यमांशी संवाद साधला. यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले की, भारतीय महिला क्रिकेट संघाचं राज्यसरकारकडून अभिनंदन सत्कार करण्यात येणार आहे. याबाबत राज्यमंत्रिमंडळाच्या बैठकीत निर्णय घेण्यात आला आहे. राज्यातील खेळाडूंना रोख पारितोषिक देणार येणार आहे. स्मृती मंधाना, जेमिमा रॅाड्रिग्ज, राधा यादव यांचा सन्मान केला जाणार असं देवेंद्र फडणवीस म्हणाले. तर दुसरीकडे यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पुणे जिल्ह्यात आढळून आलेल्या बिबट्यासंदर्भात देखील प्रतिक्रिया दिली. यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले की, बिबट्यासंदर्भातला रेस्क्यू सेंटरला देण्याची परवानगी मिळावी असे प्रयत्न केले जात आहे. पुण्यात बिबट्याच्या हल्ल्यात अनेकजणांचा मृत्यू झाला आहे. पुणे, अहिल्यानगर भागात बिबट्यांची संख्या 1300 वर आहे. राज्यातील 21 प्रकल्पाचा काल मी आढावा घेतला आहे, ज्या प्रकल्पाची पुर्ण होण्याची जी नियोजित तारीख दिलेली आहे , ज्या प्रकल्पाची काम मागे पडली आहेत त्याच्या कंत्राटदारांना देखील बोलावलं होतं त्यांच्या त्यांनी अडचणी सांगतल्या, त्यांना तंबी दिलेली आहे. तसेच प्रोजेक्ट वेळेत पुर्ण झाले पाहिजे या दृष्टीने सुचना दिलेल्या आहे अशी माहिती यावेळी मुख्यमंत्री फडणवीस यांनी दिली.

Devendra Fadnavis: भारतीय संघातील महाराष्ट्रीयन खेळाडूंना रोख पारितोषिक देणार मुख्यमंत्री फडणवीसांची मोठी घोषणा Read More »

navneet rana

Navneet Rana : दुकानदारी चालवण्यासाठी राज आणि उद्धव ठाकरे एकत्र; नवनीत राणा स्पष्टच म्हणाल्या

Navneet Rana : निवडणूक आयोगा विरोधात आज राज्यातील विरोधी पक्षांनी एकत्र येत मुंबईत सत्याचा मोर्चा काढत मतदार यादी दुरुस्त करण्याची मागणी केली. तर दुसरीकडे लोकसभेमध्ये तुम्ही जिंकले तेव्हा म्हटलं लोकशाही जिवंत आहे, विधानसभेमध्ये पराभूत झाले तर म्हणता लोकशाहीची हत्या झाली अशी टीका माध्यमांशी बोलताना माजी खासदार नवनीत राणा यांनी केली. राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे हे फक्त दुकानदारी चालवण्यासाठी एकत्र आले असल्याचा दावा देखील यावेळी नवनीत राणा यांनी केला. माध्यमांशी बोलताना नवनीत राणा म्हणाल्या की, राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे हे फक्त दुकानदारी चालवण्यासाठी एकत्र आले आहे. उद्धव ठाकरे यांच्या सोबत येण्यापूर्वी राज ठाकरे म्हणायचे मज्जीद वरचे भोंगे काढा, हनुमान चालीसा म्हनायला लावत होते असं यावेळी नवनीत राणा म्हणाल्या. तसेच लोकसभेमध्ये तुम्ही जिंकले तेव्हा म्हटलं लोकशाही जिवंत आहे, विधानसभेमध्ये पराभूत झाले तर म्हणता लोकशाहीची हत्या झाली असं देखील यावेळी नवनीत राणा म्हणाल्या.

Navneet Rana : दुकानदारी चालवण्यासाठी राज आणि उद्धव ठाकरे एकत्र; नवनीत राणा स्पष्टच म्हणाल्या Read More »