AIMIM News : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते अनावरण झालेले सिंधुदुर्ग जिल्ह्यातील मालवण मधील राजकोट किल्ल्यावरील छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा कोसळल्याने राज्यात राजकारण चांगलंच तापला आहे.
सध्या या प्रकरणावरून विरोधी पक्षांनी महायुतीच्या नेत्यांवर जोरदार टीका करत मुख्यमंत्र्यांकडे राजीनाम्याची मागणी केली. यातच अहमदनगर एआयएमआयएम जिल्हाप्रमुख डॉ. परवेज अशरफी यांनी देखील मुख्यमंत्र्यांना राजीनामा देण्याची मागणी केली आहे.
आपल्या निवेदनात त्यांनी म्हटले आहे की, रयतेचे राजे छत्रपती शिवाजी महाराज यांचा पुतळा महायुती सत्तेत आल्यानंतर पंतप्रधान मोदी यांचे हस्ते डिसेंबर २०२३ राजकोट, मालवण येथे उभारला आणि त्याचे श्रेय लाटले. परंतु सरकारच्या भ्रष्ट कारभारामुळे छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा एक वर्ष ही टिकला नाही.
महाराष्ट्रातील रयतेचे राजे ज्यांनी १८ पगड जाती आणि १२ बलुतेदार यांना एकत्र घेऊन रयतेचे राज्य स्थापन केले. त्यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांचा पूर्णाकृती पुतळा आठ महिन्यातच पाडला. यावरून स्पष्ट दिसते की महायुती सरकार आणि त्यांनी दिलेला ठेकेदार हे सर्वांनी भ्रष्टाचार करण्यात महाराजांनाही सोडलं नाही. पुतळा उभारण्यात ज्या ज्या बाबींची दक्षता घेणे आवशक होते त्या बाबींचा सरकारने विचार केलेला दिसत नाही. अवघ्या दोन महिन्यात सरकारने महाराजांचा पुतळा उभारण्यासाठी मंजुरी देऊन इतका मोठा पुतळा उभारण्याचा ज्याला काहीही अनुभव नाही अश्या व्यक्तीची शिफारस करून काम दिले.
मागील १० वर्षात मोदी सरकार यांनी बांधलेले पूल पैकी बहुतांश कोसळले, भव्य प्रभू रामाचे मंदिर सुधा गळायला लागले, नवीन संसद गळायला लागले, प्रभू राम मंदिर जवळील नवीन झालेले रस्त्यात मोठ मोठे खड्डे झाले, ज्यावेळेस पुतळा उभारण्यात आला होता. तेव्हा काही शिवप्रेमींनी शंका व्यक्त केली होती की सदर महाराजांचा पुतळा याचा दर्जा टिकण्या सारखे नसून चहेऱ्यावरचे हावभाव महाराजांचे नाही परंतु त्या विषयाला महायुती सरकारने दुर्लक्ष केले.
महाराजांचे नावाने राजकारण करतात त्याच महाराजांचे पुतळ्यात महायुती सरकारात भ्रष्टाचार केल्याचे दिसत आहे. पुतळा कोसळल्यावर मुख्यमंत्री यांनी पत्रकारांना सांगितले की वारे जोराने वाहत होते त्यामुळे पुतळा कोसडला. यावरून असे दिसते की मुख्यमंत्री यांना घटनेचा कोणताही गांभीर्य नव्हता किंवा त्यांनी हा प्रकार गांभीर्याने घेतलेला नाही.
प्रधानमंत्री आणि महाराष्ट्राचे मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री यांनी जनतेची माफी मागितली. परंतु सदर माफी ही फक्त ढोंग किंवा राजकीय नुकसान वाचवण्याचे हेतूने मागितली आहे. म्हणजेच मागितलेली माफी ही फक्त जनतेची दिशाभूल करणारी असल्याचा टोला डॉ परवेज अशरफी यांनी लावला.
खरंच महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार यांना छत्रपती शिवाजी महाराजांचा आदर आणि सन्मान असेल तर आपण छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्म स्थळी जाऊन नाक रगडून माफी मागावी आणि कोणताही विलंब न करता आपले पदाचे राजीनामे द्यावे असा सल्ला डॉ परवेज अशरफी यांनी दिला.
महाराजांचा पुतळा उभारण्यात जी सरकार भ्रष्टाचार करत असेल तर महाराजांच्या जनतेला न्याय कुठून देणार? असेही त्यांनी आपल्या निवेदनात म्हटले आहे.