Dnamarathi.com

Ahmednagar News :  मुकुंदनगर परिसरात मौलाना असलम शेख यांना 27 डिसेंबर रोजी मारहाण करण्यात आली होती. या मारहाणी विरोधात परिसरातील नागरिकांनी आज पोलीस अधीक्षक कार्यालयमध्ये निवेदनाद्वारे आरोपीवर कारवाई करण्याची मागणी केली आहे. 

या प्रकरणात आरोपी असणाऱ्या अनिस सय्यदने मौलाना असलम शेख यांना गॅस कनेक्शनच्या वादातून जबरी मारहाण केली. या मारहाणीत मौलाना असलम शेख यांच्या उजव्या डोळ्याला मार लागला आहे. 

या घटनेनंतर आरोपी विरोधात भिंगार पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. परिसरातील नागरिकांनी आरोपी विरोधात आणखी कलम वाढवून योग्य ती कारवाई करण्याची मागणी पोलीस अधीक्षक राकेश ओला यांच्याकडे केली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *