Chhatrapati Shivaji Maharaj : छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा कोसळल्याप्रकरणी फरार शिल्पकार जयदीप आपटेला अटक
Chhatrapati Shivaji Maharaj : मालवणमधील राजकोट किल्ल्यातील छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा कोसळल्याप्रकरणी फरार असलेला शिल्पकार जयदीप आपटे याला ठाणे जिल्ह्यातील कल्याण येथून बुधवारी रात्री अटक करण्यात आली. जयदीप आपटेने तयार केलेला पुतळा उद्घाटनानंतर आठ महिन्यांपेक्षा कमी कालावधीनंतर 26 ऑगस्ट रोजी कोसळला, त्यानंतर सिंधुदुर्ग पोलिस त्याचा शोध घेत होते. त्याच्या शोधासाठी पोलिसांनी सात पथके तयार केली […]









