DNA मराठी

Ahmednagar News: डोक्यामध्ये हातोडा मारुन जबरी चोरी करणारे 02 आरोपी 5,06,250 रुपये किंमतीचे मुद्देमालासह जेरबंद

IMG 20231227 WA0003

Ahmednagar News:  कार चालकाचे डोक्यामध्ये हातोडा मारुन जबरी चोरी करणारे परराज्यातील 02 आरोपी 5,06,250 रुपये किंमतीचे मुद्देमालासह 24 तासाचे आत जेरबंद स्थानिक गुन्हे शाखेची धडाकेबाज कारवाई. 

 25 डिसेंबर 2023 रोजी फिर्यादी सचिन बापु पठारे हे सुपा येथे त्यांचे कंपनीचे मॅनेजर यांना सोडुन घरी जात असतांना रस्त्त्याने जाणारे दोन प्रवाशांनी त्यांना हॉटेल अमृत येथे सोडणेबाबत विनंती केली.

 यामुळे फिर्यादी यांनी एम. एच.12 व्ही. व्ही. 7336 त्यांच्या गाडीमध्ये  प्रवाशांना बसवुन घेवुन जात असतांना रत्त्याने गाडीमध्ये मागील सिटवर बसलेल्या प्रवाशाने फिर्यादीचे डोक्यामध्ये काहीतरी टणक वस्तुने मारुन त्यांना जखमी केले आणि त्याचेकडील कार, मोबाईल, व रोख रक्कम असा एकुण 5,04,000 रुपये  किमतीचा मुद्देमाल जबरीने चोरुन नेला. सदर घटनेबाबत सुपा पोलीस ठाणे भादवि कलम 394 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला होता. 

 गुन्ह्याचा सखोल तपास करत असताना पोनि. दिनेश आहेर यांना गुप्तबातमीदारामार्फत सदरची कार व त्यामध्ये दोन आरोपी असे कोपरगांव ते सिन्नर जाणारे रोडलगत एका पेट्रोलपंपाजवळ थांबलेले असल्याची माहिती मिळाली. पोनि दिनेश आहेर यांनी प्राप्त माहिती त्यांच्या पथकास कळवुन कार व आरोपी ताब्यात घेणेबाबत सुचना दिल्या.  

पथकातील पोलीस अंमलदार हे कोपरगांव ते सिन्नर जाणारे रोडवर चोरी गेलेले कारचा शोध घेत असतांना सदरची कार ही रोडचे कडेला एका पेट्रोलपंपाजवळ उभी असल्याचे दिसुन आल्याने पथकाने सापळा रचुन कारमधील दोन आरोपींना ताब्यात घेतले. 

 शिवम मातादीन गौतम आणि दुर्जन अनारसिंग गौतम असे अटक करण्यात आलेल्या आरोपींचे नाव आहे. दोन्ही आरोपी उत्तर प्रदेशमधील आहे. 

पोलिसांनी त्यांच्या अंगझडतीमध्ये कब्जात गुन्ह्यातील चोरीस गेली कार, मोबाईल, रोख रक्कम, गुन्ह्यात वापरलेला हातोडा असा एकुण 5,06,250 रुपये किमतीचा मुद्देमाल हस्तगत केला आहे आणि आरोपींना ताब्यात घेवुन पुढील तपासकामी सुपा पोलीस स्टेशनमध्ये हजर केला आहे.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *