DNA मराठी

latest news

IMG 20240102 WA0004

Ahmednagar News: शेतमाल चोरी करणाऱ्या 07 आरोपींना अटक, 9,26,000 रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त

Ahmednagar News : शेतकऱ्यांचा शेतमाल चोरी करणारी 07 आरोपींची टोळी 9,26,000 रुपये किमतीच्या मुद्देमालासह जेरबंद करण्यात आली आहे. स्थानिक गुन्हे शाखेने ही कारवाई केली.  फिर्यादी ऋषिकेश देविदास लगड यांनी त्यांच्या घरासमोर पटांगणामध्ये वाळण्यासाठी टाकलेली 84,000 रुपये किमतीची पांढरी तुर 27 डिसेंबर रोजी कोणीतरी अज्ञात चोरट्यांनी चोरुन नेली होती. सदर घटनेबाबत बेलवंडी पोलीस ठाण्यात भादवि कलम 379, 342 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला होता. सदर घटनेचा तपास करताना पोनि. दिनेश आहेर यांना गुप्त बातमीदारामार्फत सदरचा गुन्हा हा वैभव उर्फ बाल्या सुरेश औटी याने व त्याचे साथीदाराने केला असून आता ते हा शेतमाल विक्रीकरीता पारनेर येथे येणार असल्याची माहिती मिळाली.  या माहितीवरून स्थानिक गुन्हे शाखेतील पथकाने जामगांव ते पारनेर जाणारे रोडवर जामगांव घाट या ठिकाणी सापळा रचुनवैभव उर्फ बाल्या सुरेश औटी, अमोल संतोष माळी, रोहीत सुनिल शेळके, आकाश अजिनाथ गोलवड, किरण संजय बर्डे आणि साहील नामदेव माळी या आरोपींना अटक केली आहे.   पोलिसांनी ताब्यात घेण्यात आलेल्या आरोपींच्या कब्जामधून 96,000 रुपये किमतीची 12 क्विंटल पांढरी तुर, 30,000 रुपये किमतीची 6 क्विंटल सोयाबीन व 8,00,000 रुपये किमतीची टाटा कंपनीची इंट्रा गाडी असा एकुण 9,26,000 रुपये किमतीचा मुद्देमाल हस्तगत केला आहे.   ताब्यात घेण्यात आलेल्या आरोपींना बेलवंडी पोलीस ठाणेमध्ये  भादवि कलम 379, 342 प्रमाणे या गुन्ह्याचे तपासकामी बेलवंडी पोलीस ठाणे येथे हजर करण्यात आले असुन पुढील तपास बेलवंडी पोलीस ठाणे हे करीत आहेत.

Ahmednagar News: शेतमाल चोरी करणाऱ्या 07 आरोपींना अटक, 9,26,000 रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त Read More »

Chhatrapati Sambhajinagar

Chhatrapati Sambhajinagar: धक्कादायक! कारखान्याला भीषण आग, सहा मजुरांचा मृत्यू

Chhatrapati Sambhajinagar: छत्रपती संभाजीनगर येथील वाळूज मिडक येथील एका कारखान्यात काल रात्री भीषण आग लागली.  या अपघातात सहा मजुरांचा मृत्यू झाला. व्हॅलुज इंडस्ट्रियल इस्टेटमध्ये हातमोजे तयार करणाऱ्या सनशाईन एंटरप्रायजेसने मध्यरात्रीच्या सुमारास आग लागली.  आग इतकी तीव्र होती की संपूर्ण कंपनी उध्वस्त झाली. अग्निशामक ब्रिगेडला आग विझवण्यासाठी खूप संघर्ष करावा लागला. या आगीमध्ये सहा लोकांचा मृत्यू झाला आहे. अधिकाऱ्यांनी सांगितले की फॅक्टरीला वाळूज मिडीसी क्षेत्रात आग लागली. रात्री आग लागली तेव्हा कंपनी बंद झाली होती. माहिती मिळताच अग्निशमन दलाच्या अनेक वाहने घटनास्थळी पाठविली गेली. परंतु जेव्हा बचाव कर्मचारी अडकलेल्या लोकांपर्यंत पोहोचले तेव्हा सर्व काही संपले. असे सांगितले जात आहे की मृतदेह जाळले गेले नाहीत, म्हणून प्रारंभिक अंदाज असा आहे की धुरामुळे कामगार गुदमरल्यासारखे मरण पावले असते. पोलिस आयुक्त मनोज लोहिया म्हणाले, रात्री 1. 15 वाजता छत्रपती संभाजीनगरच्या वाळूज मिडीसी भागात कंट्रोल रूममध्ये कंट्रोल रूमची नोंद झाली. रात्री पोलिस एसीपी घटनास्थळी पोहोचले. तपासणी पूर्ण झाल्यानंतर पुढील माहिती उघडकीस येईल. प्राप्त झालेल्या माहितीनुसार, मृत मुश्ताक शेख (वय 65), कौशर शेख (वय 32), इक्बाल शेख (वय 18), काकांजी (वय 55), रियाझभाई (वय 32), मार्गम शेख (वय 33 वर्षे वय 33 वर्षे) ) घडले. तथापि, मृत व्यक्ती तिथे अडकला की झोपला होता हे अद्याप स्पष्ट झाले नाही. माहिती प्राप्त होताच अग्निशमन दलाने त्वरित घटनास्थळी पोहोचली. ज्या ठिकाणी हे लोक अडकले होते तो रस्ता पूर्णपणे ज्वालांमध्ये गुंतला होता. अग्निशमन दलाच्या कर्मचार्‍यांनी आग विझविली, परंतु धूर आणि उष्णता इतकी जास्त होती की ते त्वरित वर जाऊ शकले नाहीत. यानंतर शीतकरण ऑपरेशन झाले. यानंतर, ते काळजीपूर्वक वरच्या मजल्यावर पोहोचला. जिथे त्यांना खोलीत हृदय -विखुरलेले दृश्य पाहिले. त्या खोलीत सहा लोक मरण पावले होते. त्यात एक कुत्रा देखील होता.  अधिकाऱ्यांनी सांगितले की ही आग कारखान्याच्या आसपास होती आणि हे लोक पहिल्या मजल्याच्या आत अडकले होते.  अधिकाऱ्यांनी असेही म्हटले आहे की, आग का लागली याची अद्याप माहिती मिळाली नाही, पुढील तपास चालू आहे.

Chhatrapati Sambhajinagar: धक्कादायक! कारखान्याला भीषण आग, सहा मजुरांचा मृत्यू Read More »

IMG 20231230 WA0005

Ahmednagar News : टिपु सुलतानच्या नावापुढे श्री नाव जोडल्याने हिंदुंच्या धार्मिक भावना दुखावणाऱ्यांवरती कारवाई करा

Ahmednagar News: टिपु सुलतानच्या नावापुढे श्री नाव जोडल्याने हिंदुंच्या धार्मिक भावना दुखावणाऱ्यांवरती कारवाई करण्यात यावी या मागणीसाठी विश्व हिंदू परिषद तर्फे पोलीस अधीक्षक कार्यालयात निवेदन देण्यात आले आहे. या निवेदनात म्हटले आहे की, 30 डिसेंबर 2023  महाराष्ट्र बॉडी बिल्डर मान्यतेने अहमदनगर डिस्ट्रीक्ट बॉडी बिल्डींग आयोजित टिपू सुलतान श्री शरीर सौष्ठ्य स्पर्धा भरवणारे सय्यद शहा फैजल (शानु), सोहेल शेख व सर्व आयोजकां विरोधात हिंदु धर्माचे आराध्य दैवत गणपती यांचे श्री हे नाव भारतावरती इस्मामिक राज्य आणण्याच्या हेतुने लाखों हिंदुंचे कतलेआम करणाऱ्या व हजारो हिंदु मंदिरे पाडणाऱ्या, हिंदू महिलांवरती बलात्कार करणाऱ्या टिपु सुलतान या इस्लामिक जिहादी आक्रमंताचे नाव जोडुन हिंदु धार्मियांची भावना दुखावुन तसेच रहदारीला अडथळा निर्माण करुन शहरातील पोलिसांच्या दप्तरी नोंद असलेले अति संवेदनशील आशा टॉकीज परिसर ज्या भागातुन कुठल्याही हिंदुंच्या मिरवणुक, मोर्चे काढण्यासाठी पोलिसांचे परवानगीसाठी शर्तीचे प्रयत्न करावे लागते.  अशा ठिकाणी ही स्पर्धा भरवुन शहरामध्ये धार्मित तेढ निर्माण करण्याचे ठळक उद्देश दिसून येते.  यामधील सय्यद शहा फैजल (शानु) हा अनेक प्रकारच्या हिंदु मुस्लिम वादामध्ये आरोपी आहे. त्यामुळे राम मंदिराच्या प्राणप्रतिष्ठा सोहळ्याच्या पूर्वसंध्येला हे कारस्थान करुन शहर व राज्यासह देशात याचे पडसाद उमटण्याची शक्यता आहे.  त्यामुळे पोलिसांनी अतिशीघ्र संबंधीतांवर प्रतिबंधात्मक कारवाई करत व हिंदुंच्या भावना दुखावल्या प्रकारणी कठोर स्वरुपाचे गुन्हे दाखल करावे.

Ahmednagar News : टिपु सुलतानच्या नावापुढे श्री नाव जोडल्याने हिंदुंच्या धार्मिक भावना दुखावणाऱ्यांवरती कारवाई करा Read More »

IMG 20231228 WA0013

Ahmednagar News: आरोपी विरोधात कारवाई करा! ‘त्या’ प्रकरणात समस्त मुस्लिम समाजाची मागणी

Ahmednagar News :  मुकुंदनगर परिसरात मौलाना असलम शेख यांना 27 डिसेंबर रोजी मारहाण करण्यात आली होती. या मारहाणी विरोधात परिसरातील नागरिकांनी आज पोलीस अधीक्षक कार्यालयमध्ये निवेदनाद्वारे आरोपीवर कारवाई करण्याची मागणी केली आहे.  या प्रकरणात आरोपी असणाऱ्या अनिस सय्यदने मौलाना असलम शेख यांना गॅस कनेक्शनच्या वादातून जबरी मारहाण केली. या मारहाणीत मौलाना असलम शेख यांच्या उजव्या डोळ्याला मार लागला आहे.  या घटनेनंतर आरोपी विरोधात भिंगार पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. परिसरातील नागरिकांनी आरोपी विरोधात आणखी कलम वाढवून योग्य ती कारवाई करण्याची मागणी पोलीस अधीक्षक राकेश ओला यांच्याकडे केली आहे.

Ahmednagar News: आरोपी विरोधात कारवाई करा! ‘त्या’ प्रकरणात समस्त मुस्लिम समाजाची मागणी Read More »

IMG 20231227 WA0002

Maharashtra News: स्थानिक गुन्हे शाखेची मोठी कारवाई, ATM मशिन चोरी करणारी टोळी 48 तासांचे आत जेरबंद

Maharashtra News: अहमदनगर स्थानिक गुन्हे शाखेने मोठी कारवाई करत समशेरपुर, ता. अकोले येथील ए.टी.एम. मशिन चोरी करणारी टोळी 7,52,000 रुपये किमतीच्या मुद्देमालासह 48 तासांचे आत जेरबंद केली आहे.  23 डिसेंबर 2023 रोजी रात्री 12 ते सकाळी 06.00  चे दरम्यान समशेरपुर फाटा, ता. अकोले  येथील आदिवासी सहकारी सोसायटी कॉम्प्लेक्सचे गाळ्यामधील इंडिया 1 पेमेंट लि. कंपनीचे ए.टी.एम. मशिनला दोरखंड बांधुन ए.टी.एम. मशिन बोलेरो गाडीने बाहेर ओढुन कोणीतरी अज्ञात चोरट्यांनी चोरुन नेली होती.  फिर्यादी नितीन सखाराम पाटील यांनी दिलेल्या तक्रारीवरुन अकोले पोलीस ठाण्यात भादवि कलम 457, 380 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला होता. सदर गुन्ह्यामध्ये एकुण 90,000 रुपये किमतीचे मशिन व त्यामधील रोख रक्कम चोरी गेलेली होती. या घटनेचा तपास करण्यासाठी स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने समशेरपुर परिसरातील सी.सी.टी.व्ही. फुटेज तपासत असतांना गुन्ह्यातील आरोपी हे केळी रुम्हणवाडी मार्गे गेल्याचे दिसुन आले. पोनि दिनेश आहेर स्थानिक गुन्हे शाखा यांना गुप्त बातमीदारामार्फत सदर गुन्ह्यातील ए.टी.एम. मशिन हे आरोपी भरत लक्ष्मण गोडे व त्याचे इतर साथीदारांनी चोरुन नेले आणि तो त्याचे राहते घरी त्याचे इतर साथीदारांसह थांबलेला असल्याची माहिती मिळाली.  या माहितीवरून सदर ठिकाणी जावुन गुन्हे शाखेच्या पथकाने भरत लक्ष्मण गोडे , सुर्यभान उर्फ काळ्या लक्ष्मण गोडे, अशोक रघुनाथ गोडे ,  सुयोग अशोक दवंगे आणि अजिंक्य लहानु सोनवणे यांना ताब्यात घेत त्यांच्याकडून  1,42,000 रुपये रोख रक्कम, गुन्ह्यात वापरलेली बोलेरो गाडी, गुन्ह्याचे वेळी वापरलेले मोबाईल व तुटलेले ए.टी.एम. मशिनसह एकुण 7,52,000  रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त केला आहे.  ताब्यात घेण्यात आलेल्या आरोपींना पुढील तपासकामी अकोले पोलीस स्टेशन येथे हजर करण्यात आले असुन पुढील तपास अकोले पोलीस स्टेशन करीत आहे.

Maharashtra News: स्थानिक गुन्हे शाखेची मोठी कारवाई, ATM मशिन चोरी करणारी टोळी 48 तासांचे आत जेरबंद Read More »

IMG 20231227 WA0003

Ahmednagar News: डोक्यामध्ये हातोडा मारुन जबरी चोरी करणारे 02 आरोपी 5,06,250 रुपये किंमतीचे मुद्देमालासह जेरबंद

Ahmednagar News:  कार चालकाचे डोक्यामध्ये हातोडा मारुन जबरी चोरी करणारे परराज्यातील 02 आरोपी 5,06,250 रुपये किंमतीचे मुद्देमालासह 24 तासाचे आत जेरबंद स्थानिक गुन्हे शाखेची धडाकेबाज कारवाई.   25 डिसेंबर 2023 रोजी फिर्यादी सचिन बापु पठारे हे सुपा येथे त्यांचे कंपनीचे मॅनेजर यांना सोडुन घरी जात असतांना रस्त्त्याने जाणारे दोन प्रवाशांनी त्यांना हॉटेल अमृत येथे सोडणेबाबत विनंती केली.  यामुळे फिर्यादी यांनी एम. एच.12 व्ही. व्ही. 7336 त्यांच्या गाडीमध्ये  प्रवाशांना बसवुन घेवुन जात असतांना रत्त्याने गाडीमध्ये मागील सिटवर बसलेल्या प्रवाशाने फिर्यादीचे डोक्यामध्ये काहीतरी टणक वस्तुने मारुन त्यांना जखमी केले आणि त्याचेकडील कार, मोबाईल, व रोख रक्कम असा एकुण 5,04,000 रुपये  किमतीचा मुद्देमाल जबरीने चोरुन नेला. सदर घटनेबाबत सुपा पोलीस ठाणे भादवि कलम 394 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला होता.   गुन्ह्याचा सखोल तपास करत असताना पोनि. दिनेश आहेर यांना गुप्तबातमीदारामार्फत सदरची कार व त्यामध्ये दोन आरोपी असे कोपरगांव ते सिन्नर जाणारे रोडलगत एका पेट्रोलपंपाजवळ थांबलेले असल्याची माहिती मिळाली. पोनि दिनेश आहेर यांनी प्राप्त माहिती त्यांच्या पथकास कळवुन कार व आरोपी ताब्यात घेणेबाबत सुचना दिल्या.   पथकातील पोलीस अंमलदार हे कोपरगांव ते सिन्नर जाणारे रोडवर चोरी गेलेले कारचा शोध घेत असतांना सदरची कार ही रोडचे कडेला एका पेट्रोलपंपाजवळ उभी असल्याचे दिसुन आल्याने पथकाने सापळा रचुन कारमधील दोन आरोपींना ताब्यात घेतले.   शिवम मातादीन गौतम आणि दुर्जन अनारसिंग गौतम असे अटक करण्यात आलेल्या आरोपींचे नाव आहे. दोन्ही आरोपी उत्तर प्रदेशमधील आहे.  पोलिसांनी त्यांच्या अंगझडतीमध्ये कब्जात गुन्ह्यातील चोरीस गेली कार, मोबाईल, रोख रक्कम, गुन्ह्यात वापरलेला हातोडा असा एकुण 5,06,250 रुपये किमतीचा मुद्देमाल हस्तगत केला आहे आणि आरोपींना ताब्यात घेवुन पुढील तपासकामी सुपा पोलीस स्टेशनमध्ये हजर केला आहे.

Ahmednagar News: डोक्यामध्ये हातोडा मारुन जबरी चोरी करणारे 02 आरोपी 5,06,250 रुपये किंमतीचे मुद्देमालासह जेरबंद Read More »

IMG 20231226 WA0003

Ahmednagar News: ‘त्या’ प्रकरणात 05 आरोपी जेरबंद, स्थानिक गुन्हे शाखेची धडाकेबाज कारवाई

Ahmednagar News : अहमदनगर स्थानिक गुन्हे शाखेने मोठी कारवाई करत चापडगांव व आखेगांव ता. शेवगांव येथे सशस्त्र दरोडा घालणारे 05 आरोपींना 2,49,000 रुपये किंमतीचे मुद्देमालासह जेरबंद केले आहे. फिर्यादी कमलेश सुभाष वाल्हेकर 21 डिसेंबर 2023 रोजी हे त्यांचे कुटुंबासह घरामध्ये झोपलेले असतांना रात्री 01.00 ते 02.00 वा. चे सुमारास अनोळखी चोरट्यांनी घरामध्ये प्रवेश करुन फिर्यादी तसेच त्यांचे कुटुंबियांना चाकुचा धाक दाखवुन मोबाईल, सोन्या चांदीचे दागिने, मोटारसायकल, टी.व्ही., गॅस शेगडी, 6 शेळ्या असा एकुण 1,08,700 रुपये किमतीचा मुद्देमाल दरोडा टाकुन चोरुन नेला होता.  तसेच दिनांक 24 डिसेंबर रोजी फिर्यादी अभय राधाकिसन पायघन यांचे घरामध्ये रात्री 01.00 वा. चे सुमारास अनोळखी चोरट्यांनी प्रवेश करुन फिर्यादीची आई मंगल पायघन हिचे डोळयाच्या जवळ धारदार शस्त्राने तसेच रामकिसन पांडु काटे यांना मारहाण करुन 50,000 रुपये रोख रक्कम दरोडा टाकुन चोरुन नेली होती.  या घटनेनंतर शेवगांव पोलीस ठाण्यात भादवि कलम 392, 452, 504, 506, 34 व भादवि कलम 394, 452, 457, 380, 506, 511, 34 प्रमाणे गुन्हे दाखल करण्यात आला होता.  या घटनेचा तपास करत असताना पोलीस निरीक्षक दिनेश आहेर, स्थानिक गुन्हे शाखा, अहमदनगर यांना गुप्तबातमीदारा सदरचा गुन्हा हा दिपक गौतम पवार रा. टाकळीअंबड, ता. पैठण याने व त्याचे इतर साथीदारांनी केलेला असुन ते सध्या त्यांचे टाकळीअंबड येथील घरी व घरासमोर असलेल्या पालावर आलेले असल्याची खात्रीशिर बातमी मिळाली. यानंतर पथकातील पोलीस अधिकारी व अंमलदार यांनी तात्काळ टाकळीअंबड, ता. पैठण येथे जावुन दिपक गौतम पवार याचे घरास व त्याचे घरासमोरील असलेल्या पालांना चोहोबाजुने सापळा लावला असता सदर पालांमधुन काही इसम जवळच असलेल्या ऊसाचे शेतामध्ये पळुन गेले. पथकातील पोलीस अधिकारी व अंमलदार यांनी सदर ठिकाणी घरातील व पालामधील तसेच ऊसामध्ये जावुन लपुन बसलेल्या इसमांना ताब्यात घेतले. मिळुन आलेल्या आरोपींची अंगझडती तसेच त्यांचे घराची व पालाची झडती घेता त्यांचेकडे गुन्ह्यातील चोरीस गेले मालापैकी, मोबाईल, रोख रक्कम, शेळ्या, मोटारसायकल असा एकुण 2,49,000 रुपये किमतीचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला असुन त्यांना ताब्यात घेवुन पुढील तपासकामी शेवगांव पोलीस स्टेशन या ठिकाणी हजर करण्यात आले आहे. पुढील तपास शेवगांव पोलीस स्टेशन करीत आहे.

Ahmednagar News: ‘त्या’ प्रकरणात 05 आरोपी जेरबंद, स्थानिक गुन्हे शाखेची धडाकेबाज कारवाई Read More »

Accident 1

Maharashtra Accident News : राज्यात 12 तासात दुसरा मोठा अपघात! 3 तरुणांचा मृत्यू

Maharashtra Accident News : सोलापूर जिल्ह्यात  झालेल्या भीषण अपघातात तीन तरुणांचा मृत्यू झाला आहे.   अधिकाऱ्यांनी सांगितले की, बार्शी-धाराशिव मार्गावर राज्य परिवहन एसटी बस आणि दुचाकी यांच्यात भीषण अपघात झाला. या अपघातात धाराशिव जिल्ह्यातील तीन तरुणांचा जागीच मृत्यू झाला. बार्शी-धाराशिव रस्त्यावरील तांदुळवाडी येथे गुरुवारी सायंकाळी बस आणि दुचाकीची धडक झाली. यामध्ये धाराशिव जिल्ह्यातील तीन तरुणांचा बसने चिरडून मृत्यू झाला. लक्षात घेण्यासारखी बाब म्हणजे राज्य परिवहन बसचा 12 तासांत झालेला हा दुसरा मोठा अपघात आहे. एसटी बसने दुचाकीवरून आलेल्या तीन तरुणांना चिरडल्याचे प्रत्यक्षदर्शींनी सांगितले. त्यामुळे त्यांचा जागीच मृत्यू झाला. कार्तिक यादव, ओंकार पवार, ओम अतकरे अशी मृतांची नावे आहेत. हे तिघे मित्र धाराशिवहून बार्शीला जात होते. त्यानंतर त्यांची दुचाकी पुण्याहून धाराशिवकडे जाणाऱ्या एसटी बसला धडकली. हा अपघात एवढा भीषण होता की दुचाकीवर बसलेले तिघेही तरुण बसखाली अडकले. तरूणाचे शीर शरीरापासून वेगळे करण्यात आले. तर इतर दोघांनी हवेत सुमारे 50 फूट उड्या मारल्या. घटनेची माहिती मिळताच तांदुळवाडी ग्रामस्थ मदतीसाठी धावले. अपघातानंतर बसही रस्त्याच्या कडेला असलेल्या नाल्यात गेली. त्यामुळे बसमधील काही प्रवासी जखमी झाले. त्यांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. पोलिसांनी मृतदेह ताब्यात घेऊन शासकीय रुग्णालयात पाठवले आहेत.  सकाळी 6 च्या सुमारास शालेय विद्यार्थ्यांनी भरलेल्या बसला अपघात झाला. शैक्षणिक दौऱ्यावरून परतत असताना एसटी बसने एका टेम्पोला धडक दिली. या अपघातात 50 वर्षीय शिक्षक बाळकृष्ण काळे यांचा मृत्यू झाला. या अपघातात एक शिक्षक आणि अनेक विद्यार्थी जखमी झाले आहेत.  बसमध्ये पुणे जिल्ह्यातील इंदापूर तालुक्यातील बावडा येथील श्री शिवाजी विद्यालयाचे विद्यार्थी आणि शिक्षक होते. शालेय विद्यार्थी कोकण दौऱ्यावर गेले होते आणि काल सकाळी कोल्हापुरातून परतत होते. शाळेने राज्य परिवहन (एसटी) बस भाड्याने घेतली होती.

Maharashtra Accident News : राज्यात 12 तासात दुसरा मोठा अपघात! 3 तरुणांचा मृत्यू Read More »

Screenshot 2023 12 13 17 57 50 10 40deb401b9ffe8e1df2f1cc5ba480b12

Ahmednagar News: 31 डिसेंबरपर्यंत शिवछत्रपती पुरस्कारांच्या यादीत योगाचा समावेश: आ. सत्यजीत तांबे यांच्या पाठपुराव्याला यश

Ahmednagar News:  निरोगी आणि सकारात्मक आयुष्य जगण्यासाठीचा महत्त्वाचा क्रीडाप्रकार अशी ओळख असलेल्या योगविद्येचा समावेश आता शिवछत्रपती पुरस्कारांच्या यादीतही होणार आहे.  गेल्या दोन अधिवेशनांपासून आमदार सत्यजीत तांबे यांनी योगाला क्रीडाप्रकाराचा दर्जा द्यावा व या खेळाचा समावेश शिवछत्रपती पुरस्कारांच्या यादीत व्हावा, यासाठी पाठपुरावा केला होता. आता हिवाळी अधिवेशनातही त्यांनी याबाबतचा प्रश्न उपस्थित केला. क्रीडामंत्री संजय बनसोड यांनी 31 डिसेंबरच्या आत नियमावली तयार करून शिवछत्रपती पुरस्कारांच्या यादीत योगाचा समावेश केला जाईल, असं आश्वासन दिलं. त्यामुळे आ. सत्यजीत तांबे यांनी आणखी एक प्रश्न तडीला लावल्याची भावना व्यक्त होत आहे.  भारतीय संस्कृतीत उगम झालेली योगविद्या ही निरोगी आयुष्यासाठी अत्यावश्यक आहे. योगविद्येचा अभ्यास करणाऱ्यांना शारीरिक फायद्यांसोबतच मानसिक स्वास्थ्यही लाभते. त्यामुळे योगासनांचा समावेश क्रीडाप्रकारांत व्हावा, अशी मागणी आमदार सत्यजीत तांबे यांनी आमदार झाल्यानंतरच्या पहिल्याच अर्थसंकल्पीय अधिवेशनात केली होती. तसंच योगासनं करणाऱ्यांचा विचार शिवछत्रपती पुरस्कारांसाठी व्हावा व या पुरस्कारांच्या यादीत योगाचा समावेश व्हावा, याबाबतही ते आग्रही होते. त्यानुसार योगविद्येला क्रीडाप्रकाराचा दर्जा याआधीच मिळाला होता. आता हिवाळी अधिवेशनात पुन्हा एकदा आ. तांबे यांनी योगाचा समावेश शिवछत्रपती पुरस्कारांच्या यादीत व्हावा, याबाबत प्रश्न उपस्थित केला. या प्रश्नाला क्रीडामंत्री संजय बनसोड यांनी सकारात्मक प्रतिसाद देत 31 डिसेंबरच्या आधीच याबाबत नियमावली तयार केली जाईल, अशी ग्वाही सभागृहाला दिली. 9 खेळांचा शालेय राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेत समावेश व्हावा! स्कुल फेडरेशन ऑफ इंडियाने रोलबॉल, आट्यापाट्या, बॉल बॅडमिंटन, सिकई-मार्शल आर्ट, थ्रो बॉल, डॉज-बॉल, टेनिक्वाईट, शूटिंग बॉल आणि कॅरम हे खेळ शालेय राष्ट्रीय क्रीडा स्पर्धांमधून वगळले होते. त्यामुळे हे खेळ खेळणारे खेळाडू ग्रेस मार्क, सरकारी नोकरीत पाच टक्के आरक्षण अशा सुविधांपासून वंचित झाले होते. हा या खेळाडूंवर अन्याय आहे.  परिणामी स्कुल फेडरेशन ऑफ इंडियाने हे नऊ खेळ वगळण्याच्या आपल्या निर्णयाचा पुनर्विचार करायला हवा, अशी मागणी आ. सत्यजीत तांबे यांनी केली. या मागणीची दखल घेत खेळाडूंच्या अडचणींचा आणि भवितव्याचा विचार करून या खेळांचा समावेश शालेय राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेत करण्यासाठी योग्य ती कार्यवाही केली जात असल्याचं स्पष्टीकरण दिलं.

Ahmednagar News: 31 डिसेंबरपर्यंत शिवछत्रपती पुरस्कारांच्या यादीत योगाचा समावेश: आ. सत्यजीत तांबे यांच्या पाठपुराव्याला यश Read More »

Shivaji Maharaj

Chhatrapati Shivaji Maharaj : मनपाच्या आवारात छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याचे लोकार्पण सोहळा संपन्न 

Chhatrapati Shivaji Maharaj : आज अहमदनगर महापालिकाच्या आवारात छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याचे लोकार्पण सोहळा संपन्न. यावेळी खासदार सुजय विखे यांच्या पत्नी धनश्री विखे आमदार संग्राम जगताप देखील उपस्थित होते.  आपण पुतळे उभारतो मात्र छत्रपती शिवाजी महाराज यांचे आचार आणि विचार आपल्या मुलांमध्ये रुजवले गेले पाहिजे असे मत खासदार सुजय विखे यांच्या पत्नी धनश्री विखे यांनी व्यक्त केलं अहमदनगर महानगरपालिकेच्या आवारात छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याचे अनावरण खासदार विखे यांच्या पत्नी धनश्री विखे यांच्या हस्ते करण्यात आले यावेळी शहरातील अहमदनगर महानगरपालिकेचे पदाधिकारी अधिकारी उपस्थित होते  यावेळी जिल्हाधिकारी सिद्धराम सालीमठ, जिल्हा परिषदेचे मुख्यकार्यकारी अधिकारी आशिष येरेकर, आमदार संग्राम जगताप, महापौर रोहिणी शेंडगे, आयुक्त डॉ. पंकज जावळे, रणरागिणी महिला मंचच्या धनश्री विखे पाटील, उपमहापौर गणेश कवडे, सभापती गणेश कवडे, विरोधी पक्षनेते संपत बारस्कर,  अतिरिक्त आयुक्त डॉ. प्रदीप पठारे सभागृह नेते विनीत पाऊलबुद्धे, सुनील त्र्यंबके, सभापती पुष्पाताई बोरूडे, मीनाताई चोपडा, रूपाली वारे आदींसह सर्वपक्षीय नगरसेवक उपस्थित होते. दरम्यान, महापौर रोहिणी शेंडगे, उपमहापौर गणेश भोसले, सभापती गणेश कवडे यांनी मनोगत व्यक्त केले. प्रास्ताविक आयुक्त डॉ. पंकज जावळे यांनी केले. सूत्रसंचालन उद्धव काळापहाड यांनी केले तर, अतिरिक्त आयुक्त डॉ. प्रदीप पठारे यांनी आभार मानले. प्रशासकाचा कारभार माझ्याकडे यावा नगर शहराला 500 वर्षांपूर्वीचा इतिहास आहे. छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा शहराच्या वैभवात भर घालणार महत्त्वाचा पैलू आहे. मनपाचा प्रशासकीय कारभार माझ्याकडे असल्यास सीना नदी अतिक्रमण मुक्त करण्यासाठी प्रयत्न करू. ज्या शहरात नदी वाहते त्या शहराचा विकास होतो. नगरसेवकांनी छत्रपतींचा आदर्श डोळ्यासमोर ठेवून काम करावे. शहराचे प्रश्न सोडविण्यासाठी नगरकरांच्या बाजूने उभे राहू, असे आश्वासन जिल्हाधिकारी सिद्धराम सालीमठ यांनी दिले.

Chhatrapati Shivaji Maharaj : मनपाच्या आवारात छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याचे लोकार्पण सोहळा संपन्न  Read More »